आज अज्ञातवासीने टाकलेला मेल!!
'हाय राणी..
हा मेल बहुतेक माझ्या आयुष्यातला तुला टाकलेला शेवटचा मेल आहे.
मला तुझा रिप्लाय लवकर अपेक्षित आहे प्लीज? मला बोलणं अपेक्षित आहे आपल्या दोघांमध्ये. अगदी शांतपणे... संवाद अपेक्षित आहे... प्लीज???
आशा निराशेच्या हिंदोळ्यावर झुलत बसण्यापेक्षा एक निर्णय घेऊन मोकळं व्हायचं आहे.
अगदी स्पष्ट लिहितोय. कारण मला आता practical विचार करावा लागेल... मला देखील आता life पार्टनर शोधावा लागेल. मला देखील life सुरू करावी लागेल.
काही घटनाक्रम मी मांडतो.
१. आपण दीड वर्षापूर्वी मे महिन्यात बोलायला सुरुवात केली. आणि तेव्हा मी आजारी होतो. त्याआधी पासूनच मी आजारी होतो... अज्ञातवासी लिहिताना बऱ्याचदा मी प्रतिसादात हे लिहिलं आहे.
२. आपलं बोलणं सुरु झालं. सुरुवातीला मैत्री असणारी, मी तर तुझ्या प्रेमात आधीपासून होतो. तू माझा चेहरा देखील बघितला होतास, आणि तुदेखिल माझ्या प्रेमात पडलीस.
३. तू माझ्यावर प्रेम करण्याचं कारण होतं, माझं लिखाण, माझं बोलणं, माझा पेशंस, माझं तुझ्यावर आणि राघववर असलेलं निस्सीम प्रेम. माझी तुला आहे तशी स्वीकारण्याची तयारी. त्यात अजून एक म्हणजे माझं वजन वाढलं आहे, हे तुला आधीदेखील मी खूप वेळा सांगितलं, तरीही तुझी तयारी होती मला सहा महिने देण्याची. आणि भेटून डिसिजन घेण्याची...तुला माझ्यात आवडलं होतं, की मी भारत फिरतो. मी जग फिरतो. माझी हाईट सहा फूट आहे. गोरा रंग आहे. तुला आवडलं होतं की हा मुलगा स्वप्नाच्या मागे धावतो. स्टाईल मध्ये बोलतो, राहतो. प्रेम करतो जीवापाड तुझ्यावर... आणि तुझ्या मुलावर देखील.
याच्याकडे सगळं आहे. नावावर नाशिक मध्ये चार घरे आहेत. शेती आहे. वडील खूप प्रतिष्ठित जमीनदार आणि बिजनेसमन आहेत... स्वतःचा चांगला जॉब आहे, महिन्याला छान कमावतो. एक SUV आहे. बाईकस आहेत. हे तुला का सांगतोय, कारण काही स्वप्ने फक्त पैशांनी पूर्ण होतात.
Sexual life विषयी आपण दोघे खूप compatible होतो. आपल्यासाठी फक्त आपल्या दोघांच्या erotica लिहिल्या, कारण आपलं आयुष्य असच होणार होतं.... मी दिवस रात्र फक्त तुझा होतो, तुझ्यावर प्रेम करणार होतो...आणि तू माझी. तिच्यासाठी तो लिहिणार होता, तिला लिहितं करणार होता, अगदी स्टार कपल सारखं आयुष्य दोघेही जगणार होते. सोबत जग फिरणार होते, अगदी हाय क्लास हाय प्रोफाईल कपल जगतात तसं. जादुई दुनिया निर्माण करणार होते, तिचं आणि त्याचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार होते.
४. अज्ञातवासी का तुझ्या प्रेमात पडला? एकतर तुझा चेहरा सुंदर आहे. अगदी बोलका, आणि निष्पाप. दुसरं तू होतीस अगदी अवखळ, अल्लड, सगळं मनातलं सांगणारी... खूप वाईट वाटायचं, अरे ही का त्या जागी राहतेय, मरमर काम करतेय? काय वय आहे हीचं? काय दुर्दशा करून घेतली आहे स्वतःची? सगळे शारीरिक मानसिक आजार लावून घेतलं आहे? हिच्या साठी जीव द्यायला कुणीही तयार असेल, आणि ही राबतेय फक्त. जॉब करत नाही, शिक्षण वेगळं घेतलं, का असा वेडेपणा करतेय ही?
