मराठी भाषेला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला!

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 October, 2024 - 12:25

केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

मराठी, पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी या भाषांना आज अभिजात भाषांचा दर्जा मिळाला आहे.
याआधी तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, संस्कृत आणि उडिया या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता.

अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठीचे निकष -

1) भाषेचे साहित्य हे किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावे लागते.
2) भाषेतील प्राचीन साहित्य मौल्यवान असावे.
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं लागतं ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
4) भाषेचे स्वरुप इतर भाषेपासून वेगळे असावे.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने होणारे फायदे -

1) अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
2) अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते.
3) अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.

थोडक्यात सांगायचे झाल्यास मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवरसुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठी भाषेचा अभिमान असलेल्या प्रत्येकाला ही बातमी आणि या घटनेचे महत्त्व समजायला हवे असे वाटल्याने वरील माहिती गुगल करून शोधली आहे.

सर्वांचेच अभिनंदन Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> भाषेतील प्राचीन साहित्य मौल्यवान असावे

म्हणजे काय? हे कसे ठरते?

=====

टायमिंगबाबतचे प्रतिसाद सुरू व्हायच्या आधी सांगितलेत तर आवडेल

भाषेतील प्राचीन साहित्य मौल्यवान असावे
म्हणजे काय? हे कसे ठरते?
>>>>>

हे खरे तर मलाच जाणून घ्यायला आवडेल.
कारण मी मराठी प्रेमी आहे. साहित्यप्रेमी नाही.
तरी माझ्या वाचण्यात हे आले,
-- लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू ग्रंथांच्या आधारावर मराठी भाषा अभिजात असल्याचं सिद्ध करणं सोपं झालं.---

>>> लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू ग्रंथांच्या आधारावर मराठी भाषा अभिजात असल्याचं सिद्ध करणं सोपं झालं.---

ओके ओके, धन्यवाद रुन्मेष (तुमच्या नावातील तो ऋ, जो आत्ता टाईप झालाय, तो पूर्ण नाव लिहिताना मोबाईलवर टाईप होत नाहीये, क्षमस्व)

>>> कारण मी मराठी प्रेमी आहे. साहित्यप्रेमी नाही.

तुम्ही साहित्यप्रेमी असतात तर जरा आधी झाला असता हा निर्णय!

अभिनंदन.
मराठी, पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी या भाषांना आज अभिजात भाषांचा दर्जा मिळाला.
पूर्वी तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, संस्कृत आणि उडिया या क्लासिकल अर्थात अभिजात भाषा होत्या.

अभिनंदन!
अकराव्या शतकाच्या पूर्वार्धात लिहिला गेलेला ज्योतिपरत्नमाला हा मराठीतील पहिला ग्रंथ होय, असे मत राजवाड्यांनी व्यक्त केले पण त्याची भाषा उत्तरकालीन वाटते. सन ११८८ मध्ये लिहिला गेलेला⇨मुकुंदराजांचा विवेकसिंधु हा मराठीतील पहिला ग्रंथ, असे एक मत आहे पण...
निर्विवाद पुराव्यानेच बोलावयाचे असेल, तर सु. १२७८ मध्ये⇨म्हाइंभट्टांनी (मृ.सु. १३००) संकलित केलेले लीळाचरित्र हा मराठीतील पहिला ग्रंथ म्हणता येईल. हा गद्य आहे हा त्याचा एक विशेष आहे.
>>>त्या पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधर आणि संघटक नागदेवाचार्य यांनी आपल्या पंथाच्या अनुयायांनी सर्वत्र मराठीचाच वापर केला पाहिजे, असा आग्रह धरला होता..>>
https://vishwakosh.marathi.gov.in/40923/
>>>त्या पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधर आणि संघटक नागदेवाचार्य यांनी आपल्या पंथाच्या अनुयायांनी सर्वत्र मराठीचाच वापर केला पाहिजे, असा आग्रह धरला होता..>> म्हणजे तेव्हापासून ...

