अंत: अस्ति प्रारंभ: - १ - कल्पनाशक्तीचा आविष्कार! - ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 September, 2024 - 08:35

त्याच्या हातात जादू होती. कॅनव्हास रंगत होता. डोंगर, दरी, रस्ता, नदी.... आणि कावळा.

अरेss आताच तर रेखाटला होता.. गेला कुठे???

अचानक खिडकीवर सणकन् काहीतरी आदळल्याचा आवाज आला. एक कावळा उडत येऊन काचेवर धडकला होता.

त्याने खिडकीबाहेर नजर टाकली. समोर तोच डोंगर! जो त्याने लहानपणी जाळला होता. कोणाचाही त्यावर विश्वास नव्हता.

बघताबघता त्या डोंगराने पेट घेतला. तो घाबरला. पण काय होतेय हे त्याच्या लक्षात आले.

कल्पनाशक्तीचा आविष्कार!

त्याने मायबोली उघडले. माझे लेखन.
घाईघाईतच "तो" धागा उघडला.
संपादनावर टिचकी मारली..
आणि...
आणि
खेळ खल्लास!

*तुमची संपादनाची मुदत उलटून गेली आहे!*

त्याने पुन्हा एकदा पेटलेल्या डोंगराकडे पाहिले, लॅपटॉप उचलला आणि अ‍ॅडमिनकडे धाव घेतली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समजायला सोपीच होती>> कठीण होती म्हटलं असतं तर काही बिघडलं असतं का?
तेवढंच जीवाला समाधान मिळालं असतं. एका झटक्यात श श क समजली म्हणून..
निर्मल आनंद के लिये ही सही

ते मी उपरोधाने सोप्पी लिहिले होते...
खरा मनातला प्रतिसाद हा होता..

जियो किल्ली... एवढी अवघड शशक एकही हिंट न मागता समजली..
@ संयोजक.. एक बक्षीस अश्या वाचकांसाठी सुद्धा हवे.

छान कथा ..!

मिम्सच्या धाग्यावरचे बोकलत ह्यांनी तुमच्या जाळलेल्या डोंगराच्या धाग्यावरचे मिम्स मला खूप आवडले ..

हेअरस्टाईल एकदम भारी आहे DP मधली ...

कविन तुमचा प्रतिसाद मिसला मगाशी Proud तुम्हाला सुद्धा धाव घ्यावी लागेल रस्त्यावर Proud>> Lol हो हो असच करावं लागेल

रूपाली धन्यवाद.. मलाही त्या मींम मधील फोटो निवड फार आवडली होती ..
आणि लांब केस तर आता पहिले प्रेम झाले आहे.. त्यावर तर वेगळा धागा लेख जरूर लिहेन Happy

धन्यवाद कुमार सर..

नवीन प्रतिसाद कधी आला कळलेच नाही.
अन्यथा कधीच धन्यवाद बोलून धागा वर काढला असता Happy