Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 08:19
काय मंडळी,
शीर्षक वाचून शाळेतले दिवस आठवले ना? पण घाबरू नका आम्ही काही तुम्हाला परत धडे वाचणे, पाठांतर करणे असे काही करायला लावणार नाही.
आपण शाळेत हे प्रश्न सोडवायचो त्याच स्वरुपाचा हा गंमतखेळ आहे.
खेळ एकदम साधा व सोप्पा आहे.
मराठी चित्रपट, कथा, कादंबर्या, प्रसिद्ध व्यक्ती यांच्या तोंडी आलेला संवाद अथवा त्यांचे प्रसिद्ध वक्तव्य दिले जाईल व ते वक्तव्य कोणी केले हे ओळखायचे आहे.
उदाहरणार्थ.
१. "अरे, पुराव्याने शाबित करेन!" :- हरितात्या,
२. "तुमचे सत्तर रुपये वारले" :- धनंजय माने
३. " काय हॉटेल! काय झाडी! काय डोंगर!":- शहाजीबापू पाटील
सुरुवातीला संयोजक एक वक्तव्य देतील, बरोबर उत्तर देणारा पुढचे वक्तव्य आणि गरज पडल्यास क्ल्यू देईल व हा खेळ पुढे चालू राहील.
तुमच्यासाठी पहिला संवाद आहे...
"गॉड इज सफरिंग--आमचे बायकोचा चिमटा असते तसा"
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी आधी दिलंय ते शोधा बरं.
मी आधी दिलंय ते शोधा बरं.
क्लू द्या अनया.
क्लू द्या अनया.
त्या लेखकांचं एक वाक्य
त्या लेखकांचं एक वाक्य मागच्या पानावर येऊन गेलं आहे.
तोवर अजून एक वाक्य.
'जातो जगायला मास्तर' आनंदा रामोशी म्हणाला
आधीच्या वाक्याचं उत्तर.
आधीच्या वाक्याचं उत्तर.
लंपन. दुंडाप्पा हत्तरगीच्या टांग्याची गोष्ट. 'डग' बहुधा.. लालासाहेब घोड्याच्या वर्णनात आहे ते.
वाक्याची शैली पाहून ते लंपनचं वाक्य आहे हे कळत होतं, पण स्पेसिफिक कथा आठवत नव्हती. मला आधी 'चक्र' वाटलेली.
जातो जगायला मास्तर' आनंदा
जातो जगायला मास्तर' आनंदा रामोशी म्हणाला <<
बनगरवाडी..
पुढचं देतो..
पुढचं देतो..
"मी सोल्जर.
तू लेका, सोजीर.
साम्राज्यशहाचा भाडोत्री शिपाई."
श्रद्धा आणि अनिरुद्ध दोन्ही
श्रद्धा आणि अनिरुद्ध दोन्ही बरोबर.
बनगरवाडीतलं ते वाक्य ऐकताना/ वाचताना दरवेळी डोळ्यात पाणी येतं.
क्ल्यू देतो..
क्ल्यू देतो..
कादंबरीच्या (मिनी) नावाचं नाटकही रंगमंचावर आलं होतं.
रणांगण?
रणांगण?
डोंगर म्हातारा झाला?
डोंगर म्हातारा झाला?
डोंगर म्हातारा झाला.>> मलाही
डोंगर म्हातारा झाला.>> मलाही हे कमराद म्हातार्याचं वाक्य वाटतंय. पण क्लू - मिनी नाव नाटकाला हे - जुळत नाही.
Abuva, बरोबर..
Abuva, बरोबर..
मलाही हे कमराद म्हातार्याचं वाक्य वाटतंय. पण क्लू - मिनी नाव नाटकाला हे - जुळत नाही. <<
मानव पृथ्वीकर, My Mistake. नाटक ' थँक्यू मि. ग्लाड' होतं.
Sorry Again..
कमराद म्हातारा हे एकदम बरोबर आहे..
पुढचं वाक्य:
पुढचं वाक्य:
'मला जर उद्या कुणी सांगायला लागला की तू नेहमी दूधभात, भेंडीची भाजी खा-- मी त्याला म्हणेन तू मटण पॅटिस आणि बिर्याणी खा -- क्विट्स!'
