चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

कार्तीने पोस्ट केला असणार, होम डिलिवरी असती तर कार्तीला अर्विंद ओळखत असता.

अनिंद्यशी पुर्णपणे सहमत..

चित्रपटात वा वा करण्याजोगी कथा नसली तरी बाकी चित्रिकरण हिरवाई, वास्तवदर्शन चांगले आहे.

बस समोरुन जाईपर्यंत कार्ती टाईमपास करतो आणि बस गेल्यावर घाई करतो बस डेपोत जायची तेव्हाच त्याचा गेम लक्षात आला होता Happy

साड्या विकणारा १५ लाख कॅश घरात ठेवतो हेही गंमतीशीर. पण तरीही ते कॅरेक्टर आवडले. आपल्याला मिळालेली मदत लक्षात ठेऊन त्या माणसासाठी जीवाचे रान करणारी माणसे आता इतिहासजमा झालीत. सायकलची पुर्ण कथा हृदयाला भिडते. त्या सायकलमुळे कार्तीच्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती सुधारते ह्याची जाण कार्ती ठेवतो व त्यामुळे अरविंद त्याच्यासाठी खुप महत्वाचा बनतो. त्याचा योग्य पाहुणचार व्हावा यासाठी तो धडपडतो. तो न सांगता गेला तरी त्याला दोष द्यायला तो धजावत नाही, आपलाच दोष मानतो.

अरविंद कार्तीसाठी महत्वाचा असतो, तर कार्ती अरविंदच्या पौगंडावस्थेत भेटलेल्या १० पोरांपैकी एक….अरविंअला त्याचे नाव कसे व का लक्षात राहावे?

त्या मानाने भुवना व अरविंद यांचे प्रेम अजिबात पटत नाही. २५ वर्षे संबंध ठेवलेच नाहीत हे दाखवलेय मग नियोजीत वराला रोजच भावाच्या कथा सांगण्याइतपत मटेरियल तयार झालेकधी,,??? ती मामाची मुलगी ना आणि फोनवर बोलणारे मामा? ते लग्नात पहिल्यांदा बोलले मग लग्नपत्रिका व शर्ट पोस्टाने पाठवले?? :). असो. तरेही तो दागिने घालायचा प्रसंग माझे डोळे ओलावुन गेला.. बहुतेक सगळे रडत होते म्हणुन असेल …. Happy मुलगी सासरी निघतानाचे दृष्य आजही माझ्या डोळ्यात पाणी आणते, कदाचित त्यामुळे हे दृष्य पाहुन डोळे ओलावले.

सध्याच्या फालतु चित्रपटांच्या लायनीत हा एकदम फॅमिली मुवी उठुन दिसतोय म्हणुन इतके कौतुक होतेय हेमावैम.

मला फार आवडला मैयाळगन! कसला सुंदर सिनेमा आहे! मी तमिळ विथ इंग्लिश सबटायटल्स बघितला.

अजिबात भडक होऊ न देता भावनाप्रधान कथा मांडणं सोपं नाही. अरविंदस्वामीचं व्यक्तिमत्त्व फारच आवडलं.
भुवना (जिचं लग्न आहे ती) आणि त्याचा संपर्क आहे असं दिसतंच.
मैयाळगनला तो ओळखत नाही हेही स्वाभाविक आहे. फक्त हे सुरुवातीला कबूल न केल्यामुळे तो पुढे अडचणीत सापडतो Happy

अनिंद्य आणि साधना, तुमच्या पोस्टी वाचून मजा आ गया..! Happy
मी ते सायकलवरचे रडके गाणे आले की बंद केला होता, दोनदा. पण आता दोन गट पडून युद्धाला तोंड लागले असल्याने बघून पूर्ण करेन. त्याशिवाय युद्धात भाग कसा घेणार. सगळ्या पोस्ट्स स्पॉयलर्सच्या भीतीने वरवर वाचल्या. चांगले लिहीत आहात माझेमन, अंजली, वावे. Happy

केकू, मी सेव्ह केली आहे लिंक. धन्यवाद. काल मामींनी सुचवलेला Predestination सुरू केला आहे. तो, मैयाळागन आणि शुभो मुहूर्तो तिन्ही विकान्ताला पूर्ण करेन.

