मायबोली गणेशोत्सव २०२४ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे देवघर.
देवघर किंवा देव्हारा ही प्रत्येकाच्या घरातील पवित्र जागा. घर लहान असो वा मोठे, त्यात एक जागा भगवंतासाठी असतेच. मनाला प्रसन्नता आणि शांती देणारी घरातील स्फूर्तीदायी जागा.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
सुप्रभात
सुप्रभात
गणपती बाप्पा मोरया
जय श्रीराम
.देव्हाऱ्यातले देव... वरच्या फोटो चा close up
वाह सुंदर देवघर. प्रसन्न
वाह सुंदर देवघर. प्रसन्न वाटलं
प्राजक्त पूजा मस्तच.
जय जिनेंद्र,
जय जिनेंद्र,
आमच्या देवघरातील फोटो. मोठी (मागे असलेली) मूर्ती हि पार्श्वनाथ भगवंताची सुमारे १००० वर्ष जुनी मूर्ती आहे. आमच्या पुणे येथील राहत्या घराजवळ नवे जैन मंदिर तयार होताना त्यातील मुलनायक (मुख्य मूर्ती) म्हणून या मूर्तीची प्रतिष्ठापना होण्यापूर्वी काही दिवस हि मूर्ती आमच्या घरातील देवघरामध्ये (चैत्यालय) ठेवली होती. आम्ही खूप भाग्यवान आहोत कि मूर्ती आम्हाला आमच्या चैत्यालयात ठेवायला मिळाली.
जय जिनेंद्र,
.....
किल्ली देव्हारा सुंदर.
किल्ली देव्हारा सुंदर.
मध्यलोक खरंच भाग्यवान... प्रसन्न मूर्ती!
मध्यलोक,
मध्यलोक,
सुंदर मूर्ती. छातीवर श्रीवत्स चिन्ह आहे बहुतेक.
मध्यलोक खरंच भाग्यवान... प्रसन्न मूर्ती!>>>+१
माझा देव आणि माझं देवघर….
माझा देव आणि माझं देवघर….
आहा!
आहा!
अतरंगी.. अनुमोदन... मस्तच ...
अतरंगी.. अनुमोदन... मस्तच ...
किल्ली सुरेख देव्हारा.
किल्ली सुरेख देव्हारा. ज्ञानेश्वर माऊली पहिलं लक्ष वेधून घेतायेत, सुरेख फोटो. प्राजक्त आरास आहाहा.
मध्यलोक भाग्यवान आहात. सुरेख मुर्ती.
अतरंगी आहाहा, छत्रपती शिवाजी महाराज की जय.
घरातले देवघर. साधेसुधे.
घरातले देवघर. साधेसुधे.
शूऽऽऽऽऽऽ देवबाप्पाला डुलकी लागलेय
वाह, हे साधे, काहीही. रॉयल
वाह, हे साधे, काहीही. रॉयल एकदम. देवाच्या झोपेची काळजी घेता, मस्त. मी देवाला सांगत असते, तू जागा रहा आमच्यासाठी.
किल्ली हळद कुंकवाची लक्ष्मीची
किल्ली हळद कुंकवाची लक्ष्मीची पावले किती सुरेख आहेत गं. फार फार आवडली. तिथे रमाची पावले उमटव
.. देवाच्या झोपेची काळजी घेता
.. देवाच्या झोपेची काळजी घेता, मस्त.…
हो. देवाला “छोटा बेबी”च समजतो मी.
He is powerful, awe inspiring. …. until you think of him as your own child.
Then?
Then he is your Everything !
सगळ्यांचे धन्यवाद.
सगळ्यांचे धन्यवाद.
किल्ली - सुरेख
छन्दिफन्दि - जय शिवराय
अनिंद्य - बाप्पाची डुलकी झाली का
>>>>He is powerful, awe
>>>>He is powerful, awe inspiring. …. until you think of him as your own child.
Then?
Then he is your Everything !