माझं स्वप्न होतं, तू आणि मी सोबत जिम ला जावं, आणि तुला पुन्हा कॉलेजची तरुणी बनवाव, जे तुझं स्वप्न होतं.
५. आपण बोलायला लागलो, आणि मी आधी काही गोष्टी घेतल्या.
१. ७५ इंची टीव्ही.
२. एक आय९ प्रोसेसर असलेला लॅपटॉप
३. एक वॉशिंग मशीन.
४. मार्शल चे हेडफोन.
का?
कारण तुला वेब सिरीज बघायला आवडतात, म्हणून. तू कपडे धुवून थकते म्हणून. तुला जॉब करायचा आहे, तर लॅपटॉप हवा म्हणून... हेडफोन का? तर तुला गाणी ऐकायला आवडतात म्हणून. इतका तुझ्यात जीव गुंतला होता.
६. काही मुलांना मुली टाईम पास साठी हव्या असतात. काही मुलींना मुलं देखील. मी कधीही तुला टाईम पास म्हणून बघितलं नाही. आपली मैत्री तर बेस्ट होती, पण तुला हाक मारताना आज पर्यंत फक्त राणी आणि बायको, या दोनच नावांनी हाक मारली आहे. आयुष्यात फक्त दोनदा प्रेम केलं, जीवापाड केलं...माझ्या कॉलेजचा बेस्ट आऊटगोइंग स्टुडंट होतो मी, आणि माझी एक्स मिस नाशिक. चार वर्ष तिच्यावर प्रेम केलं, आणि
आता गुंतलो तुझ्यात...आता याला तीन वर्षे होतील.
७. मी घरच्यांशी बोललो तुझ्या विषयी? हो आधीच बोलून ठेवलं. आधी त्यांनी थयथयाट केलाच as usual. पण नंतर हो म्हटले. मी त्यांना हेही सांगितलं की जेव्हा आम्ही सात फेरे घेऊ, तेव्हा राघव माझ्या कड्यावर असेल. आणि आमचा लग्नाचा पहिला फोटो तिघांचा असेल.
तू मला विचारलं होतं, की तू राघवला स्विकारशील? माझं उत्तर होतं तुझ्याही आधी तो हवाय. मी घरच्यांना हेही सांगितलं होतं की तुमचा नातू फक्त आणि फक्त राघव असेल. कारण नंतर तू आणि मी एकही मुल जन्माला घालणार नाहीत.
८. असो. नंतर तुला फक्त एकच गोष्ट आवडली नाही, आणि तू आमूलाग्र बदललीस. मला खोटं ठरवत होतीस. आणि मी बडबड करून करून करून स्वतःला प्रूव करत होतो... पण शेवटी सगळं संपलं.
९. मी तेव्हा तुला हवं ते मान्य केलं. असं नव्हतं ग की मला कणाच नाही, असं नव्हतं ग की मी खोटारडा आहे म्हणून इतकं ट्राय करतोय, असं नव्हतं ग की मी रडूबाई आहे...एकच कारण होतं... माझं तुझ्यावर इतकं प्रेम होतं की मला तुला अजिबात दुखवायच नव्हतं. आयुष्यात तेव्हा कधीही इतकं असहाय वाटलं नव्हतं.
१०. तू गेलीस. कॉन्टॅक्ट बंद झाला. तू म्हटली होतीस टेलिग्रम वर अनलॉक राहशील, ते तर तू डिलिट केलं.
११. तू गेल्यानंतर पहिला महिना माझी सायकॉलॉजीस्टची ट्रीटमेंट चालली. खूप त्रास झाला दोन महिने... कारण प्रेमच तितकं होतं. ..
१२. मी बेंगलोरला शिफ्ट झालो. हो एक वर्ष मी बेंगलोर ला काढलं, कारण नाशिकला तुझ्या आठवणी कायम असायच्या. तिथेच जिम जॉईन केली. मला माहिती होतं, काय करायचं आहे... पण डिप्रेशन होतं सोबतीला, म्हणून उशीर झाला, पण अचिव केलं.
१३. मी सहा महिन्यापूर्वी नाशिकला आलो.
