विधान सभा निवड्णुक २०२४

Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44

चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही

पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये

पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली

स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले

लाडकी बहीण जोरात चाललैये

विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

इथे कुणालाही शेअरबाजारात पैसे गुंतवण्यात रस नाही. बोकलत आणि तुम्ही तुमच्या घरात जाऊन सागरगोट्या खेळत पैसे लावा. >>
Happy

शक्यतो तुम्ही लिहिता त्याला राजकारणाची जोड द्या म्हणजे या धाग्याचा उद्देश पण सफल होईल >>
एक पोस्ट लिहीली आहे. मविआचा जोर कमी होताना दिसला तर लिहीन थोडफार.
Wink

पण गेले १-२ दिवस जरा वेळ होता म्हणून आलो होतो. उद्यापासून बिझी असणार आहे. परवा बाहेरगावी जाणारेय. तर मग भेटू २-३ दिवसांनी.
तोपर्यंत मवीआला जिंकवत ठेवण्याला सर्वांना शुभेच्छा.
Wink
Happy

जाता जाता बोकलत साहेबांच्या शिफारशीप्रमाणे थोडसं लिहून रजा घेतो.
१. संविधान खतरेमें हैं ची हवा फारशी राहिलेली नाही.
२. भाजप आरक्षण काढून टाकणार हा नॅरेटीव्ह आता फारसा प्रभाव पाडेनासा झालाय.
३. बटेंगे तो कटेंगेंनी मतदान वाढायची शक्यता वाढत चाललीय.
४. उगीच बेगडा सेक्युलरवाद बाळगायचा आव सोडायची भाजपाची तयारी झालेली असल्याने या निवडणूकीतील यशानंतर विरोधी पक्षांना भाजपाला थोपवायचं कसं हे २०१४ प्रमाणेच कळेनासे होणार आहे.
५. हे मुद्दे अजिबात समजून न घेतल्याने किंवा त्याचीच उडवाउडवी केल्याने भाजपाचे आणखीनच फावणार आहे. तर विरोधी पक्ष याला प्रत्युत्तर शोधण्यात कमी पडून आणखी गर्तेत जायची शक्यता आहे.
Happy

बोकलत साहेब २-४ दिवसांनी जमलं तर भेटू.
_/\_

ज्जे बात भागवत साहेब. विरोधकांकडे वरच्या प्रतिसादाला उत्तर नाही. पण आम्हाला असे एकाकी सोडून जाऊ नका. मोबाईलवरून टाईप करत रहा इथे तेव्हढेच पैसे खुळखुळतील आमच्या खिशात. तुमच्याकडून अजून शेअर मार्केटबद्दल जाणून घ्यायला आवडेल. लिहीत रहा.

भाजपच्या बाजूने ओबीसी मतदान झालं तरच भाजप ६० पर्यंत मजल मारू शकेल. ओबीसी मतदान भाजपला होऊ नये याची व्यवस्था भुजबळांनी केली आहे. त्यांचे डावपेच यशस्वी झाले तर भाजप ९० च्या आधी जिथे होती तिथे जाऊन पोहोचेल.

अजित पवारांनी न्युज लाँड्रीच्या श्रीनिवासन जैनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की २०१९ साली राकॉ भाजप सरकार स्थापन करण्याच्या दिशेने दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी एक बैठक झाली.<<<<<
शरद पवारांच्या निवासस्थानी नाही... अदानीकडे झाली बैठक

लोकसभेच्या अनुभवातून आपण बोलण्याऐवजी राज ठाकरेंना शरद पवारांविरुद्ध बोलायला सोडलं वाटतं यावेळेस...

बाकी रुपया रसातळाला गेला आणि शेअर बाजार पडला याचं कारण परकीय गुंतवणुकदारांनी पैसे काढून घेतले हे नसून महाराष्ट्रातील निवडणुक आणि त्यात भाजप येणार नाही असं कोणी सांगितलं हे आहे हा जावईशोध भारी आहे. भाजप येणार ही काळ्यादगडावरची रेघ आहे.

दान नव्हे , कर्तव्य !

"केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाऐवजी मतकर्तव्य या शब्दाचा स्वीकार करावा"
अशी मागणी परिवर्तन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शैलेश गुजर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.
-----------------------------------------------------------

आणि "प्रचारसभा" ऐवजी "बरळ-आखाडा" शब्द स्वीकारावा अशी मी विनंती करतो.