Meiyazhagan

चित्रपट आवडला कारण चित्रपटाचा बाज दिग्दर्शकाने ओळखून तो व्यवस्थीत सांभाळला आहे म्हणून. सिनेमाचा मुख्य भर आहे तो अरुल आणि Meiyazhagan ही दोन पात्रे उभी करण्यावर. ती पात्रे उभी करण्याकरता जेवढे प्रसंग लागतील तेवढेच प्रसंग आणि त्यातली मर्यादीत नाट्यमयता एवढ्याच भांडवलावर सिनेमा उभा केलाय - हेच खूप आवडलं. कथेची गरज नसताना उगीच एक कथा गुंफून तिची ओढाताण करणे असला प्रकार नाहीये की कुठे मेलोड्रामा पण नाहीये - दाक्षिणात्य मेलोड्रामा तर नाहीच नाही.

कथा नाही - हा बाज इतक्या प्रामाणिकपणे सांभाळला आहे की सिनेमाचा आत्ताचा आनंदी प्रसंगाने केलेला शेवट दु:खांत केला असता तरी सिनेमाला जे सांगायचं आहे त्यात कुठेच काडीमात्र बदल झाला नसता. सुखांत / दु:खांत याचा फरक कथेला पडतो, पात्रांना नाही. (हपा म्हणाले तसे कार्ती साप चाऊन मेल्याची शक्यता मलाही वाटली होती त्या काही क्षणात)

भुवना ही अरुलची चुलत बहीण आहे (स्टेजवरून उतरल्यावर अरुलला जे काका भेटतात, त्यांची मुलगी). बहीण भावाच्या नात्याची वीण सुरुवातीलाच दाखवली आहे. ज्याच्यावर निरातीशय प्रेम आहे असे घर दुरावणार या दु:खात बुडालेला अरुल घरी आल्यावर मुसमुसणार्‍या भुवनाच्या कपाळावर फुंकर घालतो. त्याला घर गेल्याचे दु:ख असते तर तिला भावापासून दुरावले जाणार याचे. तो मोठा, ती लहान. मोठेपणाच्या नात्याने तिच्या दु:खावर फुंकर घालण्याचा तो छोटासा प्रसंग इतका अलवार घेतलाय की तो प्रसंग भुवनाच्या मनावरून पुसला जाणे केवळ अशक्य! तिचं भावावरचं प्रेमही इतकं घट्ट की तिला बाबाला सोडून अरुलबरोबर मद्रासला जायचं असतं. अशा घट्ट नात्याला प्रत्यक्ष भेटीची गरज असतेच असे नाही (तरी त्या दोघांचा कॉल्स आणि मेसेजेसद्वारा संपर्क असतोच). मी मागे म्हटले आहे तेच पुन्हा सांगतो जे नातेवाईक आपल्याला आवडत असतात त्यांच्याशी नाती बर्‍याच वेळा लहानपणी विणली गेलेली असतात.

त्या लग्नातल्या प्रसंगात भावा बहिणीच्या नात्याबरोबरच अजून एक खूप आवडलं ते म्हणजे इंट्रोव्हर्ट आणि एक्स्ट्रोव्हर्ट पात्रांचे कॅरीकेचर. भुवना एक्स्ट्रोव्हर्ट - तिला इतक्या वर्षांनी भेटलेल्या भावापुढे इतर पाहुण्यांची, त्यांच्या ताटकळण्याची जराही पर्वा नसते. सारी खुदाई एक तरफ और मेरा भाई एक तरफ हे तिचं म्हणणं. आणि नेमक्या त्याच कारणांनी इंट्रोव्हर्ट अरुल कानकोंडा होत असतो. भुवनाचे आपल्यापुढे नवर्‍यालाही कमी भाव देणे, रांगेत उभी असणारे लोक आणि भुवनाचे त्याच्या भेटीत गुंतून जाणे याने तो आधी खूप लाजीरवाणा होतो आणि शेवटी सुखावतो. दोन्ही कलाकारांनी ती दोन्ही पात्रे इतकी सुरेख उभी केली आहेत त्या प्रसंगात.

