खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

एक वाटी बेसन घेऊन त्यात चवीप्रमाणे तिखट मीठ, हळद, लसूण -मिरची पेस्ट, दोन चमचे आंबट दही व अर्धी वाटी पाणी घालून पेस्ट केली. गॅसवर जाड बुडाच्या पातेलीत अर्धी वाटी पाणी उकळत ठेवले, त्यात एक चमचा तेल घातले आणि हे बेसनाचे मिश्रण ओतून पटापट हलवले. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. झाकण ठेवून वाफ काढायची आणि गरम असतानाच ही उकड थोडी मळून घ्यायची. सपाट चाळणीला तेलाचा हात लावून, त्यावर जाड शेवेच्या
जाळीने सोऱ्यातून कुरडया पाडायच्या व ती चाळणी वाफेवर ठेवून पुन्हा पाच सात मिनिटे वाफवून घ्यायचे.
(इडली पात्रातील गोलांमध्येही छोट्या कुरडया पाडून एकदम वाफवता येईल)
Happy
खायला देताना वरून खोबरे कोथिंबीर भुरभुरून द्यायचे.
(उकड इज द की! पाण्याचा अंदाज सवयीने जमतो)
Happy
ब्रेकफास्ट साठी चांगला पर्याय आहे.

प्रगतीच्या वाटेवर.

मागच्या बेकिंग क्लासपेक्षा ह्या ओटस् + काजू कुकीज़ जास्त चांगल्या जमल्या.

4b2be84e-3b76-431c-b1be-d7a181dd5c9f.jpeg

Expert Level नाही पण वाईटही नाही. एक पाऊल पुढे.

Sunday noon well spent !

आई ग्ग!!! कुकीज माझा वीक पॉइन्ट आहे. कोणत्याही कुकीज. पण ओटमील रेझिन नाही ज्या की चॉकलेट चंक कुकीज सारख्या दिसतात आणि आपण भस्सकन खातो आणि अपेक्षाभंग होतो Happy

ओटमील रेझिन पुढच्या रविवारी करणार आहे.

ते क्रंबलिंग टेक्शचर कसे आणायचे ते शिकायचे आहे

त्यापुढच्या वीकेंडला तर आलाच सांताबाबा. प्लम केक मात्र professional baker पारशी बावा / बावीने बेक केलेला तयार मिळेल अशी अपेक्षा आहे Happy

़खलबत्त्यात कुटलेली लसुण शेगदाणा चटणी
IMG_4893.jpeg

नाश्ता बनवायला नवीन बाई कामाला ठेवली आहे. पीठ वगैरे बनवण्यापासून सगळे स्वतःच करते. आपण फक्त सोफ्यावर लोळत ताटात गरमागरम डोसा यायची वाट बघायची.

कसेही झाले तरी चांगलेच लागले असते. पण खरेच चांगले लागतात त्यामुळे खोटे खोटे कौतुक करायची चोरी झाली आहे Happy

IMG-20241203-WA0006.jpg
.
IMG-20241203-WA0002.jpg
.
IMG-20241203-WA0003.jpg

हो अगदीच...
आणि आज दुपारी घरून फोन आला की ऑफिसवरून रात्री कधी येणार आहेस..
काहीतरी स्पेशल सरप्राईज आयटम ती बनवणार आहे जो आता दुपारी छोट्या ऋन्मेषसाठी बनवून, त्याला खाऊ घालून, त्याला आवडून झाला आहे. आता माझ्यावर प्रयोग करायचा आहे Happy

Pages