Submitted by मंदार गद्रे on 5 October, 2024 - 01:05
मी छाटल्या ठिकाणी उमलून आज आलो
ग्रीष्मातला बहावा होऊन आज आलो
चांभारचौकश्यांना चकवून आज आलो
कुप्रश्न धाडसाचे उठवून आज आलो
वेड्यांमुखी प्रशंसा वदवून आज आलो
हेटाळणीस त्यांच्या टाळून आज आलो
जे लागले जिव्हारी लपवून आज आलो
मौनात संयमाला सजवून आज आलो
चिंता - नव्हे - चितांना फसवून आज आलो
माया अशाश्वताची सोडून आज आलो
- मंदार.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त गद्रे साहेब
मस्त गद्रे साहेब
शेवटचे कडवे समजले नाही फक्त
शेवटचे कडवे समजले नाही फक्त
धन्यवाद, अमर!
धन्यवाद, अमर!
फक्त चिंताच नव्हे तर जिवावर उठलेल्यांना फसवून आलो.
आणि क्षणभंगुर टिकणा-या गोष्टींपेक्षा ज्या शाश्वत आहेत त्यांना आता आपलंसं करत आलो.
वाह
वाह
धन्यवाद, बन्या!
धन्यवाद, बन्या!
मतलाबंद गझल प्रयोग म्हणून
मतलाबंद गझल प्रयोग म्हणून सुरेख वाटते. मात्र इतके ध्वनीसाधर्म्य नंतर जरा कृत्रिम वाटू शकते.
(कूप्रश्न करावे लागेल)
तिसरा व चौथा शेर विशेष आवडले
धन्यवाद, बेफिकीरजी! मुद्दाम
धन्यवाद, बेफिकीरजी! मुद्दाम मतलाबंद लिहायला घेतली नव्हती, ती तशी झाली आहे.
कुप्रश्न हे 'गागाल' आहे, त्यामुळे बसते.
पुढचे अक्षर जोडाक्षर आल्यामुळे लघु अक्षराचा गुरु होतो. जसं हे सारे शब्द गागाल आहेत - विश्रब्ध, सुस्पष्ट, स्वारस्य.
>>> कुप्रश्न हे 'गागाल' आहे,
>>> कुप्रश्न हे 'गागाल' आहे, त्यामुळे बसते.
या नियमाला जे अपवाद असतात त्यातील हा एक अपवाद आहे. जसे अप्रतिम या शब्दातील अ च्या मात्रा दोन धरल्या जाऊ नयेत तसेच कुप्रश्न या शब्दातील कु च्या मात्रा दोन धरल्या जाऊ नयेत
>>> पुढचे अक्षर जोडाक्षर आल्यामुळे लघु अक्षराचा गुरु होतो. जसं हे सारे शब्द गागाल आहेत - विश्रब्ध, सुस्पष्ट, स्वारस्य.
हा नियम सुदैवाने मला माहित आहे व या विधानात दिलेल्या तिन्ही शब्दांना तो लागू होतो
>>> अप्रतिम या शब्दातील अ
>>> अप्रतिम या शब्दातील अ च्या मात्रा दोन धरल्या जाऊ नयेत
हे कळलं नाही, का ते.
उदाहरणार्थ, मालिनी वृत्तामध्ये "अप्रतिम ल ल गा गा, गालगागा लगागा " हे बसणार नाही, कारण अप्रतिम हे लललल नाही ..
"अनुदिन ल ल गा गा, गालगागा लगागा " हे बसेल.
इतर काही अपवाद!
इतर काही अपवाद!
पुन्हा, गुन्हा!
=====
अप्रतिम या शब्दाचा उच्चार मी आधी अप-रतिम असाच करायचो किंवा करतो, पण मराठी तज्ञांनुसार त्यातील अ ची मात्रा एकच धरावी असे सुमारे दहा वर्षांपूर्वी मला सांगितले गेले
कुप्रश्न (हा शब्द मला नवीन आहे) हा शब्द उच्चारताना मी कु-प्रश्न असा उच्चारला व त्यामुळे तसे लिहिले. तुम्ही तो कुप-रष्न असा उच्चारत असाल / उच्चारू इच्छित असाल तर तुमची निवड!
>>> कारण अप्रतिम हे लललल नाही
>>> कारण अप्रतिम हे लललल नाही ..
