गंमतखेळः- मायबोली व मायबोलीकरांवर धम्माल मीम्स

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 08:12

नमस्कार मंडळी,

कसे काय? मजेत आहात ना सगळे?

तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.

पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!

चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अ‍ॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)

मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.

१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी सहमत ममो.
संयोजक मंडळ प्रत्येक वर्षी स्वतःची वेळ मॅनेज करून, कामं सांभाळून हे उपक्रम आखत असतं.दरवर्षी भाग घ्यायला मजा येतेच.स्वतःच्या कुवतीनुसार(मला लायकी लिहायचं होतं पण पुटिंग पोलाईटली) पाककृती स्पर्धेत भाग घेते.कधी पाककृती बनवलेल्या असतात पण फोटो नसतात.गणपती गौरीच्या गडबडीत परत बनवून फोटो काढावे इतका उत्साह नसतो.मायबोली गणेशोत्सव उपक्रम गौरी विसर्जन नंतर चालू होऊन पुढं 2 आठवडे राहावा, म्हणजे निवांत वेळ मिळेल असं वाटतं.
पण यावर्षी मीम उपक्रमाने बऱ्याच न लिहित्या मायबोलीकरांना पण लिहितं केलं.पाककृती स्पर्धा यावर्षी थोड्या सोप्या असल्याने सहभाग वाढला.याबद्दल संयोजकांचे विशेष आभार.
दर वर्षी उत्सव असाच बहरत राहो.

मायबोलीकर:
आज बिना दुधाचा शीर खुर्मा करेन या रेसिपी ने
https://www.maayboli.com/node/85740
images (2)_0.jpeg

मायबोलीकराची बायको:
friends-rachel-green.gif

आज तीळ बदाम स्क्रब मिळणार!! याहू!!
images (1)_2.jpeg

Lol

अंत: अस्ति प्रारंभ: - या न्यायाने यंदाच्या गणेशोत्सवाचा अंत हा ह्या धाग्याचा प्रारंभ असू दे. आणखीन वाढू दे हा धागा.

Lol

याच धर्तीवर अजून एक
बीयरची बाटली पाहून अल्कोहोल प्रेमी:
"चला चकण्याची सोय करूया"
images (1)_3.jpeg

बीयरची बाटली पाहून हेअर केअर प्रेमी:
"चला केसाला लावूया"
IMG_20240918_175053.jpg

अनु Happy

हा धागा माझ्यासाठी स्ट्रेस ब्रस्टर आहे.
आजचे सगळे मीम् भारी
हरपा तुम्हाला अनुमोदन.
ममो, तुमचे लेख खूप आवडतात.
तुम्ही निर्जीव गोष्टीत प्राण फुंकता. सजीवांचा लळा खूप जणांना असतो परंतु तुम्हाला निर्जीवांचाही लळा आहे.

Rofl

इथे पृथ्वीवरील शशक कळेना. अंतराळातले काय कळणार

वाहवा क्या बात.

अंतराळात पाणी खाली पडत नसल्याने "ते दोघे कोरडेच होते"

झाली सुनीताबाईंची शशक (नाही दशक)
एक नंबर द्या त्यांना Lol

सुनीआ विल्यम्स यांचे छायाचित्र पाहण्याचे धाडस होत नाही. कसं काय मनोधैर्य टिकवलं असेल ?
साध्या मेन लँड पासून दूर असलेल्या पृथ्वीवरच्या एखाद्या भूभागावर महिनाभर अडकून पडलो तर एक एक दिवस कसा जातो हे सांगता येत नाही. इथे तर... सुखरूप परत या.

हा धागा अजिबात बंद न करता निरंतर चालू द्यावा ही विनंती.
मी माबो कधीतरीच चक्कर मारते पण गणपतीच्या दिवसांतील विशेष लेख कधीच चुकवत नाही. यावेळचा मिम्स प्रकल्प लै भारी झालेला आहे. तर हा प्रकल्प असाच चालू राहू द्यावा.

( मला पण मीम्स टाकायचे होते पण मी तर अजून फोटो अपलोड करायला पण शिकले नाहीये)
तरीही मझ्या सारख्या इतर मिमोत्सुक मंडळींसाठी हा धागा बंद करू नये ही संयोजक महोदय/ महोदया यांना विनंती.

spartan_warrior_by_rylyn84_dfo1esx-fullview.jpg
.
.
spartan-tea.jpg

Pages