अंत: अस्ति प्रारंभ: - भय - र. आ.

Submitted by रघू आचार्य on 10 September, 2024 - 10:45

आतापर्यंतची चढण ही तीस अंश किंवा फार तर चाळीस पंचेचाळीस पर्यंत होती.
कमी चढणीवर धावणे, पाय ओढत पुढे झुकत चालत राहिल्याने शरीराचा जणू मल्लखांब होत चालला होता. आता पुढचे पाऊल टाकले तर हाडाचे लोह होईल असे वाटत होते.

आता मात्र साठ अंशाचा कोन सातत्याने लागत होता. हाताचा आधार घेऊन वर चढावे लागत होते. पुढे सुळका होता. सत्तर ते ऐंशी. पण पुढे पुढे जाणे आवश्यक होते.

न जाणो "ते "मागेच असतील तर ?
थकून तो थांबला. पाण्याचा घोट घेऊन त्याने डोळ्याला दुर्बीण लावली..

वर गझलकारांची टीम पोहोचली होती आणि ऐकायला त्याला खाणाखुणा करत होती.
उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून (स्वतःच्या कविता ऐकवलेल्या नवकवींची तमा न बाळगता) त्याने रस्त्याकडे धाव घेतली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खी: खी: मस्त.

'बेतुके शायरोंकी बेसुरी कव्वालियों' ओळ आठवली Happy

सर्वांचे आभार.
गझलकारांचे विशेष आभार. कुणीच नाराज झाले नाही. Happy