Submitted by मेधा on 1 December, 2021 - 09:24
आधीच्या धाग्यावर २००० पेक्षा जास्त पोस्टी आल्या म्हणून हा नवा धागा
आधीच्या धाग्यांचे दुवे :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा -३ https://www.maayboli.com/node/38475
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पपईत peptin की पेक्तीन असते.
पपईत peptin की पेक्तीन असते. करवंटीच्या तुकड्यात असं काही नाही.काही ठिकाणी छोटुसा दगड किंवा ठिकरी का वा शिजण्यासाठी वापरतात.
हे काही न घालताही का वा शिजतात.
काहीतरी फिजिक्स असावं ह्यात.
काहीतरी फिजिक्स असावं ह्यात.
>>>>>.काहीतरी फिजिक्स असावं
>>>>>.काहीतरी फिजिक्स असावं ह्यात.
किंवा मानसशास्त्र.
मटणाला करवंटीच्या कठीणपणाचा न्यूनगंड येउन, ते आपोआप मऊ पडत असावं. विज्ञानाला तरी सर्व अजुन माहीती कुठे आहे?
अग्नीदेवता चवताळत असेल.
अग्नीदेवता चवताळत असेल. एवढासा तो तुकडा, नरम पडत नाही म्हणजे काय???? तो नरम पडावा म्हणुन सर्व शक्तीनिशी प्रयत्न करत असेल. बिचारे मटण ह्या दोन महामहिमांच्या युद्धात धारातिर्थी पडते.
नीट शिजला नाहीस तर नारळ मिळेल
नीट शिजला नाहीस तर नारळ मिळेल असा संदेश जात असावा राजम्याला.
राज म्या सारख्या इतक्या रॉयल,
राज म्या सारख्या इतक्या रॉयल, राजेपण मिरवणाऱ्या कडधान्याच्या हाती करवंटी आली....की त्याचं दुसरं काय होणार? सगळा तोरा उतरून मऊ पडत असेल......!!!
मी गेले २२-२३ वर्षे राजमा
मी गेले २२-२३ वर्षे राजमा शिजवते. कधीही न शिजण्याचा प्रॉब्लेम आला नाही.
राजमा आदल्या रात्री भिजवून सकाळी ते पाणी पूर्णपणे काढून टाकावे. आणि दोन ते अडीच पट पाणी घालून ८-१० शिट्ट्या होईपर्यंत शिजवावेत. चांगले शिजतात.
कधी भिजवायला विसरले तर सकाळी कुकरमध्ये एक शिट्टी होईपर्यंत शिजवून कुकरमध्येच ५-६ तास ठेवते आणि मग परत ५-६ शिट्ट्या होईपर्यंत शिजवते. तसेही चांगले शिजतात.
कडधान्ये शिजवताना मीठ घालू नये. कडधान्ये दाठरतात आणि शिजत नाहीत अशी टिप मला कोणीतरी दिली होती. फार उपयोगी पडते.
काळा वाटण्याबाबत मात्र मीपण हार मानली आहे.
>>>>>>नीट शिजला नाहीस तर नारळ
>>>>>>नीट शिजला नाहीस तर नारळ मिळेल असा संदेश जात असावा राजम्याला.

>>>>>>>राज म्या सारख्या
>>>>>>>राज म्या सारख्या इतक्या रॉयल, राजेपण मिरवणाऱ्या कडधान्याच्या हाती करवंटी आली....की त्याचं दुसरं काय होणार? सगळा तोरा उतरून मऊ पडत असेल......!!! Happy

प्राची म्हणजे काळा वाटाणा अमर
प्राची म्हणजे काळा वाटाणा अमर आहे तर
मानव
मानव
२२-२३ वर्षे राजमा ..वाचून मी,
२२-२३ वर्षे राजमा ..वाचून मी, "बाबौ सलाम!" असे लिहायला घेतले ..पुढे मग काळ्या वाटाण्यांनी सलाम काढून घेतला!
@meghask हो मीही ते पाणी जाण्यासाठी अनेकदा धुते किंवा एकदा धुवून थोडावेळ भरपूर पाण्यात भिजवून ठेवते
कोणी न विचारताच सांगत आहे.
कोणी न विचारताच सांगत आहे.
मी परवा मेदुवडे मधे भोक असलेले असे ट्राय केले & चक्कं ते जमले. हातावर, प्लास्टिक पिशवीवर असे अनेक प्रयोग फेल होऊन कायम चमच्याने ते चिकट पिठ तेलात सोडताना येणारी निराशा इन्स्टाच्या १ रील मुळे गायब झाली.
चहा गाळणीच्या मागील बाजूस पाणी लावून त्यावर पीठाचा गोळा टाकून, भोक पाडून तसेच तेलात सोडल्यास ते जमते. चित्र द्यायचा प्रयत्न करते.
