दिवाळी अंक - २०२४

Submitted by ऋतुराज. on 19 October, 2024 - 05:18

गणपती, नवरात्र आणि दसऱ्यानंतर वेध लागतात ते दिवाळीचे.
यंदाचे दिवाळी अंक प्रकाशित व्हायला सुरवात झाली आहे.
कोणकोणते दिवाळी अंक घेतले आणि त्यात काय काय वाचले याबद्दलची चर्चा करायला हा धागा.
तसेच, इथे असणाऱ्या मायबोलीकरांचे साहित्य (लेख, कविता) एखाद्या दिवाळी अंकात छापून आले असेल तर त्याची माहिती पण इथे देऊयात.
छापील अंकांबरोबर आता डिजिटल ई अंक पण येऊ लागले आहेत. त्याबद्दल देखील इथे माहिती देऊयात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पूर्वी यातायात करून भारतातून कोणा बरोबर तरी दिअं मागवायची पण गेली बरीच वर्षे क्वालिटी इतकी बकवास वाटते की आता उत्साह संपला आहे. कितीतरी नामवंत छापील अंकांपेक्षा मायबोली, ऐसी अक्षरे, मिपावरचे लेख चांगल्या क्वालिटीचे असतात. अन तेही लेखक ४०+ वयोगटातले दिसतात. त्यामुळे हाही दर्जा किती दिवस टिकेल कुणास ठाऊक.
रील आणी मीम्स पुरत्या शॉर्ट अटेन्शन स्पॅन च्या जमान्यातल्या नव्या पिढी चे मराठीचे एकूण ज्ञान, शब्दसंपत्ती, व्याकरण, अभिरुची आणि मुळात आस्था याबद्दल माझे फारसे आशावादी विचार नाहीत. असो.

जाहिरातींची रेलचेल आणि कंटेंटच्या नावाने बोंब. माझ्या लहानपणी मुंबईला भैया येऊन दुधाचा रतीब घालत असे. तेव्हा माझे बाबा त्याला सांगत, "भैया तुमको दुधमे जितना पाणी मिलाना है न , वो मेरेको ये बर्तनमे दो. और असली दुध ये बर्तनमे. तुम कही गटरका पाणी डालेगा. उसासे ये अच्छा रहेगा. मै पुरा पैसा दुंगा."
आता वर्तमानपत्रे आणि मासिकांच्या संपादकांना असच सांगायची वेळ आली आहे. बाबारे, तुम्ही कंटेंट आणि जाहिराती अलग प्रिंट करून द्या.
म्हणजे मग जाहिरातींचा अंक सरळ रद्दीत टाकता येईल ना.

जाहिरातींचं प्रमाण आणि अंकाची किंमत यांचं नातं (याला काय शब्द आहे? गुणोत्तर का?) व्यस्त आहे.

म्हणजे जास्त जाहिराती कमी किंमत.! असे म्हणायचे आहे का? माझे काही म्हणणे नाही. फक्त अलग करून द्या. मग ज्याला पाहिजे तो जाहिराती वाचेल किंवा रद्दीत टाकेल.

हो. लोकसत्तेत बरोबर निम्मी पाने जाहिराती असतात. त्याही सगळ्या उजव्या पानांवर. त्याची किंमत २०० रुपये .

मौज, मुक्त शब्द इत्यादिंत जाहिराती कमी असतात. असल्या तर प्रकाशकांच्याच असतात. यांची किंमत ३५०-४००

केकु, जाहिराती रद्दीत टाकायची सोपी सोय केली तर जाहिरात वाले पैसे देतील का? मग अंक महाग होईल, आणि मग लोकांनी न घेतल्याने शेवटी बंदच होईल ना?
ऑनलाईन साईटवर शंभर जाहिराती असल्या तरी माझ्या मेंदूला जसा कंटेंट फक्त दिसतो जाहिरातींचा त्रासही होत नाही तसं अंकांना ही होत असेल ना? जे हवं ते वाचायचं. जाहिरातीचं पान वाचाच अशी काही सक्ती नाही. अर्थकारण बघितलं नाही तर साहित्याला... किंवा कशालाच शून्य अर्थ असतो. अ‍ॅड बेस्ड रेव्हेन्यू असलेले स्टॉक्सपण बघा कायम आणि अजुन तरी शाश्वत वर असतात.
वाचक आहेत तोवरच जाहिताती असणार आहेत. खप कमी झाला की जाहिराती पहिल्या जातील.

करेक्ट अमितव
माझं जाहिरातींबद्दल ही काही म्हणणे नाही. दोन पैसे अवश्य कमवावेत अंक वाल्यांनी. माझा कन्सर्न आहे तो कंटेंट च्या क्वालिटी शी...

बाबारे, तुम्ही कंटेंट आणि जाहिराती अलग प्रिंट करून द्या.
म्हणजे मग जाहिरातींचा अंक सरळ रद्दीत टाकता येई>>>>>

आमच्या गावात मला गेल्या वर्षी फक्त तरुण भारत अंक मिळाला. वाचताना जाहिरातींचा ईतका अडथळा यायला लागला की शेवटी मी पट्टी घेऊन बसले आणि जाहिरातीची पाने फाडुन काढली. सगळी फाडल्यावर १/३ पाने उरली ती शांतपणे कसल्याही अडथळ्याविना वाचली.

कंटेंट बद्दल ममोशी सहमत.गेल्या १० वर्षात गाडी घसरत पार रसातळाला पोचलीय. आताशा पसरट लिहिणे वाढलेय. सगळा संयम एकवटुन कथेच्या अंताशी पोचलो तरी हाती ठोस काही लागत नाही.

आमच्या इथे "कोथरूड मित्र" किंवा "कोथरूड समाचार" असे काहीतरी नावाचे चारपानी वृत्त पत्र निघते आणि सगळ्या सोसायटीतून फुक्कट वाटले जाते. फक्त आणि फक्त जाहिरातीच. आणि जाहिरातदार जाहिराती देतच रहातात. दिवाळी अंकात कोणी वेळ काढून आवर्जून जाहिराती वाचत असतील अशी चुकीची कल्पना जाहिरातदारांची असेल असे वाटत नाही. पण त्यांची स्वतःची काही गणिते असतीलच. जे आपल्याला माहित नाहीत.

दिवाळी अंकात कोणी वेळ काढून आवर्जून जाहिराती वाचत असतील अशी चुकीची कल्पना जाहिरातदारांची असेल असे वाटत नाही. >> मग कोथरुड मित्र आणि समाचार मध्ये वाचत असतील अशी कल्पना आहे का?
'वेळ काढून आवर्जुन' विशेषण न लावता सांगा. चांगली कथा वाचताना त्याच लेखकाच्या पुस्तकाची जाहिरात त्याच पानावर आली. किंवा कथेतील नायिका साज शृंगार करत्येय आणि बाजुच्या पानावर पुनागाडगीळ वाली मृणाल नथ घालुन आली. असं काहीही की लक्ष जातंच की. जाहिरातींचा त्रास होतो याचा अर्थ दे आर वर्किंग. मला कधीकधी दिसतच नाहीत त्यामुळे माझ्या बाबत त्यावेळा वर्क केल्या नाहीत. त्रास झाला म्हणजे तुमच्या डोक्यात त्या रजिस्टर झाल्या. काम फत्ते.

जाहिरातींच्या पानात कथेचे पुढचे पान शोधावे लागते त्याचा त्रास होतो. जाहिराती मी आनंदाने वाचते. तेवढीच माहिती मिळते. दिवाळी अंकात कित्येकदा हार्दिक शुभेछावाली पाने आसतात… हे बहुतेक मित्रमंडळ असावे, पैसे पुरवणारे. जाहिराती वाचत असल्या कल्पना करत टिपी करता येतो.

आताशा पसरट लिहिणे वाढलेय. सगळा संयम एकवटुन कथेच्या अंताशी पोचलो तरी हाती ठोस काही लागत नाही.
>>>> अनुमोदन. हे दिवाळी अंकापुरतेच नाही सगळीकडेच लागण झाली आहे. आशय नाही आणि वर्णन जास्त.

जाहिरात पानभर व चकचकीत सुळसुळीत पानावरून प्रकाश परावर्तित होऊन डोळ्यांना त्रास होतो दिवाळी अंक वाचताना. प्रत्येक पानानंतर एका पानाचे लेखन व क्रमशः असते मग जाहिरातासाठी जागा रहावी उरलेले लेखन मागे माळ्यावर टाकलेले असते. रसभंग होतो. मी वाचत नाही आता दिवाळी अंक, हा प्रकारच डेटेड वाटतोय.

Hi all paise nahit.deoghar w tamhn ghyyache àhe. Bookgangawar baghte. Naval grahankit han as sa s have àhe. Kalnirnay

पूर्वी नवीन असताना माहेर आणि मेनका वगैरे बद्दल मायबोलीवर वाचून एकदा आवर्जून हे दोन अंक विकत घेतले
त्यावेळी जी निराशा पदरी पडली तेव्हापासून कानाला खडा लावला आहे . जाहिराती एकवेळ परवडल्या पण कंटेंट च्या नावाने बोंब ! ऐसा केसन चलेगा?

मागच्या वर्षी मी चंद्रकांत , अक्षर , धनंजय दिवाळी अंक विकत घेतलेले . ते बऱ्यापैकी ठीक होते जाहिरातीचा भडीमार असूनही .

जाई, अगदी! माहेर आणि मेनकाची जी काय वाट लागली आहे गेल्या काही वर्षांत की बस! बेहेरे पती-पत्नी माहेरचे (आणि बहुतेक मेनकाचेही) संपादक असताना दोन्ही अंक वाचनीय असायचे. कथा, दीर्घकथा सुंदर असायच्या. कित्येक लेखक वर्षानुवर्ष फक्त ह्या दिवाळी अंकांमध्येच लिहायचे. नंतर मॅनेजमेंट बदलल्यावर पहिले एक-दोन वर्ष छान होतं पण नंतर माहेर म्हणजे 'माहितीचा भडिमार' टाईप सुरू झालं! शिवाय लेखनाचा दर्जाही ढासळला. मेनका म्हणजे गृहशोभिका किंवा तत्सम मासिकांसारखं लाईफस्टाईल मॅगझिन झालं आहे! माझी आई दोन्ही अंक घेते. गेले काही वर्ष ती इथे येते तेव्हा घेऊन येते किंवा मी तिथे जातो तेव्हा मी ते वाचतो आणि बरं झालं कुरीयरचे पैसे वाचले असं म्हणून समाधान मानून घेतो. Happy

अनुभव , अक्षर वगैरे अंक मला आवडतात. गेल्यावर्षी लोकसत्ताही बरा वाटला होता. एक समदा नावाचा भटकंती थीम वरचा अंक वाचला होता गेल्या एक दोन वर्षांत तो ही मस्त होता. मुशाफिरी बंद पडल्याचं अजूनही वाईट वाटतं फार!

असो, कथांबद्दल सांगा की.

हाय पीप्स गुड मॉर्निन्ग. नवे देवघर घरचे भा डे व एक हप्ता गेल्यावर घ्याचे ठरिवले मग बुक गंगा वर फेरी मारली. प्रामाणिक पणे बोलायचे झाले तर सदाशीव पेठ वाल्याशी बोलवेना सबकी अम्मा अम्माझोन वर पण बघितले. तिथून काल निर्ण य व त्याचेच दि अं नवल व सा स घेतले आहे अब भुक्तो.

१) मौज : हे कव्हर वर मौत सारखेच दिसते. दिव्य फॉट् सिलेक्षन.

२) शतायु एस ई बाई ज्युनिअर डॉक्ट र किंवा सिनीअर नर्स रील पुरती पोज मारत आहे अशी दिसती. पुर्वी ते काही तरी अगम्य मशीन टाकत व ते बघून लोकमान्य नगर वाले एम एस केल्या वाणी खूश होउन शेअर करत असत ती माहिती.

३) आवाजः बेटर पॉर्न इस अवै लेबल इ झीली. कव्हर फाडली.

माहेरः ह्या कव्हर वर फिकुटलेली ब्रेस्ट क्यान्सर वाली बाई आहे. निळी फासलेली आय शॉडे. नो लिप्स्टिक नॉट इव्हन डे शेड. फिक्कट कमळ हातात. निळे जुनेरे व चौकड्री चा शेपलेस बिलोज. काय हे. फसलेले जामिनी रॉय.

मला एक आय डिया आहे: डे डली आत्या मधील सुंदर बुम्मी घेतली असती. तिला सुंदरशी लाइट ग्रीन प्रिंट ड शिफॉन/ विचित्र सिल्क नेसवली असती. सर्वीकडे स्लीवलेस वाल्या बाया भरल्या आहेत मात्र. ड रपोक कहीं के. व उभ्याने , केस लांब सोडून मागे वळून बघणारी अशी पोझ दिली असती त्र मी चित्र कापून फ्रेम केले असते.

२) मेनका पण कव्हर वर फार मेहनत नाही. १२ वी च्या पोराला पण बाळ बोध वाटे ल. खणा चा बिलोज ची ड्रेपरी. फक्त नाही आं योउ बॅड ब्वाइज. साडी नेसून जमिनीवर बसून जात्यावार दळत आहे. वाच कांचा भेजा भेजे बहुतेक . गुलाबी साडी वालीला तरी घ्यायचेच. ती गोड आहे .

काल निर्णय. : स्लीवलेस वाली जेनेरिक बाई. पण ठस ठ शीत आहे. फोटो सॉप गोरी. ह्यात मजेशीर माहिती असते पण .

