"आई, आपण इकडे का जेवायला बसलो आहोत? झाडाखाली? किडे आहेत इथे! चल ना तिकडे जाऊ सगळे"
भार्गव दहा वर्षाचा होता. मोठ्यांच्या भानगडी समजण्याचे त्याचे वय नव्हते. त्याची मोठी बहिण कोमल सोळा वर्षांची होती. तिला फार काही कल्पना होती असे नव्हे, पण इतके कळत होते की आई योग्य निर्णय घेत असणार.
आई म्हणजे नीलाक्षी, नीला!
नीलाने भार्गवकडे किंचितच कडक नजरेने पाहिले व भार्गव गप्प बसून खाऊ लागला. अधिक कडक नजरेने भार्गवकडे बघणे किंवा त्याला काही कडकपणे बोलणे योग्य नाही हे नीलाला माहीत होते. मात्र भार्गव गप्प बसल्यावर डोळ्यात किंचित पाणी आले आणि नीलाने नवर्याकडे, मेजरकडे चुटपुटत पाहिले. तिच्या नवर्याला गंमत म्हणून सगळे मेजर म्हणत. मेजरनेही मान खाली घातली. कोमल गपचूप खाऊ लागली.
पलीकडे काही अंतरावर जल्लोष सुरू होता. नीलाच्या सख्ख्या मोठ्या बहिणीच्या मुलाच्या लग्नाचे रिसेप्शन होते. एकीकडे प्रशस्त पसरलेला बुफे, एकीकडे एक जाद्ञ्गार जादू करून दाखवतोय, एकीकडे मैदानात दिड-दोनशे लोक भोजनाचा आस्वाद घेत गप्पा झोडतायत, एकीकडे मुलाचे आणि मुलीचे मित्र-मैत्रिणी नवीन गाण्यांवर नाचतायत आणि एकीकडे नीलाची बहिण आणि तिचे मिस्टर सगळ्यांची विचारपूस करतायत.
फक्त नीलाचे कुटुंब बुफेमधून मोजके पदार्थ व एक स्वीट डिश ताटात घेऊन इकडे एका अंधार्या झाडाखाली असलेल्या पारावर बसून जेवण करत होते.
जेवण मस्त होते. वादच नाही. दोन्हीघरचे तगडे श्रीमंत होते. तसे तर श्रीमंतीचा, चवीचा आणि जेवण आवडण्याचा काही संबंध नसतोच, पण तो अलीकडे लावला जातो. मात्र हे जेवण खरोखरच सुग्रास होते. मेन्यू ठरवताना तर नीला ताईबरोबर खूप अॅक्टिव्ह होती. नीलाला ते आठवले. ते आठवण्यासोबतच असेही वाटले की आपण इथे यायला तरी हवे होते की नको होते!
आलोच नसतो तर वाईट दिसले असते या विचाराने नीलाने निदान रिसेप्शनला तरी येण्याचा निर्णय घेतला होता. मेजरचा जरा सौम्य विरोध होता, पण नीला म्हणाली होती की असे प्रसंग कुठे सारखे येतात? नाही गेलो हे डोळ्यांवर येईल. भार्गव आणि कोमलला खूप एन्जॉय करायचे होते, पण पलीकडे चाललेल्या जल्लोषात भाग घ्यायचा तरी कसा हा प्रश्न कोमलला पडला होता. भार्गवला आशा होती की त्याची आई निदान त्याला तरी डान्स फ्लोअरवर जायची परवानगी देईल.
"चला, झाले का?"
मेजरने नीलाकडे व मुलांकडे बघत उगीचच विचारले. नीलाने निरर्थकपणे मान हलवत डिश झाडाच्या पारावर ठेवली. मग कोमलनेही ठेवली. खरे तर कोमल पोटभर जेवलीच नव्हती. मेजरचे जेवण आधीच झालेले होते. मेजर मोठा शिस्तीचा! स्वतः शिस्त पाळणार आणि शिस्त न पाळणार्यांना अद्दल घडवण्याची हिम्मत दाखवणार! मात्र त्याला आत्ता कशातच रस नव्हता. हे कसले लग्नाचे जेवण, मेजरच्या मनात येत होते. भार्गव डान्स फ्लोअरवर नाचणारी त्याची सगळी भावंडे पाहून एकेक घास खात होता. त्याला किंचितशी घाई करत नीला म्हणाली:
"चला भागोबा, उशीर झालाय, चला पटकन् पार्किंगकडे"
"आई, मावशी का रडतीय? लग्न म्हणजे चांगले असते ना?"
