प्रकाशचित्रांचा झब्बू २ - देवघर

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 09:20

मायबोली गणेशोत्सव २०२४ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे देवघर.

देवघर किंवा देव्हारा ही प्रत्येकाच्या घरातील पवित्र जागा. घर लहान असो वा मोठे, त्यात एक जागा भगवंतासाठी असतेच. मनाला प्रसन्नता आणि शांती देणारी घरातील स्फूर्तीदायी जागा.

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मध्यलोक
फार सुंदर माहिती दिलीत.
हे नवे मंदिर वेसरा या द्रविड आणि नागर शैलीच्या मिश्र शैलीतील असणार आहे. संपूर्ण काळ्या पाषाणातून याची निर्मिती सुरु आहे. या निर्माणाधीन मंदिराचे अजून विशेष असे फोटो काढले नाहीत. ते कधी नंतर शेयर करेन.>>>>>>> नक्की करा.

@अतरंगी,
एक नंबर
छत्रपती शिवाजी महाराज की जय _/\_
@अनिंद्य,
बाप्पाची मूर्ती फार सुरेख आहे.
@लवंगी मिरची,
देवघर सुंदर आणि बाजूच्या दोन मांडण्या देखील सुंदर आहेत.
प्रसन्न वाटले.

मोक्षु: तुमच्या आजींना विरागसागर महाराजांनी दीक्षा दिली होती का? >>> नाही, गुणनंदी महाराजांनी.
(अवांतर माहितीसाठी ०४ जुलै २०२४ ला विरागसागर जी महाराजांचे जालन्यात निर्वाण झाले. फार ज्ञानी आणि प्रेमळ व्यक्तिमत्व.)

ऋतुराज. थँक्यू

थोडे अवांतर :

अनेक जिवलग कौटुंबिक मित्र जैन धर्माचे पालन करणारे असल्याने पंचकल्याणक, नवकार, पर्यूषण, पारणा, अनुमोदना बारंबार, माथेन् वंदामी, स्वामीवत्सल, दीक्षा, गोचरी, वैरागी- वितराग हे शब्द लहानपणापासून परिचित आहेत. गावात छोटे देरासर होते.

राजगीर, सम्मेदशिखर, रणकपूर, पालीताणा, मुक्तागिरी भेटी घडल्या आहेत. इंदोरला फेमस काचमंदिरात आत जातांना सेवादाराने हटकले - क्या आप जैन हैं ? तेंव्हा णमो अरिहंताणं… णमो सिद्धाणंम.. णमो सव्वसाहुणं असे धाडघाड कॉन्फीडंटली म्हटले की ज्याचे नाव ते. माझ्यासारख्या (तेव्हां) तिशीतल्या घोड्याला ‘तेजस्वी बालक’ म्हणाला नंतर तो Lol

@ मध्यलोक,

तुमचे सदस्यनाम मी साधारण २ वर्षांपूर्वी पहिल्यांदा बघितले तेव्हांच ते किती thoughtfully ठरवले आहे असा विचार केला होता. Very impressed.

‘मद्यलोक’ वरुन आज सांगावेसे वाटले.

परदेशी असताना तिथले देवघर

ऍमेझॉनच्या बॉक्सचा बेस, बॉक्स मधील थर्माकॉल शीट्सचा पुनर्वापर करून हे मंदिर तयार केले होते. रिफ्युज, रिड्यूस, रियुज आणि रिसायकल तत्वांचा विचार करून बायकोने हे बनवले. तिथे असताना शेवटपर्यंत हेच मंदिर वापरले. आता मित्राला हस्तांतर केले. इथेही देवघराला शिखर/कळस केला नाही कारण कळस असेल तर त्यावर काहीही नसायला हवे पण बहू मजली इमारती मध्ये हे शक्य नसते मग कळस नसलेले देवघर वापरले.
MB Ganesh Deoghar - 005.jpg

फार सुंदर वाटतायत सर्वांची देवघरे. मध्यलोक, रिसायकल देवघर छान बनलंय.
(काचमंदिर किश्यावरून (शब्द चुकवला, गुगल लिहू देत नाहीये) एक शंका: म्हणजे जैन मंदिरात नॉन जैन ना प्रवेश नसतो का?मुलुंड च्या पार्श्वनाथ मंदिरात गेलेय मी एकदा.कोणी अडवले नाही.)

.. नॉन जैन ना प्रवेश नसतो का?

मध्यलोक सांगतील. पण इंदोर सोडून बाकी सर्व जैन धर्मातली पवित्रतम आणि लोकप्रीय तीर्थस्थाने आहेत. मला तरी कुणीही अडवले नाही.

जैन तत्वज्ञान/धार्मिक साहित्य थोडेफार वाचलेले आहे. सात्विक आणि सुंदर वाटले होते. मंदिरात शांत वाटतं. महावीर यांची पद्मासनात बसलेली मूर्ति फार प्रसन्न असते.

डोंबिवलीत काही ठिकाणी देरासरमध्ये जाऊ देतात, मी गेले आहे, कुठल्या पंथाचे ते नाही सांगता येणार, हा एक श्वेतांबर होतं. दुसरं अगदी जवळ आहे, आमच्या गल्लीत (इथे एकजण ओळखीच्या घेऊन गेलेल्या) . आमच्या मदतनीस ताई ठाकुर्लीला गेलेल्या, तिथे त्यांनी नमस्कार वगैरे केला, तेव्हा कोणीतरी बडबड्त आलं की तुम्हाला आत कोणी सोडलं, इथे सर्वांना अलाऊड नाहीये. तिथे खूप ध्यानस्थ मुर्ती होत्या, त्यांना आवडलं तिथे पण बसू दिलं नव्हतं. मे बी वॉचमन नसेल जाग्यावर अडवायला, त्यांनाही माहीती नव्हतं, त्या गेल्या आत.

माहेरच्या घराजवळ तेरापंथी देरासर आहे, जाऊ देतात की नाही माहीती नाही.

वरचे सर्व देव्हारे आणि देव सुरेख.

जैन मंदिरात जैनेतर लोकांना जाऊच देत नाही असे काही नाही...इंदौरच्या काच मंदिरात जास्त नियम आहेत...तिथे फोटो वगैरे काढलेले चालत नाही...आम्ही जैन असून सुद्धा वरच्या मजल्यावरच्या मंदिरचे दर्शन करण्यासाठी त्यांना खूप मानवावे लागले...तेव्हा कुठे दर्शन झाले...अर्थात हे सगळे सुरक्षेच्या दृष्टीने आहे..बाकी काही हेतू नसतो...

अनिंद्य.. या धाग्यावरचा तुमचा एकही फोटो दिसत नाहीये आता. पुन्हा बघायला मिळतील का? तुम्ही काढलेल्या देवघर धाग्यावर बंद देवघर टाकले आहे. त्यामुळे उत्सुकता अजूनच वाढली आहे. प्लीज?

Pages