घटक पदार्थ: १-२ ग्लास आंबील करण्यासाठी
१) नाचणी सत्व/ नाचणी पीठ ३ चमचे
२) पाणी दिड ते दोन ग्लास
३) मीठ (साधे किंवा सैधव)
४) पुदीना ५-६ पाने
५) मिरची तिखटवाली असेल तर अर्धी किंवा पाव मिरची
६) जिरे पावडर अर्धा चमचा
७) आलं अर्ध पेर
८) ताक
९) कोथिंबीर
(यात घटक पदार्थ आणि काही प्रमाणात कृतीमध्ये व्हेरिएशन्स आहेत. मी आज केलेली कृती खाली सविस्तर देते. व्हेरिएशन्स नंतर सगळ्यात खाली लिहेन.)
कृती:
१)३ चमचे नाचणी पीठ/ सत्व अर्धी वाटी पाण्यात कालवून थोडावेळ तसेच ठेवून द्यावे. (मी तासभर ठेवले कारण बाकी कामे आटपायला तेव्हढा वेळ लागला मला)
२)दिड ग्लास पाणी गरम करत ठेवावे. पाण्याला उकळी आली की त्यात भिजवून ठेवलेले पीठ घालून सतत ढवळत रहावे.
३) खूप घट्ट झालेय वाटले तर अजून थोडे पाणी घालून ढवळत रहावे
४) शिजत आले की रंग डार्क होतो. त्याला तकाकी येते त्यावरून ओळखता येते शिजल्याचे. साधारण १५-२० मिनिटे लागत असावीत.
५) झाकण ठेवून रुम टेंपरेचरला येऊ द्यावे
६) मिरची, जिरे पावडर किंवा भाजलेले जिरे, मीठ (साधे किंवा सैधव) (मला सैधव जास्त आवडते), पुदिना, कोथिंबीर एखादीच काडी, आले खलबत्त्यात कुठून किंवा मिक्सरला वाटून ते शिजवून गार झालेल्या नाचणी पीठात घालावे. यात ताक मिक्स करुन ग्लास मधे ओतून प्यावे.
टिप्स:
१) क्रमांक ५ पर्यंतच्या स्टेप्स, क्रमांक ६ ची स्टेप, आणि ताक रात्रीच वेगवेगळे करुन फ्रीजमध्ये ठेवता येईल. सकाळी फक्त एकत्र केले की ब्रेकफास्टला आंबील तयार.
क्रमांक ५ आणि ६ जास्त प्रमाणात करुन दोन तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवून लागेल तेव्हढ्या प्रमाणात घेऊन एकत्र केले तरी चालते. चव आणि टेक्ष्चर बदलत नाही. एकट्यासाठी खटाटोप करताना कधी कधी घाट घालणे नको वाटते म्हणून अजिबात न करण्याचा पर्याय निवडण्यापेक्षा दोन तीन दिवसांचे असे मिश्रण सेपरेट स्टोअर करणे सोय म्हणून चालू शकते. मी असे केले आहे. त्याहून जास्त करुन मी टिकवून बघितलेले नाही.
एका ग्लास पुरतेच शिजवलेले पीठ मी वाटीत काढून घेतले आहे. ताक आणि शिजवलेले पीठ यांचे प्रमाण १:३ / १:२ / १:१ आपल्याला किती कमी अधिक घट्ट हवेय त्याप्रमाणे कमीअधिक घेता येते.
फायदे:
न्युट्रिएंट रिच, हाय फायबर, ग्लुटन फ्री मिलेट असे मला गुगलबाबाने एका वाक्यात सुचवले. डायबेटिस कंट्रोल, कोलेस्टेरॉल कंट्रोल, वजन कमी करणाऱ्यांच्या डाएट प्लॅनमधला एक हिरो, ॲंटिऑक्सिडेंट, प्रथिने आणि इतर मिनरल्स आणि कॅल्शियम, लोह असलेले धान्य असे बरेच फायदे गुगलने आणि डायटिशियनने सांगितले. अर्थात प्रमाण महत्वाचे आणि इतर आहार विहार देखील महत्वाचा.
माझ्या दृष्टीने एक वाढीव फायदा म्हणजे आंबील झटपट होते, फार खटपट न करता होते, आदल्या रात्री करुन ठेवता येते आणि पोटही भरते.
व्हेरिएशन्स
१)नाचणी धान्य/ नाचणी+तांदूळ २:१ प्रमाणात धान्य घेऊनही करता येते
धान्य धुवून भिजत घालायचे ४-५ तास किंवा रात्रभर. मिक्सरला वाटून घ्यायचे आणि नंतर शिजवून घ्यायचे.
