I am not in danger, Skyler. I am the danger ! हायझेनबर्ग फॅन क्लब

Submitted by च्रप्स on 13 December, 2024 - 16:01

ही फक्त एक series नाही, ती एक experience आहे.
जसं वॉल्टर म्हणतो, “Say my name”—जर तुम्ही हे पाहिलं नाही, तर तुम्ही खरं thrill चुकवत आहात!

का पाहावी?
1. Thriller आणि Drama चं Perfect Combination: एका साध्या माणसाचा crime lord बनण्याचा प्रवास तुम्हाला एका क्षणासाठीही स्क्रीनवरून दूर जाऊ देत नाही.
2. Unforgettable Characters: वॉल्टर, जेसी, स्कायलर, गस फ्रिंग—प्रत्येक पात्र वेगळं आणि विचार करायला लावणारं.
3. Unexpected Twists आणि Turns: प्रत्येक episode नवं suspense आणि thrill घेऊन येतो. काहीच predictable नाही.
4. Phenomenal Direction: Vince Gilligan च्या direction मुळे प्रत्येक सीन art piece वाटतो.
5. माणसाचा संघर्ष: चांगलं आणि वाईट यामधल्या line वर चालणारी ही गोष्ट तुमचं मन हेलावून टाकते.

वॉल्टर म्हणतो, “I am not the danger. I am the danger.” त्या वेळी तुम्हाला हे पटत नाही. पण जेव्हा सिरीज पुढे जातं, तेव्हा तुम्हाला ते समजतं.

सिरीजच्या सुरुवातीला हे संवाद ऐकताना आपल्याला वाटतं की वॉल्टर फक्त एक सामान्य माणूस आहे, जो आपली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत आहे. पण जसजसा शो पुढे जातो, तसे वॉल्टरची मानसिकता आणि त्याचा बदल जाणवतो. त्याचा हा संवाद, “I am the danger,” त्याच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्याच्या प्रवासाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनतो. There comes a point when you truly grasp that Walter White has evolved into a powerful, ruthless पर्सन who won’t let anything or anyone stand in his way.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पत्रकारितेत शिरताय का? इंग्रजी- मराठी शब्द गुणोत्तर अगदी योग्य जमलं आहे. काही अर्थबोध न होता काही तरी भारी लिहिलंय ही वाटतंय. क्लिक बेटवर काम करायची गरज आहे. बाकी अ‍ॅड रेव्हेन्यू चालू होऊन जाईल.
ह्याचा ग्रुप चुकला. वेबसिरीज मध्ये हलवा.

धन्यवाद, अमित. मला आता group कसा change kela पाहिजे हे माहित नाही. मी मुद्दामच त्या मालिकेचे नाव दिले नाही कारण मला खरे चाहत्यांनाच इथे येऊन राहावे अशी इच्छा आहे. खूप लोक आहेत जे फक्त टाइमपास करत आहेत आणि ट्रोल करत आहेत. ते इथे येऊ नयेत. जे खरे चाहते आहेत, त्यांना malice समजेल की मी कोणत्या मालिकेबद्दल बोलत आहे.

वॉल्टरची मानसिकता >> एका सामान्य वाटणाऱ्या माणूस किती सहज पणे खोटं बोलतो वागतो... हे आता जास्त लक्षात येतंय.

उत्सुकता निर्माण झाली आहे
पण ही सिरीज इंग्लिश मध्येच बघावी लागेल का?
हिंदी मध्ये ऑडियो उपलब्ध आहे का?
इंग्लिश मध्ये सब टायटल वाचायला वैताग येतो.. आणि या लोकांचे ऐकलेले इंग्लिश काही कळत नाही.

इंग्लिश मध्ये सब टायटल वाचायला वैताग येतो.. आणि या लोकांचे ऐकलेले इंग्लिश काही कळत नाही.>> सवय होईपर्यंत होतो थोडा त्रास. पण तरीही बघाच.
आणि ती झाली की better call soul.

it's all good man!

मी किमान 3 ते चार वेळा पूर्ण सिरीज पाहिली आहे. BrBaआणि GoT प्रत्येक वेळी नवीन काहीतरी सापडतं.. जेसी आणि walter चं वेगळंच नातं, बाहेर पडायचं तर आहे तरी मानवी लोभ आणि सरतेशेवटी येणारं रितेपण, फोल असल्याची जाणीव सगळंच कमाल!

ही सिरीज नुकतीच आली होती तेव्हापासून म्हणजे २०१० सालापासून बघण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. समहाऊ कधी अपीलच झाली नाही. मागच्या वेळी निकराचा प्रयत्न करून पाचव्या एपिसोडपर्यंत पोहोचलो होतो. अख्ख्या जगाला आवडणारी सिरीज आपल्याला ॲप्रिशियेट होत नाही याचं आश्चर्य वाटतं.

ऋन्मेSSष, अरे खर म्हणजे अमेरिकन इंग्लिश ऐकताना समजायला खुप सोप्पे असते( ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन अ‍ॅक्सेंट पेक्षा). थोडे पेशन्स दाखवुन महिनाभर बघत( ऐकत) रहा. कानाला आपोआप सवय होइल. मग हीच काय ,नेटफ्लिक्स आवडत असेल तर त्यांची ओरिजीनल, पाब्लो एस्कोबारवरची “ नार्को“ ही सिरीज बघ तसच नेटफ्लिक्स वर “ ओझार्क” ही सिरीज पण मस्त आहे. एच बी ओ असेल तुझ्याकडे तर “ चेर्नोबिल“ ही सिरीज बघ व पिकॉक असेल तर “ यलोस्टोन” ही केव्हिन कॉसनरची सिरीज बघ. अमेरिकन अ‍ॅक्सेंट समजत नाही अस म्हणत राहीलास तर या सगळ्या मस्त बिंजवर्दी मालीकांना मुकशील Sad

अमेरिकन अ‍ॅक्सेंट समजत नाही अस म्हणत राहीलास तर या सगळ्या मस्त बिंजवर्दी मालीकांना मुकशील>> आणि चांगल्या सिनेमाना पण.

सायो, तो धागा आपल्याच मैत्रिणीने काढला आहे, ती आपल्याला दुसर्‍याच नावाने परिचित अहे, अनेकदा भेटलो आहोत.

<<समहाऊ कधी अपीलच झाली नाही. ??
मला पण नाही. बरेचदा प्रयत्न केला पण माझा नि अंमली पदार्थ नि त्यांचा धंदा यांचा काय संबंध? मला त्यात काय इंटरेस्ट?
<<अख्ख्या जगाला आवडणारी सिरीज??
अख्खे जग म्हणजे फक्त टीव्ही वर आहे म्हणून बघायचे असे करणारे लोकच फक्त.
मी आपला फक्त क्रिकेट नि अमेरिकन फुटबॉल बघतो.
दोन्ही मधे ठळक घटना समजतात, बारकावे समजत नाहीत.