Submitted by आबा. on 3 March, 2020 - 12:12
अगोदरच्या धाग्याने २००० प्रतिसादांची मर्यादा ओलंडली आहे. तरी तुम्हाला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
अगोदरचे धागे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक शंका. फटाके फोडणे, उडवणे
एक शंका. फटाके फोडणे, उडवणे हे धार्मिक कृत्य आहे का? ते करताना देवाचं स्मरण, प्रार्थना, मंत्र म्हणणे असे काही करतात का? त्याची काही फलश्रुती आहे का?
Submitted by भरत. on 19 October, 2022 - 13:24
मुळीच नाही, मुळात फटक्यांना हिंदू धर्मात कोठेही स्थान नाही. पण ही गोष्ट आमच्या धर्मगुरूंनी, आमच्या आध्यात्मिक संघटनांनी सांगितलेली चालेल. 'परक्यांनी', हमद्या, मुकडी, दानव ने सांगितलेली नाही चालणार. त्यांनी आपले 'थोबाड' बंद ठेवावे, हे उत्तम!!!
https://www.sanatan.org/mr/a/768.html (खरेतर सनातन संस्था याही आधीपासून 'फटाके नको' अशी भूमिका मांडत आहे, पण सध्या २०१२ सालचा पुरावा मिळाला आहे, अजून जुना पुरावा मिळाला की नक्की देईन!)
अवांतर - त्या HP च्या जाहिराती इतक्या आवडल्या आहेत की माझा पुढील laptop हा HP चाच असेल, प्रिंटर घेताना सुद्धा HP चाच घेईन आणि इतरांना सुद्धा HP च सुचवेन!
Ceat tyres मात्र ऑफर असली तरीही घेणार नाही.
सनातन संस्था _/|\_
सनातन संस्था _/|\_
ते इतकी वर्षे सांगूनही तुम्ही लोक ऐकत नाही. उलट कोणी फटाके नको असं म्हटलं की आम्ही फटाके लावणारच असं सांगता. न्यायालयाचे आदेशही पाळत नाही. म्हणजे देशाचं संविधानही मानत नाही.
मलातरकैकळतचनै.
असो.
बॉलिवूड म्हणणार त्याच्या
बॉलिवूड म्हणणार त्याच्या विरुद्ध आचरण करणे हेच आमच्या जीवनाचे उद्दिष्ट.... बाकी गेले उडत...
ते इतकी वर्षे सांगूनही तुम्ही
ते इतकी वर्षे सांगूनही तुम्ही लोक ऐकत नाही....
For ur kind info:
मी स्वतः वयाच्या १२ व्या वर्षापासून फटाके उडवणे बंद केले आहे. सनातनचे बालसाधक फटाके उडवत नाहीत. सनातनच्या कोणत्याही फेरीत, नामदिंडीत आजतागायत कधी फटाके वाजवले गेले नाहीत, आणि यापुढेही वाजवले जाणार नाहीत. सनातनने आयोजित केलेला कोणताही कार्यक्रम रात्री १० नंतर सुरु राहत नाही.
हा, पण उद्या जर तो 'हमद्या' कधी माझ्यासमोर आला तर मात्र ' मी तुम्हाला जुमानत नाही, जे करायचं आहे ते कर' (फारच सभ्य शब्द!) या आविर्भावात एक टिकली नक्की फोडेन किंवा एक फुलबाजा नक्की लावेन!!!
जसे की मी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या दिवशी 'ठरवून' एकतरी वाक्य खोटे बोलतो, किमान एकतरी झुरळ मारून 'हिंसा' करतो आणि द्राक्षासव काचेच्या ग्लासात घेऊन 'चिअर्स' करून पितो!!!
यावर नवीन धागा काढा लोकहो
यावर नवीन धागा काढा लोकहो
आणि फटाक्यांवर आधीच एक धागा आहे.
विक्षिप्त मुलगा तुमचा स्टॅंड ईंटरेस्टींग आहे
पण जे तुम्ही २ ऑक्टोबरला मुद्दाम करता ते उर्वरीत वर्षभर करत नसाल तर तुम्ही ग्रेट आहात.. चीअर्स !
