दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तुंग व्यक्तिमत्व. नेता (राजकीय नाही, लीडर या अर्थी) कसा असावा याचा वस्तुपाठ देणाऱ्या व्यक्तींपैकी एक. भावपूर्ण श्रद्धांजली.

लता नंतर आज देशात सगळ्यांचे एकच स्टेटस आहे व्हॉट्सॅपवर..

असा द्रष्टा माणुस परत होणे नाही. एक चांगले आयुष्य जगले, खरोखर लाखोंचा पोशिंदा म्हणायला हवे. मनापासुन श्रद्धांजली. Sad

ही बातमी वाचून डोळ्यात खूप पाणी आले. घरातले कोणीतरी गेल्यासारखे वाटतेय.
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

वरच्या सगळ्या पोस्टसला अनुमोदन! फार उत्तुन्ग पण तेवढच नम्र व्यक्तिमत्व...लता दीदी, कलाम साहेब, अटलजी आणी रतन टाटा...निखळलेले तेजस्वी तारे!!
इट्स पर्सनल लॉस फॉर एव्हरी इण्डियन!!

श्रीमान योगी किंवा प्लेटो चा फिलॉसॉफर किंग म्हटल्यावर डोळ्यासमोर शिवाजी महाराजांनंतर रतन टाटा च येतात. श्रद्धांजली.

अत्यंत दुःखद दिवस आजचा, उद्योग जगतासाठी, देशासाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी. Sad
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

काल बातमी ऐकली की रतन टाटा यांची तब्येत बरी नाहि ब्रीच कँडी ला आहेत तेव्हा ते बरे होण्याची प्रार्थना करेपर्यंत रात्री बातमी कळली ते गेले.. त्यावेळी खरचं वाटत होतं कि बातमी सांगणार्‍याने परत याव अन सांगाव कि आमच्याकडुन चुक झाली अगोदरची बातमी खोटी आहे.. खुप दु:खद घटना Sad
देव त्यांच्या आत्म्यास सदगती देवो! __/\__

अरेरे अतुल परचुरे Sad श्रद्धांजली.

कॅन्सर मधून बरे झाले होते ना, मागे मुलाखत बघितली होती, त्यामुळे इतक्या लवकर जातील वाटलं नव्हतं.

रतन टाटांना श्रद्धांजली _/\_
अतुल परचुरे? अरे बापरे! धक्कादायक बातमी. कॅन्सरमधून बरे झाल्यावरची मुलाखत बघितली होती Sad

सखाराम गटने म्हणा, कुंदा म्हणा किंवा धोंडू जस्ट चील!

योगा योग असा की साधारण तासभरापूर्वी मी सखाराम गटणे वाचत होतो!

श्रद्धांजली.

'चाळीशीतले चोर' (अभिनय) आणि 'घरत गणपती' (सूत्रधार) हे अतुल परचुरेंचे दोन्ही शेवटचे परफॉर्मन्सेस इतक्यातच बघितले होते. श्रद्धांजली!

अरेरे!

अतुल परचुरे! श्रद्धांजली.
कालच कपिल शर्मा शो बघताना डोक्यात आलेलं अतुल यात आता परत दिसत नाही... काय झालं कोण जाणे. आणि आज ही बातमी वाचली. Sad
त्याची मुलाखत मी ही बघितली होती आणि आवडलेली. लढा देऊन बाहेर पडल्याच्या प्रवास प्रांजळपणे सांगितलेला.

Pages