अंजली यांनी म्हटल्याप्रमाणे अरुलचे नात्यानुसार प्रत्येक स्त्रीशी बदलणारे वागणे पण खूप सुंदर फुलवले आहे. मुख्य पात्रांबरोबर शेवटी येणार्‍या त्या फुलवालीबरोबरच्या छोट्या प्रसंगात त्या इंटरॅक्शनची छटा पण वेगळी रंगवली आहे.

"शुभ मुहूर्त" बघितला.
सुचवल्या बद्दल धन्यवाद केकू.
आगाथा ख्रिस्ती ची सगळी पुस्तकं वाचली असल्याने कथेचा अंदाज होताच. पण भारतीय adaptation खूप छान केलंय.

Dubbing (इंग्लिश /हिंदी ) असतं तर बघायला आणखी मजा आली असती.

कथेची गरज नसताना उगीच एक कथा गुंफून तिची ओढाताण करणे असला प्रकार नाहीये
+७८६
इतरही अनावश्यक ट्रॅक नाहीयेत.
आमच्या घरात मी एकटाच पाहिला आहे. त्यामुळे फॅमिली सोबत पुन्हा एकदा बघेन. दुसऱ्यांदा बघताना अजून उलगडत जातात असले चित्रपट..

बाकी चित्रपट उत्तमच आहे.
ज्यांना आवडला नाही त्यांच्या टाईपचा नाही इतकेच.

SharmilaR
प्लीज मी रिव्यू ची लिंक दिली आहे. तो वाचा. रीव्युत दोन गोष्टी हाय लाईट केल्या आहेत. ते पुस्तकात आहेत कि नाहीत माहित नाहीत. लायब्ररीतून पुस्तक आणलय वाचतोय.
mousetrapचे ही बंगाली वर्षान आहे. Black & White. जुना सिनेमा आहे.

सुंदर प्रतिसाद माधव. आणि +१०० . फक्त भुवना मला मामेबहीण वाटली अरुलची. कारण ते अंकल अरुलच्या बाबांशी बोलताना सबटायटल्समधे ब्रदर-इन-लॉ येत होतं.
गाणी मला actually आवडली. ज्यांनी वर नाही आवडली असं लिहिलंय त्यांनी हिंदीमधे ऐकली का? तमिळमधली मला तरी आवडली.

@केकू
Review मधे सरळ रहस्य उघड केलं आहे.
त्यामुळे ज्यांना सिनेमा बघायचा आहे त्यांनी नकोच तो वाचायला.

सध्या चित्रपट पाहणे होत नसल्याने उत्तम पोस्टी स्किप कराव्या लागत आहेत. नंतर वाचेन.

सध्या चित्रपट पाहणे होत नसल्याने उत्तम पोस्टी स्किप कराव्या लागत आहेत. नंतर वाचेन.

हो. मी हिंदी मध्ये ऐकली आणि नाही आवडली. तमिळ ऐकून सब टायटल वाचायचा कंटाळा आलेला आणि अनायासे हिंदी उपलब्ध होता. आता तेवढ्या साठी परत गाणी नाही ऐकत, पण तमिळ चांगली असतील आणि हे लॉस्ट इन ट्रांसलेशन असावं वाटलच होतं.
अनिंद्य तुमच्या त्रुटी काही जाणवलेल्या पण असा साधा सरळ सिनेमा मनाला भावला खूप.

