मत (opinion?)
Submitted by जोशी काका on 21 November, 2024 - 03:14
मत (opinion?)
सख्या, कसला रे हा मेळा,
हा कसला सांग सोहळा?
मी वनवासी रानांतून,
मी मुकी बाहुली आतून,
घाबरतो जीव जरासा,
ही गर्दी, गोंधळ पाहून.
ही रांग कशी ही अजब रे,
का उभे इथे हे सारे,
राजे, धनिक अन भटजी,
सोडुनी वैभव, सख्या रे?
म्हणे, हीच असे आजादी,
ना प्रमुख कोणी, ना इत्यादी,
सर्वांची किंमत एकच,
असो राजा, वजीर वा प्यादी.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा: