दिवाळी अंक - २०२४

Submitted by ऋतुराज. on 19 October, 2024 - 05:18

गणपती, नवरात्र आणि दसऱ्यानंतर वेध लागतात ते दिवाळीचे.
यंदाचे दिवाळी अंक प्रकाशित व्हायला सुरवात झाली आहे.
कोणकोणते दिवाळी अंक घेतले आणि त्यात काय काय वाचले याबद्दलची चर्चा करायला हा धागा.
तसेच, इथे असणाऱ्या मायबोलीकरांचे साहित्य (लेख, कविता) एखाद्या दिवाळी अंकात छापून आले असेल तर त्याची माहिती पण इथे देऊयात.
छापील अंकांबरोबर आता डिजिटल ई अंक पण येऊ लागले आहेत. त्याबद्दल देखील इथे माहिती देऊयात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यंदाच्या अनुभव दि अं चं कव्हर पहा लोकहो, आणि संबंधित लेखही वाचा.
बाकीचे लेखही वाचा.

पराग, अनुभवमधली मेघश्री दळवींची कथा छान आहे.

वाचनालयातून मुक्त संवाद ( छापील) अंक आणला. हा पीडीएफ पेक्षा वेगळा आहे. म्हणजे संपादक इ. सुद्धा.
यात अज्जुका यांचा "मी कॉश्च्यूम डिझायनरच आहे," हा लेख आहे.

भरत,
तुम्ही वेगळा अंक आणला आहे. पीडीएफ आणि छापील अंक समान आहे.

Arere te dalan kiti wela vachnar. Asech upalabdh aahe.

अर्थातच चिनूक्स. मी अनुक्रमणिका पाहिली नाही. मुखपृष्ठावर संपादकाचं नाव छापलं आहे. तेही पाहिलं नाही. संपादक विलास गावरसकर.
हे त्रैमासिक आहे. कांदिवली , मुंबईचा पत्ता आहे. अंकात संपादकांची मुलाखत आहे आणि मुखपृष्ठाच्या मागच्या बाजूला त्यांची जाहिरात.

रहस्य कथा / भयकथा आहेत. मुखपृष्ठ त्याला साजेसे आहे. झाडाच्या भयाण फांद्या. पडका वाटावा असा वाडा. त्यात एकच दिवा. मी करोनासंबंधीची एक कथा तेवढी वाचली. उरलेल्या साहित्यातील पाककृती वाचेन.

कॉश्च्यूम डिझायनर लेखातलं आधी मायबोलीवर वाचलंच आहे. चित्रपट बघताना तुमची कला जर वेगळी लक्षात येत असेल, तर तुमचं काम कथेपासून सुटून वेगळं जाणवतं , हा एका मुद्दा आधी कधी वाचला होता का , ते आठवत नाही. पटला.
हा लेखही त्यांनी या दिवाळी अंकासाठी दिला आहे का, कळत नाही. लेखाच्या शेवटी मनोगत या संकेतस्थळाचा उल्लेख आहे.

"कुल्फी"चा दिवाळी अंक. रंगी बेरंगी रेखाचित्रे, उत्कृष्ट दर्जेदार कागद आणि छपाई ने नटलेला. कथा अत्यंत वाचनीय आहेत. अजून पूर्ण वाचून झाला नाहीये. सुजय जाधव, माधुरी पुरंदरे, उमेश कुलकर्णी ह्यांच्या कै च्या कै कथांनी नटलेला. मेघना भुस्कुटे ह्या अंकाच्या सहसंपादिका आहेत. हे मासिक लहान मुला मुलींसाठी आहे. पण, कुणाला सांगणार नसाल तर सांगतो, इकडे कान द्या जरा, ४५+ वयाच्या मोठ्या मुलांनीही हळूच चोरून वाचायला हरकत नाही. किंमत १८०/ पण पैसा वसूल अंक! Happy

मेघना, जितेन वैद्य, आणि नर्मदा खरे यांनी काढलेला ' भास ' या अनियतकालिकाचा अंक जरूर विकत घ्या आणि वाचा.
देवदत्त राजाध्यक्ष, आदुबाळ, परिणीता दांडेकर, हेमंत राजाध्यक्ष यांचं अप्रतिम लेखन आहे. चित्रंही सुरेख आहेत.

नवल दिवाळी अंक वाचला बऱ्यापैकी. चांगल्या आहेत कथा.

पद्मगंधा मधील पण दोन तीन लेख आवडले. बच्चा पोश या विचित्र अफगाणी पद्धतीची नविन ओळख झाली.
IMG-20241103-WA0050.jpg

Pages