१४. आताशा मी दररोज १३ किलोमिटर चालतो जिम मध्ये. ३० किलो वजनाचे डांबेल घेऊन चेस्ट करतो. २१० किलो वजन घेऊन लेग्ज करतो. मी साखर नाही खात. मी मीठ नाही खात. कारण मी आता जरी परफेक्ट शेप मध्ये असेल, ३२ किलो कमी केलं असेल, तरीही माझ्या राणीला माझा बेस्ट द्यायचंय हे माझं स्वप्न आहे. म्हणून आता सिक्स पॅक अब्ज बनवतो आहे. माझं चेहरा चांगला आहे हे तू आधी म्हटलीच आहे. पायात ऑल रेड शूज, हातात जी शॉक आणि गळ्यात तुझ्यासाठी घेतलेले मार्शल हेडफोन... हा आता जिमचा स्टेटस सिम्बॉल आहे.
मला जगातला सगळ्यात हँडसम मुलगा बनायचं आहे म्हणजे तू माझ्यासोबत अभिमानाने चालू शकशील.
१५. या प्रवासात मला अशा काही मुलींनी मदत केली, ज्या तुझ्या आधी माझ्या आयुष्यात होत्या. त्यांच्यावर मी कधीही प्रेम केलं नाही, पण त्यांनी माझ्यावर जीवापाड केलं. ज्यांचा उल्लेख मायबोलीवर आला आहे.
१६. दीड वर्ष मी फक्त तुझ्यासाठी काढलं. तुझ्या साठी झुरलो, रडलो, पण हरलो नाही... लढत होतो.
१७. तुझा २ ऑक्टोबर चा हाय माझ्यासाठी खूप महत्वाचा होता... का? कारण माझं प्रॉमिस मी आता तोडणार नव्हतो. तू मेसेज केल्याशिवाय मी मेल करणार नाही, आणि सगळ्या जुन्या आठवणी, बेबी, अगदी अगदी सगळं जागं झालं.
१८. तुला मी रिप्लाय दिला ३ दिवसांनी. कारण मला तुला insecure फील करवायचं नव्हतं. पण तुझा रिप्लाय नाही आला. मला कळलं देखील नाही नेमकं काय झालं? कसं react करू नाही कळत नव्हतं. त्यात मला ३० ऑक्टोबर पर्यंत प्रॉमिस पूर्ण करायचं होतं.
१९. माझ्या वाढदिवसाला तुला मी फोटो पाठवले. फेसबुक वर आलो, स्नॅप वर आलो...
...पण तुझा रिप्लाय नाही आला.
२०. त्यानंतर मात्र मला पुन्हा सायकोलोजिस्त कडे जावं लागलं, तब्बल एक वर्षाने. रिजन being आता पुढे कसं जावं... कारण जुन्या आठवणी धडका मारून आता पुढे येत होत्या. मला तुझी पुन्हा काळजी वाटायला लागली होती... मला आता माझी राणी हवी होती, सो रडू बाई नाही, पण दिवाळीपासून फक्त मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करतोय, कारण आता जे एक कारण होतं तू निघून जायचं, ते राहिलं नाही... आणि तुला जे हवं होतं, ते सगळं आहे.
२१. तुझा मेल येण्याची मी आशा सोडली, आणि म्हटलं आता पुन्हा परीक्षा सुरू, त्यात परवा तुझा मेल आला. त्यावर मी एक फक्त मैत्रीसाठी म्हणून रिप्लाय दिला...आधी मैत्री करू, मग डिसिजन घेऊ..
२२. मी काल रात्री माझ्या सायकोलोजिस्टशी सविस्तर चर्चा केली....
आता पुढे जाण्यासाठी दोनच ऑप्शन आहेत.
१. आपल्या दोघांना एक निर्णय घ्यावा लागेल. जर तुला वाटत असेल, की हो... मला पुन्हा या नात्याला एक चान्स द्यायचा आहे, तर पुन्हा सुरुवात करावी लागेल... आधीपासून... आणि तुझ्या मनात असेल तर मी अजून थांबेन. कितीही वेळ. हो मी जे जे सांगितलं आहे त्यात काहीही खोटं नाही. अगदी अगदी तसच घडेन... आय प्रॉमिस... आणि मी माझं वचन नाही तोडत. बोलायला सुरुवात करू, भेटू... समजून घेऊ एकमेकांना परत. आपण सोबत माझ्या सायकोलोजिस्त कडे जाऊ, आणि प्रॅक्टीकल विचार करू.
