अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन!!!

Submitted by मोरोबा on 6 November, 2024 - 05:49

निश्चयाचा महामेरू। पॅट्रियटांसी आधारू।
मागाशक्तीचा निर्धारू। श्रीमंतयोगी।।

हाउसपति सिनेटपति । इलेक्टोरल कॉलेजपति।
पॉप्युलर आणि व्होटपति। सकलही स्विंग स्टेट।।

कमलाहर मेलनियावर। शूरवीर अल्फा नर।
सावधपणे लिबरल। तुच्छ केले।।

लिबरलमीडिया नीच। डेमॉक्रॅट उन्मत्त।
नमविले सकलही। ग्रॅबुनिया पुX।।

गन गर्भ अधिकार। करावया संरक्षण।
हृदयस्थ झाला अंकलसॅम। प्रेरणा केली।।

या अम्रिकेचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।
रिपब्लिकनधर्म राहिला काही। तुम्हां कारणे।।

कित्येक इल्लिगल ॲरेस्टिला। कित्येकासि धाक सुटला।
कित्येकांस डिपोर्ट केला। डॉनल्डराजा।।

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> इतक्या दर्जाहीन पोस्ट्सचा फक्त निषेध करावासा वाटतो.
अशी भाषा वापरली की तेवढ्यापुरतं त्यांना जरा एम्पॉवर्ड वाटत असावं बहुधा, मला दयाच येते.
कधीतरी रागाच्या भरात अपशब्द निघून जाणं निराळं, आणि उगाच सुखासुखीसुद्धा तोंडाळपणा करणं निराळं.

“ कधीतरी रागाच्या भरात अपशब्द निघून जाणं निराळं, आणि उगाच सुखासुखीसुद्धा तोंडाळपणा करणं निराळं.” - +१

निवडणुका संपल्या, जिंकल्या, तरी वाचाळपणा सुरूच आहे. त्यात काही मुद्दा पण नाहीये, नुसत्याच पोकळ शिव्याशाप.

>>
“ ह्या भ्रमिष्ट म्हातार्‍याच्या वेडगळ राजवटीचा अंत्यविधी होतो आहे असे झाले आहे” - बापरे!! स्वतः कॅलिफोर्नियासारख्या प्रगत राज्यात रहायचं आणि उगाच उंटावरून शेळ्या हाकायच्या हे हास्यास्पद आहे. असल्या एक्स्ट्रीम शिवीगाळ करणार्या भाषेचा कंटाळा आलाय. एक रिपब्लिकन सपोर्टर म्हणून सुद्धा इतक्या दर्जाहीन पोस्ट्सचा फक्त निषेध करावासा वाटतो.
<<
कॅलिफोर्नियात रहातो म्हणून सरकारबद्दल मत बाळगण्याचा हक्क गमावून बसतो का नागरिक? कुठला नियम आहे हा?
आमच्या भाषेचा कंटाळा आला असेल तर दुर्लक्ष करा. आपले आवडते कॅन्सल कल्चर मरणशय्येवर पहुडलेले आहे आता!
आपण रिपब्लिकन सपोर्टर? वा! तसे असेल तर मी अमिताभ बच्चन आहे!

>>
अशी भाषा वापरली की तेवढ्यापुरतं त्यांना जरा एम्पॉवर्ड वाटत असावं बहुधा, मला दयाच येते.
कधीतरी रागाच्या भरात अपशब्द निघून जाणं निराळं, आणि उगाच सुखासुखीसुद्धा तोंडाळपणा करणं निराळं.
<<
तुमच्या बाजूचे लोक उगीच ट्रंपच्या मंत्रीमंडळात तुमची जागा नक्की वगैरे काड्या करतात तो तोंडाळपणा दिसत नाही. पण त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले की मात्र तोंडाळपणा दिसतो. किती ते ढोंग करणार?

पुन्हा एकदा ट्रंप विरोधकांचे शिव्याशाप, बोटे मोडणे हे आमच्यासाठी पुष्पवर्षाव आहेत. मंत्रीपद नको. कितीतरी चांगले लोक मंत्रीमंडळात आहेत. त्यांना संधी मिळो!

“आमच्या भाषेचा कंटाळा आला असेल तर दुर्लक्ष करा.” - पब्लिक फोरमवर व्यक्त झाल्यावर ही अपेक्षा बाळगू नये.