सिमेंट टायर्सच्या जाहिरातीत
सिमेंट टायर्सच्या जाहिरातीत अमीर खान म्हणाला, फटाके फोडायचे ते सोसायटीच्या आवारात. रस्त्यावर नाही. मग मोडला पापड.//
पण ते बरोबर आहे. दिवाळीचे फटाके सोसायटीच्या आवारातच फोडावे. रस्त्यावर उतरून करायला तो काही नमाज नाही.
असो. एचपीची एक जाहिरात बघितली ज्यूस सेंटरवाली. छानच आहे.
AU finance मध्ये साठीचा आमिर खान तरुण मुलीचा नवरा बनून सजलाय ते शोभत नाही. ती काय जरठ कुमारी विवाहाची ऍड आहे काय? तरुण, लोकप्रिय नट चालला असता.
एज इज जस्ट अ नंबर...
एज इज जस्ट अ नंबर...
तरुण, लोकप्रिय नट चालला असता.
तरुण, लोकप्रिय नट चालला असता.
>>>
पण त्या तरुण लोकप्रिय नटाने ती जाहीरात करायची हिंमत दाखवली असती का?
(चिर)तरुण, लोकप्रिय नट म्हणजे
(चिर)तरुण, लोकप्रिय नट म्हणजे फक्त शाहरुकच की.
अगदीच अपेक्षित ठोकळेबाज
अगदीच अपेक्षित ठोकळेबाज प्रतिसाद.
रस्त्यावर नमाज प्रशासनाच्या परवानगीने पढतात. जसं प्रशासनाच्या परवानगीने रस्त्यावर गणेशोत्सव, नवरात्रीचे मंडप बसतात, तसंच.
गुरगावमधले लोक तर पार्कमध्ये प्रशासनाच्या परवानगीने, रादर प्रशासनाने ठरवून दिले ल्या जागेत आणि वेळेत नमाज पढायचे. तरीही काही लोकांनी त्रास करून घेतलाच.
विक्षिप्त मुलगा म्हणतात, मी फटाके फोडत नाही, तसं अमीरही म्हणू शकेल, मी रस्त्यावर नमाज पढत नाही.
विक्षिप्त मुलगा, तुम्ही लोक
विक्षिप्त मुलगा, तुम्ही लोक म्हणजे फक्त सनातनवाले का? मग आवाजाचे फटाके तेही रात्री दहानंतर लावणारे लोक हिंदू नाहीत का?
बाकी तुमचा २ ऑक्टोबरचा कार्यक्रम वाचून तुमच्याबद्दल करुणा वाटली. एखाद्याचा द्वेष करणे ही मानसिक हिंसाच. ती वर्षाचे ३६५ दिवस करता हे दिसतंय. त्यामुळे त्या दिवशी फक्त दिवस साजरा करण्यासाठी म्हणून झुरळ मारत असाल्, तर नाही मारलं तरी चालेल..
विक्षिप्त मुलगा, तुम्ही लोक
विक्षिप्त मुलगा, तुम्ही लोक म्हणजे फक्त सनातनवाले का? मग आवाजाचे फटाके तेही रात्री दहानंतर लावणारे लोक हिंदू नाहीत का?
असे कोण म्हणाले??? दहानंतर फटाके लावणारे हिंदू आहेत. पण त्यांचे प्रबोधन हे हिंदू करतील, हिंदूंच्या धार्मिक / आध्यात्मिक संघटना करतील.
परधर्मियांनी आमच्या देशात येऊन आम्हांला तत्वज्ञान शिकवायच्या फंदात पडू नये.
गुरगावमधले लोक तर पार्कमध्ये प्रशासनाच्या परवानगीने, रादर प्रशासनाने ठरवून दिले ल्या जागेत आणि वेळेत नमाज पढायचे...
