मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती २

Submitted by आबा. on 3 March, 2020 - 12:12

अगोदरच्या धाग्याने २००० प्रतिसादांची मर्यादा ओलंडली आहे. तरी तुम्हाला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

अगोदरचे धागे

https://www.maayboli.com/node/2738

https://www.maayboli.com/node/51027

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे देवा! भयंकर जाहिरात आहे!
तोंड झाकून म्हणजे 'घूंघट' घातलेला पाहिला आहे मूर्तीला, असा अतिरेक्यांसारखा रुमाल बांधलेला प्रथमच पाहिला मी. आणि 'बायका कामं करतात तर त्यांनाच आणू दे गणपती' हे भलतंच लॉजिक! म्हणजे तेही काम त्यांच्याच गळ्यात मारू - असं झालं! 'यंदा मी मोदक वळायला बसतो, तुम्ही गणपती आणा' असं कुठे म्हणाला नाही तो ग्लूकोजवाला चोर! Proud

असा अतिरेक्यांसारखा रुमाल बांधलेला प्रथमच पाहिला मी.
>> आईंग? आम्ही लहानपणापासून असाच रुमाल बांधतो आणि आजूबाजूला सगळ्यांनी असेच बांधताना पाहिले आहे.

बाकी 'बायका कामं करतात तर त्यांनाच आणू दे गणपती' हे भलतंच लॉजिक! म्हणजे तेही काम त्यांच्याच गळ्यात मारू - असं झालं! 'यंदा मी मोदक वळायला बसतो, तुम्ही गणपती आणा' असं कुठे म्हणाला नाही तो ग्लूकोजवाला चोर!
याच्याशी १००% सहमत !!

हो का, मग सॉरी - प्लीज ती उपमा इग्नोअर करा. मी प्रथमच पाहिलं असं मूर्तीचं तोंड बांधलेलं. Happy

सगळ्या बायका कामं करतायेत मग पुरुष काय करतायत ??
हा बिस्कीटं खात बसलायं , ते आजोबा झोपाळ्यावर झुलतायेत .

ती मुलगी केया आहे का ??

माझ्या माहेरी गेली 5-6 वर्षे मीच गणपती घरी आणते आणि मीच विसर्जनासाठी नेते.

माझ्या माहेरी गेली 5-6 वर्षे मीच गणपती घरी आणते आणि मीच विसर्जनासाठी नेते.>>>>>> चांगली गोष्ट आहे.

सगळ्या बायका कामं करतायेत मग पुरुष काय करतायत ??
हा बिस्कीटं खात बसलायं , ते आजोबा झोपाळ्यावर झुलतायेत .>>>>>>>>> हाहा.. त्याचं बिस्किटं खाणं तर एवढं फनी वाटतंय मला. करमचंद जसं कोणत्याही सिचुएशनला गाजर खात असायचा.

पार्ले ऍड आत्ता बघितली, मला एक समजलं नाही, तो हिरो बिस्कीट पुडा घेऊन जातो मूर्ती आणायला ते समजा समजून घेतलं, तरी तो बिस्कीट खात का असतो तिथे, बंद पुडा ठेवायचा ना हातात ऍड करत.

माहेरी झाकून नाही आणत मूर्ती. सासरी जे मदतनीस असतात त्यांचा मान असतो, ते आणतात. माहेरचे गणपतीबाप्पा कोकणात होते तेव्हा, मदतनीसच आणायचे. मग त्यांना विडा दक्षिणा द्यायची असते, तेव्हा झाकून आणतात का नाही ते आठवत नाहीये, एक दोनदाच गेलेय कोकणात गणपतीसाठी.

ही ॲड बेसिकातच चूकलीय. मुळात गणपती बाप्पाला आणायची इच्छा त्या छोट्या मुलीची आहे आणि ती एवढी छोटी आहे की तिला मूर्ती नीटशी सांभाळता येणार नाही. मग त्या मुलाने आणली काय किंवा तिच्या आईने आणली काय. बऱ्याचदा लहान मुलांच्या उत्सुकतेला हाताळायला उंदिरमामा सेपरेट ठेवून त्यांना आणू देतात मूर्तीकार.