“आवडते कॅन्सल कल्चर मरणशय्येवर पहुडलेले आहे आता!
आपण रिपब्लिकन सपोर्टर?” - तुम्हाला माझ्याविषयी काहीही माहिती नाही. त्यामुळे तुमचे अंदाज तुमच्या जवळच ठेवा. फक्त एकच बाजू लावून धरणे, फिअर मॉगरिंग, शिवीगाळ करणे, एकतर्फी विचार करणे आणि आपल्याला प्रश्न विचारण्यार्याला आपला शत्रू समजणे म्हणजेच रिपब्लिकन (किंवा डेमोक्रॅटीक) असणे असं नाही. मध्यममार्गी लोकंही (दोन्हीकडे) आहेत - किंबहूना बहुसंख्य लोक तसेच असतात. हा आक्रस्ताळेपणा बहूदा फक्त सोशल मिडीयातच दिसतो. म्हणूनच म्हटलं की मुद्दे नसलेल्या वाचाळपणाचा कंटाळा आला.

अच्छा म्हणजे आपण नामशेष होत असलेल्या लिझ चेनीच्या रिपब्लिकन पक्षातले आहात तर!
ज्यांना लोक नावापुरते रिपब्लिकन अर्थात रायनो म्हणतात. हरकत नाही. असतात असे लोक. सुदैवाने अशांची संख्या नगण्य आहे.
थेरड्या बायडनला आपल्या सरकारचे मरण जवळ आलेले दिसत असून तो मोठ्या प्रमाणात युक्रेनला शस्त्रे पुरवत आहेत. आणि पुतिनला उलट हल्ले करायला उद्युक्त करत आहे. ट्रंप शस्त्रसंधी करून युद्ध संपवायला उत्सुक आहे हे दिसत असताना हा जराजर्जर ,मतिभ्रष्ट राष्ट्रपती आगीत तेल ओतत आहे हे उघड दिसत असताना ह्याला फियर माँगरिंग म्हणणे हे लिझ चेनीच्या धाडसी नेतृत्वालाच शक्य आहे!
असले घातक उद्योग करताना दिसणारा डोकेफिरू राष्ट्रपती असेल तर त्याचे स्तुतिपाठ गायचे का? शिव्याच घातल्या पाहिजेत.

प्रश्न विचारण्याबद्दल बंदी घालणे, फियर माँगरिंगचे आरोप करुन सोशल नेटवर्क सदस्यस्त्व रद्द करणे, कुठलाही विरोध केल्यास त्या माणसाला आयुष्यातून उठवणे हे उद्योग आपल्या लाडक्या डेमोक्रॅट पक्षाने कोविड काळात मनसोक्त केले आहेत. प्रोजेक्शन की कायसेसे वापरून आपले वागणे दुसराच अनुकरण करतो आहे असा बिनबुडाचा कांगावा करणे थांबवा.

शेंडे, तुमच्याइतकं अ‍ॅक्टीव्हली राजकारण मी फॉलो करत नाही आणि तितका मला त्यात इंटरेस्टही नाही. त्यामुळे लिझ चेनी वगैरे मला कळलं नाही. त्याच न्यायानं डेमोक्रॅटीक पक्ष माझा लाडका असायचाही प्रश्न येत नाही. तुम्हाला मुद्दाच लक्षात येत नसेल किंवा समजावून घ्यायचा नसेल तर तुमचा कांगावा चालू द्या. कुठलीही राजकीय भुमिका न घेता, तुमच्या भांडखोर तोंडाळपणाला माझा विरोध मी मांडत राहीन.

<<थॅन्क्सगिविंगच्या निमित्ताने आज परमेश्वराचे आभार. ट्रम्प यांच्या पहिल्या टर्मप्रमाणेच पुढची चार वर्षे अमेरिकेला स्थैर्याची, समृद्धीची, शांततेची आणि युद्धमुक्त जावोत. >>

------ ट्रम्पच्या काळांत कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केली होती .
४००, ००० अमेरिकन त्याच्या पहिल्या टर्ममधेच कायमचे शांत झाले होते. शांत होण्याची प्रक्रिया पुढेही सुरुच होती.

कोरोना बळींची संख्या जगांत सर्वात जास्त अमेरिकेमधे आहे- तब्बल १.२ दशलक्ष. जॉन हॉपकिन्सवर पण अशीच आकडेवारी आहे.
https://www.worldometers.info/coronavirus/#countries

खरंय. ट्रम्प ने चीनमध्ये जाऊन गुपचूप चायनाव्हायरस बनवला आणि अमेरिकेत आणून प्रत्येक घरात जाऊन चिमणीतनं खाली उतरून प्रत्येकाला टोचला. एवढं एक काम त्याने वाईट केलं.

