
घटक पदार्थ: १-२ ग्लास आंबील करण्यासाठी
१) नाचणी सत्व/ नाचणी पीठ ३ चमचे
२) पाणी दिड ते दोन ग्लास
३) मीठ (साधे किंवा सैधव)
४) पुदीना ५-६ पाने
५) मिरची तिखटवाली असेल तर अर्धी किंवा पाव मिरची
६) जिरे पावडर अर्धा चमचा
७) आलं अर्ध पेर
८) ताक
९) कोथिंबीर
(यात घटक पदार्थ आणि काही प्रमाणात कृतीमध्ये व्हेरिएशन्स आहेत. मी आज केलेली कृती खाली सविस्तर देते. व्हेरिएशन्स नंतर सगळ्यात खाली लिहेन.)
कृती:
१)३ चमचे नाचणी पीठ/ सत्व अर्धी वाटी पाण्यात कालवून थोडावेळ तसेच ठेवून द्यावे. (मी तासभर ठेवले कारण बाकी कामे आटपायला तेव्हढा वेळ लागला मला)
२)दिड ग्लास पाणी गरम करत ठेवावे. पाण्याला उकळी आली की त्यात भिजवून ठेवलेले पीठ घालून सतत ढवळत रहावे.
३) खूप घट्ट झालेय वाटले तर अजून थोडे पाणी घालून ढवळत रहावे
४) शिजत आले की रंग डार्क होतो. त्याला तकाकी येते त्यावरून ओळखता येते शिजल्याचे. साधारण १५-२० मिनिटे लागत असावीत.
५) झाकण ठेवून रुम टेंपरेचरला येऊ द्यावे
६) मिरची, जिरे पावडर किंवा भाजलेले जिरे, मीठ (साधे किंवा सैधव) (मला सैधव जास्त आवडते), पुदिना, कोथिंबीर एखादीच काडी, आले खलबत्त्यात कुठून किंवा मिक्सरला वाटून ते शिजवून गार झालेल्या नाचणी पीठात घालावे. यात ताक मिक्स करुन ग्लास मधे ओतून प्यावे.
टिप्स:
१) क्रमांक ५ पर्यंतच्या स्टेप्स, क्रमांक ६ ची स्टेप, आणि ताक रात्रीच वेगवेगळे करुन फ्रीजमध्ये ठेवता येईल. सकाळी फक्त एकत्र केले की ब्रेकफास्टला आंबील तयार.
क्रमांक ५ आणि ६ जास्त प्रमाणात करुन दोन तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवून लागेल तेव्हढ्या प्रमाणात घेऊन एकत्र केले तरी चालते. चव आणि टेक्ष्चर बदलत नाही. एकट्यासाठी खटाटोप करताना कधी कधी घाट घालणे नको वाटते म्हणून अजिबात न करण्याचा पर्याय निवडण्यापेक्षा दोन तीन दिवसांचे असे मिश्रण सेपरेट स्टोअर करणे सोय म्हणून चालू शकते. मी असे केले आहे. त्याहून जास्त करुन मी टिकवून बघितलेले नाही.
एका ग्लास पुरतेच शिजवलेले पीठ मी वाटीत काढून घेतले आहे. ताक आणि शिजवलेले पीठ यांचे प्रमाण १:३ / १:२ / १:१ आपल्याला किती कमी अधिक घट्ट हवेय त्याप्रमाणे कमीअधिक घेता येते.
फायदे:
न्युट्रिएंट रिच, हाय फायबर, ग्लुटन फ्री मिलेट असे मला गुगलबाबाने एका वाक्यात सुचवले. डायबेटिस कंट्रोल, कोलेस्टेरॉल कंट्रोल, वजन कमी करणाऱ्यांच्या डाएट प्लॅनमधला एक हिरो, ॲंटिऑक्सिडेंट, प्रथिने आणि इतर मिनरल्स आणि कॅल्शियम, लोह असलेले धान्य असे बरेच फायदे गुगलने आणि डायटिशियनने सांगितले. अर्थात प्रमाण महत्वाचे आणि इतर आहार विहार देखील महत्वाचा.