काय सुंदर सेन्टिमेन्टस आहेत अनिंद्य. _/\_
@मध्यलोक,
@मध्यलोक,
तुमच्या घरात मुमुक्षु दीक्षा झालीय का इतक्यात ? मी तसे हाताचे छाप नेहेमी दीक्षार्थींचे बघितलेत आधी म्हणून कुतुहल.
भोचक प्रश्न वाटल्यास इग्नोर करा.
@ अन्जू , सामो, आभार.
He is powerful, awe inspiring
He is powerful, awe inspiring. …. until you think of him as your own child.
Then?
Then he is your Everything !>>> आवडलं
किल्ली,सुरेख देव्हारा!
किल्ली,सुरेख देव्हारा!
मध्यलोक,भारीच की.चैत्यालय शब्द नव्याने कळला.
ऋतुराज, श्रीवत्स म्हणजे शंख का?
अनिंद्य,देव जागे झाले की परत फोटो टाका.
अनिंद्य मस्तच.
अनिंद्य मस्तच.
देवकीने लिहिलं तसं देवाचे जागेपणी फोटो शेअर करा.
ऑन डिमांड देवबाप्पाचा फोटू :
ऑन डिमांड देवबाप्पाचा फोटू :
अवघे १२८ वर्षे वयोमान असलेला आमचा गणपती. कालपरत्वे चंदन-कुंकुमादि उपचारांमुळे मूर्तीचा मूळचा काळाशार रंग आता पार बदललाय.
बड्डे सेलेब्रेशनसाठी देव्हाऱ्यातून गम्पू बाप्पा बाहेर आला तेव्हा हा फोटो काढला. For posterity.
गम्पूबाप्पाचा आजवर काढलेला हा एकमेव फोटो !
देव्हाऱ्यातले अन्य सर्व विग्रह जुनेच आहेत, यंगेस्ट सुद्धा किमान तिशीचा असेल. ते देव लाजरे हैत, फोटोला येतील असे नाही वाटत
वाह वा गणपतीबाप्पा मोरया,
वाह वा गणपतीबाप्पा मोरया, तुमच्या देव्हाऱ्यातला हा देव तरी पावला आम्हाला आणि दर्शन दिलं. १२८ वर्षांची मूर्ती सुरेखच.
बाकी लिहिलंय खुसखुशीत, लाजणाऱ्या देवांना नमस्कार कळवा.
खूप छान देवबाप्पा आणि घर
खूप छान देवबाप्पा आणि घर अनिन्द्य
मध्यलोक खरंच भाग्यवान... प्रसन्न मूर्ती! +११
जय शिवराय!!
(No subject)
सर्व देव्हारे सुंदर.
सर्व देव्हारे सुंदर.
मस्त आहेत सर्व देव्हारे...
मस्त आहेत सर्व देव्हारे...
इथे मला आमच्या कोकणातल्या घरातील देवघर आणि देव्हारा दाखवायचा मोह होतोय पण जालावर नको प्रताधिकार मुक्त व्हायला ते देवघर स्वतःला आवर घालते आहे. असो.
सर्व देवघर मस्त
सर्व देवघर मस्त
श्रीवत्स म्हणजे शंख का?>>>> नाही
श्रीवत्स हे श्री म्हणजे लक्ष्मी, समृद्धीशी निगडित आहे
शक्यतो विष्णु तसेच तीर्थंकरांच्या छातीवर त्याचे अंकन असते
ऋतुराज: छातीवर श्रीवत्स चिन्ह
ऋतुराज: छातीवर श्रीवत्स चिन्ह आहे बहुतेक >> हो, जैन तीर्थांकरांच्या मूर्तीवर श्रीवत्स चिन्ह असते
अनिंद्य: तुमच्या घरात मुमुक्षु दीक्षा झालीय का इतक्यात ? मी तसे हाताचे छाप नेहेमी दीक्षार्थींचे बघितलेत आधी म्हणून कुतुहल. भोचक प्रश्न वाटल्यास इग्नोर करा. >>> नाही, मुमुक्षु दीक्षा नाही झाली, मुमुक्षु हा जैन धर्मातील एक पंथ आहे (दिगंबर आणि श्वेतांबर हे दोन मुख प्रकार), पण आमच्या घरात माझ्या सौ च्या आजीने दीक्षा घेतली होती, आर्यिका श्री अरुपश्री माताजी. हे हाताचे ठसे घरात चैत्यालय बांधले तेव्हा केलेल्या पूजेच्या वेळचे आहेत.
