।।२।।
“बोल काय बोलायचं आहे? मेसेज वाचुन मला वाटले काय मेजर घोळ झालाय कोणास ठावूक. मला तर भीती वाटली ऋते, म्हातार्याने तुला कायमचे हाकलले की काय “
“ त्याचे टॅंट्रम्स मागील पानावरून पुढे चालू आहेत. नवीन काहीच नाही त्यात. त्याच्या बकवास थेअर्यांमध्ये मला इंटरेस्ट नाही, हे लपवण मी आता बंद केले आहे. ‘मी जगातली सगळ्यात नालायक पोस्टडॉक आहे आणि त्याच्याकडुन फुकटचा पगार घेते’, हे त्याचं मत त्याने पहिल्या दिवसापासून कधी लपवलं नाही. त्याचा कुजकट पणा वाढलाय हल्ली. पण आता माझा टॉलरन्स पण वाढलाय. त्यामुळे आज आपण म्हातार्याबद्दल बोलायचे नाहीये.
“मग नचिकेत शी भांडण झालं का?”
“तुला माहिती आहे नचिकेत सध्या फॅकल्टी पोझिशन अप्लीकेशन्स मध्ये गळ्यापर्यंत बुडाला आहे. तो आणि मी बोललोच नाही आहोत बरेच दिवस, भांडण तर दूरच.”
“ मग काय प्रॉब्लेम आहे ऋता?”
“तेच तर माहीत करुन घ्यायचय मला. नचिला सांगून आलेय मी की आज मी तुझ्याकडे रहातेय. तू सांगणार आहेस मला प्रॉब्लेम काय आहे ते. तू सांगितल्याशिवाय काही आज मी तुला सोडणार नाही.“
“आय सी. अम्माचा फोन आला होता तुला, बरोबर? मी आता ३० ची होणार, तुझ्या सारखे मी पण आता लग्न करून सेटल व्हायला हवे. आधी माझे पीएचडी आणि नंतर पोस्ट डॉक मिळवण्याचे टेंशन म्हणून त्या दोघांनी फार आग्रह धरला नाही. पण आता मात्र….. आदी इत्यादी”
“यामि, अंकल आणि आंटीना काळजी वाटतेय तुझी. क्वाइट फ्रॅंकली, मला आणि नचिला सुद्धा. “
“कुछ भी “
“यामि लोक प्रेमात पडतात तश्या आपण मैत्रीत पडलो. तुझे डोळे तुझ्या शब्दांची सोबत कधी सोडतात हे मला कळतं. माझ्या समोर हा बेफिकिरीचा आव आणुन काही फायदा होणार नाहीये. त्यामुळे माझ्या समोर ही नाटकं नाही करायची अजिबात.
ऑफ कोर्स आंटी अंकलना तु लग्नाचा सिरियसली विचार करायला हवा आहेस. पण हा विषय नाही त्यांच्या सध्याच्या काळजीचा. आंटी म्हणाल्या तू आजकाल सारखेच त्यांचे फोन घेणे टाळतेस. घेतला तरी जुजबी बोलून काही तरी फालतु कारण सांगून फोन बंद करतेस. तुझ्या आयुष्यात नक्की काय चाललंय ते कळत नाही म्हणून अस्वस्थ झाले आहेत ते दोघे.
मला सुद्धा टाळतेस तु हल्ली. आज हा निर्वाणीचा मेसेज केला म्हणून भेटायला तयार झालीस. तुझ्यातला बदल नचिने पण नोट केलाय. तो मला सांगत होता, तुझा पेपर नेचर न्युरोसायंस नी ऍक्सेप्ट केला त्या दिवशी पण तुझ्या चेहऱ्यावर आनंद नव्हता अजिबात. प्रोजेक्टच्या सुरुवातीला तुझे टार्गेट होते त्या पेक्षा जास्त इम्पॅक्ट फॅक्टर मिळाला तुला. एवढ कंबरतोड काम केलंस ह्या पेपर साठी आणि तरीही तुझ्या चेहऱ्यावर यत्किंचितही आनंद नसावा? आमच्या पैकी कुणाशीही बोलण्याची सुद्धा इच्छा नसते तुझी. नक्की काय चाललंय यामिनी तुझं?”
“मी तुला नाही सांगु शकत अमृता. ट्रस्ट मी, जे काही चाललंय त्याचा अर्थ लावण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला पण मला स्वतःलाच ते कळत नाहीये. विचार करुन डोकं फुटायची वेळ आली आहे. जिथे मी स्वतः च विश्वास ठेवू शकत नाही तिथे दुसरं कोणी कसा विश्वास ठेवेल?”
“यामिनी, शांत हो यार. ट्राय मी प्लीज. माझ्या बरोबर कंफर्टेबल नसशील तर हरकत नाही पण कुणाशी तरी तुला बोललच पाहिजे. जे चाललंय ते काही बरोबर नाही. हे असंच चालू राहिलं तर डिप्रेशन मध्ये जाशील तु. प्लीज अशी गप्प राहु नकोस.”
“ऑल राइट. मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते. अमृता तुझ्या समोर आत्ता कोण बसलय?”
“म्हणजे काय? माझी बेस्ट फ्रेंड, डॉ. यामिनी विजयशेखरन, जन्मजात पुणेकर असल्याने जी माझ्यापेक्षा अस्खलित मराठी बोलु शकते. माझ्या नवऱ्याची ज्युनिअर, जीचे भवितव्य अतीशय उज्वल आहे अशी बडिंग न्युरोबायलॉजिस्ट.
“नाही ऋता, तुझ्या समोर फक्त यामिनी बसली नाहीये. म्हणजे शरीर माझच असलं तरी शरीराच्या आत इन पर्टिक्युलर मेंदुच्या आत एक अजुन बाई रहाते. ती माझ्याशी म्हणजे यामिनीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतेय!”
इंटरेस्टिंग..
इंटरेस्टिंग..
बापरे!
बापरे!
ओह!
ओह!
पुढचा भाग येऊ दया लवकर.
पुढचा भाग येऊ दया लवकर.
इंटरेस्टिन्ग…. पुढचे भाग येऊ
इंटरेस्टिन्ग…. पुढचे भाग येऊ द्या लौकर.
धन्यवाद भक्ती, वावे, स्वाती२,
धन्यवाद भक्ती, वावे, स्वाती२, शर्मिला आणि साधना.
जबरदस्त पु भा प्र
जबरदस्त
पु भा प्र
मस्तच!!
मस्तच!!
शेवटपर्यंत कळल नव्हतं पाहिल्या भागाचा या भागाशी काय संबंध आहे .
धन्यवाद किल्ली आणि आबा.
धन्यवाद किल्ली आणि आबा.
टिपिकल अंबाच्या़ कथेने वेगळेच
टिपिकल अंबाच्या़ कथेने वेगळेच वळण घेतलं. उत्सुकता वाढलि आता
धन्यवाद माधव
धन्यवाद माधव