नीलाने भार्गवला थोपटले व चुचकारले.
हळूहळू सगळे उठले आणि पार्किंगकडे गेले.
गेले अनेक दिवस पाऊस पडत होता. विचित्र मोसम होता. आकाश आणि नीलाचे डोळे यांना आज एकाचवेळी एकच काम सुचले होते. मेजर नीलाला थोपटत होता. कोमलला कळत होते की इतके जवळचे नाते असूनही मावशी आणि तिच्या घरच्यांनी साधी विचारपूसही केली नाही. भार्गवला तेही कळत नव्हते.
मेजरने नेहमीप्रमाणे ड्राईव्ह वे मधून सुळसुळीतपणे गाडी बाहेर काढून रस्त्यावर आणली.
"आलो नसतो तरी चालले असते"
मेजर हळूच पुटपुटला खरे, पण नीलाने ते व्यवस्थित ऐकले. एरवी नीला उसळून काहीतरी म्हणाली असती. मात्र आज तिच्या तोंडात वेगळे उद्गार आले.
"ताईची साईबाबांवर अपार श्रद्धा आहे ना! म्हणून आपण पत्रिका तिथे ठेवायला गेलो लग्नाची! ताईला लग्नाच्या गडबडीत वेळ होणारच नव्हता. आता एवढे केल्यावर निदान लग्नाला तरी जायलाच हवे ना?"
"ते ठीक आहे, पण बघितलेही नाही आपल्याकडे"
"जाऊदेरे मेजर, परत येताना आपण सगळे अपघातातात मेलो नसतो तर आज आपणच ताईसोबत आगतस्वागत करत असतो ना?"
=====
-बेफिकीर'!
भारीच!!! बेफी is back!!!!
भारीच!!!
बेफी is back!!!!
भन्नाट कथा
भन्नाट कथा
माझा वेगळा समज झाला होता.
बापरे!
बापरे!
छान लिहिली आहे.
छान लिहिली आहे.
मला अंदाज आलेलाच या शेवटाचा.... कदाचित तुमचे नाव बघून आला असेल.
बाप रे!
बाप रे!
बापरे!!! अनपेक्षित ट्विस्ट!
बापरे!!!
अनपेक्षित ट्विस्ट!
बाप रे..
बाप रे..
ह्म्म… बेफिकिर नावाला असा
ह्म्म… बेफिकिर नावाला असा ट्विस्ट अपेक्षित नव्हता…
छान आहे गोष्ट… १० व १६ वयाचे वाईट वाटले. ज्या लग्नाची तयारी इतक्या उत्साहाने केली त्याचे निदान रिसेप्शन तरी पाहावे हे बरोबर.. ’त्यांनाही’ यावेसे वाटले परतुन.
मला आधी वाटलं की हे भिन्न
मला आधी वाटलं की हे भिन्न धर्मीय लग्न आहे आणि त्यातून ऐन वेळी काही भांडण होऊन यांना शिष्ठ वागवलं गेलं.
तुम्ही परत कथा टाकायला
तुम्ही परत कथा टाकायला सुरुवात केली हे बघून आनंद झाला. अशाच कथा टाकत जा. वाट बघतोय.
अनपेक्षित ट्विस्ट
अनपेक्षित ट्विस्ट
आपलेच काम करतांना सख्ख्या बहिणीसकट तिचे सर्व कुटुंब गेल्यावर कार्यक्रमात इतका थाटमाट, डान्स फ्लोर इ असेल का असे वाटले.
ह्म्म… बेफिकिर नावाला असा
ह्म्म… बेफिकिर नावाला असा ट्विस्ट अपेक्षित नव्हता…
>>>>> +१
कदाचित, एक पंखा म्हणून जास्तीची अपेक्षा आहे तुमच्याकडून.