गरजच काय??? आणि जर रस्ता, पार्क अशा ठिकाणीच नमाज पढायचा असेल तर मग मशिदी कशासाठी बांधतात??? (तेही आमची देवळे तोडून)
विक्षिप्त मुलगा पॉईंट आहे
विक्षिप्त मुलगा पॉईंट आहे
सरकारकडून परवानगी घेतली तरी रस्त्यावर आणि सार्वजनिक जागेत धार्मिक प्रार्थना करणे चूकच.
जर फटाके वाजवायला सरकारने कायद्याने बंदी घातली नाही तरी आपण लोकांना त्रास होतोय म्हणून त्याचा विरोध करतोय तोच विरोध ईथेही अपेक्षित. ईथे मात्र सरकारची परवानगी आहे अश्या पळवाट देण्यात काय हशील. हे सोयीने स्टँड बदलणे झाले.
वेगळा धागा काढा रे .. विषय रोचक आहे
{गरजच काय??? आणि जर रस्ता,
{गरजच काय??? आणि जर रस्ता, पार्क अशा ठिकाणीच नमाज पढायचा असेल तर मग मशिदी कशासाठी बांधतात??? (तेही आमची देवळे तोडून)}
गुरगाव मध्ये त्या भागात मशीद नव्हती. म्हणून ते पार्कमध्ये नमाज पढायचे. मशीद बांधायला जागा, परवानगीही देत नव्हते. हे इतर राज्यांतून आलेले मंजूर होते व त्या भागात काम करीत होते. बरं पार्कमध्ये नमाज पडायला विरोध करणारे तिथे स्वतः: पूजाविधी करू लागले.
फटाके उडवणे हे धार्मिक कृत्य आहे का, असं मी विचारलं होतं. त्यावर तुम्ही नाही म्हणालात. मग जर ते. धार्मिक कृत्य नाही, तर धर्मगुरूंनी प्रबोधन करायचा प्रश्नच काय?
दहानंतर फटाक्याबद््दलचा नियम न्यायालयाचा आहे, तोही तुम्हांला मान्य नाही, असे दिसते.
फटाक्यांसंबंधी जे आहेत ते नियम तरी लोक पाळतात का? दहाची मर्यादा, आवाजाची मर्यादा?
हा देश अजूनतरी सर्वधर्मीयांचा आहे; फक्त तुमचा नाही.. तुम्ही ज्यांना बाहेरून आलेले म्हणतात , त्यातल्या बहुस़ख्यांचे पूर्वज इथलेच ,धर्मांतरित झालेले आहेत.
तुमचे पूर्वज आपली माणसेही सांभाळू शकले नाहीत व देवळे ही.
माणसे सांभाळण्यात त्यांना रस नव्हताच, माणसांना जनावरापेक्षा हीन लेखायचे, अजूनही लेखतात. पण तो वेगळा मुद्दा.
--+++
तनिश्कच्या जाहिरातीतील मी
तनिश्कच्या जाहिरातीतील मी फटाके न फोडता दिवाळी साजरी करेन म्हणणारी ही परधर्मीय आहे का? की तनिश्क टाटांची म्हणजे बाहेरून आलेल्या पारशी इसमाची कंपनी, म्हणून त्यांना अधिकार नाही?
तसंच विराट कोहली, अनुष्का शर्मा, जितेंद्र जोशी यांना का क्रोध करता?
इथे एक हिंदुत्ववादी आयडी आहे. भाजपच्या विरोधात बोलणाऱ्या ना तो मुस्लिम घोषित करून टाकतो. मग ममता बॅनर्जी ममता बेगम होते . आणि फक्त नेते नव्हेत, मायबोलीवर लिहिणारे ही.अशाने हिंदू खरंच अल्पसंख्य होतील हं, कारण भाजपला अजूनही फार तर ४० टक्के मतं पडतात.
