मत (opinion?)

Submitted by जोशी काका on 21 November, 2024 - 03:14

Vote Image.jpgमत (opinion?)

सख्या, कसला रे हा मेळा,
हा कसला सांग सोहळा?

मी वनवासी रानांतून,
मी मुकी बाहुली आतून,
घाबरतो जीव जरासा,
ही गर्दी, गोंधळ पाहून.

ही रांग कशी ही अजब रे,
का उभे इथे हे सारे,
राजे, धनिक अन भटजी,
सोडुनी वैभव, सख्या रे?

म्हणे, हीच असे आजादी,
ना प्रमुख कोणी, ना इत्यादी,
सर्वांची किंमत एकच,
असो राजा, वजीर वा प्यादी.

तू आज खास, तू राणी,
तू सर्वज्ञ, तू शहाणी,
देऊनी मत तुझेही,
लिही देशाची तू कहाणी.

मी कोण, काय मत माझे,
मी नेहमी निमूटच साजे,
लग्नाच्या विषयांतूनही,
“मत” कुणी जाणले जरासे?

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे. कवितांमधले फार कळत नाही पण यमके अशी जमली की वाचायला छान वाटते.

आशयाच्या दृष्टीने एकदम चपखल आहे.

धन्यवाद!

निवडणुकीतील मताचा विचार करताना या कवितेत व्यक्तीच्या मताचे महत्व, समाजातील समानता आणि व्यक्त होण्याच्या प्रवासावर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

आवडली कविता.
ना प्रमुख कोणी, ना इत्यादी, - वा!

कविता आवडली. कवितेतल्या साध्या स्त्री सारखी साधी प्रांजळ. मेसेज आहे पण अभिनिवेश नाही.