क्ल्यू देतो:
क्ल्यू देतो:
इंदूर-देवासच्या पार्श्वभूमीवर रचलेलं नाटक...
तुज आहे तुज पाशी - काकाजी
तुज आहे तुज पाशी - काकाजी
दिनेश लाटकर: बरोबर!
दिनेश लाटकर: बरोबर!
आवाज एकदम हेलिकॉप्टर सारखा
आवाज एकदम हेलिकॉप्टर सारखा येतोय. अरे हे मशीन बंद तरी करा नाहीतर विकून तरी टाका रे ss
पुढच वाक्यः
पुढच वाक्यः
काडीची नाही अक्कल आणि नाव काय तर सहस्त्रबुद्धे
इथली वाक्य बघून माझं वाचन
इथली वाक्य बघून माझं वाचन केवढं कमी आहे आणि विस्मरण शक्ति केवढी जास्त आहे ते जाणवलं.
काडीची नाही अक्कल आणि नाव काय
काडीची नाही अक्कल आणि नाव काय तर सहस्त्रबुद्धे <<
मला ही म्हण वाटतेय.
कुठल्या कथा, चित्रपटात आल्याचं आठवत नाहीये..
मी वाक्य द्यायचे राहीले होते
मी वाक्य द्यायचे राहीले होते काल.
देऊन ठेवतो, आधीचे सुद्धा सोडवा.
"अरे मी "त्यांना" ओट्स खाऊ घालतो, ओट्स! नाव सुद्धा ऐकलं नसशील कधी".
(मूळ वाक्यात त्यांना ऐवजी नक्की कोणाला याचा उल्लेख आहे.)
क्लु: ’त्यांन” हे माणसांना
क्लु: ’त्यांना” हे माणसांना उद्देशुन नाहीय. लेखक याच पानावरील.
ववीला असंच झालेलं. लोक महान
ववीला असंच झालेलं. लोक महान कोडी घालत होते आणि झटक्यात सोडवत होते, दुसरा round आणि मी ह्या ह्या करून हसण्याशिवाय काहीही करु शकत नव्हते. कुठून आणता एवढं टॅलेंट!
टॉपिकाढू सलाम!
मानव, अनिल बर्व्यांचं
मानव, अनिल बर्व्यांचं 'स्टडफार्म' का?
घोड्यांना ओट्स खाऊ घालत असणार.
मलाही तेच वाटलं होतं. शिवाय
मलाही तेच वाटलं होतं. शिवाय थँक्यू मिस्टर ग्लॅडचे लेखकही तेच आहेत.
बरोबर, श्रद्धा, अनया!
बरोबर श्रद्धा, अनया!
बरोबर श्रद्धा, अनया!
काडीची नाही अक्कल आणि नाव काय
काडीची नाही अक्कल आणि नाव काय तर सहस्त्रबुद्धे <<
मला ही म्हण वाटतेय.
कुठल्या कथा, चित्रपटात आल्याचं आठवत नाहीये..
गेला माधव कुणीकडे - माधव, उद्धव कोन्बडे ला
ओके दिनेश..
ओके दिनेश..
कोणीच काही देत नाहीये म्हणून
कोणीच काही देत नाहीये म्हणून देतो :
एकदम थांबून त्याच्याकडे वळून पाहत रेणू उद्गारली. "सर!!"
तेव्हा पुन्हा तिच्या खांद्यावर हात ठेवून अतिशय मजेने तिच्या डोळ्यात पाहत xxxx म्हणाला,
" हा बये, घाबरूही नकोस किंवा अपेक्षाही करू नकोस.
तुला एक गंमत सांगतो रेणू. तुला मिठीत घेतलं असताना एकदम समोर मृणाल आली तर नक्कीच मी मिठी किंचित घट्ट करीन. पण मृणालला मिठीत घेतलं असताना एकदम तू किंवा दुसरं कोणी आलं तर चटकन मी दूर होईन.
जो स्पर्श इतर कुणी पाहू नये, दोघांपुरता राहावा असं वाटतं तो स्पर्श फक्त लग्नानंतर मिळवावा. हे माझं सोपं तत्वज्ञान!"
Pages