जर फटाके वाजवायला सरकारने
जर फटाके वाजवायला सरकारने कायद्याने बंदी घातली नाही तरी आपण लोकांना त्रास होतोय म्हणून त्याचा विरोध करतोय तोच विरोध ईथेही अपेक्षित. ईथे मात्र सरकारची परवानगी आहे अश्या पळवाट देण्यात काय हशील. हे सोयीने स्टँड बदलणे झाले. +१
गुरगाव मध्ये त्या भागात मशीद नव्हती. म्हणून ते पार्कमध्ये नमाज पढायचे. मशीद बांधायला जागा, परवानगीही देत नव्हते. हे इतर राज्यांतून आलेले मंजूर होते व त्या भागात काम करीत होते.> मजूर होते म्हणजे काही कालावधीसाठीच होते असणार ना. मग त्यांच्यासाठी पक्की मशीद बांधण्याची परवानगी नाकारली तर चुकले कुठे? उलट ते शहरातल्या दुसरीकडे कुठे असलेल्या मशिदीत जाऊ शकले असते ना.
म्हणजे समजा मी कोणी उसतोड कामगार आहे, उसाच्या हंगामात उसाची शेती होते अशा गावी स्थलांतर केले आणि तिथल्या ग्रामपंचायतीकडे मागणी केली की, 'मी अमुक एका देवाचा / देवीचा भक्त आहे, तर मला मी माझे खोपटे उभारले आहे त्याच्या समोर त्या देवाचे / देवीचे मंदिर बांधायला जागा द्या' तर अशी मागणी मान्य होईल का? अर्थातच नाही. त्याउलट मी जर अल्प कालावधीसाठी दुसऱ्या गावी स्थलांतर केले आहे तर त्या गावात जे कोणते मंदिर असेल तिथे जाऊन मी भक्ती करणे योग्य नाही का?
बरं पार्कमध्ये नमाज पडायला विरोध करणारे तिथे स्वतः: पूजाविधी करू लागले.>> नमाज पठणाला विरोध म्हणून पूजा सुरु केली असेल तर ही 'क्रियेवरील प्रतिक्रिया' आहे हे लक्षात घ्या!
फटाके उडवणे हे धार्मिक कृत्य आहे का, असं मी विचारलं होतं. त्यावर तुम्ही नाही म्हणालात. मग जर ते. धार्मिक कृत्य नाही, तर धर्मगुरूंनी प्रबोधन करायचा प्रश्नच काय?>>> कारण फटाके ही हिंदूंच्या सणात घुसलेली एक विकृती आहे, त्यामुळे धर्मगुरू नक्कीच प्रबोधन करू शकतात. पण पुन्हा, हिंदूंचे धर्मगुरू! इतरांनी आपले 'मुखकमल' बंद ठेवावे!!!
दहानंतर फटाक्याबद््दलचा नियम न्यायालयाचा आहे, तोही तुम्हांला मान्य नाही, असे दिसते.>>> नेमके कोणत्या वाक्यात असे दिसले, जरा सांगाल का?
फटाक्यांसंबंधी जे आहेत ते नियम तरी लोक पाळतात का? दहाची मर्यादा, आवाजाची मर्यादा?>>> काही जण नाही पाळत, त्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी प्रबोधन करावे, नाही ऐकलेच तर पोलिसांनी (निष्पक्ष) कारवाई करावी.
हा देश अजूनतरी सर्वधर्मीयांचा आहे; फक्त तुमचा नाही... > मी असे कोठेही म्हटलेले नाही, फक्त त्यांना जर हा देश त्यांचा वाटत असेल तर त्यांनी येथील नियम पाळावे, येथील न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा (तिकडे शरियत ची मागणी कशाला?), या देशात वस्तू, खाद्यपदार्थ यांचा दर्जा (standard) ठरवण्यासाठी असलेल्या ISI, FSSAI सारख्या शासकीय यंत्रणांवर विश्वास ठेवावा (तिकडे 'Halal Certification' ची मागणी कशाला??), या देशाला, भारतभूमीला वंदन करावे!!!
तुम्ही ज्यांना बाहेरून आलेले म्हणतात , त्यातल्या बहुस़ख्यांचे पूर्वज इथलेच ,धर्मांतरित झालेले आहेत.>>> हेच खरे सत्य असले तरी 'बाटगे जास्त कडवे असतात' या उक्तीप्रमाणे ते प्रत्येक ठिकाणी आम्ही कसे वेगळे हे दाखवायचा प्रयत्न करत असतात.
