दिवाळी अंक - २०२४

Submitted by ऋतुराज. on 19 October, 2024 - 05:18

गणपती, नवरात्र आणि दसऱ्यानंतर वेध लागतात ते दिवाळीचे.
यंदाचे दिवाळी अंक प्रकाशित व्हायला सुरवात झाली आहे.
कोणकोणते दिवाळी अंक घेतले आणि त्यात काय काय वाचले याबद्दलची चर्चा करायला हा धागा.
तसेच, इथे असणाऱ्या मायबोलीकरांचे साहित्य (लेख, कविता) एखाद्या दिवाळी अंकात छापून आले असेल तर त्याची माहिती पण इथे देऊयात.
छापील अंकांबरोबर आता डिजिटल ई अंक पण येऊ लागले आहेत. त्याबद्दल देखील इथे माहिती देऊयात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Anuvad 1.jpg
.
Anuvad 2.jpg

दिवाळी अंकांत मायबोलीकरांचे लेखन

उत्तम अनुवाद - साजिरा- दीपक ठाकरे - काफ्का -स्टोकर. हा अनुवाद त्यांनी गेल्या वर्षी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने केला होता.

मुक्त संवाद - चिनूक्स -चिन्मय दामले - छपाक् ... आणि स्त्रिया पोहू लागल्या

महा अनुभव - जनुकं जेव्हा कात्रीत सापडतात - डॉ आरती रानडे (rar?)
इट्स डार्क इकॉनॉमी स्टुपिड - कौमुदी वाळिंबे

माहेर मध्ये अनेक मायबोलीकरांचे लेखन असतेच. तो अंक पाहिला नाही.

भरत.
महा अनुभव -
इट्स डार्क इकॉनॉमी स्टुपिड - कौमुदी वाळिंबे ह्या लेखात नेमके काय आहे? जर कल्पना द्याल काय?

मी वाचायचा प्रयत्न करत आहे. खूप कष्टाचे काम आहे. हेवी ड्युटी!
त्यातल्या त्यात "मिडीयावरील माझा मैत्र परिवार" हा लेख गमतीदार आहे. हहपुवा! लेखिका मधून मधून लई सेंटीमेंटल झाल्यात.
डायरेक्ट इथे जाऊन वाचा.
https://www.aisiakshare.com/node/9123
अजुन एक
चेतागुंजन
- झंपुराव तंबुवाले
ही विज्ञान कथा आहे. खूप फुलवून सांगितली आहे. वाचनीय झाली आहे.
https://www.aisiakshare.com/node/9124
माझ्या माहिती प्रमाणे - झंपुराव तंबुवाले म्हणजे आपले अश्चिग. बरोबर?

ह्या इथे मिपाचा दिवाळी अंक आहे.
https://www.misalpav.com/diwaliank2024
१८+ म्हणून खूप गाजाविजा केला होता. पण मिपाच्या सभ्य सदस्यांनी आवरून घेतले आहे असे एकूण दिसतंय. त्यामुळे खूप निराशा झाली.
Wink बाकी अंक हलकाफुलका आहे.

अक्षर दिवाळी अंक वाचला.
मुख्य विषय जीव घेण आकर्षण. सोशल मिडिया, मोबाईल, समाज माध्यमांचा विळखा. पण त्यात नविन काही नाही, याबाबतच्या वेगवेगळ्या कंगो-यांची एकत्र अशी माहिती ९ लेखात दिली आहे.
ज्युलियन असांजे, पॅलेस्टाइनचा प्रश्न, बलुचिस्तान मधील स्त्रियांचा लढा हे लेख माहितीपूर्ण आहेत. छाया कदम आणि फादर दिब्रेटो यांच्या वरचे लेख उत्तम. कथा वाचनीय आहेत. कविता पण आहेत. पण त्यावर मत प्रदर्शन करण्या इतके कवितांचे रसग्रहण करण्याची माझी कूवत नाही.
क्रांतीकारक चाफेकर बंधूंवरील लेखात लेखकाला त्यांच्या बद्दल इतिहास पुनर्लेखन होईल अशी भिती वाटते. हा लेख राजकीय दृष्टीकोनातून लिहिलेला आहे. दिवाळी अंकात वेगवेगळ्या लेखात असलेला सॉफ्ट प्रचार मला तरी आवडत नाही.
मला या अंकातील सर्वात जास्त आवडले म्हणजे त्याचे पुखपृष्ठ. एक लहान निरागस बाळ लॅपटॉप समोर बसलेलं आणि त्याच्या डोक्यावर माहितीचे घोंगावणारे चक्र.

एकंदरीत अंक ठिक वाटला. ६/१०.

एकदम मस्त लेख! जाम आवडला. थँक्स फॉर शेअरिंग लिंक.

मॅगीच्या विटा, रस्ता क्रॉस, भिया, हॅ Rofl धमाल आहे. जबरी निरिक्षण!

चिनूक्स,
तुमचा "छपाक् ... आणि स्त्रिया पोहू लागल्या" लेख वाचला. खूप अभ्यासपूर्ण आणि रोचक.
बाकी अजून वाचतोय...

