महाराष्ट्रियन घरात डिशवॉशर कितपत उपयुक्त?
आजकाल घरकाम बायांच्या सुट्ट्या बर्याच वाढत चालल्यायत. चालायचेच!
ऐनवेळी असा प्रसंग असल्यास अडचण होते. विषेशतः पाहुणे वगैरे असल्यास. तर, जसा रोबो फ्लोअर क्लिनर वगैरे हाताशी उपयोगी पडतो तसा डिशवॉशर उपयुक्त आहे का? भांडी आपली नेहमिचीच - ताट , वाटी, पेले, चमचे वगैरे...की घेतल्यावर आणी नवलाई संपल्यावर नुसताच ; मला पहा अन फुले वाहा! आणि मग नंतर नुसताच 'भुईला भार'?