घरातून उठून व्यायामाला कसे जावे? - व्यायाम विस्थापन व्यवस्थापन

Submitted by किल्ली on 11 November, 2024 - 05:57

नमस्कार.

सकाळी किंवा संध्याकाळी (कधीही सध्या वेळ महत्वाची नाहीये )
घरातून जागेवरून उठून केलेल्या निश्चयास अनुसरून जिम, running किंवा तत्सम ठिकाणी जेथे व्यायाम केला जातो तिथे कसे जावे?
स्थिरपणे निवांत बसलेले असताना, किंवा साखरझोपेतून जागी होऊन, जागेवरून उठून योगासन कशी करावीत?
.
व्यायाम विस्थापन व्यवस्थापन हा अत्यंत दुर्लक्षित विषय आहे. हयाविषयी कुणीही बोलत नाही म्हणून तुमच्या निदर्शनास हा प्रश्न आणत आहे.
कृपया मार्गदर्शन करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सकाळची वेळ सगळ्यात बेष्ट. पहिली पायरी म्हणजे घड्याळ गजर लावून लांब कुठेतरी ठेवावे शक्यतो दुसऱ्या खोलीत.

Warming up

एखादी आवडणारी गोष्ट व्यायामाला जाण्याशी निगडीत कर. म्हणजे व्यायामाला गेल्याशिवाय वाडेकरांना चहा देणार नाही वगैरे. मग ती गोष्ट करण्यासाठी आधीचं काम करायची इच्छा होते.
आता मीच तुला टास्क देते. उद्या व्यायामाला गेल्याशिवाय वाड्यावर यायचं नाही सकाळी. दिसलीस तर मी विचारणार बरं.

हेहेहेहे देवकी मी पण हेच म्हणणार होते, मृ ला विचार. मी पण विचारीन. मी सद्ध्या माझी मॅट गुंडाळून ठेवली आहे,
बरं झालं धागा काढलास

माझेमन +१
ऑडिओ बुक, पॉडकास्ट आवडत असतील तर एखादं चांगलं ऐकायचं आहे असं ऑडिओ बुक, शक्यतो लायब्ररीतून, म्हणजे मर्यादित वेळात पूर्ण करायचं बंधन असेल किंवा अन्यथा चालू कर. ते फक्त व्यायाम करतानाच ऐकायचं असं ठरव. पहिले एक दोन दिवस पुस्तकात रस निर्माण झाला की त्यासाठी बाहेर पडणं आपोआप चालू होईल.

सकाळी उठायचा आळस येत असतो तेव्हा, दिवसभर आपल्याला या आळसाचा खूप खूप guilt येणार आहे हे आठवावे. माझ्यासठी हे काम करते.

व्यायामाला गेल्याशिवाय वाडेकरांना चहा देणार नाही >> आणि किल्ली ताईंना चहा मिळणार नाही.

व्यायाम झाला की स्वतःला ट्रीट द्यायची, आवडीची एखादी गोष्ट करायची उदा. छोटी गोळी किंवा खडीसाखर खायची.

एखादे ट्रॅकर ॲप वापरून पहा ज्यात तू रोजची एन्ट्री टाकू शकशील. ते पाहून हुरूप वाढू शकतो.

मला व्यक्तिशः Habuild ऑनलाईन योगा क्लास चा उपयोग झाला. तुम्ही क्लास अटेंड केला की ते रोज काउन्ट मेसेज करतात. आपोआप आपण तो काउन्ट वाढवायच्या मागे लागतो आणि रोज न चुकता क्लास अटेंड करायला लागतो. सवय लागून जाते.

मला वाटतं रोज व्यायाम ठराविक वेळीच करता येणार आहे नाहीतर नाही हा कळीचा मुद्दा ठरतो या क्लास मध्ये. ते रेकॉर्डिंग देत नाहीत. आजचा क्लास हुकला तर हुकलाच. त्यामुळे ' बघू, नंतर करू ' अशी आपण आपल्यालाच हुलकावणी देऊ शकत नाही.

