या नावातला ‘नाच’ हा नाचणीचे लघुरूप आहे, जरा फॅन्सी नाव आकर्षक वाटते म्हणून! (चव घेतली की नाच कराल अशी एक फाको सुचली आहे ती चालवून घ्या.)
साहित्य – एक छोटा चमचा नाचणी पीठ. सत्व वापरण्याची गरज नाही, पण वापरले तरी चालेल. एक कप दूध, अर्धा कप पाणी. दीड चमचा किंवा चवीप्रमाणे साखर, एक छोटा चमचा कोको पावडर (गोड नसलेली) व्हॅनिला किंवा बटरस्कॉच इसेन्स, पौष्टिक पावडर* [खालची टीप बघा.] यातले इसेन्स आणि पौष्टिक पावडर पूर्णतः ऑप्शनल आहे, पण इसेन्समुळे स्वाद खुलतो आणि पौष्टिक पावडरमुळे गुणवत्ता, त्यामुळे वापरा असा आग्रह करेन.
* पौष्टिक पावडर म्हणजे मखाणे, आवडीच्या तेलबिया, काजू-बदाम-पिस्ते इत्यादी सुकामेवा खमंग भाजून पूड करून त्यात सम प्रमाणात खारीक पावडर मिसळून ठेवते मी घरात. स्मूदीज, शिकरण, केक अशा कोणत्याही गोडसर पदार्थावर घालून वापरता येते.)
कोको पावडर, पौष्टिक पावडर आणि नाचणी पीठ.
कृती – एका पातेल्यात नाचणी पावडर, दूध, साखर, कोको पावडर एकत्र करा. नीट ढवळून सर्व जिन्नस एकजीव करून घ्या. दहा मिनिटांनी पातेलं गॅसवर चढवा. तोवर नाचणीचे पीठ दुधात नीट मिसळले जाते. एकदा गॅस सुरू केल्यावर आजूबाजूला कुठेही लक्ष न ते मिश्रण ढवळत रहा, नाहीतर गुठळ्या होणे, खाली लागणे असे उपद्व्याप होऊ शकतात. दोनतीन मिनिटांतच मिश्रण शिजून आळायला लागेल. जर जास्त दाट वाटले तर थोडे थोडे पाणी (दूधही वापरू शकता) वापरून आवडीनुसार पातळ करून घ्या. मिश्रणाला तकाकी आली की गस बंद करा. त्यात इसेन्स आणि पौष्टिक पावडर घालून ढवळा आणि गरम, कोमट आवडीप्रमाणे आस्वाद घ्या किंवा द्या!
जास्त लाड आले असतील तर वरून किसलेले चॉकलेट किंवा चॉकोचिप्सने सजवा. जरा थंडी असेल तेव्हा हे गरम पेय पीत बसायला फार मस्त वाटते.
Nice
Nice
मस्त एकदम. सानुलाही आवडेल हे
मस्त एकदम. सानुलाही आवडेल हे वर्जन.
मस्त आहे हे पेय.चॉकलेट आणि
मस्त आहे हे पेय.चॉकलेट आणि नाचणी एकमेकांबरोबर चांगले लागेल.
नाचणीचे हे version खूपच
नाचणीचे हे version खूपच चविष्ट असणार. नक्कीच करून बघणार. नाचणी is a love
भारी आहे आयडिया करून बघेन
भारी आहे आयडिया करून बघेन नक्की .. नाचणी पीठ नाही माझ्याकडे .. सत्व आणलेलं भारतातून पण संपलं ...
अरे व्वा. छान दिसतं आहे. करून
अरे व्वा. छान दिसतं आहे. करून बघायला हवं.
जास्त लाड आले असतील तर वरून किसलेले चॉकलेट >>
चॉकलेट नाचणी कॉम्बो भारी
चॉकलेट नाचणी कॉम्बो भारी वाटतेय
मस्त रेसिपी. करून बघेन नक्की.
मस्त रेसिपी. करून बघेन नक्की.
यावेळच्या सगळ्या entries बघून असं वाटतंय जगातले सगळे टॅलेंटेड लोक माबोवर जमा झालेत.
एक से एक मिम्स, रेसिपीज , फोटोज, शशक.
संयोजक मंडळ तर खूपच खुश असणार . अजून सगळे धागे वाचून व्हायचे आहेत.
महिना तरी लागेल .....
ही चव इमॅजिन नाही करता येते.
ही चव इमॅजिन नाही करता येते. सगळे जिन्नस आहेत, लगेच करुन बघतो.
यंदा नाचणी फॉर्मात आहे का? कविनची पण अशीच सेव्हरी रेसिपी होती.
मस्त आहे रेसिपि....
मस्त आहे रेसिपि....
कविनची पण अशीच सेव्हरी रेसिपी
कविनची पण अशीच सेव्हरी रेसिपी होती.>> हो मी पाण्यात शिजवते कारण ज्याला दुधात हवे त्याला दुध घालून ब्लेंड करुन देते आणि ज्याला ताकात हवे त्याला सेव्हरी वर्जन ब्लेंड करते
मी लेकीला करुन दिले असे चॉको चिप्स वापरून. तिला आवडले हे ही व्हेरिएशन
एरव्ही तिला कधी नाचणी+सत्तू +ड्रायफ्रूट पावडर एकत्र करुन शिजवून दुधात ब्लेंड करुन देते कधी साखर कधी खजूर घालून.
मला हे नाव फार आवडलं रेसिपीच.
मला हे नाव फार आवडलं रेसिपीच.
हे छान लागेल असं वाटतंय. चिकट
हे छान लागेल असं वाटतंय. चिकट होते का? गार झाले की
वा! छानच नक्की पिऊन बघणार
वा! छानच
नक्की पिऊन बघणार
मस्तच आहे हे. फोटोही छान.
मस्तच आहे हे. फोटोही छान.
चिकट होते का? गार झाले की -
चिकट होते का? गार झाले की - नाही, अजिबात चिकट होत नाही.
मला हे नाव फार आवडलं रेसिपीच. - खूप धन्यवाद!
यावेळच्या सगळ्या entries बघून
यावेळच्या सगळ्या entries बघून असं वाटतंय जगातले सगळे टॅलेंटेड लोक माबोवर जमा झालेत - टॅलेंटेड लोकांच्या यादीत घातल्याबद्दल धन्यवाद!
लेकीला करुन दिले असे चॉको चिप्स वापरून. तिला आवडले हे ही व्हेरिएशन - अरे वाह, लगेच करून बघितलं! धन्यवाद!
सगळे जिन्नस आहेत, लगेच करुन बघतो - बघितलं का करून? कशी वाटली चव?
(No subject)
अभिनंदन सहेली!! ड्रिंक आकर्षक
अभिनंदन सहेली!! ड्रिंक आकर्षक आणि हेल्दी आहे.
अभिनंदन.. हि नजरेतून सुटली
अभिनंदन.. हि नजरेतून सुटली होती. छान दिसत आहे. मुलांसाठी ट्राय करता येईल.
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन
हल्ली आंबील केले नसले की ही रेसिपी करते लेकीसाठी. तिलाही आवडलेय आणि केकसाठी म्हणून आणलेले चोको चिप्स आहेत शिल्लक ते ही संपतायत यामुळे
अभिनंदन सहेली
अभिनंदन सहेली
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
धन्यवाद सगळ्यांना!
धन्यवाद सगळ्यांना!