२) पीठ पाण्यात न भिजवता ताकात भिजवायचे आणि पाण्यात शिजवायचे
३) पीठ रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी आंबील शिजवायची
४) पीठ कमी वेळ म्हणजे अगदी १५-२० मिनिटे भिजवून शिजवून घेतल्यानंतर मग फरमेंट करायला तसेच झाकून बाहेर ठेवायचे आणि फरमेंट झाल्यावर मग त्यात ताक आणि इतर मसाले घालायचे
५) पीठ शिजवून घेतानाच त्यात मीठ, किसलेलं आलं, मिरची, पुदिना इत्यादी घालायचे. काहीजणं यात लसूण देखील घालतात ठेचून. काही यात मिरीही ठेचून घालतात.
मी चव बदल म्हणून आलटून पालटून हे ते घालून बघत असते
६) यात ताकात घातल्यावर वरतून कांदा बारीक चिरुन देखील घातला जातो
७) नुसते पाण्यात शिजवून घेते मी त्याचे दोन फायदे. ताकातल्या चवीचा कंटाळा आला तर त्यात दूध आणि गूळ/साखर घालून घेता येते. गोडही चांगले लागते. गुळ साखरेला पर्याय म्हणून दुधात खजूर पेस्ट घालून बघता येईल. (लेकीला दुधातले आणि मला ताकातले असे दोघींसाठीचे पर्याय एकाच वेळी होतात म्हणून मी नुसते पाण्यात शिजवून घेते बरेचदा)
(पाकृ लिहायचा त्यासाठी प्रमाण मोजून साहित्य लिहायचा आणि प्रत्येक स्टेपचा फोटो जमेल तितका नीट काढायचा उत्साह टिकवून ठेवणे हे प्रत्यक्ष कृतीपेक्षा अवघड काम आहे थोडक्यात नक्की करुन बघा कृती अतिशयच सोपी आहे. व्हेरिएशनला स्कोप आहे आणि कृतीवर माझा कॉपीराईट नाही, ही तशी पारंपरिक कृती आहे बऱ्याच घरांमधे होते/व्हायची) (यंदा पाकृसाठी भाग घेता येईल असे नियम ठेवल्याबद्दल संयोजकांचे आभार. इथे येणाऱ्या पाकृ माझे पुढचे काही meal plans सोपे करुन टाकणार आहेत)
एक नंबर!!
एक नंबर!!
छान कृती. करून बघायला हवं.
छान कृती. करून बघायला हवं.
थोडंफार असंच पण जरा घट्ट करते मी. (उकड ).
कुळीथ पीठ वापरून पण करता येईल.
हो शर्मिला कुळीथ पीठ, ज्वारी
हो शर्मिला कुळीथ पीठ, ज्वारी पीठ वापरून पण करता येते.
एकदम मस्त आणि पौष्टिक रेसिपी
एकदम मस्त आणि पौष्टिक रेसिपी.आवडली.
मस्त पारंपारीक पाकृ.. पण मला
मस्त पारंपारीक पाकृ.. पण मला नाचणी आवडत नाही. त्यामुळे ती तुम्ही ठेवा. ईतर सारे घटक पदार्थ आणि सारे सोपस्कार करून ताक इथे सरकवा
धन्यवाद
धन्यवाद
ऋन्मेष, तू ये इथे. ताकात पाहुणचार आटपत असेल तर मला काय चालेलच
छान आहे रेसिपी, आवडली.
छान आहे रेसिपी, आवडली.
एकदाच पिलय आंबील. मित्राच्या आईने केलेलं , ज्वारीचं पीठ वापरून.
आंबील पिल्याने सुस्ती/झोप येते का !
हेल्दी आहे.
हेल्दी आहे.
मस्तच...
मस्तच...
कविन मस्त आहे पाकृ.
कविन मस्त आहे पाकृ.
ज्वारीचं आंबिल प्यायलोय. नाचणी ट्राय करेन नक्की.
छान आहे पाकृ.. पौष्टिक
छान आहे पाकृ.. पौष्टिक
फोटो आणि त्यांचं labelling पाहून कॉलेज मधल्या diagrams आठवल्या. Efforts घेतलेत तिकडे, steps चे फोटो नसले तरी
छान आहे रेसिपी . करुन पाहीन
छान आहे रेसिपी . करुन पाहीन
मी ज्वारीच्या आंबिलाची रेसिपी
मी ज्वारीच्या आंबिलाची रेसिपी लिहायच्या विचारात होते. आता दुसरं काहीतरी सुचायला हवं.
नाचणीचे आंबिल कधी केलं नाहीये. करून बघेन.
आंबील पिल्याने सुस्ती/झोप
आंबील पिल्याने सुस्ती/झोप येते का !>> जरा जास्तच पोटभर प्यायली असावीत किंवा जास्त घट्ट आणि जास्त प्रमाणात असे डबल धमाका झाला असावा
नाहीतर झोप वगैरे येत नाही खरेतर. पण तसेही झोप यायला काही कारण लागते का? मीटिंग लांबली ऑफीसमधे तरी पेंग येते आपल्याला
अल्पना, येऊदेत नवीन काहीतरी. माझ्या आवाक्यातली असेल तर मलाही एक पर्याय मिळेल नवीन.
