डिस्क्लेमर: पक्के चहाबाज असाल तर या शिर्षकातला 'टी' तुम्ही वाचू नका . फुल चहाचे अपभ्रंश करुन लिहीलेल्या शब्दातल्या 'चा' कडेही तुम्ही बघू नका. पण एक वेगळ्या स्वादाचे पेय म्हणून एकदा तरी नक्की करुन बघा. करायलाही फार कष्ट नाहीत.
चला मग करुन बघुया हे दोन चहा
१) गोकर्ण फुलाचा चहा आणि २) जास्वंद फुलाचा चहा
प्रचि:
गोकर्ण चहा
फोटोत दिसणारे दोन रंग हे लिंबू न घालता आणि घालून झालेल्या बदलामुळे आहेत. लिंबू न घालता फिकट ते थोडा डार्क निळसर रंग येतो आणि लिंबू घातल्यावर पर्पल (लिंबू किती पिळलेय तसा रंग कमी अधीक डार्क येतो)
२) जास्वंद चहा
साहित्य:
१) निळी गोकर्ण फुले/ लाल जास्वंद फुले
२) आलं (ठेचून किंवा किसून/मिक्सरवर वाटून ठेवत असाल एकदमच तर त्यातला एक चमचा)
३) गवती चहा
४) तुळशीची पाने
५) पुदिना पाने
६) पाणी (मी दोन ग्लास पाणी घेतले आहे)
दोन्हीची कृती सारखीच आहे.
१) पाण्यात आल्याचा कीस, गवती चहा, पुदिना, तुळस घाला. पाणी या सगळ्या सकट उकळू द्या
२) उकळी आली की गॅस बंद करा आणि फुले घालून झाकण ठेवा (फुले पाण्याखाली धुवून घेऊनच वापराल हे गृहीत धरतेय)
मी वेळ मोजून बघत नाही गाळायचा पण साधारण पणे पाण्यात रंग उतरतो आणि फुलाचा मूळ रंग फिकूटतो/ क्रिमिश रंग येतो फुलाला तेव्हा मी तो चहा गाळून घेते.गाळून झाल्यावर या चहात लिंबू देखील पिळले तर चालते (न पिळता तसाच प्यायल्यास गरुड पुराणात शिक्षा नाहीये पण मला तो थोडा टॅंगी स्वाद आवडतो. रंगही मस्त येतो लिंबाने म्हणून मी लिंबू पिळते)
चहा पिण्याच्या पद्धती:
१)चहा गाळल्यावर तसाच गरम गरम प्या. लिंबू पिळून किंवा न पिळता कसाही प्या
२)त्याला गार करुन थंड करुन प्या. त्यात बर्फ घालून प्या.
३) मी यात साखर /मध काही घातले नाहीये पण यात साखर किंवा मध देखील चांगला लागतो. तुमची जीभ चालवून घेत असेल गोडा शिवाय किंवा साखर/गोड वर्ज्य मोडात असाल तर साखर / मध न घालताच प्या.
फायदे: याची चव डेव्हलप व्हावी लागते त्यामुळे जर पहिल्या घोटात नाही आवडला तरी हार मानू नका. थोडे बदल जीभ करेल तिच्यात याची चव स्विकारुन, थोडे प्रयोग तुम्ही करा यात. खरेतर न आवडण्यासारखे यात काही नाहीये तसेच फार हिट्ट व्हावे असेही यात काही नाहीये. पण पेयातली व्हरायटी/ चहाबाजगिरी कमी करायला हेल्दी पर्याय/ ॲंटिऑक्सीडन्ट्स प्रॉपर्टीज/ अतिरिक्त उष्णता कमी करणे/ पित्त नाशक/ वजन कमी होण्यास मदत/ रक्तदाब + विलनवाले कोलेस्टेरॉल प्रमाणात ठेवण्यास मदत/ यकृताचे आरोग्य सुधारते/ चयापचय सुधारते/ केस गळणे कमी होते/ तणाव कमी करते आणखीही xyz फायदे आहेत याचे असे गुगल आणि AI म्हणते.