२. जर तुला नकोच असेल हे नातं, तर प्लीज, यापुढे आपण कधीही एकमेकांना न दिसणं उत्तम. मी एकही असा मार्ग ठेवणार नाही की तू मला कॉन्टॅक्ट करू शकशील. तुलाही रिक्वेस्ट आहे की मायबोली, प्रतीलिपी सगळीकडे मला अनफॉलो कर. मी देखील तिथून निघून जाईन कायमचा. हो आता याक्षणी तू जाण्याचा त्रास होईल पुन्हा, प्रचंड... पण यापुढे मला स्वतःच आयुष्य जगायचं भान येईल. कुणा दुसऱ्या मुलीवर प्रेम करायचा प्रयत्न करेन... तू देखील प्लीज पुन्हा हाय वगेरे करू नकोस ग... कारण जीव आहेस तू माझा, तुझं येणं म्हणजे माझा जीव येणं आणि तू जाणं म्हणजे जीव जाणं.
३. जर तुला वाटत असेल, चार महिन्यांनी जर मनू सिक्स पॅक अब्ज बनवून आला, तर मला तो हवा असेल. मी जे स्वप्न बघितलं असा पुरुष मला हवा आहे पण मी चान्स चार पाच महिन्यांनीच देईन... तर स्पष्ट सांग...की हो, चार महिन्यांनी पुन्हा मला फोटो पाठव, मी विचार करेन.
४. Extra Marital Affair हा पर्याय बाद करतोय मी. कारण माझी बायको, माझी सर्वस्व फक्त तूच आहे...
एक सांगतो, या नात्याला आता एकतर शेवट असेल, नाहीतर डेफिनाईट टाईमलाईन.
...शेवटी सांगतो... अगदी कळकळून सांगतो, ज्याच्या प्रेमात तू होतीस, त्या गोष्टींच्या प्रेमात तू होतीस, अगदी अगदी सगळं तसच्या तसं आहे. किंबहुना अजून सुंदर झालं आहे. तुझी लाईफ जगातील सगळ्यात सुंदर लाईफ करण्याची धमक आहे तिथे.
मी देखील अजूनही तिथेच आहे... कारण त्याला सर्वकाही द्यायचं होतं तुला, तुला सर्वस्व द्यायचं होतं, आणि ते दिलं. अजूनही त्याने कुणाचा विचार नाही केलेला.
...तू होतीस, नव्हतीस तुझा हिरो कायम तुझ्या प्रेमात होता...
साधायचा संवाद? प्लीज करशील अनलॉक व्हॉट्स ॲप वर... शेवटचा संवाद होईल, पण मी मुक्त होईल आणि तूसुद्धा.'
त्याला आलेलं उत्तर!!!
'मी तुला आधी देखील सांगितलं आणि आताही सांगतेय, मला काहीही नकोय यातलं. तू तुझ्या आयुष्याचं डिसिजन घ्यायला मोकळा आहेस. गुड बाय अँड टेक केयर...'
अज्ञातवासीचा शेवटचा मेल!
'thank you so much, good bye and take care!'
बस. दीड वर्षाचा प्रवास आज संपला...
रीता झालोय. बस एवढच.
सुन्न झालोय. बस एवढंच...
...अचानक पाणी येतंय डोळ्यातून...
शेवटी आईच आठवली...
'मी तिची आभारी आहे. तिने आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय घेतला... आणि तुम्ही निघा या वेडेपणातून. दिवाळीला, पाडवा, लक्ष्मीपूजन तुम्ही फक्त झोपून राहिलात... सतत मोबाईल चाळत राहिलात, वाट बघत राहिलात.
तुमची बहीण, मी आणि तुमचे वडील, सगळं सगळं करत होते, आणि तुम्ही झोपून होतात...
आपला बाप राम आहे, आजपर्यंत जी प्रतिष्ठा कमावली, सगळी तुम्ही उधळून द्यायला निघाला होता. हे आमचे संस्कार नाहीत. माझा मुलगा रावणाच्या देखील वर गेला होता. तुम्हाला प्रॉपर्टीतून बेदखल करतोय आम्ही. आता स्वतःच काय विश्व बनवायचं असेल बनवा आणि आम्हाला अभिमान वाटेल असं बना.
बस माझीही शक्ती संपली...'
शेवटी आईची देखील शक्ती संपली...
सॉरी.. पण मी कथा नाही पूर्ण करू शकणार कधीच. सॉरी पण यापुढे मला नाही जमणार इथे यायला.