व का. क्यालेंडर. : हे मला आवड ते. इंग्रजीतोन घेणा र होते पण लेकीला मराठी डोक्यावरुन जाते. पाणी घालून गिरगिट शिजव कळत नाही.
मग मराठी झिन्दा बाद. अमेरिकेतील बहिणीं सा ठी मेजर अपड्रेट. भाउ लोक जरुर सांगा त्यांना.

काही महिन्यात अमेरिकेचे गिलीअ ड व्हय्ला सुरुवात होईल तर तुम्ही जर पिरीअड ट्रॅकिन्ग अ‍ॅप वर करत असाल तर तसे करोनका. तो डेटा सरकार कडे घेतील. व तुमच्या रिप्रॉ अ‍ॅक्टि विटीज चा ट्रॅक ठेवतील. ही उ मुलींच्या सर्कल मधली गॉसिप आअहे. बट पॉसिबल. फर्टाइल प्रेग्नंट मुलींना गर्भ पात करू देणार नाहीत. कंपनी चालवायला पोरगे व गोड गोर्‍या बाळी हव्यातच. वाइट वाटत आहे. पण शेअर करोन ठेवत आहे.

के कू नवल यायाचे आहे. कव्हर वर चित्रच आहे त्याहून आश्रम हरिणी हिरवीण आहे. कव्हर नोट मॅट रिन्ग हेर. हंस दिसलेच नाही. माहेर वाले मारत असतील व्योज. . जुस्ट किडिंग नाहीतर केस व्हायची. हंस व दक्षता पण तुमचे वचून झाल्यावर घरपोच घेउन या व इलेक्ट्रिक केटल वर चहा करुन घ्या. तोपरेन्त दे वघर पण लागेल.

अजून वाचायला सुरुवात नाही केली. पण वाचायला सुरूवात करण्याआधी मुखपृष्ठांची चिरफाड- ही अमांची आयडिया भारी आहे. विकत घेतलेली पण वाचायची राहिलेली पुस्तकं, लायब्ररीयनचं डोकं खाऊन आणलेली पण वाचायची राहिलेली पुस्तकं, मागच्या दिवाळी अंकांच्या गठ्ठ्यातलं वाचायचं राहिलेलं बरचसं, ऑनलाईनमधलं बुकमार्क करून ठेवलेलं पण अजून वाचायचं राहिलेलं आणि त्यात या वर्षी नवीन उगवलेले दिवाळी अंक- आता हे कधी वाचणार, असं होऊन जातं. अशात मुखपृष्ठांची रसग्रहणं लिहायला किंवा वाचायला मिळाली तर जरा शांती मिळेल.

मागल्या वर्षीच्या 'भूमी' थीम असलेल्या 'अनुवाद'चं मुखपृष्ठ फार फार आवडलेलं.

हंस आणि नवल आवडतात. काही कंटेंट सामान्यच असलं तरीही एकंदर थीम आणि रचना आकर्षित करते. तेही काही वर्षांनी बोअर होईल कदाचित. जत्रा, आवाज वगैरे बोअर होतात आता. त्यांच्या मुखपृष्ठांबद्दल अमांना मोदक. आजकाल यांत ज्युब्र सारखे लोक लिहिताना दिसतात- हे जरा बरं चिन्ह म्हणायचं.

'मौज' चा कुठच्याही वर्षाचा अंक काढून त्यावर इतर कुठचंही साल चिकटवलं तरी काही फरक पडणार नाही- इति रॉबिनहूड Proud बाकी मौजमधल्या एलकुंचवारांच्या 'बिंदूनादकलातीत'च्या प्रेमात पडलो होतो. कितीदा वाचलं, शेवटी अभिवाचनही केलं. याचाच सिक्वेल, म्हणजे मौज २३ च्या अंकातलं 'निरोप' ही आवडलेलं..

Way back we were active subscribers of the Satya Katha. Stories poems articles. And now we have di a called usmala!!!

Hi I got naval today . Cover girl is good enough. Lots to read. And good complicated chitre in between. Let me read through and revert.

Hi sorry for delay
. Naval is absolutely good smashing from front to back. Pl read.

Got three yesterday. Of which kalnirnay is very good content format wise. No mumbo jumbo. Neat segments. Even a cute bal vibhag. Recipe s good ones.

Grah sanket full vachla nahi I get it for sadesati updates. Plus other nice details ond detailed article on protective kavach.. nice print and liss ads.

Third on saptahik sakal . Madhuri on top but tukar content and full o f ads. Something on vaagh. No energy to write about each story.

Pages