नुसते 'लॉस्ट ईन ट्रान्स्लेशन' कुठे आहे, आवाजही किती भयंकर आहेत. ईन्डियन आयडॉलच्या ऑडिशनमधून ह्यांना हाकलून दिले असते असे वाटले मला. बाकी सगळी अनुवादित गाणी लॉस्ट ईन ट्रान्स्लेशनच असतात. रोजा, हम से है मुकाबला, बाहुबली ई पण ते निदान गोडवा - ठेका - हार्मनी तरी जपतात. हे काही तरी One of a kind प्रकरण होते. Happy त्या टीमने न ऐकताच रेकॉर्ड करून सिनेमाला जोडली व प्रिमियरलाही हेडफोन लावून बसले असावेत असे वाटण्याइतके अनभिज्ञ कोणी कसे असू शकते.

भुवना चुलत बहिण नसणार ना.. वाद वडलांच्या भावात झाले, घर त्यांना मिळाले म्हणुन यांना सोडावे लागले ना..

ते काका लोक्स पण लग्नाला आलेले असतात, जेवायला ते यांच्या मागेच बसलेले असतात. त्यांना बघुन अरुलचा मुड जातो व तो निघतो निघतो करतो तेव्हा कार्ती कायतरी बडबड करुन त्याला थांबवतो.

घरच्यांनी जोर घातला म्हणुन हा लग्नाला येतो.. बायको म्हणते की तु गेला नाहीस तर आपल्याकडे कोण येणार असे काहीतरी.. तो म्हणतो कुत्री मांजरी आहेत की आपले… त्यावरुन तरी तो भुवनाशी टचमध्ये होता असे वाटले नाही.. ते ब्रथर इन लॉ भुवनाचे वडिल का याबद्दल मला खात्री नाही कारण ते जेवायला याच्यासोबत बसले. मुलीच्या लग्नात बाबा व्याह्यां सोबत नाही का बसणार.. तसे असेल तर कदाचित भुवनाच्या कुटुंबास्जी टचमध्ये असतील हे लोक…

मला लग्नाला बोलावले असते तर बरे झाले असते.. मी ते मस्त जेवण पोट भर जेवले असते आणि कार्तीला नावही विचारले असते. पिक्चर तिथेच संपला असता. Happy

मामाची मुलगी आहे. मुलीच्या बापाची बहिण म्हणजे अस्वाची आई. हे सगळं स्वच्छ सांगितलंय की!
तो ये मेरे मामा है म्हणतो. मामा आपली बहिण नाव घेऊन कशी आहे विचारतो.
घर त्यांना कुठे मिळालं? ते त्या शुभ्रवस्त्रांकित जरी बॉर्डरांकित धोतर आणि साडी नेसलेल्यांना मिळालं ना.
हो. लॉस्ट इन एव्हरीथिंग. Lol

सोकुमामा हा अस्वाचा मामा.

पण तो भुवनाचा बाबा नाही. लहानपणी घर सोडताना भुवनाचे बाबा अस्वाला म्हणतात तिची कुठल्याशा शाळेत अ‍ॅडमिशन घेणार आहेत त्या करता त्यांना अस्वाच्या बाबांनी शिफारसपत्र पण दिलेलं असतं. तो माणूस सोकुमामा नाहीये (कारण तो तेंव्हा अस्वाच्या बाबांबरोबर असतो). आणि भुवनाच्या बाबांना तो काका म्हणतो.

केस बहुतेक चुलत भावांशी हरतात. (ते पण दोन भाऊ दाखवले आहेत - पंक्तीत जेवताना. )

ईन्डियन आयडॉलच्या ऑडिशनमधून ह्यांना हाकलून दिले असते >>> Rofl

चित्रपटात वा वा करण्याजोगी कथा नसली तरी बाकी चित्रिकरण हिरवाई, वास्तवदर्शन चांगले आहे. >>>
ईन्डियन आयडॉलच्या ऑडिशनमधून ह्यांना हाकलून दिले असते >>>
सर्वत्र सो. मिडियावर प्रचंड स्तुती चालू असली तरी फार बोअर आणि संथ सिनेमा आहे. >>>>

आधीच हे "मल्लू, किंवा मल्लू सारखे वाटणारे तमिळ" पिक्चर बघायला पेशन्स ठेवून बसावे लागते. आणि तुम्ही लोक इथे जोरदार "प्रमोट" करत आहात Proud