जरा लेट टीन्समधली मुलगी हा प्रश्न विचारती व तिला स्वतःला आणता आल्याचं दाखवलं असतं तर गोष्ट वेगळी.
बाकी कुणीही आणा पण बिस्कीट (किंवा इतर काही) खात आणू नका.

आता कुणीतरी रिव्हर्स फेमिनिझम करून गौरी माहेरवाशिण मुलींनीच का आणायच्या, लग्न झालेले बाप्ये पण गौरीची आरास करतात तर त्यांना आणू द्या अशी ॲड करा.

विडा, दक्षिणा मूर्तीकाराकडे ठेवतात.

जाहिरात फार लांब आणि मोठी आहे.
बाकी ते तोंड बांधून गणपती: हल्ली मूर्ती विकणारेच पांढरा रुमाल तसा बांधून त्यावर डिलिव्हरी चं नाव लिहून विकतायत(काल आम्ही मूर्ती घ्यायला गेलो तर त्याने आधी कबूल आणि पावती किंमतीच्या 20 रु जास्त मागितले. त्याला म्हटलं का, तर म्हणे रुमालाचे.आम्ही 2 रेशमी वस्त्र घरातून घेऊन जातो, एक मूर्ती खाली आणि एक मूर्ती झाकायला.त्याला म्हटलं रुमाल ठेव तुझ्याकडे, आमच्याकडे घरी तसे बिनकामाचे 2 पडलेत पांढरे.तेही सिंथेटिक कापड.त्याचा धड रुमाल म्हणून वापर नाही धड पोछा म्हणून(हे मनात म्हटलं).मग त्याने रिसीट किमतीत दिला)

लहानपणी मी जितके पाहिले तितके लोक नॉर्मल प्रकारे तोंड न झाकता गणपती आणायचे, नॉर्मल मखराच्या जागी ठेवायचे आणि पूजेच्या वेळी थोडा मागे सरकवून प्राणप्रतिष्ठा करायचे.

गणपती आणण्याचा इतक्या नानाविध रीती आहेत की नवल वाटते
प्रत्येकाची अशी म्हणून काहीतरी वेगळी पद्धत असते आणि शास्त्र असतं ते
काहीजण आदले दिवशी आणतात, त्यात काही जण तोंड रुमालाने झाकून आणतात ला तर म्हणे हरतालिका चे तोंड बघायचे नसते
काही जण समोर तोंड करून, काहीजण आपल्याकडे तोंड करून, काही जण डोक्यावर मिरवत तर काही जण बाईकवर लहान मुलाला कडेवर घेऊन बसतात तसे आणतात Happy
विसर्जन करण्याचाही नाना तर्हा

हो खरे आहे. यापूर्वीही विविध प्रकारे गणपती आणताना पाहिले असावेत - पण सहसा झाकूनच आणलेले पाहिलेत. तेव्हाही कधीकधी जाणवले होते. पुण्यात अनेक ठिकाणी तुम्ही मुर्ती बुक केली की तिच्या सोंडेत चिठ्ठी ठेवत आपल्या नावाची. अजूनही करत असतील तसे. पुण्यात मांडवातील मोठी मुर्ती विसर्जन करत नाहीत तेव्हा ती परत नेताना सुद्धा झाकून नेतात.

गणपती-गौरी ह्या सणात प्रचंड व्हरायटी आहे. दीड दिवस ते दहा दिवस गणपती. गौरी खड्यांच्या, मुखवटे, उभ्या गौरी, मूर्ती असे प्रकार. घावन-घाटले, पुरणपोळी ते सामिष अशी नैवेद्यात व्हरायटी. 'आमच्याकडे' हा फंडा ह्या सणात जेवढा आहे, तेवढा बाकी सणात नाही. दसरा, दिवाळी, संक्रांत, पाडवा सगळ्यांकडे बऱ्यापैकी सारखा असतो.

मुंबईत मोठ्या मूर्तींचं विसर्जन होतं. त्यामुळे ही मूर्ती परत आणायची आयडिया पुण्यात आल्यावर कळली. पण पर्यावरण पूरक कल्पना आहे. त्यामुळे आवडली.

'यंदा मी मोदक वळायला बसतो, तुम्ही गणपती आणा' असं कुठे म्हणाला नाही तो ग्लूकोजवाला चोर! >>> Proud

काहीही जाहिरात आहे ती. आणि किती मोठी आहे!