पण मग यातले कुठलेच ग्रंथ प्राचीन, म्हणजे किमान १५०० वर्षं जुने नाहीत.

किमान १५०० ते २००० याला काय अर्थ आहे? किमान हा एकच आकडा असतो. रेंज कशी असेल?

असो, जे झालं ते चांगलं झालं. अभिनंदन.

हपा थोडा बडा सोचो. मार्जीन/टॉलरंस अजून थोडा वाढवा. आणि आजपासून मराठीत बोलायची हॅबिट वाढवूया. Happy
Don't look a gift horse in the mouth .

माझा मराठाचि बोलु कौतुकें | परि अमृतातेंही पैजां जिंके
ऐसीं अक्षरें रसिकें | मेळवीन ||1||
असे मराठीचे भाषेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केले आहे.तर सुरेश भट यांनी आपल्या काव्यपंक्तीतून मराठीचा गोडवा पुढीलप्रमाणे गायला आहे.
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ,जात एक ऐकतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
-------मराठी कट्टा वरून साभार,
मराठी असे आमुची मायबोली,
जरी भिन्न धर्मानुयायी असू
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू
वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी

@ हपा, अजून थोडे शोधता हे मिळाले.

- भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे

- प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा

सर
सरकारने मान्यता दिली काय वा न दिली काय. काय फरक पडतो. अभिजात शबदाचा अर्थ ही माही नाही पण ज्या भाषेत संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम बोवा समर्थ रामदास स्वामी अशा सारख्यांनी लिहिले ती भाषा महान असणारच!

सरकारने मान्यता दिली काय वा न दिली काय. काय फरक पडतो.
>>>

भाषेच्या विकासासाठी आणि प्रचारासाठी सरकारची मदत मिळते हा फायदा असावा.

कायप्पा वर खालील माहिती मिळाली

अभिजात दर्जाने काय बदल होतात?
या भाषांसाठी मोठा निधी दिला जातो त्यातून भाषेच्या संदर्भात प्रकल्पाला निधी मिळतो.
मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणं.
भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं.
•प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं.
•महाराष्ट्रातील सर्व १२,000 ग्रंथालयांना सशक्त करणं.
•मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणं.

हे ठीकच आहे.
पण जसे हेलीकॉप्टर मधून पैशाचा वर्षाव केला तरी गरिबी नाहीशी होत नाही, तसेच पैशाचा वर्षाव केला तरी भाषा समृद्ध होईल ह्याची खातरी नाही. कोणी तरी म्हटले आहे ते खरेच आहे , जो पर्यंत मराठी माणूस गरीब आहे तो पर्यंत मराठी भाषेला मरण नाही!

ह्या निकषाने तर इंग्लिश देखील कशी बशी "अभिजात" होते.
इंग्लिश मधील Beowulf हे काव्य इ स ७५० साली लिहिले गेले .
तेव्हा अश्या कासोट्यांचा बाऊ करू नये.

आनंदाची बातमी आहे. अभिनंदन आपल्या सर्वांचे.

केशवकूल यांचे मुद्दे सुद्धा योग्य आहेत.

>> ह्या निकषाने तर इंग्लिश देखील कशी बशी "अभिजात" होते.

कशीबशी अभिजात Lol वाह! अगदी खरं आहे. हा मुद्दा खरंच व्हायरल करण्यासारखा आहे. इंग्रजांना माहित असते तर अशी अभिजातहीन भाषा जगभर घेऊन जाण्याचे धारिष्ट्य त्यांनी केलेच नसते Proud
The English language is around 1,400 years old,

असो. आपण मराठी माणसे भावनिक असतो. भावनिक समाधान मिळाले याचा खूप आनंद झाला आहे असे म्हणावे लागेल. हे अजून काही फायदे:

* केंद्राकडून प्रत्येक वर्षी अंदाजे 250-300 कोटी रुपयांचं अनुदान मिळतं.

* मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता मराठीच्या बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल, संशोधन आणि साहित्यसंग्रह करण्याच्या दृष्टीने चालना मिळणार आहे.

* सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातील सर्व ४५० विद्यापिठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते.

* राज्यातील १२ हजार ग्रंथालयांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या निर्यानंतर ही सर्व ग्रंथालयांचे सशक्त करण होणार

* अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. यापुढे हा पुरस्कार मराठी भाषेत काम करणाऱ्या व्यक्तीला मिळेल.

* भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची व्यवस्था केली जाणार.

संदर्भ:
https://www.loksatta.com/maharashtra/marathi-get-classical-language-stat...

https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/exactly-what-happ...

अभिजात भाषेत अभिव्यक्त होण्याची अभिलाषा पूर्ण करण्याचे अभिवचन सरकारने पाळले, यामुळे युवाभिश्री पिढी मधे मायमराठी प्रती अभिकरण होऊन अभिजात भाषेच्या अभिमानाने अभिसरण वाढून भाषेचा संवादी अभिज्ञान म्हणून प्रसार व अभ्यास होईल याबद्दल सर्व अभिजनांचे, अभ्यागतांचे, अभ्यासकांचे, अभ्यागतांचे, अभिभावकांचे, अभिश्रींचे, अभिनेत्यांचे तसेच अन्य अभ्युदयींचे अभिनंदन!
(एकाही अभिशब्दाचा अर्थ माहीत नाही. नेहमीप्रमाणेच अदमासे अभिव्यक्त झालो आहे.)

हपा सूक्ष्मदर्शक यंत्र घेऊन येतीलच.

रा ग जाधव.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले होते.

आभार र.आ.
म्हणूनच पैसा नको वाचक पाहिजेत!

__/\__ केकू

जो पर्यंत मराठी माणूस गरीब आहे तो पर्यंत मराठी भाषेला मरण नाही! >>मूळचे वाक्य असे आहे.
जो पर्यंत गरीब मराठी माणूस आहे तो पर्यंत मराठी भाषेला मरण नाही!

“काय फरक पडतो” असे म्हणायचा मोह फक्त एका कारणाने आवरला - अभिजात म्हणून मान्यता मिळवलेल्या पहिल्या भारतीय भाषेचा, तमिळ भाषकांचा आणि त्यांच्या नीती निर्धारकांचा अल्प का होईना प्रत्यक्ष संपर्क !

अनेक दशकांच्या पाठपुराव्यानंतर २००४ साली त्यांनी ‘अभिजात’ भाषा म्हणून मान्यता मिळवली. . (१९६० साली सुरुवात सर्व “सरकारी” पदाधिकाऱ्यांनी फक्त तमिळ भाषेतच सही करावी अशा आग्रहाने झाली होती)

ठरवले तर सामान्यजन, -भाषाविद्वान, कवी, सिनेमा-नाट्यजगत आणि त्याहीपेक्षा “सरकार” नामक यंत्रणा भाषेसाठी काय करु शकते याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. त्यावर पुन्हा कधीतरी.

अर्थात भाषाप्रेम, भाषाभिमान आणि भाषेबद्दलची सर्वपक्षीय सर्वस्तरीय आस्था copy-paste करण्यासारखे नाही, पण आपल्या महाराष्ट्रात ९ कोटी मराठीजनांसाठी हजारोच्या संख्येने बंद पडणाऱ्या मराठी शाळा, हमालीच्या दराने राबवून घेतले जाणारे शिक्षक उर्फ शिक्षण सेवक, मराठीत दहा अचूक वाक्येही न लिहू शकणारे लाखो साक्षर मराठी युवक याबद्दल काही अभिजात दर्ज्याच्या निमित्ताने करता आले- झाले तर खूप आनंद होईल.

Pages