Submitted by ऋतुराज. on 19 October, 2024 - 05:18
गणपती, नवरात्र आणि दसऱ्यानंतर वेध लागतात ते दिवाळीचे.
यंदाचे दिवाळी अंक प्रकाशित व्हायला सुरवात झाली आहे.
कोणकोणते दिवाळी अंक घेतले आणि त्यात काय काय वाचले याबद्दलची चर्चा करायला हा धागा.
तसेच, इथे असणाऱ्या मायबोलीकरांचे साहित्य (लेख, कविता) एखाद्या दिवाळी अंकात छापून आले असेल तर त्याची माहिती पण इथे देऊयात.
छापील अंकांबरोबर आता डिजिटल ई अंक पण येऊ लागले आहेत. त्याबद्दल देखील इथे माहिती देऊयात.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यंदाच्या अनुभव दि अं चं कव्हर
यंदाच्या अनुभव दि अं चं कव्हर पहा लोकहो, आणि संबंधित लेखही वाचा.
बाकीचे लेखही वाचा.
पराग, अनुभवमधली मेघश्री दळवींची कथा छान आहे.
वाचनालयातून मुक्त संवाद (
वाचनालयातून मुक्त संवाद ( छापील) अंक आणला. हा पीडीएफ पेक्षा वेगळा आहे. म्हणजे संपादक इ. सुद्धा.
यात अज्जुका यांचा "मी कॉश्च्यूम डिझायनरच आहे," हा लेख आहे.
भरत,
भरत,
तुम्ही वेगळा अंक आणला आहे. पीडीएफ आणि छापील अंक समान आहे.
मुक्त संवादच्या अलीकडच्या
मुक्त संवादच्या अलीकडच्या अंकांत नीरजाचा लेख नाही. तुम्ही नक्की कोणता अंक आणला आहे?
Arere te dalan kiti wela
Arere te dalan kiti wela vachnar. Asech upalabdh aahe.
अर्थातच चिनूक्स. मी
अर्थातच चिनूक्स. मी अनुक्रमणिका पाहिली नाही. मुखपृष्ठावर संपादकाचं नाव छापलं आहे. तेही पाहिलं नाही. संपादक विलास गावरसकर.
हे त्रैमासिक आहे. कांदिवली , मुंबईचा पत्ता आहे. अंकात संपादकांची मुलाखत आहे आणि मुखपृष्ठाच्या मागच्या बाजूला त्यांची जाहिरात.
रहस्य कथा / भयकथा आहेत. मुखपृष्ठ त्याला साजेसे आहे. झाडाच्या भयाण फांद्या. पडका वाटावा असा वाडा. त्यात एकच दिवा. मी करोनासंबंधीची एक कथा तेवढी वाचली. उरलेल्या साहित्यातील पाककृती वाचेन.
कॉश्च्यूम डिझायनर लेखातलं आधी मायबोलीवर वाचलंच आहे. चित्रपट बघताना तुमची कला जर वेगळी लक्षात येत असेल, तर तुमचं काम कथेपासून सुटून वेगळं जाणवतं , हा एका मुद्दा आधी कधी वाचला होता का , ते आठवत नाही. पटला.
हा लेखही त्यांनी या दिवाळी अंकासाठी दिला आहे का, कळत नाही. लेखाच्या शेवटी मनोगत या संकेतस्थळाचा उल्लेख आहे.
"कुल्फी"चा दिवाळी अंक. रंगी
"कुल्फी"चा दिवाळी अंक. रंगी बेरंगी रेखाचित्रे, उत्कृष्ट दर्जेदार कागद आणि छपाई ने नटलेला. कथा अत्यंत वाचनीय आहेत. अजून पूर्ण वाचून झाला नाहीये. सुजय जाधव, माधुरी पुरंदरे, उमेश कुलकर्णी ह्यांच्या कै च्या कै कथांनी नटलेला. मेघना भुस्कुटे ह्या अंकाच्या सहसंपादिका आहेत. हे मासिक लहान मुला मुलींसाठी आहे. पण, कुणाला सांगणार नसाल तर सांगतो, इकडे कान द्या जरा, ४५+ वयाच्या मोठ्या मुलांनीही हळूच चोरून वाचायला हरकत नाही. किंमत १८०/ पण पैसा वसूल अंक!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेघना, जितेन वैद्य, आणि
मेघना, जितेन वैद्य, आणि नर्मदा खरे यांनी काढलेला ' भास ' या अनियतकालिकाचा अंक जरूर विकत घ्या आणि वाचा.
देवदत्त राजाध्यक्ष, आदुबाळ, परिणीता दांडेकर, हेमंत राजाध्यक्ष यांचं अप्रतिम लेखन आहे. चित्रंही सुरेख आहेत.
नवल दीवाळी अंक वाचला
नवल दिवाळी अंक वाचला बऱ्यापैकी. चांगल्या आहेत कथा.
पद्मगंधा मधील पण दोन तीन लेख आवडले. बच्चा पोश या विचित्र अफगाणी पद्धतीची नविन ओळख झाली.
![IMG-20241103-WA0050.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u21114/IMG-20241103-WA0050.jpg)
इथे लिहिताना अमांची आठवण
इथे लिहिताना अमांची आठवण येतेच.
यंदा वाचन अगदीच रखडलं. हा दुसराच अंक वाचून होतोय.
ऋतुरंग. संपादक अरुण शेवते. यंदाची थीम आवाज.
असहमतीचा आवाज - जवळच्या लोकांच्या, वडिलधार्यांच्या , वरिष्ठांच्या किंवा अगदी स्वतःच्याही असहमतीने घेतलेले निर्णंय. यताले राजकारण्यांचे लेख वाचले नाहीत. राजीव खांडेकरांचा लेख भंपक वाटला. बाकीचे आवडले. शुभदा चौकरांचा लोकसत्तेतला प्रवास वाचताना छान वाटलं.
दुसरा भाग - आतला आवाज.
दत्तप्रसाद दाभोळकर नेहमीप्रमाणे विवेकानंदांवर विशिष्ट अजेंडा घेऊन लिहितात. त्यांनी सिलेक्टिव्ह विवेकानंद घेतलेत का असा प्रश्न पडतो.
रॉजर फेडररच्या या भाषणाचा अनुवाद आहे.
सोनाली लोहार यांचा बाबासाहेब आंबेडकरांवरचा लेख आवडला.
सिद्धार्थ अकोलकर - अंतहीन युद्ध
https://www.imdb.com/title/tt8571630/
आम्ही असे लढलो - वोलोडिमिर झेलन्स्की - वाचला नाही.
आवाजाची दुनिया या सदरातला मृदुला दाढे - जोशी यांचा किशोरकुमारवरचा लेख अतिशय आवडला. यांचं चित्रपटसंगीतावरचं पुस्तक घ्यायचं राहिलं आहे, हे आठवलं.
संतवाणी मधले लेख वाचले नाहीत. प्रदीप चंपानेरकरांचा आशावरचा लेख उगाच आहे. बाळ फोंडकेंचा लेख चाळला.
एकंदर अंक आवडला.
इथे लिहिताना अमांची आठवण
इथे लिहिताना अमांची आठवण येतेच.>>>>>> अगदी अगदी.
माझे २०२४ मधील "दिवाळी अंक"
माझे २०२४ मधील "दिवाळी अंक" लेखन
![diwali ank 2024 self writing.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u80262/diwali%20ank%202024%20self%20writing.jpg)
लोकमत दीपोत्सव चांगला वाटला.
लोकमत दीपोत्सव चांगला वाटला. खुर्ची = सत्ता ही मध्यवर्ती संकल्पना आहे.
Pages