Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
वाईट वाटलं.
वाईट वाटलं.
बरेच विचार मनात आले. कामाला फार सिरियसली कधीही घेऊ नका आणि बेफिकिरी बाणवा. हे फक्त मॅनेजर नाही वर पासूनचं त्या ठिकाणचं टॉक्सिक कल्चर असावं.
काम हे आयुष्याचा एक भाग न
काम हे आयुष्याचा एक भाग न राहता पूर्ण आयुष्य बनून गेल्यावर असे दुष्परिणाम होतात.
या मुलीबद्दल खूप वाईट वाटतंय
अवघड आहे!
अवघड आहे!
इथेही बघते माझ्या मुलाच्या मित्रमंडळींमध्ये बर्न आऊट झालेल्यांची उदाहरणं. आपल्याच पिढीचं पाप आहे बहुधा हे. मुलांना रॅट रेसची भीती आणि ओव्हरअचीव्हिंगची सवय/भुलावण/सक्ती यापैकी काहीही माथी मारणार्यांत आपण नाही ना हे सतत मनाशी तपासायला हवं.
अतिताणाने आयुष्य बर्बाद
अतिताणाने आयुष्य बर्बाद करण्यात खरच अर्थ नाही.
मी ही सध्या बेरोजगार आहे - गेले एक वर्षं. पहील्यांदा रिलोकेशन नको चे नखरे केले आता कोणीच येत नाहीये. असो. पण टेन्शन घ्यायचे कशाला? आहेत ना बरिस्ता, केस मॅनेजर्स, अॅडमिन आणि शाळांत जॉब्स आहेत. स्वतःच्या अधीच्या वेल-पेड जॉबला इतकं ग्लॅमर देउन चढवलेले की आता सपाटून आपटताना किंचित त्रास होतोय.
होय किंचितच कारण काम हा आयुष्याचा भाग आहे. आयुष्य नाही.
खूप वाईट वाटले वाचून.
खूप वाईट वाटले वाचून. टॉक्झिक कल्चर, त्यातून ताण तणाव आणि उद्भवणारे हेल्थ प्रॉब्लेम्स या सगळ्यात त्याच ठिकाणी जॉब करत रहायला नको होते. इतकी क्वालीफाईड मुलगी, तिला दुसरा चांगला जॉब सहज मिळाला असता. शेवटी सर सलामत तो...
https://www.youtube.com/watch?v=gGGdecffQTI
वरच्या लोकसत्ताच्या लिंकच्या डिस्क्रिप्शन मधे लिहिलयं की डॉक्टरांनी आराम करायचा सल्ला दिला होता तरी ती हॉस्पिटल मधून थेट कामावर गेली.
इथे अमेरीकेत ८० तासाचा वर्क विक वगैरे फार जवळून पाहिले आहे. टॉक्झिक कल्चर म्हणून नाही तर त्या रोलची तिच डिमांड म्हणून. सगळ्यांनाच नाही झेपत. अशात 'अ' ला जमते तर मलाही जमावे म्हणून हट्ट आणि त्यातून मोडून पडणे ही बघितले आहे.
प्रचंड कामाच्या ताणावामुळे
प्रचंड कामाच्या ताणावामुळे आत्महत्या करावी लागल्याची घटना वाचून वाईट वाटले.
जिवापेक्षा काही महत्वाचे नसते, एक नाही तर दुसरी नोकरी हमखास मिळाली असती असे मला वाटत असले तरी त्या परिस्थितीमधून जाणार्या व्यक्तीच्या ताणाची कल्पना आपल्याला येणार नाही. प्रत्येकाची त्रास सहन करण्याची शक्ती वेगळी आहे आणि त्या त्रासाला रिअॅक्ट कसे करावे याचे प्रशिक्षण कुठल्याही पुस्तकांत मिळत नाही.
<<. स्वतःच्या अधीच्या वेल-पेड जॉबला इतकं ग्लॅमर देउन चढवलेले की आता सपाटून आपटताना किंचित त्रास होतोय. >>
----- याला आपटणे नक्कीच म्हणता येत नाही. वेल पेड, अंडर पेड हे आपणच ठरवतो. एक छोटा काळ कामापासून ब्रेक घेण्याची संधी मिळत आहे असे समजायचे. करिअर/ व्यावसाय यात काही बदल करायला हवेत का ? शिक्षणांत काही नव्याची भर घालायला हवी का? यावर नोकरी मधे असतांना गंभिरपणे विचार करता येत नाही.
जपानमध्ये तर कामाच्या
जपानमध्ये तर कामाच्या अतिताणामुळे आत्महत्या करण्याची उदाहरणे पण आहेत>>> मी पण वाचले/ऐकले आहे हे. अ ती ताण आणि स्त्री पुरुष भेदभावा बद्दल पण.
टॉक्झिक कल्चर, त्यातून ताण तणाव आणि उद्भवणारे हेल्थ प्रॉब्लेम्स या सगळ्यात त्याच ठिकाणी जॉब करत रहायला नको होते. >>> तिचं वय पण महत्वाचा मुद्दा आहे. अगदीच विशीची होती, बुली होतेय हे कळलं ही नसेल. मॅनेजर्स म्हणतात ही..तो अमुक पण करतोय, ती तमुक पण. तुलाच काय त्रास आहे?
माझ्याच ऑफिस मधे १ प्रो. मॅनेजर टिम ला ओटी करायला लाऊन त्याचा क्लेम किंवा बदली रेस्ट डे द्यायला नाही म्हणायचा. माझ्या बजेट मधे बसत नाही म्हणे. माझ्याही कडून शनिवारी काम अपेक्षा असे, पण मी व्हॉअॅ. मेसेज अनसीन सोडायचे.
