अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन!!!

Submitted by मोरोबा on 6 November, 2024 - 05:49

निश्चयाचा महामेरू। पॅट्रियटांसी आधारू।
मागाशक्तीचा निर्धारू। श्रीमंतयोगी।।

हाउसपति सिनेटपति । इलेक्टोरल कॉलेजपति।
पॉप्युलर आणि व्होटपति। सकलही स्विंग स्टेट।।

कमलाहर मेलनियावर। शूरवीर अल्फा नर।
सावधपणे लिबरल। तुच्छ केले।।

लिबरलमीडिया नीच। डेमॉक्रॅट उन्मत्त।
नमविले सकलही। ग्रॅबुनिया पुX।।

गन गर्भ अधिकार। करावया संरक्षण।
हृदयस्थ झाला अंकलसॅम। प्रेरणा केली।।

या अम्रिकेचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।
रिपब्लिकनधर्म राहिला काही। तुम्हां कारणे।।

कित्येक इल्लिगल ॲरेस्टिला। कित्येकासि धाक सुटला।
कित्येकांस डिपोर्ट केला। डॉनल्डराजा।।

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोरोबा, तुमचेही अभिनंदन.

ट्रंप निर्विवाद जिंकला.आता पॉलिटिकल रेट्रिब्युशन वर जोर न देता बाकी त्याने केलेली प्रॉमिसेस( उदा: बॉर्डर व इल्लिगल इमिग्रेशनचा प्रॉब्लेम, इन्फ्लेशन- जे आटोक्यात आलेच आहे, आणी इतर अनेक प्रॉमिसेस.) तो कशी तो अमलात आणतो ते बघुयात.

आता तर सरकारच्या तिन्ही शाखा त्याच्या ताब्यात आल्या आहेत. त्याचा उपयोग तो हुकुमशहा बनण्या ऐवजी “मेक अमेरिक ग्रेट अगेन“ करण्यात कसा करतो याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

एक आपल्या देशाचा अध्यक्ष म्हणुन त्याच्या यशाला शुभकामना.

ट्रंपजी, व्हान्सजी, उषाताई, मोरोबा, शेंडेनक्षत्र, राज आणि सामो यांचे अभिनंदन!

ट्रंपजींच्या विजयामुळे भारतीय मीडियाही भलताच एक्साइट झाला आहे.

या फोटोतील घटनेनंतर निवडणूक ट्रम्प कडे वळली होती, नंतर बरेच काही घडले असेल, पण हा निर्णायक क्षण म्हणता येईल.

>>त्याचा उपयोग तो हुकुमशहा बनण्या ऐवजी..<<
तसं काहि होत नाहि रे बाबा. फियर्माँगरिंग पासुन दूर राहुया. २०१६ नंतर देखील काहि डिम्विट्स ट्रंप नुक बटन दाबेल अशी भिती व्यक्त करत होते, अ‍ॅज इफ इट्स अ‍ॅन इझी बटन. असो..

मोरोबा, तुमची बोटं हर्षवायुमुळे थरथरत होती अशी आशा करतो... Happy

प्रेसिडेंट इलेक्ट ट्रंप यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा! अमेरीकेसाठी आणि माझ्यासारख्या सामान्य नागरीकांसाठी पुढील चार (की आठ?) वर्षे चांगली जावोत.

हे कधी झाले?
अमेरिकेत निवडणुका चालू होत्या..
मायबोलीवर याची चर्चा होती? मला का नाही कधी दिसली?

इथले लोक कोणाचे समर्थक आहेत? म्हणजे ही बातमी भारतीयांसाठी आणि अमेरिकेत राहणाऱ्या मायबोलीकरांसाठी सुखद आहे की दुःखद?

शेंडे, राज आणि विकु यांचं अभिनंदन!

माननीय मर्यादापुरुषोत्तम ट्रम्परावजीसाहेब आमच्या देशाची शान पुनरुज्जीवित करोत!
देशोऽयम् क्षोभरहितो सज्जनः संतु निर्भयः॥

अभिनंदन.
ग्रेट अगेन होऊन जाऊद्या.

अभिनंदन !
आता लाडकी बहीण , लाडका दाजी योजना चालू राहील.

अभिनंदन ट्रम्परावांचे आणि त्यांच्या समर्थकांचे . आता पुढच्या ४ वर्षात अमेरिका ग्रेट होणार.

पण ४ वर्षांनी कोण ? इलॉन मस्क ?

RAhul Kanwal ,
News Director - Aajtak & India Today

Congratulations America for electing a President despite his 34 felony convictions, his role inspiring an assault on the Capitol and his indictments on charges of attempting to subvert the 2020 election and to hold on to classified documents.

त्याही पेक्षा स्त्रियांबाद्दलची त्याची वक्तव्ये. च्यायला, मी असे बोललो असतो तर माझ्या बाबांनी मला GPL केले असते.

बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना. >>> बेगानी शादी मे दिवाने अब्दुल्ला बन के नाच रहे है और परवाने जल रहे है.

झोपा आता, उद्या हापिसात जायचंय.

>>>>>ट्रंपजी, व्हान्सजी, उषाताई, मोरोबा, शेंडेनक्षत्र, राज आणि सामो यांचे अभिनंदन!
धन्यवाद.

