अंत: अस्ति प्रारंभ: - २ - {प्राक्तन } - {कविन}

Submitted by कविन on 10 September, 2024 - 10:44

सटवाईने कुणाच्या कपाळी काय लिहीलं असेल काही सांगता येत नाही. आता हेच बघा ना! मला पाऊस आवडतो पण बाल्कनी सोडून पावसात मला जाता येत नाही. आणि या दोघांचं पावसाशी अजिबातच सख्य नाही तरी त्यांची मात्र पावसात भिजण्यातून सुटका नाही. रोजंदारीवर जगणाऱ्याला चॉईस असतोच कुठे?

वाईट वाटलं तरी माझ्या पंखात कुठे बळ होते मदत करण्याइतके.

आजही पाऊस कोसळत होता. “आजही भिजणार बिचारे!”, मन उद्गारले

पण आजचा दिवस मात्र वेगळा होता. आता पावसात भिजायची गरजच उरली नव्हती. कॅट सॅकमधे एकमेकांना बिलगून बसलेले ते दोघे आज त्यांच्या हक्काच्या घरी चालले होते.

मी बघितले ना बाल्कनीतून, आताही ते दोघे मुसळधार पावसात होते, पण कोरडेच!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान!

मस्त!
रोजंदारीवर वरचा कर्ता बदललेला नाही.