<<<ट्रम्प ने चीनमध्ये जाऊन गुपचूप चायनाव्हायरस बनवला>>>
मला वाटले, म्हणजे मी असे ऐकले की बायडेन, फौची, बिल गेट्स या सार्‍यांनी मिळून तो चीनमधे बनवला नि टॅरिफ न देता अमेरिकेत आणला!

काय बुवा, काय खरे काय खोटे कळत नाही.
आता इथे मोरोबा, शेंडेनक्षत्र यांच्यासारखे आतील गोटातील लोक आहेत ज्यांना खरे खोटे माहित आहे, त्यांचेच ऐकावे झाले.
करोनासाठी त्रंप्याने सुचवलेले उपाय करून बघण्याचा योग आला नाही, पण शेंडेनक्षत्र म्हणाले की ते उपहासात्मक, विनोद म्हणून होते.

"कधी एकदा जानेवारी येतो आणि ह्या भ्रमिष्ट म्हातार्‍याच्या वेडगळ राजवटीचा अंत्यविधी होतो आहे असे झाले आहे."
ह्यात मला तरी शिवीगाळ आढळली नाही. बायडेन म्हातारा आहे हे खरे. त्याच्या भ्रमिष्टपणाची उदाहरणे (हवेत काल्पनिक व्यक्तीशी हस्तांदोलन करणे, स्टेजवर कुठल्यातरी दिशेने चालणे, मोदींना introduce करायला विसरणे वगैरे) आहेत. वेडगळ ही शिवी नाही. ह्या राजवटीने अनेक वेडगळ कामे केली असे बऱ्याच लोकांना (साधारपणे) वाटते. ही राजवट निवडणुकीद्वारे लोकांनी संपवली आहे. परंतु औपचारिकदृष्टया ती संपेल ट्रम्पच्या शपथविधीनंतर. त्यामुळे ट्रम्पच्या शपथविधीला बायडेच्या राजवटीचा अंत्यविधी म्हणणे चुकीचे नाही. ही अलंकारिक भाषा आहे पण शिवी नाही.
ह्या वाक्यापुरतेच आणि इतकेच म्हणणे आहे.

व्हायरस कसा आला हा मुद्दा महत्वाचा आहे. तो चीन मधून आला असेल अशी एक शक्यता आहे. पण आता तो माणसांत आलेला आहे, कोरोनाशी सामना करतांना तो चीन मधून आहे, का द. अफ्रिकेतून हा मुद्दा गैरलागू ठरतो. १.२ दशलक्ष अमेरिकेत बळी गेले. जगातली सर्वोत्तम आरोग्य सेवा अमेरिकेत नसली तरी १.२ दशलक्ष हा आकडा फार मोठा आहे.

अमेरिकन जनतेला व्हायरस पासून सुरक्षित ठेवण्यासाठी ट्रम्पने केले काय ?

“ ह्यात मला तरी शिवीगाळ आढळली नाही.” - हरकत नाही. पण लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या, राष्ट्रप्रमुखाला ‘आसन्नमरण पिशाच्च‘ वगैरे विशेषणं मला तरी आलंकारिकही वाटत नाहीत आणि त्यातून काही मुद्दाही कन्व्हे होत नाही.

fossil fuel वापरांत अमेरिका-चीन ( आता भारत ही मागे नाही) जगांत अग्रेसर आहे. मागचा इतिहास बघितला तर CO2, CH4 निर्माण करण्यातला अमेरिकेचा सहभाग सर्वात मोठा आहे.

प्रश्न कुणामुळे / कशामुळे निर्माण झाला आहे यावर चर्चा करायला हरकत नाही, पण त्यांच्या कृत्याचे दुष्परिणाम आता सर्व जगाला भोगावे लागत आहे. ( म्हणून तर COP मधे $ ३०० अब्ज / वर्ष देण्याचे विकसीत देशांनी मान्य केले आहे). एखाद्या छोट्या बेटावरच्या देशाची काहीच चूक नसतांनाही त्याला metigate + remidy चा भाग बनावा लागणार आहे - त्यांना पर्याय नाही.

मनुष्य काय/ किती बदल करु शकेल याच्या मर्यादा मला मान्य आहेत पण हा एक ज्वलंत प्रश्न आहे हे तर स्विकारणे काही अवघड नाही. हे सर्व खोटे आहे आणि ट्रम्पला क्लायमेट चेंज मान्य नाही असे म्हटल्याने आज होत असणारा क्लायमेट चेंज थांबणार नाही.