(No subject)
हाय तुमने तो दुखती नस पे हाथ
हाय तुमने तो दुखती नस पे हाथ रख डिया.व्हिडिओ दाखव.
छान दिसतायत मेदूवडे. आयडिया
छान दिसतायत मेदूवडे. आयडिया भारी आहे चहाच्या गाळणीची.
aashu नशीबवान आहात .माझी दोन
aashu नशीबवान आहात .माझी दोन गाळणी वाया गेलीत...मा का चू
फोटो मस्त आलाय..
राजमा बी लाईक.
राजमा बी लाईक.

काय भारी चित्र आहे
काय भारी चित्र आहे
इतकं नेमकं चित्र कसं मिळवलं?
क्या बात है....
क्या बात है....
भारी चित्र!
भारी चित्र!
आशू२९, मेदूवडे मस्त!
मस्त चित्र मोरोबा. फक्त आतलं
मस्त चित्र मोरोबा. फक्त आतलं खोबरं काढून टाका. राजमा के लिये करवंटी काफी है!
आशू, मेदूवडे मस्त!
आशु 29, मेदूवडे खूप छान जमले.
आशु 29, मेदूवडे खूप छान जमले.
इतकं नेमकं चित्र कसं मिळवलं?...... +१.
वाह, मस्त झालेत.
वाह, मस्त झालेत.
धन्यवाद सर्व.
धन्यवाद सर्व.
अनू, चहा गाळणी गोलाकार बूड असलेली ला पाणी हात लाऊन त्यावर चमच्याने पीठ ओता (पीठ पातळ असू नये) मधे बोटाने भोक बनवा & तेलाच्या वरच्या सरफेस वर सोडा, पीठ गाळणी ला ही चिकटून बसते, मी नाय जा म्हणत. पण ग्रॅव्हिटी मुळे पडते खाली, मग चाळणी ला जरा टॅप करून सोडवायचा प्रयत्न करायचा. चाळणी तेलात नाही घालायची, मग सलग तसाच चाळणी सकट वडा तळून मग उलटता नाही येणार
रील मिळाली तर पेस्टते.
मला आहोजाहो केल्याबद्दल निषेध
मला आहोजाहो केल्याबद्दल निषेध(कालच मेंदी इंडिगो उस्तवारी करून केस रंगवलेत
)
पाणी ज्या बाजूत आत पीठ ओततात त्याच बाजूला लावायचं ना?पण तरी गाळण्याला मध्ये ते 1 सेमी व्यासाचं ओतायचं चोच रुपी होल नसेल तर वड्याला कसे पडेल?
बरेच प्रश्न आहेत डोक्यात.
अनु हा घे व्हिडिओ गाळणे
अनु हा घे व्हिडिओ गाळणे वापरून मेदू वडा करायचा. ती कुठल्या तरी साऊथ इंडियन भाषेत बोलतेय पण आपल्याला व्हिज्युअल्सशी मतलब.
ओके ओके,धन्यवाद.
ओके ओके,धन्यवाद.
बघते.आता राजमागडानंतर भोकवालामेदूवडागड सर करण्यात येईल.
माझेमन, विडीओ लिंक साठी
माझेमन, विडीओ लिंक साठी धन्यवाद! हे जमेल असे वाटतेयं.
आमच्यासारख्या मेदूवडा
आमच्यासारख्या मेदूवडा challenged लोकांसाठी हे मिळते की.
जॉब मेड सुपर ईझी. Gas lighter सारखे दाबायचे - पटापटा मेदूवडे होतात
१००-२०० रुपये किंमत.
(इथे लज्जित लाल बाहुली)
(इथे लज्जित लाल बाहुली)
आमच्याकडे आहे पण याने पण भोक पडत नाही.बहुधा पीठ जास्त पातळ बनतेय मिक्सरमध्ये पटापट करण्याच्या नादात.
आमच्याकडे आहे अंजलीचे यंत्र.
आमच्याकडे आहे अंजलीचे यंत्र. त्याने छान होतात मेदूवडे पण तरी मशीन शिवाय जमावे असे वाटत रहातेच. प्रयोग फसला की पुन्हा मशीनला शरण जाते.
त्या यंत्राने काही जमत नाही !
त्या यंत्राने काही जमत नाही !
( लोक नेपाळला जाऊन ते अक्रोड फोडायचे कसलेसे यंत्र का घेऊन येतात? जिथे गेलो तिकडे जे पाहायचे ते पाहावे, खायचे ते खावे आणि परत यावे. बाकी रानडे रोड आणि लक्ष्मी रोड वर न मिळणारी कोणती गोष्ट असेल असे वाटत नाही!