मग जर शांत पाण्यात मुद्दाम दगड टाकला, तर तरंग हे उठणारच ना!!!
तनिश्कच्या जाहिरातीतील मी फटाके न फोडता दिवाळी साजरी करेन म्हणणारी ही परधर्मीय आहे का??? ती कलाकार कोण आहे माहीत नाही, पण ती No Firecrackers नंतर but lots of diyas असे म्हणते आहे. म्हणजे आमच्या संस्कृतीशी नाळ जोडते आहे.
मुळात तनिष्क रडारवर आली ती दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या, 'लव्ह जिहाद' ला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातीमुळे. ज्यात ते कोणी मुस्लीम कुटुंब त्यांच्या हिंदू सुनेला आडकाठी आणत नाही वगैरे वगैरे दाखवले होते. (कारण वास्तव खूप भयानक आहे, नुकतेच काही आठवड्यांपूर्वी मुंबईच्या चेंबूरमध्ये घडलेले रुपाली चंदनशिवे प्रकरण ज्ञात असेलच!)
की तनिश्क टाटांची म्हणजे बाहेरून आलेल्या पारशी इसमाची कंपनी, म्हणून त्यांना अधिकार नाही? 'रतन टाटा' हे खरोखर देवमाणूस आहेत. त्यांच्या बाबतीत असा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही. किंबहुना पारशी हे आपल्याशी इतके समरूप झाले आहेत की ते बाहेरून आले आहेत यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.
जेव्हा जेव्हा मी 'बाहेरून आलेले' म्हणतो तेव्हा माझा रोख 'खान मंडळींकडे' असतो. कारण त्यांच्या पूर्वजांनी आपल्या देशाचे अतोनात नुकसान केले आहे, लाखो हिंदूंचा नरसंहार केला आहे (जो आजही 'सर तन से जुदा' च्या माध्यमातून सुरु आहे). पारशांनी असे काहीही केले नाही. (त्यांनी एकदाच दंगल केली, तीसुद्धा ब्रिटिशांच्या काळात, ब्रिटिशांच्या विरोधात)
AU Finance ची जाहिरात आत्ता
AU Finance ची जाहिरात आत्ता पाहिली. पण त्यात काय इश्यू आहे ते कळले नाही. सगळ्यांचे व्यवस्थित कपडे , कुंकू वगैरे आहे की. नवरा सासरी गेला म्हणून गदारोळ आहे का?
तनिश्क ची ती अॅड आणि त्यातला मेसेज चांगला असला तरी सध्याचा व्हॉटसॅप ऑडियन्स इमोशनली इतका इन्टेलिजन्ट अजिबात नाही.
विक्षिप्त मुलगा तुमच्या
विक्षिप्त मुलगा तुमच्या मुद्द्यांतले अंतर्विरोध तुम्हांला दिसणार नाहीत. त्यामुळे आणखी लिहायची इच्छा नाही.
रूपाली चंदनशिवे प्रकरणी केलेल्या तपासात लव्ह जिहादचा कोणताही प्रकार घडलेला दिसत नाही, मुलाच्या कस्टडीवरून वाद होता, अफवा पसरवून सामाजिक तणाव निर्माण करू नये, असं पोलिस अधिकार्याने म्हटलं होतं.
AU Finance ची जाहिरात आत्ता
AU Finance ची जाहिरात आत्ता पाहिली. पण त्यात काय इश्यू आहे ते कळले नाही. सगळ्यांचे व्यवस्थित कपडे , कुंकू वगैरे आहे की. नवरा सासरी गेला म्हणून गदारोळ आहे का?
हो.
अर्थात तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' याला अनुसरून जर आमीर खान वागला तर कदाचित गदारोळ कमी होईल, असा माझा आपला एक अंदाज!
तसेही काही महिन्यांपूर्वी त्याचा घटस्फोट झालाच आहे, तर आता तिसरे लग्न करून त्याने 'घरजावई' व्हायला हरकत नाही! काय?