सुरवातीला कोरोनालाच नाकारणे, मास्क लॉकडाऊन लसीकरण या उपाययोजनांची चेष्टा करणे असे केल्याने कोरोना काळांत अमेरिकेमधे १.२ दशलक्ष लोक गेले - तो आकडा प्रश्नाचे योग्य गांभिर्य दाखवून कमी ठेवता आला असता.

इनॉगरेशन्च्या आधीच ट्रंप अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने काहि महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्याची एक झलक -
१. २५% टॅरिफ कॅनडा, मेक्सिकोला देखील लागु. होणार. गेल्या टर्म मधे नाफ्टा रिवाय्ज करुन यांच्या नाड्या आवळल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती..
२. एफबीआय्च्या संचालकपदि कॅश पटेल यांची नियुक्ती. पटेल यांचा ट्रॅक रेकर्ड पहाता त्यांच्या कडुन भरपुर अपेक्षा आहेत..
३. नेटो देशां खालोखाल आता तैवानला सुद्धा मोफत संरक्षण देणं आता बंद. लक्षात घ्या कि, साधारण २५० वर्षांपुर्वि मराठ्यांनी मुघल आणि राजपुतांकडुन त्यांच्या संरक्षणा बदल्यात चौथाइची प्रथा पाडली होती..
४. ब्रिक्स राष्ट्रांना स्वःतःची करंसी निर्माण करण्यावर बंदि. केल्यास अमेरिके बरोबर होणार्‍या व्यापारावर १००% टॅरिफ लागु..

पिक्चर अभी बाकि है, असं म्हणायला हरकत नसावी...

राज - ब्रिक्स साठी १०० % ट्रम्प टॅरिफ जर $$$ पासून फारकत घेतली तर...
कॅनडा, मेक्सिको ला २५ % - अटी मान्य केल्या नाही तर...

ट्रम्प हा संयंघोषित डिल मेकर आहे. मेक अमेरिका ग्रेट अगेन - भाग दोन चा आरंभ होत आहे. तुम्ही कुठेही असलांत तरी या निर्णयाचा जोरदार फटका सर्वांनाच बसणार आहे. कॅनेडियन आणि मेक्सिकन नेत्यांनी तासाभरांतच फोन केले. जस्टिन ट्रुडों ने तर मार अ लागो वर हजेरी लावली.

पहिल्या टर्म मधेच मेक्सिको सिमे वर उंच अशी भिंत , ट्रम्प वॉल, बांधणार होता. भिंत तयार करण्यासाठी पाच अमेरिकन सेंट पण लावणार नव्हता - भिंतीसाठी येणारा सर्व खर्च मेक्सिकोकडून घेणार होता.
कॅनडाच्या स्टिल आणि अ‍ॅल्युमिनियम वर टॅरिफ लावला होता, मग पुढे काय झाले ? अर्थात डिलमेकरला हवे ते मिळाले असेल.

पुढील गोष्टींची शक्यता आहे.
(अ) टॅरिफचे पैसे अमेरिकन लोकांना द्यावे लागतील. कांदा, टमाटा, लाकूड, दूध अशा गोष्टी महाग होणार. केवळ कॅनडा सोबत $ ६०० अब्जचा व्यापार/ट्रेड आहे.
(ब) सर्व नेते धावत पळत मार अ लागो गाठतील आणि ट्रम्पच्या मागण्या मान्य करतील.
(क) retaliatory tariff वर ब्रिक्स त्यातही चीन , कॅनडा, मेक्सिको विचार करतील. मेक्सिकोने तसा इशारा दिलेलाच आहे.
(ड) पर्यायी सोर्सेस शोधण्याचे काम सुरु होईल पण हे फार वेळकाढू आहे.

तुलसी गबार्ड आणी काश पटेल यांच्या नावाला जॉन बोल्टन आणी विल्यम क्रिस्टॉल या नगांनी विरोध केला आहे. त्या अर्थी ही दोन चांगली नावे आहेत से मानायला हरकत नाही.

(२०१६ मधे सेक्रेटरी ऑफ स्टेट साठी विचार झालेला आणि पुढे NSA म्हणून काम केलेल्या) जॉन बोल्टनने २०२४ मधे ट्रम्पला विरोध केला होता. ट्रम्प चांगला आहे असे मानायला हरकत नाही.

Pages