पीठ पातळ झाले असे वाटत असेल
पीठ पातळ झाले असे वाटत असेल तर किंवा इतर वेळी सुद्धा दोन (पोहा) चमचे तांदूळ पिठी घातली की पाण्याचा हात लावून भोक पाडून मेदू वडा करता येतो. मेदू वड्याला तांदूळ पीठी घालून किमान पंधरा ते वीस मिनिट एकाच बाजून हाटून घ्यायचे, होतात नीट मग.
या विकेंड ला या सर्व टिपा
या विकेंड ला या सर्व टिपा करून मेदूवडा करण्यात येईल.
कर कर, लिही कशाने कमी
कर कर. नंतर सांग इथे, कशाने कमी त्रासदायक आणि परफेक्ट होतं ते.
Location पाठवून ठेव अनु. मेदू
Location पाठवून ठेव अनु. मेदू वड्याचे
मला आहोजाहो केल्याबद्दल निषेध
मला आहोजाहो केल्याबद्दल निषेध>
नाही ते सर्वांसाठी म्हणुन प्लुरल होतं चिल्ल.
व्हिडीओ आला बरं झालं.
ते स्टील चे साचा टाईप पाहिले होते पण धुवायचा कंटाळा येतो. पुरणयंत्र पण म्हणुनच मी घेतले नाहिये.
रानडे रोड आणि लक्ष्मी रोड वर
रानडे रोड आणि लक्ष्मी रोड वर न मिळणारी कोणती गोष्ट असेल असे वाटत नाही!>> पार्कींगला जागा?
भारीच, मानव!
भारीच, मानव!
पुलंच्या काळात हा प्रश्न नसावा.
यस यस
यस यस
मेदू वडा मेदू वड्यासारखा दिसल्यास लोकेशन नक्की पाठवले जाईल.
अगदीच अवांतर !
अगदीच अवांतर !
अनू, शिवार चौकात axis बँकेच्या समोर गाडीवर अतिशय टेस्टी मेदु वडा सांबार रिजानेबल किमतीत मिळतो. मला त्याची फार आठवण येते आधे मधे. तो असताना घरी का बनवते आहेस?
हो हो, बालाजी ना?तो आणतो
हो हो, बालाजी ना?तो आणतो कधीकधी आम्ही.तो प्रचंड बिझी असतो शनिवारी रविवारी(मला सहानुभूतीने 'तुझ्या वड्यातही पडतील हो बाई नीट छिद्रं' असा वर देणारा मालक तिथलाच
)
घरीही चांगले बनतात चवीला टेक्श्चर ला.फक्त भोकं नाही हा सल. तुला अमेरिकेत कुठे मिळतात?तिथे आता एक साऊथ चं मिशेलीन स्टार हॉटेल बनलंय सेम्मा नावाचं असं वाचलं(अर्थात माझे अमेरिका भूगोलाचे ज्ञान हे पुण्याच्या माणसाला 'ते काय, परवा तुमच्या जवळ बुलढाण्याला ते मोठं हॉटेल आहे ना उघडलेलं' असं सांगण्याच्या लेव्हल चं आहे.)
आमच्या आजूबाजूला कुठे नाही
आमच्या आजूबाजूला कुठे नाही मिळत भारतीय काही. पण मला अमेरिकेतले , अगदी सर्वाना भवनचे सुद्धा मेदु वडे आवडत नाहीत. मला जनरली मोठे वडे नाही आवडत त्यामुळे पुण्यातही सगळीकडचेच आवडतात असं नाही. पण हे बालाजीचे फारच फेवरेट.
मेदुवडे व करायची आईडिया
मेदुवडे व करायची आईडिया भारीच ! मी_अनु तुला all the best.
मेदुवडा घरी बनवणे is खूप महान खटपट व असले खटोटोपी प्रकार असतील तर माझा प्रयत्न असतो की शक्यतो जेवायलाच करायचे .. कारण ६ मेदुवडे करायला ही तितकाच व्याप करावा लागणार शिवाय इतकुसे पीठ माझ्या मिक्सर च्या भांड्यात होणार नाही तो भाग वेगळाच.. भारतात जम्बो असतात मेदुवडे तसे घरी करता येतातच असे नाही, मात्र मला मेदुवडे जाम म्हणजे जाम म्हणजे जामच आवडतात .. परंतु खूप वेळ तळत बसावे लागते हे पण खरे. पीठ घट्ट म्हणजे घट्ट म्हणजे हातातून पडता पडत नाही असेच हवे .. हे करताना मला माझ्या मिक्सर ची दया येते व काळजीही वाटते.. परंतु असे घट्ट पीठ त्यात कढीपत्ता खोबरे मिरचीचे तुकडे असे घालून चांगले फेट फेट फेटायचे .. व आपले हात अचानक १० किलो डंबेल्स उचलल्यागत भरून आले कि मगच ती पाण्यात पीठ घालायची टेस्ट पास होतो आपण.. जसे वर गाळणीने केले तसेच एक कालथा पाण्यात बुडवायचा त्यावर पाणी राहिले पाहिजे किंचित व आपला पण हात पाण्यात चांगला बुडवायचा पटकीनी पिठाचा गोळा या कालथ्यावर ठेऊन भोक पाडायचे व कालथा तेलात उलटा करायचा वडा तेलात लगेच पडतो मात्र बुडाशी पाणी असल्याने तेल जाम चिडते व त्याला बाहेर ढकलून फेकून देते म्हणून मला वडा करायला कटकट वाटते .. सगळीकडे तलाचे थेम्ब नि चिकट गोपट.. फोटोपुरते ४ वडे असे करते व बाकी बोन्डे only !!! हा हा !!