जानेवारीपासून पुन्हा आंदोलन
दीडशे वर्षांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण होते. पण ते नंतर त्यांना आरक्षण कोट्यातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळेच आरक्षण आंदोलन पुढे चालू ठेवण्यासाठी निवडणुकीत उमेदवार उभे केले नसल्याचा दावा जरांगे यांनी केला. सरकार कोणाचेही येवो पुन्हा जानेवारीपासून आरक्षणाच्या मागणीसाठी सामुहिक आंदोलन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बातमी साभार - लोकसत्ता

धनुष्यबाण शिंदेंकडे आहे हे त्यांना माहिती असेल का ? >>>>
माहिती नसायला काय झालं? फ२० च्या मुमपदाच्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळालं जे मविआच्या काळात सुप्रीम कोर्टात टिकलं नाही हे सोयीस्करपणे विसरलेत तसंच हेही विसरले असतील. माजी मुम व आजी उमुम म्हणून फ२० दिसतात पण आत्तापर्यंत आरक्षणाचा ‘आ’ पण न उच्चारणारे मराठा स्ट्रॉंगमेन राजकारणी विसरतात तसंच हेही विसरले असतील.

दीडशे वर्षांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण होते ?

जरांगे पाटील इथे असाल तर या प्रश्नांचे उत्तर द्या. मायबोली वांट्स टू नो.

आधी छगन भुजबळ आणि मग अजित पवारांनी मुलाखत द्यायची आणि मग ती नाकारायची असा क्रम लावलेला आहे. मज्जाच मज्जा चालू आहे.
यामागे काका नसतीलच याची खात्री नाही. क्लीन चिट्स घेऊन झालेल्या आहेत. भुजबळांवर आम्ही केस का टाकली ते आठवत नाही, पेपर्स सुद्धा मिळत नाहीत, असं ए ईडीने न्यायालयाला सांगितलं .

साहेबांनी एका मुलाखतीत सांगितले की दादानी विचारधारा बदलली आणि ती आमच्या विचारधारेला मिळणारी झाली तर ते आमच्याकडे यायला आमची मनाई नाही.

जे शक्य ते लिहीत जा, आम्हीही वाचतोय >>

ट्रंप आत्मनिर्भर अमेरिका करायचं म्हणतोय. आता मोदींच्या आत्मनिर्भरचं काय होणार?
मविआ वाले झोडपा मोदीला. Wink

तो फडणवीस एफडीआय मधे १ नंबर मिळवतोय काय? आकडेवारीवरून सिध्द करतो काय?
मविआवाले त्या फडणवीसांना विचारा की, आता कसं करणार आहेस आत्मनिर्भर महाराष्ट्र ते? काहीतरी जुनीपानी आकडेवारी तोंडावर फेकत असतो. Wink
दोन महिन्यांपूर्वीची असली म्हणून काय झालं? जुनी ती जुनीच.
Happy

आता बास.
फार वेळ जातो बॉ.
_/\_

लोकसत्तेच्या ज्या पानावर दीडशे वर्षांच्या आरक्षणाचं वक्तव्या हे, त्याच पानावर हेही आहे.

मुस्लिम विरोध करताना मराठा समाजाच्या हातात लाठ्या देऊन त्यांचा वापर करून घेतला जातो.

नितीन गडकरी
बटेंगे तो कटेंगे - संघाची हिंदुत्वाची व्याख्या सर्व भारतीयांना सामावून घेणारी आहे.
एक है तो सेफ है - मी री जाहिरात पाहिली नाही त्यामुळे त्यावर काही बोलणार नाही .
(अशा) घोषणांच्या गरजेविषयी मी बोलणे योग्य नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो आणि व्यक्तीही वेगवेगळ्या असतात.

---
महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे या घोषणेची गरज नाही. मी या घोषणेचे समर्थन करत नाही - पंकजा मुंढे

--

फडणवीसांनी आणलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावं यासाठी केंद्र सरकारने मदत केली होती का? आरक्षणावरची ५०% मर्यादा हटवली तर ही समस्या सुटू शकते. हे केंद्रच करू शकतं. तसंही ८ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या - तथाकथित आर्थिक दुर्बलांना सवर्ण आरक्षण देताना १० टक्के वरूनच दिले आहेत.

शाम भागवत सर सगळ्यांची विनंती धुडकावा, तुमचा “अमूल्य” अभ्यास ह्या धाग्यावर नकोय. ज्यांना हवाय त्या वयक्तिक पाठवा.

“ही निवडणूक… शरद पवारसाहेब, उद्धवजी ठाकरे, राहुल गांधी विरुद्ध દેવેન્દ્ર ફડણવીસ, એકનાથ શિંદે, અજિત પવાર अशी आहे.
विषय कट!”
व्हॉट्सअप वर आलं. Happy

श्याम सर हाच तो दिवस आहे ज्यासाठी तुम्ही ट्रेडिंग सुरू केली होती. जग हळूहळू तुम्हाला ओळखायला लागलं आहे. लवकरच तुम्ही एक प्रो ट्रेडर बनणार आहात त्याच दिशेने तुमची वाटचाल सुरू आहे. प्रवास अर्धवट सोडू नका अजून पोस्टी येऊ दे.

“ही निवडणूक… शरद पवारसाहेब, उद्धवजी ठाकरे, राहुल गांधी विरुद्ध દેવેન્દ્ર ફડણવીસ, એકનાથ શિંદે, અજિત પવાર अशी आहे.
>>> पण मग ‘केम छो वरळी‘ कुठल्या गटात जाणार?

Pages