पुन्हा लिहिते झालात माबो वर, हे ही नसे थोडके
अजून वाचायला आवडेल... नवनवीन कथा ई.
>>>>कदाचित, एक पंखा म्हणून
>>>>कदाचित, एक पंखा म्हणून जास्तीची अपेक्षा आहे तुमच्याकडून.पुन्हा लिहिते झालात माबो वर, हे ही नसे थोडके>>>+1
उद्योग जगत तुमचा हातखंडा आहे...
बेफि , बरेच दिवसांनी. आनंद
बेफि , बरेच दिवसांनी. आनंद झाला.
जबरदस्त !
जबरदस्त !
आधी वेगळा समज झाला. अनपेक्षित शेवट.
ओह!
ओह!
आपलेच काम करतांना सख्ख्या बहिणीसकट तिचे सर्व कुटुंब गेल्यावर कार्यक्रमात इतका थाटमाट, डान्स फ्लोर इ असेल का असे वाटले.>>+१
की तोच विरोधाभास अपेक्षित होता?
Below average
Below average
की तोच विरोधाभास अपेक्षित
की तोच विरोधाभास अपेक्षित होता?
>>>
हो.
आपण यांच्या लग्नाच्या कामात मेलो आणि याना काही त्याचे सोयरसुतक नाही.
ते बेफिकीर येऊन इथे प्रतिसाद देणार नाहीत यावर काही
मी प्रतिसाद खरंच देणार होतो.
मी प्रतिसाद खरंच देणार होतो.
पुढच्या पिढीच्या सर्व हौसेसाठी लग्न दिमाखात करावे लागणे, घरचे फार महत्वाचे कार्य असल्याने लग्न दिमाखात करावे लागणे, बुकिंग वगैरे गोष्टी साधारण आधीच झालेल्या असल्याने त्या रद्द न करता येणे, सख्ख्या बहिणीचे कुटुंब गेले या दुःखाची तीव्रता सर्वांसाठी समान नसणे, मुलीकडच्यांना त्यांच्या वधूपक्षाची सर्व हौस पुरवावीशी वाटण्याचा भार मनावर असणे असे काही घटक विचारात घेतले होते.
असो!
दिलखुलास, उदार प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार!
क्या बात है! वेलकम बॅक, बेफि!
क्या बात है!
वेलकम बॅक, बेफि!
Khup Chan..as always.
Khup Chan..as always.
Khup Chan..as always.
Khup Chan..as always.
Khup Chan..as always.
Khup Chan..as always.
Khup Chan..as always.
Khup Chan..as always.
मला आधी गरीब बहिणीला काही
मला आधी गरीब बहिणीला काही किंमत नाही अस काहीसं वाटलेल...
वेलकम बॅक बेफिकीर..
निलू आणि फ्यामिली त्याच
निलू आणि फ्यामिली त्याच लग्नाची पत्रिका द्यायला जाताना मरण पावले आहे.
आणि आता कुणाला दिसू शकत नाहीत हे माहीत असूनही ते आपल्या नातेवाईकांवर का रागावलेत ?
मरण पावलेल्या आत्म्यांनी नाचगाण्यात आणि जेवणावळीत भाग घ्यायचा नाही हा अखिल भूतजातीवर अन्याय आहे !
.
.
बेफी कथा पाहून आनंदी, उत्साही
बेफी कथा पाहून आनंदी, उत्साही वाटले. छान च, लिहते रहा
कथा पण मस्तं. मलाही वाळीत टाकलेली गरीब बहीण वगैरे वाटत होते!
आकाश आणि नीलाचे डोळे यांना आज एकाचवेळी एकच काम सुचले होते.>>> खास बेफी टच.
भन्नाट. शेवट एकदम अनपेक्षित
भन्नाट. शेवट एकदम अनपेक्षित होता.
वेलकम बॅक, मस्त कथा बेफी
वेलकम बॅक, मस्त कथा बेफी
खूप छान कथा नेहमीप्रमाणे..
खूप छान कथा नेहमीप्रमाणे..
तुमच्या जुन्या कथमलिका परतपरत वाचत असते...
नवीन काहीतरी चालू केला तर कृतकृत्य होईल आम्ही...
Pages