काही लोक पैसे भरून क्लास लावतात, पैसे बुडायचा गिल्ट येतो आणि आपोआप नियमितपणा येतो.
काही वर्ष मी तसे केले. कोव्हीड पासून घरी अ‍ॅप वर व्यायाम करते, कॅलरी काऊंट येतो जरा हुरूप वाढतो.
जरा इंचेस कमी झाले की नवा ड्रेस्स घेते किंवा चीट फूड. दिवाळीत जरा जास्त च झालय Sad

एखादी आवडणारी गोष्ट व्यायामाला जाण्याशी निगडीत कर.
>>>>>

मी हा प्रयोग करून पाहिला.
पण तिने व्यायाम सोडला तसे माझाही थांबला

छोटे मोठे हॅक्स भरपूर आहेत, पण आधी तुमच्या डोक्यात तुम्हाला एखादी गोष्ट का करायची आहे हे फिक्स हवे. मग सगळे सोप्पे आहे.

क्षमा मागून थोडेसे पर्सनल लिहितो.

तुम्ही स्वतः पोस्ट ग्रॅज्यूएट आहात. ऐन टिनेजमधे समोर असलेली ईतकी सारी प्रलोभने असून एवढा अभ्यास केलात ना? का केलात?

ध्येय सुस्पष्ट होतं? जर शिकलो नाही तर काय आयुष्य जगावे लागेल हे कळलं होतं? की अजून काही?

तेच ईथे करायचे.

आपल्याला हेल्दी का व्हायचे आहे? हेल्दी नाही राहीलो तर त्याने quality of life, आपल्यावर असलेली मागच्या व पुढच्या पिढीची जबाबदारी यावर काय परिणाम होणार आहेत वगैरे एकदा लक्षात आले की पुढचे सोप्पे होते. असे मला वाटते. सगळी प्रलोभने कमी आकर्षक वाटतात.

Why is more important than How……

आणि सर्वात आधी मी हेल्दी व स्ट्रॅंाग पर्सन आहे हे स्वतःच्या मनावर बिंबवा. प्रत्येक वेळेस एखादी गोष्ट करायचा कंटाळा आला की यावेळेस एक हेल्दी पर्सन काय निर्णय घेईल हे स्वतःला विचारा.

एखादी आवडणारी गोष्ट व्यायामाला जाण्याशी निगडीत कर. >>>+१

मी हा प्रयोग करून पाहिला.
पण तिने व्यायाम सोडला तसे माझाही थांबला>>>>> Lol

र आ माझ्या जीमच्या खाली आहे पिझ्झा शॉप, बास्कीन रॉबिन का का आणि जीगरथंडा पण...

पण तिने व्यायाम सोडला तसे माझाही थांबला >>> तीने व्यायाम सोडला कि तीला सोडायचे आणि दुसरी पाहायची पण आपण नाही थांबायचे.. Wink

अतरंगी पोस्ट छान...

जोपर्यंत स्वतः ला आतून वाटत नाही कि मला हे करायचंच आहे... तोपर्यंत प्रलोभने, सल्ले याचा काही फायदा होतं नाही...
रोजचा फक्त पाऊण ते एक तास व्यायाम आणि त्याचे मिळणारे अमेझिंग फायदे जेव्हा लक्षात येतात त्यानंतर व्यायाम सोडावासा वाटणारच नाही....
किल्ली,तुला खूप शुभेच्छा...पण मला खात्री आहे तु हे करणार आहेस...

अतरंगी , एकदम छान पोस्ट !! घरी या दोन्ही जबाबदाऱ्या आहेत . त्यामुळे आपण फीट राहिलेच पाहिजे हे कायम डोक्यात राहते . पण याचा कधी कधी मानसिक ताण पण येतो . मला व्यायामाबरोबर याचेही नियोजन करायचे आहे .

असा विचार केला नाही
काहीतरी ट्रिगर होउन व्यायाम सुरू होतो माझा
मग मी व्यायाम गप्पा मारतो
थोडा फायदा दिसतो
नंतर आपोआप काहीतरी होउन गाडी रुळावरून घसरते
घसरून बाजूला बंद पडले असे दिवस व्यायाम केलेल्या दिवसापेक्षा जास्त असतात हे मात्र नक्की.