(करते असे लिहायला मी आतापर्यंत ३-४ वेळाच केले आहेत व तेही ५-६ yrs ago ..पण सांगताना रोज करते अशा थाटात सांगायचे )
एके वर्षी मी ३०-३२ खरोखरचे मेदुवडे (means भोकवाले) potluck साठी घेऊन जायचा पराक्रम केलेला आहे.. (आमची थीम ठरलेली बहुतेक सौथ इंडियन करून आणायचे असे i think .. )त्यावेळी पीठ आदल्यादिवशी रात्री वाटून लगेच फ्रेश wrap अगदी चिकटवून लावली व वरून शिवाय घट्ट झाकण लावून लगेच फ्रीझ ला टाकलेले .. सकाळी पीठ आंबले नाही अजिबात.. तसेच काढून लगेच वडे तळले ..पण खूप वेळ लागला होता. तेव्हापासून कानाला वडा .. potluck ला कधीही मेदुवडे न्यायचे नाही
राजमा व करवंटी फोटो जबरदस्त !!
त्या विडिओ मध्ये ती कसले पटापट करतेय वडे !!
भारी डिटेल लिहिले आहेस अंजली.
भारी डिटेल लिहिले आहेस अंजली.
मेदूवडा घरी ताजा करणे अगदी मोजकं कमी पब्लिक असेल तर बरं पडतं.आम्ही थंडीत करतो कधीकधी.
हल्ली जवळपास साऊथ इंडियन खाणं चांगलं मिळणारी खूप हॉटेल्स झाली आहेत.पण बाहेरच्या खाण्यात वापरलेलं मुबलक तेल हा फॅक्टर असतोच.मग घरी.
मुळात त्या मेदूवड्याला भोक
मुळात त्या मेदूवड्याला भोक पाडायचा प्रयास का करताय? नुसते वडे केले तरी काय फरक पडत नाय. चवीत तर नाहीच. आमच्यकडे २-३ दा ट्रायले गेले त्यानंतर आलेलं शहाणपण.
आजकाल तर मेदूवडा खावा वाटला की २०० मीटर वर अण्णाची मोठी गाडी आहे तिथे जायचं अन मस्त गरमागरम मेदूवडे, उकळतं आणि शिवाय अतिशय चविष्ट सांबार, चटणी, वाफभरल्या इडल्या, ताजे अगदी समोर करून दिलेले दोसाये काय हवं ते चापायचं अन घरी येऊन पडी नंतर
आधीचा आणि नंतरचा कसलाच कुटाणा, पसारा कछू नय!
योकु.. अशा वेळी अंगात नसलेला
योकु.. अशा वेळी अंगात नसलेला सुग्रणपणा डोकं वर काढतो, हात शिवशिवतात, बोक नसलेल्या भजीला मेदुवडा म्हणायला जीभ धजावत नाही व मेंदू नकार देतो व अंगात मस्ती..दुसरं काय??? पळा ssss
मी भारतात आले कि २-३ वेळा हाणते मेदुवडे..एकदा गेल्यागेल्या एकदा मध्यात व एकदा येण्या आधी .. हाहा !
माझ्या मेदूवड्यांचा एकदा
माझ्या मेदूवड्यांचा एकदा स्फोट झाल्यानंतर बहुतेक मी कधीच केले नाहीत. (आधीही खूप वेळा केले होते असं अजिबात नाही.) आता केले पाहिजेत एकदा.
एक मदत हवी आहे मंडळी.
एक मदत हवी आहे मंडळी.
मे महिन्यात कुर्ग वरुन येताना मसाले आणले होते. त्यात हिंग पण आणलं होतं.
घरी येऊन पाकीट उघडलं तर ते आपलं नेहेमीचं पावडर/ दाणेदार हिंग नाहिये.\
डार्क चॉकलेटी रंगाचा चिकट हिंगाचा गोळा आहे. सुरी ने किंवा बत्त्या ने तुकडे पण करता येत नाहियेत.
पण वास मस्त आहे.
तर हे हिंग कसं वापरायचं कोणाला माहिती आहे का ?
Pages