प्रकाशचित्रांचा झब्बू ३ - श्रीमंती माझ्या नजरेतून

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 09:23

मायबोली गणेशोत्सव २०२४ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू.

आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी अगदी सापेक्ष असतात. प्रत्येक जण त्याच गोष्टीबद्दल सारखाच विचार करेल असे नाही. प्रत्येकाची फुटपट्टी वेगळी आणि मापदंडही. यश-अपयश असो किंवा श्रीमंती त्याच्या व्याख्या अगदी वैयक्तिक व सापेक्ष असतात. आजच्या या प्रकाशचित्रांच्या झब्बूतून पाहू या एकमेकांच्या श्रीमंतीच्या व्याख्या.

आजचा विषय आहे श्रीमंती माझ्या नजरेतून.

तुम्हाला तुमच्याकडे असलेली, या विषयाबद्दलची जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि क्रिकेटवेड्या पोरांची श्रीमंती Happy

याची किमंत आणि यासोबत जोडलेले इमोशन शब्दात मांडताना वेगळा लेख बनेल. पण यासाठी जीव कितीही धोक्यात टाकायची तयारी असायची त्यावेळी यातूनच समजू शकते.

ही संपत्ती ही श्रीमंती मुलीची आहे.
आणि आपल्या मुलीला सुद्धा आपल्या सारखेच क्रिकेटचे वेड असणे ही माझी श्रीमंती Happy

IMG_20240911_211526.jpg

हा 'रमड'ना झब्बू..
लेकाच्या आवारातील खजिना..


आणि हे त्याच आवारात पिच खायला येणारं हरिण..


पुस्तकांचा/ घरातल्या लायब्ररीचा फोटो पहिल्या पाच entries मधेच अपेक्षित होता Happy

पुस्तकांचा/ घरातल्या लायब्ररीचा फोटो पहिल्या पाच entries मधेच अपेक्षित होता >>> बराच वेळ किंडलचा फोटो टाकावा की इथे आणलेल्या मोजक्या पुस्तकांचा हे ठरत नव्हतं Proud

कुणी हेल्थ इज वेल्थ म्हणेंना की इथे.
ती ही श्रीमंतीच.
फोटो मात्र नाही ह्याचा.

आलेले बरेच फोटो आवडले.
पुस्तके फोटो मलाही वाटलेलं.
कुणाकड़े जुन्या रेकॉर्ड गाणी कैसेट्स वै असतील ते ही येउदे.

कुणाकड़े जुन्या रेकॉर्ड गाणी कैसेट्स वै असतील ते ही येउदे >>> अगदी हेच मनात आलं होतं. पण हा खजिना माहेरी राहिलाय Happy

Health is wealth साठी ट्रायथलोंन पूर्ण केलेले बरेच माबोकर आहेत एलिजीबल.
Harpen, सिंबा अजून कोण कोण.
अनिंद्य Happy

आडरानातील वाट, पाठीवर बॅग, बॅगेत एक दोन वस्तू आणि भटकंती,
नंतर आयुष्यभर पुरतील अश्या आठवणींची श्रीमंती
MB Ganesh Shreemanti - 001.jpeg

FB_IMG_1726071373922~4.jpg

संगीताचे - पेटीचे , बासरीचे सूर, हास्य विनोदाची कारंजी, पुस्तकं वाचण्यासाठी जळणारे दिवे, किकींग बॅगची धडाम धूम ..

निरु लेकीने तुम्हाला गडगंज श्रीमंती दिली.. मस्त चित्रे.

सगळ्यांची श्रीमंती आवडली. आम्हाला बोलवा उपभोगयला तुमच्या सोबत.

छंदीफंदी तुमच्या श्रीमंतीचा हेवा वाटतेय बरं का…कलाकार घर दिसतंय तुमचं.
निरू तुमचं घर म्हणजे आर्ट गॅलरीच आहे…

वा !!
सर्व फोटो एकसे बढकर एक आहेत. . .

कलाकार घर दिसतंय तुमचं>>>
कलाकार असं नाहीये कोणी, पण स्वांतसुखाय त्यांचं काही न काही चालू असतं.. जरा बरं वाटत..

एक से एक एंट्री आहेत सर्वांच्या. धाग्याची सुरुवात च कुटुंब संपत्तीने केली ऋन्मेष, वाह क्या केहने!!
अनिरुद्ध, खरे श्रीमंत आहात. धनवान रहा.
वळचणी ला आलेले क्युट प्राणी पण किती मस्त. सर्व च चित्रे मस्त.
अनिंद्य तुमच्या खिडकीतला पक्षी पिल्लांचा फोटो मला सापाची पिल्ले वाटलीत Lol

Pages