ठराविक उपाय नसावा.
सब दिमाग का खेल.
माझ्या बाबतीत काही गोष्टी शेअर करतो
1) घरात व्यायाम होत नाही, मी इतका शिस्तबद्ध व्यक्ती नाही
2) व्यायामाचे ठिकाण फार दूर असेल तर जरा जरी कंटाळा आला की माझयातला आळशी व्यक्ती ओव्हरपॉवर करतो आणि दांडी होते.
3) म्हणून जिम , ग्राउंड गाडीने देखील जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटांच्या अंतरावर हवेत
4) आपल्यापेक्षा active आणि शिस्तबद्ध व्यायाम।पार्टनर मिळाला तर सोनेपे सुहागा
5) प्रगती असो वा अधोगती ट्रॅक ठेवला।पाहिजे. तो क्वांटिटेटीव्ह हवा. उदा वजन, बॉडी कंपोनिशन अनालिसिस ज्यात फॅट मसल ह्याचे आकडे कळतात, टेप घेउन मोजमाप , आणि ह्या सर्वांचे रेकॉर्ड आठवडा अथवा पंधरा दिवसात एकदा तरी मोजून ठेवायचे. प्रगती असेल तर हुरूप येतो, अपेक्षित निकाल आला नसेल तर कुठे काय चुकतंय बघून दुरुस्ती करणे सोप्पे होते
6) डाएट - सहज सोप्पे रोज फॉलो करता येईल ते ही वर्षांनुवर्षे असावं हवे. म्हणवलजे व्यायाम आणि डाएट ह्याचे बोरिंग आहे असे लिंक लागत नाही.
7) काही टार्गेट ठेवले तर जास्त मोटिवेशन मिळेल.
जसे की ड्रेस साईज एक कमी व्हायला हवा, बेल्टला tight side ला अजून 2 ते 3 होल्स मारून तिथे पोहचणे, वजनाचे टारगेट, अमुक इतके सुर्य नमस्कार / पुश उप / पूल अप जमवणे असे काहीसे.

हुश्श

अंतरंगी +१
मृणाली, अशाच ठिकाणी फास्ट फूड जोरात चालतं. Lol
झरा (झकासराव) - बरोबर. . त्यावर दहा बारा प्रतिसाद आले कि लिहितो.

आधी वाटलं कि या धाग्याचा उद्देश सकाळी उठल्यावर व्यायाम करण्याआधी काय करावं असा आहे. विस्थापन हा शब्द मराठी असेल तर नेमके काय करायचे हे कळले नाही. अशी अवघड नावं दिली तर तो प्रकार दुर्लक्षित राहणारच.

व्यायामशाळेत सायकलवरून या असा आग्रह आमचे सूचनाक करायचे. सायकल वरून न येणाऱ्यांसाठी जास्त वेळ वॉर्मिंग अप घेत. नंतर आलेल्या इंस्ट्रक्टर्सनी (सूचनाक - वाहक, चालक प्रमाणे) सायकल बंद, रनिंग बंद करायला सांगितले. त्यामागे व्यावसायिक कारणे होती. व्यायाम उद्योग कात टाकत होता.

तुम्हाला बॉडी बनवायची कि स्लिम व्हायचेय कि तब्येत चांगली राखायची आहे असे तीन प्रोग्रॅम्स आले. कालांतराने तिसरा पर्याय बाद झाला.

विक्रम फिटनेस नावाचा एक कार्यक्रम बिग एफएम वर सकाळी साडे सात ते नऊ या वेळेत कधी तरी असतो. तो गाडी चालवताना ऐकतो. तुमच्या समस्या असतील तसा प्रोग्राम ते देतात. फोनवरून मार्गदर्शन सुद्धा करतात. त्यांची जाहिरात करणे हा उद्देश नाही. पण अनेक गोष्टी क्लिअर होतात.

वय, काम, दिनक्रम, आरोग्य यानुसार व्यायाम निवडणे सोपे होते.

मोटिव्हेशन हा मुद्दा असेल तर एकापेक्षा जास्त जणांनी समान उद्देशाने प्रेरित होत केलेली चळवळ टिकण्याची शक्यता जास्त असते.

फेसबुकवर मिलिंद पदकी नावाचे गृहस्थ आहेत
व्यायाम का केला पाहिजे याचे शास्त्रीय स्पष्टीकरण त्यांच्या वॉल वर वाचायला मिळेल . ते वाचून प्रेरणा नक्कीच मिळते .

अजून एक ट्रिक - तुझा आवडता ड्रेस नजरेसमोर सतत ठेव . तो ड्रेस मला एल किंवा एम साईज मध्ये झाला पाहिजे असे सतत घोटवत रहा . पाऊले आपोआप जिमची चालू पडतात .

एखादी फिटनेस फ्रीक मैत्रीण शोध . दोघी सोबतीने जिमला जा . एकसे भले दो.

माझा मिडल साइज़ चा ड्रेस घाटल्यावर बेली फैट अजिबात म्हणजे आजूबात दिसू नये हे टारगेट ठेऊन जिम ला जाते…
आणि रस्त्यात बाचाबाची झाल्यावर वेळ आल्यावर 

Pages

Back to top