सगळ्यांची माफी मागतोय... रियली सॉरी. ही वेबसाईट पुन्हा पुन्हा मला त्याचं जंजाळात ओढत राहीन. मी वेडा होइन पुन्हा..
...अज्ञातवासी संपला...
गुड बाय ऑल...
जेव्हा एखाद्याचा प्रेमभंग
जेव्हा एखाद्याचा प्रेमभंग होतो तेव्हा ती व्यक्ती दुरावली याचा त्रास असतो.
सेक्सभंगाचे दुःख असा काही प्रकार नसतो. सेक्स करायची सोय झाली होती ती गेली त्याचा तितका त्रास होत नाही. ते दुसरीकडून मिळवता येते किंवा मिळवू हा विश्वास मनाला देता येतो. त्या केस मध्ये फक्त इगो हर्ट होतो.
जर कोणी प्रेम गमावल्यावर इथेतिथे सेक्स शोधायचा प्रयत्न करते त्याला लवकरच त्यातील फोलपणा जाणवतो. कबीर सिंग चित्रपटात हे दाखवले होते. मलाही त्याचा अनुभव आहे. काही फायदा होत नाही. भले तुम्हाला रिप्लेसमेंट म्हणून कितीही सुंदर सेक्सी हॉट पर्याय मिळाला तरी नो युज.. मन जिथे गुंतले होते तिथेच अडकून राहते.
जे नाते तुम्ही सेक्ससाठीच जपले असते तिथे दुसरा चांगला पर्याय मिळाला तर लगेच उडी मारता...
पण प्रेम असेल तर तुमच्यासाठी तीच व्यक्ती जगातली सर्वात सुंदर आणि आकर्षक व्यक्ती असते. त्या पलीकडे काही नसते
>>>>प्रेम हा सेक्स चाच शुगर
>>>>प्रेम हा सेक्स चाच शुगर कोटेड अवतार आहे.
असहमत!
प्रेम इज परिपूर्ण इन इटसेल्फ. त्याकरता सेक्स लागत नाही.
अज्ञातवासी, आशा करते की
अज्ञातवासी, आशा करते की तुम्ही मायबोली वरून ब्रेक घ्यायच्या आधी इथले सगळ्यांचे रिप्लाय वाचाल. सगळ्यात पहिल्यांदा हॅट्स ऑफ टू यू, की तुम्ही इतक्या प्रामाणिक पणे, हिंमत दाखवून ओपनली तुमची पर्सनल जर्नी इथे मांडली. त्यावरून च कळतंय की फार हिंमतीचे आहात. आणि ही जर्नी तुम्ही अल्मोस्ट संपवत आणली आहे त्याच हिंमतीन. बस काही पावलं च बाकी आहेंत, ती पार केलीत की तुम्ही जिंकलंय.
आता तुम्ही जे गमावलं आहे त्याबद्दल, तर जे गमावला आहे त्यापेक्षा जेव्हा त्रयस्थ म्हणून बघाल तर खूप कमावलं आहे तुम्ही. स्वतःची सगळी मत बाजूला ठेवून तुमच्या साठी तुमच्या निर्णयाला पाठिंबा देणारे आईवडील, बहीण भाऊ. स्वतःच एकतर्फी प्रेम बाजूला ठेऊन तुम्हाला सपोर्ट करणारी मैत्रीण, तुम्हाला unconditionally प्रेम करणारा मित्र, मैत्रीण आणि इतर परिवार, motivate करणारे जिम ट्रेनर आणि मानसोपाचार तज्ज्ञ, आणि तुमची ज्यांच्याशी इथं फक्त virtual ओळख असून पण तुमच्या काळजीने इथं सल्ले देणारे मायबोलीकर, या सगळ्यांचे प्रेम, काळजी,सदभावना हे सगळं कमावलं आहे तुम्ही. आपण मनात आणलं तर weight लॉस च काय वाट्टेल ते करू शकतो हा आत्मविश्वास कमावला आहे. हे सगळं खूप जपून ठेवा कारण ते अनमोल आहे. आणि लिहिणं सोडू नका. भले इथं येऊन नका लिहू पण लिहीत राहा, डायरीत,p. C. वर कुठंही.जेव्हा तुम्ही या सगळ्या मधून पूर्ण बाहेर आलेल असाल आणि happily ever after असाल तेव्हा इथं परत या आणि तुमच्या happily ever after ची कथा नक्की लिहा तटस्थ पणे.छान वाटेल आम्हा सगळ्यांना.
खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला
Pages