आणि हा बिल्कुल भोचक प्रश्न नाही. कुतूहल म्हणा हवे तर. हैप्पी टू आंसर
देवकी: चैत्यालय शब्द नव्याने कळला >>> चैत्यालय/ घर देरासार हि एक जैन संकल्पना आहे. घरात जिथे मूर्ती ठेवली असते त्या जागेला चैत्यालय/घर देरासार म्हणतात. खाजगी दर्शनासाठी किंवा आता घरातील जैष्ठ/वयस्कर व्यक्तीसाठी घरात असणारे छोटे मंदिर असेही काही अंशी म्हणू शकता.
जैनीजम मध्ये श्रीवत्स म्हणजे तीर्थांकरांना झालेल्या केवलज्ञानाचे प्रतीक. श्रीवत्स हा सिम्बॉल बौद्ध, हिंदू आणि जैन या तिन्ही परंपरेत आढळतो.
त. टी. : मी जैनीजम एक्स्पर्ट नाहीये, माझ्या स्वाध्यायानुसार मी प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.
आमच्याकडे वंश परंपरेने
आमच्याकडे वंश परंपरेने चैत्यालय आहे. आजोबांकडे, काकांकडे आणि सासरी सुद्धा चैत्यालय आहे. राहत्या घरात आलो तेव्हा एक इतक्यात पंचकल्याणक झालेली मूर्ती आणली आणि अगदी छोटेसे चैत्यालय तयार केले.
पहिले चैत्यालय
पुढे काही महिन्यांनी असे वाटले कि आपल्यासाठी घरात जागा आहे तशी देवासाठी एक विशेष जागा करावी म्हणून विशेष रूम तयार केली आणि त्यात अस्थायी वेदी, चांदोवा सह व्यवस्था केली. मुद्दाम यात कुठेही कळश असेल अशी रचना केली नाही कारण जिथे कळश असतो त्यावर काही बांधकाम नको असे सगळ्यांनी सांगितले होते. या नव्या रुम मध्ये मग हि मूर्ती ठेवली. काही महिन्यात आमच्या घराला अनेक जैन मुनींचे पाय लागले, त्यांची घरात आहार चर्या झाली. आता घरातील चैत्यालयात शास्त्र (जिनवानी, आगम इत्यादी) आहे.
घरातील चैत्यालय
नंतर घरातील मूर्ती आमच्या सोसायटी जवळ निर्माण होणाऱ्या जैन मंदिराला दिली. हे नवे मंदिर वेसरा या द्रविड आणि नागर शैलीच्या मिश्र शैलीतील असणार आहे. संपूर्ण काळ्या पाषाणातून याची निर्मिती सुरु आहे. या निर्माणाधीन मंदिराचे अजून विशेष असे फोटो काढले नाहीत. ते कधी नंतर शेयर करेन.
सध्या सोसायटी मध्ये असलेल्या मंदिरात या तीन मुर्त्या आहेत. आता आमच्या सगळ्यांचे हेच कॉमन देवघर
धन्यवाद मायबोली, गणेशोत्सव संयोजक ज्यांनी हा विषय दिला. अन्यथा याबद्दल लिहिणे झाले नसते.
प्रसन्न मूर्ती आहे मध्यलोक..
प्रसन्न मूर्ती आहे मध्यलोक...तुमच्या आजींना विरागसागर महाराजांनी दीक्षा दिली होती का?
Pages