फेबुवर अस्वाचे अनेक फॅन्स अनेक वर्षांनंतर रियुनियन मधे कॉलेज क्रश भेटल्यासारखे लिहीत आहेत Happy

काल माबोकर बुवांच्या रेकोवरून नेफिवर "माय ओल्ड अ‍ॅ* " नावाचा पिक्चर थोडा बघितला. इंटरेस्टिंग वाटतोय. पहिला अर्धा पाऊण तास पाहिला आहे. संवाद व विनोद एकदम सध्याचे वाटतात.

@ फारएण्ड,

मला आत्ताच हे ढकलपत्र आले :

: चित्रपटांचा आपल्या मानसिकतेवर प्रभाव पडतोच.

: खराय. कुठला सिनेमा पाहिलास?

: मैयाळगन.

: म्हणजे तुला आता माणसांतला चांगुलपणा, क्षमाशीलता, प्रेम, नातीगोती वगैरे गोष्टींचं महत्त्व पटायला लागलं असणार.

: नाही. तसं काही नाही.

: मग?

: हल्ली मी मडक्यातून बीअर प्यायला सुरुवात केली आहे.

चित्रपटसार, अर्थार्क, घुसळून काढलेले नवनीत, गूढ़ार्थ, निचोड, take away वगैरे इतके चपखल मांडणाऱ्या ह्या संवादलेखकास माझा प्रणिपात्, पंचांग प्रणाम, आदरयुक्त नमस्कार!

मैयाळगन नक्की कसे ऊच्चारावे म्हणुन हिन्दि ऑडिओचा द एन्ड आल्यावर मी तमिळ ऑडिओ सुरु करुन शेवट परत पाहिला.. ते मियाळगाSS असे आहे.. म्हणजे मिलिंदा म्हणताना दा वर जोर देऊन कसे उच्चारले जाईल तसे मियाळगा…

ते बिअर प्रकरण पण गोलमाल आहे… तो बिअर पिउया म्हणतो
पण ते दोघे उठुन गेल्यावर चटईवर नाग आल्याचे दृष्य वरुन घेतलेय, त्यात मडक्यात पांढरे द्रव दिसते. आता तो बिअरचा फेस म्हणावे तर तासभर मडक्यात राहिलेली बिअर फेस टिकवुन ठेवेल का माहित नाही … असो

मियाळगान् चे हाक मारताना मियळगा ऽऽ झाले आहे. सोकुकाका आणि भुवनाचे बाबा वायले वायले. भुवना आत्येबहिण व सोकुकाका मामा आहेत. घर सोडण्याच्या प्रसंगात भुवनाचे बाबा व सोक्कुलिंगम् दोन्ही आहेत. त्यांनी एकमेकांशी कॉंटॅक्ट ठेवला असावा.

मियळगा

मिलिंद, अनंत वगैरे मुलांना हाक देतांना आपण नाही का मिलिंदाsss, अनंताsss करत ? तसयं ते.

Submitted by अनिंद्य on 9 November, 2024 - 22:10 Lol
'मी खिडक्यांना ते तसले पडदे म्हणत होते' Wink

पण मलाही (मी दारू पीत नसूनही) तो मातीच्या भांड्यातून बीअर पिण्याचा प्रसंग आवडला. त्या सगळ्या वातावरणात काचेचे ग्लास अगदीच विसंवादी वाटले असते.

मैयाळगन का काय तो पुन्हा पाहण्याचा निकराचा प्रयत्न केला. तो लग्नात दागिने घालण्याचा प्रसंग काय पीळ पीळ पिळलाय. फास्ट फॉरवर्ड केला तरी चालूच. मी मागच्या रांगेत असतो तर तिथूनच गिफ्ट न देता कलटी मारून, भरपूर जेवून सटकलो असतो. दिग्दर्शकाला बहुदा मिनिटांच्या हिशोबात पैसे मिळाले असावे.

Pages