अपोलो टायरच्या सचिन तेंडुलकरवाल्या जाहिरातीचे जिंगल डोक्यात जाते . ऑफिसमध्ये झी बिझनेस लावलेला असतो तेव्हा प्रत्येक ब्रेक ला येतेच येते अशी तिडीक जाते ताबडतोब MUTE करते पण मग UNMUTE करायला विसरल्यावर जेव्हा टीव्ही कडे वागते तर ती पुन्हा चालू झालेली असते .
सेम विथ पतंजली च्या फिनाईलच्या जाहिरातीसाठी . अनोयिंग आहे अक्षरशः

व्हील पावडरची ही जाहिरात. संपूर्ण जाहिरातीचा व्हिडियो मिळाला नाही. टीव्हीवर दिसणारी जाहिरात बरीच मोठी आहे.

आधी त्या नवराबायकोला मेकपने किंवा डिजिटली अधिक वाईट दाखवलंय हे खटकायचं.हा सगळा सीन कौलारू घराबाहेर चाललाय. अंगणात दिसेल तिथे दोर्‍यांवर कपडे सुकताहेत. आताही ती प्लास्टिकच्या एका टोपल्यात धुतलेले कपडेच घेऊन आली आहे. नवरा कामावरून आलाय, कपडे मळलेत. बायकोचा वाढदिवस आहे म्हणून तिच्यासाठी लाल गुलाब घेऊन आलाय. फूल मिळताच ती खुष होते आणि नवर्‍याला मिठी मारू पाहते. पण नवरा तिला थांबवत म्हणतो, कपड्यांना (कु) वास येतो आहे. आता काय करायचं? तिथे बाजुलाच टेबलावर चार पाच शर्ट घडी करून ठेवलेत. त्यातला पांढराशुभ्र शर्ट ती नवर्‍याला देते. नवरा म्हणतो, धुवून इतके दिवस झाले तरी छान वास येतोय. मग तो शर्ट बदलतो आणि बायकोला मिठीत घेतो. वास त्याच्या कपड्यांनाच येत होता, अंगाला नाही, त्यामुळे अंघोळ करायची गरज नव्हती. आणि व्हील साबणाने अंघोळ कशी करता येईल?
तर तीन दिवसांपूर्वी धुतलेला शर्ट अजून अंगणात टेबलावर काय करतोय? घरात कपाट नाही का? आणि जर त्या शर्टला छान वास येतोय तर आज घालून गेलेल्या शर्टला का येत नाही?
बायको कोणाचे इतके सगळे कपडे धुते ?
याच्याच मागेपुढे कम्फर्टची जाहिरात येते. पावसाळ्यात कपडे न सुकल्याने त्यांना कुबट वास येतो म्हणून कम्फर्ट वापरा. व्हीलवाल्यांकडे पाऊस कसा नाही?

भरत Lol

"पुढच्या वेळेस बुके हवा" - कसला दरडावून सांगतोय तो आवाज.

माझे मन, विडा दक्षिणा मूर्तीकारांकडे मदतनीसाकरवी पाठवतात (ज्यांना तिथे गडी रूढ शब्द आहे, मी वापरत नाही, मी मदतनीस म्हणते) आणि मदतनीस जे गणपतीबाप्पा आमच्या घरी आणतात, त्यांनाही विडा दक्षिणा द्यायची पद्धत आहे आमच्याकडे कोकणात.

इथे आता डोंबिवलीत माहेरच्या गणपतीबाप्पा वेळी भावाबरोबर आणायला जाते, तेव्हा विडा दक्षिणा मूर्तीकारांना डायरेक्ट देते.

तीन दिवसांपूर्वी धुतलेला शर्ट अजून अंगणात टेबलावर काय करतोय? घरात कपाट नाही का? आणि जर त्या शर्टला छान वास येतोय तर आज घालून गेलेल्या शर्टला का येत नाही?>>> Lol भरत.. काय टोला हाणलाय

कुणाल रॉय कपूर आणि वरुण शर्माची ब्रिटानियाची वर्ल्ड कप विन सेलिब्रेशन जाहिरात बघताना कुणालला हार्ट अ‍ॅटॅक येईल अशी भीती वाटून माझंच बीपी वाढू लागतं.

भरत Lol

Pages