शब्दखेळांच्या यादीमध्ये दोन नवीन खेळांची भर टाकली आहे.
marathi-word-games.web.app
१) अदलाबदली खेळ
या खेळात ७ शब्द निवडले जातात व त्यांची अक्षरे विस्कळीत करून सादर केली जातात. खेळ खेळणाऱ्याला ती अक्षरे योग्य ठिकाणी आणून मूळ शब्द तयार करायचे आहेत. सर्व शब्द तीन किंवा चार अक्षरी आहेत व आडवे आहेत. अक्षरांची जागा बदलण्यासाठी कोणतेही दोन चौकोन निवडून त्यांच्या अक्षरांची अदलाबदली करता येते. चौकोन निवडण्यासाठी त्याच्यावर टिचकी मारा. पहिला चौकोन निवडल्यानंतर त्याच्याभोवती काळी सीमा दिसते. दुसरा चौकोन निवडल्यावर त्यांच्या अक्षरांची अदलाबदल होते. अक्षर योग्य जागी आल्यावर चोकोनाचा रंग हिरवा होतो. सुरुवातीला काही अक्षरे योग्य जागी बसविली आहेत. योग्य जागी असलेले अक्षर हलवीता येत नाही.
कमीत कमी वेळेत व कमीत कमी प्रयत्नांत सर्व मूळ शब्द तयार करणे हे या खेळाचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण खेळ खेळून झाल्यावर दवंडी पिटविता येईल. त्यासाठी लाऊडस्पीकर च्या बटनावर टिचकी मारा. दवंडी क्लिपबोर्ड ला कॉपी केली जाईल.
हा खेळ दैनिक आहे - म्हणजे दररोज ७ शब्दांचा एकच संच असेल व तो सर्वांना समान असेल.
२) सरकती अक्षरे खेळ
या खेळात तीन किंवा चार शब्द निवडले जातात व त्यांची अक्षरे विस्कळीत करून सादर केली जातात. खेळ खेळणाऱ्याला ती अक्षरे योग्य ठिकाणी आणून मूळ शब्द तयार करायचे आहेत. सर्व शब्द आडवे आहेत. अक्षराचा चौकोन ढकलत योग्य जागी न्यायाचा आहे. त्यासाठी एक चौकोन रिकामा आहे. रिकाम्या चौकोनाच्या शेजारील कोणत्याही चौकोनाला टिचकी मारा. मग तो चौकोन रिकाम्या जागी येईल. अश्या प्रकारे तो चौकोन सरकवत योग्य जागी न्यायाचा आहे.
तीन अक्षरी दैनिक मराठी
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
18 एप्रिल, 2024
वेळ - 01 मिनिटे, 52 सेकंद
प्रयत्न - 10
marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
18 एप्रिल, 2024
वेळ - 18 मिनिटे, 05 सेकंद
प्रयत्न - 25
marathi-word-games.web.app
चार अक्षरी सोडवायला तब्बल १८ मिनिटे लागली. पण सुटले एकदाचे.
तीन अक्षरी दैनिक मराठी
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
18 एप्रिल, 2024
वेळ - 04 मिनिटे, 27 सेकंद
प्रयत्न - 11
marathi-word-games.web.app
अदलाबदली खेळ सोपा आहे. आवडला.
अदलाबदली खेळ सोपा आहे. आवडला. तीन अक्षरी वर्डल अजिबात मला जमलं नव्हतं.
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
18 एप्रिल, 2024
वेळ - 04 मिनिटे, 22 सेकंद
प्रयत्न - 15
marathi-word-games.web.app
सरकत्या अक्षरांच्या खेळातले
सरकत्या अक्षरांच्या खेळातले शब्द ओळखता आले. पण अक्षरे योग्य जागी नेणे जमले नाही.
छान खेळ रचता तुम्ही!
धन्यवाद अवनी, भरत.
धन्यवाद अवनी, भरत.
@भरत, खरे आहे. अक्षरे सरकवत नेणे थोडे कठीण वाटते. पण सरावाने जमू शकते. मी आताच ४ अक्षरी खेळलो. बरेच प्रयत्न लागले पण अक्षरे जुळवता आली.
चार अक्षरी दैनिक मराठी सरकती अक्षरे खेळ
18 एप्रिल, 2024
वेळ - 03 मिनिटे, 07 सेकंद
प्रयत्न - 102
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
18 एप्रिल, 2024
वेळ - 07 मिनिटे, 36 सेकंद
प्रयत्न - 25
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
25 एप्रिल, 2024
वेळ - 03 मिनिटे, 29 सेकंद
प्रयत्न - 11
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी
दैनिक चार अक्षरी मराठी अदलाबदली खेळ -
20 सप्टेंबर, 2024
वेळ - 03 मिनिटे, 07 सेकंद
प्रयत्न - 26
https://marathigames.in
दैनिक पाच अक्षरी मराठी अदलाबदली खेळ -
20 सप्टेंबर, 2024
वेळ - 03 मिनिटे, 14 सेकंद
प्रयत्न - 25
https://marathigames.in
नवीन आलेले सगळे खेळ खेळून
नवीन आलेले सगळे खेळ खेळून पाहिले. मजा आली मस्त आहेत सगळे खेळ. पूर्वी मी hangman खूप खेळायचे. त्यात कोड्याच्या शेजारी एक कार्टून होते व आपण शब्द चुकलो की तो नर्व्हस होऊन काही बोलायचा(इंग्लिश मधून ).. like अरे यार चुकले! परत चुकले!! मला तू ठारच मारणार! ओ बॉय!! अशा type चे.. मजा यायची.
फक्त हे सगळे खेळून झाल्यावर दवंडी चिकटवायचे इथले धागे सतत शोधावे लागतात त्यासाठी काही करता येईल का? म्हणजे असा एक धागा ज्यात माबोवरील सर्व धाग्यांच्या लिंक्स एकत्र असतील म्हणजे तो main धागा निवडक १० मध्ये save केला की त्यातून सगळीकडे जाता येईल.
त्यात कोड्याच्या शेजारी एक
त्यात कोड्याच्या शेजारी एक कार्टून होते व आपण शब्द चुकलो की तो नर्व्हस होऊन काही बोलायचा >>> हो, माझाही तसे करण्याचा विचार होता पण ते खूप अवघड झाले असते म्हणून रद्द केला.