ते तसे आहे असे मराठी भाषा तज्ञांचे म्हणणे आहे व हे मला नंतर कळले होते
कुप्रश्न चा उच्चार मी कु वर
कुप्रश्न चा उच्चार मी कु वर आघात देऊन करतो. सुस्पष्ट मधल्या सु सारखाच.
याला गुन्हा, पुन्हा हे अपवाद आहेत हे पटले. (अप्रतिम हा अपवाद आहे हे नाही पटले)
जसं रामदासांच्या करुणाष्टकांमध्ये, सामान्यत: मालिनी आहे, पहिली सहा लघु अक्षरे असलेलं पण काही ओळीत जोडाक्षर असल्याने एक गुरू आणि चारच लघु अक्षरे वापरली आहेत, तरच ते चालीत बसतं.
उदा:
तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू ।
षड्रिपुकुळ माझें तोडि याचा समंधू ॥
यातली दुसरी ओळ. ष गुरू आहे.
>>> कुप्रश्न चा उच्चार मी कु
>>> कुप्रश्न चा उच्चार मी कु वर आघात देऊन करतो.
तुमचा निर्णय!
>>> अप्रतिम हा अपवाद आहे हे नाही पटले
मलाही पटत नसे, खरे तर अजूनही पटत नाही, पण दोन मराठी भाषा तज्ञ तसे म्हणतात. माझे भाषेचे ज्ञान त्यांच्याइतके नाही.
एक गंमत म्हणून -- बहुतेक
एक गंमत म्हणून -- बहुतेक ह्या अपवादांची मराठी गंमत असावी.
’न्हा’ (न + ह) नसलेला एखादा अपवाद मला पटकन सुचत नाहीये. किंबहुना ’ह’ पाहिजे. तर्हा लगा आहे! बहुतेक मला या अपवादांचं मूळ दिसतंय. ह असल्याशिवाय अपवाद नाही.
पुन्हा हे लगा आहे, पण कुंदा गागा आहे. ’ह’ असला तरच आधीचं अक्षर लघु राहतंय का काय? (अशी एक शंका)
क, च, ट, त , प असे सर्व गट घेतले तर त्यातली जोडाक्षरं अपवाद नाहीत.
खंदा, घंटा, चंदा, तंटा, पंखा - सर्व गागा आहेत. लगा साठी ’ह’च पाहिजे असं वाटतं.
तन्वी सुद्धा गागा आहे. तसंच अंशी, नक्षी.
>>> पण कुंदा गागा आहे.
>>> पण कुंदा गागा आहे.
कु वर अनुस्वार आहे व त्यामुळे ते गागा आहे, त्यात जोडाक्षर नाही
अनुस्वार हा जोडाक्षर
अनुस्वार हा जोडाक्षर लिहिण्याचा मार्ग आहे.
कुन्दा किंवा कुंदा दोन्ही एकच.
ओके
ओके
न्हा’ (न + ह) नसलेला एखादा
न्हा’ (न + ह) नसलेला एखादा अपवाद मला पटकन सुचत नाहीये. किंबहुना ’ह’ पाहिजे. तर्हा लगा आहे! बहुतेक मला या अपवादांचं मूळ दिसतंय. ह असल्याशिवाय अपवाद नाही. >> छान निरीक्षण. पण ह्यात य सुद्धा घ्यावा लागेल. पऱ्या, खऱ्या इत्यादी. शिवाय ॐ नमोजी आद्या मधला द्या आणि आदित्यला आपण टोपण नावाने म्हणतो तो आद्या यातला द्या यातही फरक आहे. दुसरा आद्या हा गागा ऐवजी लगा सारखा आहे. ते हर्फ गिराना की काय म्हणतात ना, तसं होईल ते. "उद्याची" पण लगागा आहे.
नाही पुण्याची मोजणी >> इथे पुण्याची गागागा
मुंबई पुण्याची माणसं >> इथे पुण्याची लगागा
-------
कुप्रश्न >> आपण उच्चार कसा करतो यावर आहे. हा शब्द मुळात तद्भव असल्याने संस्कृत उच्चार योग्य आणि संस्कृतमध्ये कायम जोडाक्षराच्या आधीच्या स्वरावर आघात येतो.
हा शब्द अनेकदा मराठी "प्रश्न" घेऊन त्याला कु उपसर्ग लावल्याप्रमाणे उच्चारला जातो, जे ठीक आहे. पण हे सवयीचं असल्याने मूळ तद्भव उच्चार चुकीचा ठरवता येणार नाही.
गझल आणि चर्चा - दोन्ही छान
गझल आणि चर्चा - दोन्ही छान