मन

Submitted by - on 22 October, 2024 - 23:00

माझा जीव अडकतो एका गावरान भाषेतील मराठी पुस्तकात,
खिशाला काही परवड नाही आणि हिसकावून घ्यायला जमत नाही..

माझा जीव अडकतो एका स्वैर वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळुकेत,
पकडायला काही जमत नाही आणि बंदिस्त तर मुळीच करता येत नाही..

माझा जीव अडकतो एका संथ वाहणाऱ्या नदीच्या गोड पाण्यात,
थोड्याने पोट भारत नाही एव्हडया मोठया पाण्याला अडवण्याची ताकद माझ्यात नाही ..

आणि ,

माझा जीव अडकतो प्रचंड गडगडाट करून बरसणाऱ्या सारीं मध्ये ,
बघून मन भारत नाही मिठीत त्या क्षणभररही टिकत नाही ....

पण वेड मन अडकायचे काही थांबत नाही ....

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults

छान