यंदाच्या काही दिवाळी अंकांतील आवडलेले काही :

१. 'अक्षरधारा' दिवाळी अंक २०२४:
बर्थ डे गर्ल - हारूकी मुराकामी (अनुवादित कथा)
चाळ आणि वेताळ चालीसा - पंकज भोसले (कथा)

२. 'शब्दालय' दिवाळी अंक २०२४:
थेर- रंगनाथ पठारे (लेख)
महामार्ग - मनस्विनी लता रवींद्र (कथा)
खेळ - निखिलेश चित्रे (कथा)

३. 'उत्तम अनुवाद' दिवाळी अंक २०२४:
आजीवन ऐषोरामाची आखणी - सॉमरसेट मॉम (कथा)
मुलगे आणि मुली - ॲलीस मन्रो(कथा)
निवाडा - काफ्का (कथा)
एक जुने हस्तलिखित - काफ्का (कथा)
द स्टोकर - काफ्का (कथा)
पुस्तकं वाचण्याविषयी- हेरमान हेसे (लेख)

४. 'मुक्त शब्द' दिवाळी अंक २०२४ :
आयरनी उर्फ व्याजदशा - मकरंद साठे (कथा)
जनुवेने हाय राम - सतीश तांबे (कथा)
बरखा भगतची पहिली केस - मनस्विनी लता रवींद्र (कथा)
लकडीपुलावर लॉलीपॉप - पंकज भोसले (कथा)
तुकडा - मेघना पेठे (कविता)

५. 'मौज' दिवाळी अंक २०२४ :
अतीक्षा - प्रशान्त बागड (कथा)

६. 'हंस' दिवाळी अंक २०२४ :
अविरत वाचकांचं अजब आख्यान - निखिलेश चित्रे (कथा)

IMG-20241105-WA0028_0.jpg
ऐसी अक्षरे मधील आवडलेले लेख with green mark.

1. सेक्स, ड्रग आणि हार्मोन -
आई आणि मुलीच्या सध्याच्या काळातील संबंधांचा फारच प्रयोगशील कथा प्रकार.
2. सोशल मीडिया वरील माझा मित्र परिवार - चांगले, प्रांजळ कथन. फेसबुक आधीचे मैत्र विश्व समजले. आभासी जगात एखाद्याच्या मनाच्या कोपऱ्यात काय चालते, हे समजले.
3. SNAPCHAT स्वप्ना -
5 स्टार. भन्नाट लघुकथा. प्रचंड relevant and contemporary. Just loved the format and boldness with punches on existing elements in the society.

भवतालचा यावर्षीचा अंक फार दर्जेदार आहे.
देवाण घेवाण विशेषांक. वाचतोय..
खाली अनुक्रमणिका दिली आहे.

Screenshot_20241106_191440_Chrome.jpg

आणि हे अंक विकत कुठे मिळतील ते ही सांगा.>>>>> आयडीयल, दादर मध्ये सर्व दिवाळी अंक १०% सवलतीत मिळतील.
काही प्रमुख वर्तमानपत्र विक्रेत्यांकडे देखील दिवाळी अंक उपलब्ध असतात.
अथवा बुकगंगा वरून ऑनलाईन मागवू शकता.

मी मौजपासून सुरुवात केली. संपादकीय, बाळ फोंडके आणि मंगला गोडबोले यांचे लेख वाचले आणि आता पुढे काही वाचायची इच्छाच होत नाहीए.
दिवाळीच्या फराळात पहिल्याच घासात खवट शेंगदाणा यावा तसं झालं. आणखी काही अंक विकत घेतलेत, त्यांच्याकडे पाहावंसंही वाटत नाही.
अमा कुठे आहेत? गेल्यावर्षीचे त्यांचे प्रतिसाद अगदी क्लिनिकल होते.
ऐसी अक्षरे मधली एक कथा वाचली. हिट्स ऑफ ९२ ची स्त्री निवेदनातून संक्षिप्त आवृत्ती होती ती. तिथेही डोकेफोड झाली.

दिवाळी अंक म्हंजे एके काळचा प्राण होता माझा. लहानपणी आमच्यात भांडणं होतं असतं कोण वाचणार म्हणून. नंतर ही ऑफीस मध्ये म वा मंडळाची लायब्ररी असे , त्यामुळे वाचता येत असत. मग अंकांची क्वालिटी कमी होत गेली की माझी आवड बदलली पण वर्गणी नुसती भरायची वाचन शून्य अस झालं काही वर्ष पण अलीकडे दहा बारा वर्षात तोंड ही बघितलं नाहीये दिवाळी अंकांचं... असो.

मी गेले अनेक वर्षे फक्त लोकमत दीपोत्सव वाचायचो. टीम खूपच यंग आणि काळाशी सुसंगत विषय निवडते. तुम्हाला रीपोर्ताज प्रकारचे लेख आवडत असतील तर तो चांगला पर्याय आहे.

बाकी यावर्षी पहिल्यांदाच मी खरेदी केलेले अंक फक्त छान मूळ / अनुवादित कथेसाठी आहेत. दररोज एखादी कथा वाचतो. कथा ठीक आहेत.

1. ऋतुरंग
2. दीपावली
3. भावार्थ
IMG_20241106_165045.jpg

भारत. तुम्ही मौज घ्र्तलाय ना? मग बघा 'मौज' दिवाळी अंक २०२४ :
अतीक्षा - प्रशान्त बागड (कथा)
ही संपत्ति१ ह्यांची शिफारस आहे.

Pages