तिथे लिहीलेच आहे पण इथेही अभिनंदन Happy

ट्रम्पच्या बहुतेक गोष्टी त्याच्या मतदारांना माहीत आहेत. मागा फ्रिंज नव्हे. लक्षावधी इतर मतदार. तरीही त्यांना तो कमलापेक्षा योग्य वाटला. यात इमिग्रेशन व महागाई बद्दलचा जेन्युईन राग असेल, किंवा त्यांच्या बबल मधे जे डेमोक्रॅट्सचे चित्र उभे आहे त्यामुळेही असेल. पण बहुतेकांनी "despite of it" मत दिले आहे. त्याच्या त्या गोष्टींचे समर्थन म्हणून नाही. याचे एक उदाहरण नॉर्थ कॅरोलीना मधे दिसेल. तेथील आधीचा गव्हर्नर निवृत्त झाला. त्या जागी ट्रम्पनेच पाठिंबा दिलेला रिपब्लिकन उमेदवार मार्क रॉबिन्सन लढत होता व डेमोक्रॅट जिल स्टाइन. ट्र्म्पने नॉर्थ कॅरोलीनामधे मोठ्या फरकाने विजय मिळवला. पण मार्क रॉबिन्सन हरला. एकाच मतपत्रिकेवर लोकांनी एकापाठोपाठ असलेल्या दोन रिपब्लिकन्स पैकी एक निवडला व दुसरा नाकारला. मार्क रॉबिन्सन वर सर्च करा म्हणजे आणखी माहिती मिळेल. तेव्हा लोकांनी काही विचार करून मते दिली आहेत हे नक्की.

आयोवाच्या मतदारांपुढे "इमिग्रेशन" हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. आता मेक्सिकोची बॉर्डर कोठे, आणि आयोवा कोठे. पण रोष होता आणि डेम्सना ती नस पकडता आली नाही. नंतर बिल वगैरे आणले पण मुळात ते याबाबतीत सिरीयस आहेत असे लोकांना वाटत नाही.

डेमोक्रॅट जिल स्टाइन.>> जॉश स्टाईन
नॉर्थ केरोलिनात बर्‍याच वेळा गव्हर्नर डेमॉक्रॅट पण व्हाईट हाऊस रीप्ब्लिकन असं चित्र दिसतं.

मुळात बायडेनने उभं रहायला नको होतं. नंतर कमलाबाईंना उमेदवारी द्यायला नको होती. बाकी इमिग्रेशन, महागाई ही महत्वाची कारणंपण आहेतच. बरीच हिस्पेनिक आणि मुस्लिम जनताही ट्रंपकडे का वळली हेपण बघायला पाहिजे.

सिरियसली व्हॉट्स राँग विथ अ‍ॅरिझोना? कुठल्या बाबा अ‍ॅदमच्या काळातली मतमोजणीची पद्धत ते वापरत आहेत तिथे? अजुन पर्यंत फक्त ६१ टक्केच मते मोजली आहेत त्या राज्यातली! धिक्कार असो असल्या तिथल्या फडतुस मत मोजणीच्या पद्धतीचा! हे २१ वे शतक चालु आहे हे कोणीतरी त्यांना सांगायला पाहीजे! आणी हे चित्र त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत दिसुन येते( अध्यक्ष निवडणुक, राज्यपाल निवडणुक, सेनेट निवडणुक वगैरे.)

फारएंड, २ गोष्टी लक्षात घे.

१: कमला हॅरीसची जो बायडन बरोबरची नाळ मतदारांनीच नव्हे तर तिला “ व्ह्यु“ या ए बी सी वरच्या शो वर आली असताना जेव्हा प्रश्न विचारला की बायडन पेक्षा वेगळे तु काय करशील तेव्हा “ नॉट अ थिंग कम्स टु माय माइंड !” असे उत्तर देउन तिने सुद्धा तोडली नव्हती. डिपली अनपॉप्युलर प्रेसिडेंटशी असे घट्ट जोडुन घेउन तिनेच आपल्या पायावर धोंडा पाडुन घेतला. हर फेट वॉज सिल्ड देन अँड देअर. हे एक.

२: दुसरे म्हणजे तिचे पॉलिटिकल बॉडी ऑफ वर्क व तिचा ट्रॅक रेकॉर्ड अगदीच मामुली व वोफुली इनअ‍ॅडिक्वेट होता! जवळजवळ शुन्यच म्हटला तरी चालेल! तेवढ्याश्या तुटपुंज्या भांडवलावर अमेरिकेची प्रेसिडेंट होण्याची स्वप्न बघणे हे म्हणजे गंगु तेलीने राजा भोज होण्याचे स्वप्न पाहण्यासारखे होते! अश्या कुठलीही निवडणुक स्वतःच्या बळावर व नावावर न जिंकलेल्या तिने देशात ४६ टक्के मते मिळवली ही तिचे भाग्यच व क्रेडिबलच म्हटले पाहीजे!

तुला आठवत् असेल की तिला जेव्हा घिसाडघाइने ( बायडनच्या डिबेटमधल्या हॉरंडस परफॉर्मंस नंतर) डेमोक्रॅटिक पक्षाची नॉमीनी केले गेले व तिची भलावण डेमॉक्रेटिक पक्षाचे सगळे ऑपरेटिव्ह करु लागले तेव्हाच मी इथे याच बीबीवर म्हटले होते की ही तिची सगळी भलावण मी कशी मिसली?

“मुळात बायडेनने उभं रहायला नको होतं. नंतर कमलाबाईंना उमेदवारी द्यायला नको होती”

अंजली, तुझ्याशी या बाबतीत १०० टक्के सहमत!

नॉर्थ कॅरोलायना मध्ये जेफ जॅक्सन (डे) अ‍ॅटर्नी जनरल म्हणून पण निवडून आला (येईल) दिसतंय.
जेफ टिक टॉकवरुन समजला. एक शांत, समंजस, सेन्सिबल, नो-नॉन्सेन्स, हुषार आणि डेडिकेटेड असावा असं वाटतं. सध्या हाउस रेप आहे आता एजे होईल. त्याचा एकुण डिमिनर आणि कळकळ मला फार आवडते. असे लीडर डेम्स मधुन पुढे यावेत.

Pages