अन्तः अस्ति प्रारम्भः - १- उद्धार - प्राचीन

Submitted by प्राचीन on 13 September, 2024 - 14:26

उद्धार

शुभ्र चंदेरी झालरीची शिखरं आणि निशब्द आसमंत. रोजच्याप्रमाणे त्याची आजही शोधमोहीम सुरू. गेल्या बारा वर्षांत त्याने अथक प्रयत्न करून त्या श्रमलेल्या साठ हजारांचा माग काढला होता.. मागच्या त्रुटी भरून काढण्यासाठी झटत होता. पण नेमका मार्ग मिळत नव्हता . दिव्यस्पर्शी असं काहीतरी सोबतीला असल्याचं मात्र नेहमीच जाणवत होतं.
आजची सकाळ मात्र वेगळी ठरणार होती.
हाती यंत्र तंत्र तर मनी मंत्र घेऊन तो डोंगरमाथ्यावर पोहोचला. काल अंधार पडल्याने अर्धवट काम सोडून आलेल्या ठिकाणी..
आणि काय आश्चर्य! ती आलेली दिसली.. शुभ्रवस्त्रा, मंगला.. अतिशय वेगाने खाली उतरत होती.. हे शुभ वर्तमान सगळ्यांना सांगण्यासाठी आणि तिला गाठण्यासाठी उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अच्छा.. ही गंगावतरणाराची गोष्ट माहीत नाही.. निदान आता आठवत तरी नाही. त्यामुळे समजणे अवघड झाले होते Happy

सुंदर कथा… साठ हजार म्हटल्यावर संदर्भ लक्षात आला व तो शेवटाने कंफर्म केला.

भक्ती, फारएण्ड, सामी, मामी, - शर्वरी -, साधना आणि स्पार्कल, प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
ऋन्मे§ष, गंगावतरण कथा जुनी आहे ना. कदाचित त्यामुळेच आठवली नसेल. सगरपुत्रांचा उद्धार म्हणजे नेमके काय, याची उत्सुकता कायम असते मला. वेगवेगळ्या संदर्भात त्याचा अर्थ लावता येईल.