सगळ्या प्रतिसादकांचे पुन्हा एकदा आभार
छान आहे पाकृ..
छान आहे पाकृ..
एकदम पौष्टिक !
कविन,मस्त पा कृ.
कविन,मस्त पा कृ.
मैत्रीण आणायची ही आंबील,त्याची आठवण झाली.
Thank you. Wonderful recipe
Thank you. Wonderful recipe for me. Will try to cook and update. Half a glass will help me pull through half a day. Ordered nachni peeth today. Hope it helps with weight gain. Best wishes for winning award.
नाचणी/रागी अगदी आरोग्यदायी
नाचणी/रागी अगदी आरोग्यदायी पदार्थ. हे आंबिल सूप सारखे खाण्यात येईल धन्यवाद.
आजवर नाचणी डोसेच खाले आहेत, आता अजून १ पदार्थ यादीत अॅड.
धन्यवाद कुमार सर, देवकी, अमा,
धन्यवाद कुमार सर, देवकी, अमा, आशु२९
@अमा, hope it helps you. आज मी लेक आणि माझ्यासाठी दुधात शिजवले आणि हेल्थ ड्रिंक नाव देत लेकीला दिले. आज मी नाचणी पीठ, त्याहून निम्मे सत्तू पीठ (रोस्टेड चणे मिक्सरवर फिरवले), बदाम आणि अक्रोड पूड असे सगळे दुधात मिक्स करुन शिजवून घेतले आणि नंतर जरा वरतून दूध घालून कन्झिस्टन्सी अॅड्जस्ट केली. तिला साखर घालून दिले आणि मी तसेच साखर विरहीत प्यायले. तुम्ही असेही कर शकाल अधूनमधून बदल म्हणून
हे कधी प्यायलेलं नाही. पण
हे कधी प्यायलेलं नाही. पण करुन बघेन नक्की.
उकड खूप आवडते त्याच चवीचं पण पातळ आणि गार असं होईल असं वाटलं. कसं झालं म्हणजे बरोबर आणि कसं झालं म्हणोजे माकाचु कॅंडिडेट हे ही माहित नाही अवस्था
गव्हाचे सत्त्व करते मी, ते
गव्हाचे सत्त्व करते मी, ते पाण्यात शिजवून खाते. माझ्या साबा ,कोणी आजारी पडलं की गव्हाचं सत्व करायच्या. ते ताकातूनही पितात असं ऐकलंय. तेही खूप शक्तीवर्धक असतं.
नाचणी सत्त्व नुसतही ताकात किंवा दुधात मिक्स करून पितात ना? कि ते वेगळं ? हां, लाह्या पिठ आठवतंय मला.ते ताकात किंवा दुधात घालून खातात.
तात्पर्य काय तर नाचणीचे आंबिल मी ऐकलंय खूप पण खाण्याचा योग नाही आला.आता रेसिपी कळलीये. करण्यात येईल.
मस्त रेसिपी आणि फोटो.
मस्त रेसिपी आणि फोटो.
उघडण्याची वाट बघत पडलेलं एक
उघडण्याची वाट बघत पडलेलं एक नाचणी सत्त्वाचं पाकीट आहे घरात. नक्की कसं करायचं हे कळत नव्हतं. सांगणारे लोक फॉर डमीज कृती देत नव्हते. तुमची ही रेसिपी आणि व्हेरिएशन्स मला खूप उपयुक्त ठरतील.
इथे येणाऱ्या पाकृ माझे पुढचे काही meal plans सोपे करुन टाकणार आहेत)+१
नीट तपशीलवार लिहिली आहे आणि
नीट तपशीलवार लिहिली आहे आणि फोटोही मस्त.
मस्त, मस्तच. अशी करून बघेन.
मस्त, मस्तच. अशी करून बघेन.
मी तूप जिरे फोडणीत नाचणीचं पीठ थोडं भाजून घेते, खमंगपणा येतो, आणि ताकातली करते.
मस्त. मी पण अन्जुसारखंच करते.
मस्त. मी पण अन्जुसारखंच करते. अन्जु, तुच सांगितलं होतंस. खूप दिवसात केलं नाही आता करावं.
थँक्स सुनिधी.
थँक्स सुनिधी.
(No subject)
अभिनंदन कविन.एकदम हेल्दी
अभिनंदन कविन.एकदम हेल्दी रेसिपी.
हायला पाकृ स्पर्धेत दोन दोन
हायला पाकृ स्पर्धेत दोन दोन बक्षिसे.. अभिनंदन
Pages