असे सगळे जादुई काही होत नसले इतक्या प्रमाणात तरी त्या निमित्ताने पाणी पोटात जाते, चहाला पर्याय मिळतो, चवीत बदल होतो, करायला सोपे असल्याने आळशीपणा मधे न येता हा चहा करुन होतो या जोडीला वर दिलेले फायदे जर अर्धा पाव टक्क्याने मिळाले तरी बेस्टच आहे की.
तुम्ही या व्यतिरिक्त आणखी कोणत्या फुलाचा चहा करता मला प्रतिसादात नक्की कळवा म्हणजे मलाही अजून प्रयोग करुन बघता येतील.
चहाबाज लोकांनी शेवटपर्यंत वाचायचे कष्ट घेतले असतील तर त्यांचे आभार (तुमच्या नकळत तुम्ही एक पाऊल पुढे टाकलेले आहे स्विकाराच्या वाटेवर )
बाकीही सगळ्यांचे आभार आणि संयोजकांनी यावेळी माझ्या सारख्या या म्हणजे पाकृ लिहायच्या वाटेकडे न फिरकणाऱ्या भिडूला खेळायला भाग पाडल्याबद्दल त्यांचेही आभार सरतेशेवटी न कंटाळता आळस बाजूला सारुन फोटो वगैरे काढायचे कष्ट घेऊन इथवर आल्याबद्दल माझेही आभार
(ग्रॅटिट्युड जर्नल लिहायला लागल्यापासून स्वतःचे आभार देखील मानायचे असतात हे शिकायला मिळाले मलाच)
मायाळू ओवा वगैरे पानांची
मायाळू ओवा वगैरे पानांची करतों तशीच. भज्यांच्या भिजवलेल्या पिठात पानं बूडवून पीठाने कोट करायची आणि नेहमी प्रमाणे भजी तळायची. खूपच कुरकुरीत होतात.>> अच्छा! आले लक्षात.
मायाळू ओवा म्हणजे?
मायाळू ओवा म्हणजे?
क्रूर ओवा पण असतो का?
काय सुरेख रंग आहेत चहाचे !!
काय सुरेख रंग आहेत चहाचे !!
रंग मस्त येतो , जास्वन्दीचा
रंग मस्त येतो , जास्वन्दीचा करून बघेन
मायाळू ओवा म्हणजे?
मायाळू ओवा म्हणजे?
किल्ले. मायाळू च्या पानांची भजी, ओव्या च्या पानांची भजी
क्रूर ओवा पण असतो का?>
रंगीत पेय चांगलं दिसतंय. के ड्रामा मध्ये पण अशा टाईप चे चहा बघितले आहेत ( काय माझी भाषा!)
पूर्वी कुठल्यातरी मालिकेत मोगऱ्याचं सरबत दाखवलं होतं ना ( रमाबाई का कुठलीशी)
दिसतोय सुंदर.
दिसतोय सुंदर.
पण चहा नकोच म्हणायला असे वाटले
सुंदर रंग. (पण चहाला चटावलेली
सुंदर रंग. (पण चहाला चटावलेली माझी जीभ ह रसपान करेल का अशी शंका वाटते आहे. अजून कषाय पर्यंत जेमतेम धाव गेलेली आहे )
क्रूर ओवा हाईट आहे.
क्रूर ओवा
हाईट आहे. हलके घे किल्ली.
मायाळू पाने गुगलून बघ किल्ली.
क्रूर ओवा
क्रूर ओवा
मायाळूची भाजी फास्टर फेणे च्या 'भागी गाय चुलाण्यात पडली' गोष्टीत वाचून माहीत आहे.अजून खाल्ली नाही.
कवीन छान रेसिपी . रंगीत
कवीन छान रेसिपी . रंगीत फुलांचं सरबत हे जास्त बरोबर होईल....
चहाबाज असल्यामुळे "चहा मत बोलो ना!!!" असं वाटलं
(No subject)
झब्बू
झब्बूला बदाम
झब्बूला बदाम
Pages