माझ्या दृष्टीने एक वाढीव फायदा म्हणजे आंबील झटपट होते, फार खटपट न करता होते, आदल्या रात्री करुन ठेवता येते आणि पोटही भरते.
व्हेरिएशन्स
१)नाचणी धान्य/ नाचणी+तांदूळ २:१ प्रमाणात धान्य घेऊनही करता येते
धान्य धुवून भिजत घालायचे ४-५ तास किंवा रात्रभर. मिक्सरला वाटून घ्यायचे आणि नंतर शिजवून घ्यायचे.
२) पीठ पाण्यात न भिजवता ताकात भिजवायचे आणि पाण्यात शिजवायचे
३) पीठ रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी आंबील शिजवायची
४) पीठ कमी वेळ म्हणजे अगदी १५-२० मिनिटे भिजवून शिजवून घेतल्यानंतर मग फरमेंट करायला तसेच झाकून बाहेर ठेवायचे आणि फरमेंट झाल्यावर मग त्यात ताक आणि इतर मसाले घालायचे
५) पीठ शिजवून घेतानाच त्यात मीठ, किसलेलं आलं, मिरची, पुदिना इत्यादी घालायचे. काहीजणं यात लसूण देखील घालतात ठेचून. काही यात मिरीही ठेचून घालतात.
मी चव बदल म्हणून आलटून पालटून हे ते घालून बघत असते
६) यात ताकात घातल्यावर वरतून कांदा बारीक चिरुन देखील घातला जातो
७) नुसते पाण्यात शिजवून घेते मी त्याचे दोन फायदे. ताकातल्या चवीचा कंटाळा आला तर त्यात दूध आणि गूळ/साखर घालून घेता येते. गोडही चांगले लागते. गुळ साखरेला पर्याय म्हणून दुधात खजूर पेस्ट घालून बघता येईल. (लेकीला दुधातले आणि मला ताकातले असे दोघींसाठीचे पर्याय एकाच वेळी होतात म्हणून मी नुसते पाण्यात शिजवून घेते बरेचदा)
(पाकृ लिहायचा त्यासाठी प्रमाण मोजून साहित्य लिहायचा आणि प्रत्येक स्टेपचा फोटो जमेल तितका नीट काढायचा उत्साह टिकवून ठेवणे हे प्रत्यक्ष कृतीपेक्षा अवघड काम आहे थोडक्यात नक्की करुन बघा कृती अतिशयच सोपी आहे. व्हेरिएशनला स्कोप आहे आणि कृतीवर माझा कॉपीराईट नाही, ही तशी पारंपरिक कृती आहे बऱ्याच घरांमधे होते/व्हायची) (यंदा पाकृसाठी भाग घेता येईल असे नियम ठेवल्याबद्दल संयोजकांचे आभार. इथे येणाऱ्या पाकृ माझे पुढचे काही meal plans सोपे करुन टाकणार आहेत)
अभिनंदन.
अभिनंदन.
हे परवा केलेलं. आवडलं. पुढच्यावेळी असं वॉटरी ड्रिंक कन्सिस्टंसी करण्यापेक्षा मला उकडच जास्त आवडेल वाटलं.
अभिनंदन!
अभिनंदन!
धन्यवाद
धन्यवाद
पुढच्यावेळी असं वॉटरी ड्रिंक कन्सिस्टंसी करण्यापेक्षा मला उकडच जास्त आवडेल वाटलं.>> आता मी एकदा नाचणीची उकड करुन बघेन. मी आजवर फक्त तांदूळाची उकड केलेय आणि खाल्लेय
अभिनंदन कविन
अभिनंदन कविन
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन.
अभिनंदन.
आत्ताच करून बघितलं. छान झालंय. आवडलं.
आत्ताच करून बघितलं. छान झालंय
आत्ताच करून बघितलं. छान झालंय. आवडलं.>> अरे वा! छान वाटले वाचून
धन्यवाद सगळ्यांना
Pages