परवानगी (शृंगारिक)

Submitted by अजिंक्यराव पाटील on 21 October, 2024 - 11:24

आधी गुंततील डोळे
डोळ्यातून इशारा मिळालाच तर
मग तुझ्या काळ्याशार लांबच लांब केसात शिरत तो आकडा काढून तुझ्या बटा मोकळ्या करीन मी.. एकामागून एक.

डोळ्यांनी बोलता बोलता जर तू पुढे केलेस तर, तुझे मऊ गुलाबी सायी सारखे ओठ, त्यांची परवानगी घेईन मी उजवा अंगठा फिरवून..

परवानगी मिळालीच समजा, तर मात्र मी माझ्या ओठात धरेल तुझ्या कानाची पाळी.. आणि सांगेन तुला की किती प्रेम करतो तुझ्यावर. तू विश्वास ठेवणार नाहीस कदाचित,
सळसळणारे तुझे ओठ जाब विचारत चावा घ्यायला येतील कदाचित.. पण मी सरकलो असेन तुझ्या मानेवरच्या तिळावर... आसुसून बिलगशील, उसासे देशील आणि अगदीच नाईलाज होईल तेव्हा माझा ताबा घेशील..

मी तुझा गुलाम.. तुझ्या ओठांची साय चाखत, बोटांनी तुझी लांबच लांब पाठ चाचपडत.. हातानी ख्याली खुशाली विचारेन तुझ्या पुठ्ठ्याची..

हळूहळू मग उतरतील कपडे, लाज, शरम आणि उरतील दोन जीव एक होण्यासाठी तळमळणारे..

पण एवढ्यात नाही.. मी आधी चुंबुन घेईन तुझे कपाळ कान, मान अन खांदे,
तुझे दंड, मनगट हात आणि बोटे..
तुझी छाती, स्तन आणि त्यावरली बोन्डे..
तुझे पोट नाभी आणि ओटीपोटही

तुझे एक एक इंच अंग, तुझे एक एक रंध्र..

आणि फुलवीन प्रणयचेतना अश्या की तू हरपून अर्पून टाकशील सर्वस्व एक एक श्वासासोबत

आणि मग

प्रिये, मी पणाला लावीन माझ्यातल्या पुरुषार्थ तुला तुझे स्त्रीत्व अनुभवता यावे म्हणून..

माझ्या देहाची समिधा प्रणयकुंडात अर्पून तुझे स्त्रीत्व प्रसन्न करून घेईन..

तुझ्या एका आवंढ्यासाठी... तुझ्या एका हुंकारासाठी.. तुझ्या आनंदासाठी..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'पुठ्ठा' या शब्दाला अडखळले. तिथे नितंब हा शब्द घाला - आवडल्यास.
ललितात, शृंगारिक मूड उत्तम पकडला आहे.

Lol!!!

नितंब हा शब्द वापरणे प्रशस्त वाटले नाही असे म्हणायचे आहे या ठिकाणी...

(याच प्रतिसादात आधी "नितंब वापरणे प्रशस्त वाटले नाही" असे लिहिलेले, म्हटलं अजून एक कोटी नको!)

म्हणून मराठी भाषेत इतर भाषेतून शब्द आले पाहिजे..
आमच्याकडे सगळे मिळून दिवसभरात 50 ते 60 वेळा बंपी या शब्द वापरतात.. कोणाला काही वावगे वाटत नाही. इथे साधा नितंब हा शब्द नुसते लिहायचे म्हटले तर प्रशस्त वाटत नाही.

कशाला पाहिजे इतर भाषेतून शब्द? मराठीतल्या शब्दांना आपणच अश्लील वगैरे समजतो. ही श्लील अश्लीलतेची समजूत वाईट आहे, शब्द नव्हे..

अहो तुम्हीच म्हणालात ना नितंब हा शब्द प्रशस्त वाटत नाही. आणि त्या जागी पुठ्ठा हा शब्द तुम्हाला वापरावा लागला.
श्लीलअश्लीलतेची समजूत तुम्हालाच मोडता येत नाहीये.
खरे सांगू तर मला पुठ्ठा हा शब्द जास्त आक्षेपार्ह वाटला.

प्रशस्त वाटलं नाही ते कवितेच्या अनुषंगाने.. मला रांगडी श्रुंगारात्मक कविताच लिहायची होती.. त्यात नितंब ऐवजी पुठ्ठा शब्द वापरणे संयुक्तिक वाटले.

अच्छा.. मग ठिक आहे.

तरी त्या अनुषंगाने देखील जिथे स्तन आले तिथे नितंब यायला हरकत नव्हती..

पुठ्ठा म्हणजे सपाट अवयव असेल ना एखादा.
टुमदार अवयवाला पुठ्ठा कसं म्हणणार?

बाकी कविता भारीच शृंगारिक आहे. आवडली !!

झकास जमली आहे.आवडली. मध्यात जरा ओळी लांबल्या आहेत...त्या जरा छोट्या केल्यात आणि मुक्तछंदीच जरी ठेवलीत तर जरा गेयता येईल.
पुठ्ठा फार निर्जीव वाटत...नितंबात सजीवपण/रसरशीतपण जाणवत.

कानाची पाळी, ओठांची साय, प्रणयचेतना, देहाची समिधा, प्रणयकुंड हे शब्द असतील तर नितंब शब्द वापरण्यास काहीच प्रत्यवाय नसावा..
अर्थात कविचा अधिकार हा सर्वात महत्वाचा..
(मला मात्र पुठ्ठा हा घोड्याशी जास्त संबंधित वाटतो..)
लावणी असेल तर पुन्हा पुठ्ठाच..
यानिमित्ताने ऐतराज मधला कोर्टसिनमधला परेश रावळही आठवला.
बम, पुठ्ठा, पृष्ठ, नितंब....

कटीभार आवडेल खरं.. किंवा आता विचार केल्यास नितंब पण चालला असता..

मादकता जास्तीत जास्त व्यक्त व्हावी अश्या अपेक्षेने शब्द हवा

Back to top