युक्ती सुचवा युक्ती सांगा -भाग ४

Submitted by मेधा on 1 December, 2021 - 09:24

आधीच्या धाग्यावर २००० पेक्षा जास्त पोस्टी आल्या म्हणून हा नवा धागा

आधीच्या धाग्यांचे दुवे :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा -३ https://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थालिपीठ मऊ होण्यासाठी काही उपाय आहेत का? मी सहसा तांदळाच्या पिठात कांदा, मसाले, कोथिंबीर घालून थालिपीठ करते. घरात असतील त्या भाज्या म्हणजे गाजर, काकडी, भोपळा इ. किसून त्यात ढकलते.
आता वड्याचं पीठ आहे घरात तर ते घालून करते. गरमागरम खाताना थोडं कडक थालिपीठ छान लागतं पण डब्यात दिलं की ते वातड आणि जास्त कडक लागतं. लेकीला खूप आवडतात पण तिच्या सेन्सरी इश्यूमुळे गिळताना त्रास होतो. काय करता येईल?

मीही साले फेकुन देते.

आमच्या इथे चण्दगड नावाचे तालुक्याचे गाव आहे. तिथे एकाने वेल्चीची लागवड केलीय. मी पाहायला गेले होते. त्याची बाग अगदीच लहान पण वेलचीची रोपे चांगली सहा सात फुट वाढलेली आणि भरपुर वेलची लागलेली. त्यांना इतर झाडांखाली लावावे लागते. तशी साबली लागते. त्याने तयार वेलची दाखवली. पांढरट सालीची होती. मी म्हटले, जुनी आहे का? पांढरी पडलीय. तो म्हणाला, ताजीच आहे. वेलची झाडावर सुकल्यावर काढतो तेव्हा सालही सुकते व पांढरी पडते. लोकांच्या डोक्यात हिरवी म्हणजे ताजी हे फिक्स झालेय. त्यामुळे वेलचीला आम्ही एक पुर्ण रात्र गंधकाची धुरी देतो. त्यामुळे साल हिरवी होते. चवीत काहीही बदल होत नाही. लोकांमुळे हा जादाचा खर्च करावा लागतो.

वेलचीची सालं मी ही चहा पावडर मध्ये घालून ठेवून संपवते. अगदी कणभर वास असला सालाना तरी फेकून देववत नाहीत.

वेलचीची सालं मी ही चहा पावडर मध्ये घालून ठेवून संपवते >>> डिट्टो आमच्याकडे. वेलची सोलली की सालं आपसुक चहाच्या बरणीत जातात.

साधना ++ Happy
यावरून नेहमी साबांची बोलणीही ऐकते...! तरीही देते फेकून!

>>अशी सालं पूर्वी आजी एमआर कॉफीत घालत असे.
+१
ही एमआर कॉफी पावडर अजून भारतात मिळते का? माझी आई त्यात जायफळ घालून सुरेख कॉफी करायची. बेस्ट एवर. आणि ती इन्स्टंट कॉफीसारखी सुपरफाईन नसायची त्यामुळे चहाप्रमाणे कॉफी गाळावी लागत असे.

सही! जिस कॉफी के सरपे ताज, एम आर कॉफी लाना आज! लोगो तोच आहे.
मलाही जायफळ/ वेलची घातलेली कॉफीच आठवते. आता परत प्यायली तर आवडेल का माहित नाही. वर्षा तू म्हणत्येय तशी गाळलेली. चहा आणि कॉफीचं गाळणं पण वेगळं असे घरी. Happy

मिळते , एम आर कॉफी , आम्ही अजून ही करतो कधी कधी मुद्दाम.
जायफळ वेलची घालून दूध थोड आटवून , गोडसर आणि दाट थोडी... भारीच लागते.

एम आर कॉफी आहे अजूनही घरात. कोविड काळात आणलेली, ब्रु कॉफी मिळत नव्हती. मी चहा पित नाही त्यामुळे तेव्हा ती कॉफी करुन प्यायचे. वेलची, जायफळ घालून आहाहा. माहेरी कोकणात कॉफीच असायची, चहा कोणीच पित नसत. एम आर च असावी, इतकं आठवत नाहीये. इथे डोंबिवलीत आई बाबा चहा प्यायचे, भाऊ बहीण दूध. मला मात्र कॉफीच हवी असायची.

माझ्या शाळेतल्या एका कानडी मैत्रीणीने फडके रोडवरचे एक दुकान सांगितलं तिथे कॉफी विथ चिकरी मागायची, ताजी कॉफी पावडर मिळायची, तिथून बाबा आणायचे माझ्यासाठी. ती ही भारी होती. नंतर मी नेसकॉफी पिऊ लागले, आता ब्रू वर स्थिरावले.

Pages