अंत: अस्ति प्रारंभ: - १ - एकजूट - गोल्डफिश

Submitted by गोल्डफिश on 7 September, 2024 - 10:19

डोंगराच्या पायथ्याशी तिला हालचाल जाणवली. तिने धोका ओळखून इतरांना बोलावले. घाबरतच सगळे जमा झाले.

त्यांना धीर देण्यासाठी ती बोलली. "ते चोर इथे पोचतील पण घाबरून जाऊ नका. दर वेळेला आपल्या घरांवर ते हल्ला करून आपली संपत्ती घेऊन जातात. पण या वेळी आपण त्यांना हल्ला करायला वेळच द्यायचा नाही".

पोचल्यावर चोरांतील एकाने मशाल पेटवायला घेतली तेवढ्यात लपून बसलेला एक गट एकजुटीने त्यांच्यावर तुटून पडला. त्यांना सुरक्षाकवच घालायला सुद्धा वेळ दिला नाही. ते चोर जोरजोरात आक्रोश करू लागले आणि सैरावैरा धावू लागले.

अजूनही पायथ्याशी असलेल्या एकाने हातातली मधासाठी आणलेली बादली तिथेच टाकली आणि उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजूनही पायथ्याशी असलेल्या एकाने हातातली मधासाठी आणलेली बादली तिथेच टाकली आणि उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली.">>> Happy Happy Happy :स्मित

मस्त!