व्हॉअॅ थ्रु धस्स होइल असे मेसेज मला अवेळी पाठवल्या बद्दल मी तक्रार नोंदवली होती. ह्या गोष्टीचा डुख धरून होता.
स्वत:च्या अधीच्या वेल-पेड जॉबला इतकं ग्लॅमर देउन चढवलेले की आता सपाटून आपटताना किंचित त्रास होतोय>>> सामो बिग हग आणि तुला नव्याने तुला हवा तसा जॉब लवकरच मिळोत, शुभेच्छा!
त्या परिस्थितीमधून जाणार्या
त्या परिस्थितीमधून जाणार्या व्यक्तीच्या ताणाची कल्पना आपल्याला येणार नाही. प्रत्येकाची त्रास सहन करण्याची शक्ती वेगळी आहे आणि त्या त्रासाला रिअॅक्ट कसे करावे याचे प्रशिक्षण कुठल्याही पुस्तकांत मिळत नाही.>>>> यु सेड इट.
करोनाकाळात एक नवा विषय शिकून
करोनाकाळात एक नवा विषय शिकून त्याच्यावर काम करावे लागले असताना पहाटे 3-4 पर्यंत जागून काम, दुसऱ्या दिवशी 9 ला उठून परत भारतातल्या मिटिंग हे काही दिवस केले आहे.एकदा स्ट्रेस ने डाव्या खांद्यात दुखायला लागल्यावर हा संकेत समजून थांबले.
आता सकाळी कामाचा दिवस लवकर चालू करून संध्याकाळी 8 नंतर आणि विकेंड ना मेसेज बघत नाही.कामं संपणार नाहीत, करायला, शिकायला जग पडले आहे.पण आपली एनर्जी, मर्यादा ओळखाव्या प्रत्येकाने.फोमो येऊन कामाचा नाही.(हे माझ्याबाबतीत म्हणतेय.प्रत्येकाची परिस्थिती, जास्त वेळ द्यावा लागण्याची अगतिकता वेगवेगळी असेल.)
उदय आणि आशु धन्यवाद. उदय मी
उदय आणि आशु धन्यवाद. उदय मी हा ब्रेक सकारात्मकतेने घेते आहे खरा.
इथेही बघते माझ्या मुलाच्या
इथेही बघते माझ्या मुलाच्या मित्रमंडळींमध्ये बर्न आऊट झालेल्यांची उदाहरणं. आपल्याच पिढीचं पाप आहे बहुधा हे. मुलांना रॅट रेसची भीती आणि ओव्हरअचीव्हिंगची सवय/भुलावण/सक्ती यापैकी काहीही माथी मारणार्यांत आपण नाही ना हे सतत मनाशी तपासायला हवं. >> माझी बे ऐरिया मधली भाची म्ह णते आम्ही अमेरिकेतल्या प्रेशर कुकर मध्ये रहा तो.. i could feel her.
Recently, good is good enough हा कोट वाचला आणि फार आवडलाय.
मी हा ब्रेक सकारात्मकतेने
मी हा ब्रेक सकारात्मकतेने घेते आहे खरा >> चान्गलय ग तसा घेतेयस ते. आपल्यालाही कधीतरी ब्रेक ची गरज असते. पुन्हा ताजंतवानं होऊन कामाला लागण्यासाठी, नवीन रस्ते दिसण्यासाठी, नवीन कल्पना सुचण्यासाठी..
होय नानबा
होय नानबा
रतन टाटा
रतन टाटा, श्रद्धांजली _/|\_
मोठाच लॉस आहे हा! भावपूर्ण
मोठाच लॉस आहे हा! भावपूर्ण श्रद्धांजली __/\__
भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली!
ओह! श्रद्धांजली!
ओह! श्रद्धांजली!
रतन टाटा? खूप वाईट बातमी..
रतन टाटा? खूप वाईट बातमी..
श्रद्धांजली!
श्रद्धांजली!
एक legend गेला. भावपूर्ण
एक legend गेला. भावपूर्ण श्रद्धांजली.
मोठाच लॉस आहे हा! >>> अगदी
मोठाच लॉस आहे हा! >>> अगदी खरोखर. भावपूर्ण श्रद्धांजली.
खरंच एक legend गेला. भावपूर्ण
खरंच एक legend गेला. भावपूर्ण श्रद्धांजली!!
गेल्या तासाभरात कॉन्टॅक्ट
गेल्या तासाभरात कॉन्टॅक्ट लिस्ट मधील 20-25 जणांनी व्हॉटसअप स्टेटस शेअर केले आहेत. सर्वच्या सर्व रतन टाटा.
अब्दुल कलाम सर यांच्यानंतर आज अश्या भावना अनुभवत आहे.
Real pride of India !
रतन टाटा यांना श्रद्धांजली!
रतन टाटा यांना श्रद्धांजली!
रतन टाटा यांना श्रद्धांजली
रतन टाटा यांना श्रद्धांजली
अत्यंत वाईट घटना! श्रद्धांजली
अत्यंत वाईट घटना! श्रद्धांजली!
रतन टाटा... श्रद्धांजली!
रतन टाटा... श्रद्धांजली!
खूप दुःख:द बातमी.
खूप दुःख:द बातमी.
आदरणीय व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले.
दुःखद बातमी.
दुःखद बातमी.
भावपूर्ण श्रद्धांजली
ज्यांच्या जाण्याने कोणी आपलं
ज्यांच्या जाण्याने कोणी आपलं गेलं असं वाटून डोळ्यात पाणी येईल, घसा दाटून येईल अशी माणसं विरळाच.अटल बिहारी बाजपेयीं, अब्दुल कलाम आणि आता रतन टाटा.
Prayers in peace
Pages