फक्त तिसरे लग्न करतांना पुन्हा हिंदू महिलेशी करून 'लव्ह जिहाद' ला प्रोत्साहन नाही दिले म्हणजे मिळवले!!!
नवरा सासरी राहायला गेला हे
नवरा सासरी राहायला गेला हे जाहीरातीत दाखवणे सोपे असते प्रत्यक्षात अवघड
यावरही कोणीतरी एक वेगळा धागा काढा रे
हा धागा आवडलेल्या न आवडलेल्या जाहीरातींसाठीच राहू द्या.
मी १९२० मधून इकडे टाईम
मी १९२० मधून इकडे टाईम ट्रॅॅव्हल करून इकडे आलो आहे. बघतो तर काय? कुणीही सनातन धर्माचे पालन कात नाहीये.
स्त्रिया सकच्छ नेसण्या ऐवजी विकच्छ नेसायला लागल्या आहेत.
विधवा सती तर जात नाहीतच पण केश वपन करून आलवण पण नेसत नाहीत.
स्त्रिया दरवर्षी मुले मॅॅनुफॅॅक्चुर करायचे सोडून ऑफिसात जाऊन पुरुषांच्या खुर्चीस खुर्ची लाऊन काम करायला लागल्या आहेत.
स्त्रिया महिन्यातले चार दिवस कोपऱ्यात न बसता सगळीकडे विटाळ कालवत मजेत फिरत असतात.
नवरयाला इकडून तिकडून असे न संबोधता "ए पक्या, आयला किती उकडतंय., जरा ac चालू कर. आणि मला चहा करून दे ,गवार निवडून ठेव..." अस हुकुम देणाऱ्या ...
हर हर काय हे कलियुग!
मराठी शादी डॉट कॉमच्या
मराठी शादी डॉट कॉमच्या एखाद्या तरी जाहिरातीत मराठी जोडपं दाखवलंय का?
https://youtu.be/3gePR66xECw
https://youtu.be/3gePR66xECw?si=POjgTvG9XYoSOpSp
ही जुनी ऍड सापडली , रिपीटवर ऐकावीशी वाटते आहे ..
छान आहे अॅड. मजेशीर आहे.
छान आहे अॅड. मजेशीर आहे.
तो मुलगा पारले जी ची जाहिरात
तो मुलगा पारले जी ची जाहिरात म्हणून सतत असं बिस्किट खाताना का दाखवलाय?
गणपती आणायला जाताना पण बिस्किट कोण खातं? तबकात पण ठेवलंय नंतर. काहीही... पीळ आहे.
https://www.youtube.com/watch?v=ZUWFNslsE8E
पारले जी वरून अवांतर आठवलं --
पारले जी वरून अवांतर आठवलं -- पारलेजी ची Dark biscuits खाल्ली आहेत का कोणी ? मस्त लागतात
एक जाहिरात म्हणून कायच्या काय
एक जाहिरात म्हणून कायच्या काय आहे ती. एक मंगल प्रसंग दाखवून त्यात बिस्किट घुसवले आहे.
जाहिरात अशी हवी की त्यातील प्रॉडक्ट त्यात मुख्य रोल मधे पाहिजे. इथे ते बिस्किट असले काय नसले काय, काहीच फरक पडत नाही. म्हणजे त्या बिस्किटाचा ना त्या समारंभाशी संबंध आहे, ना बायकांनी गणपती आणण्याशी. त्या लोकांपैकी कोणीही गणपती आणला असता तरी या जाहिरातीत काहीच फरक पडला नसता.
मुळात बायका आणत नाहीत अशी काही प्रथा आहे का? गणपती घरी आणताना आपल्याकडे तोंड करून आणतात असेच ऐकले आहे - इतरांचे माहीत नाही पण आम्ही तरी करतो. घरी जेथे बसवायचा आहे तेथे ठेवायला सोयीचे व्हावे म्हणूनही असेल.
आणि गेल्या काही वर्षांत "बाप्पा" हे कॉमन झाले आहे का? तो नुसताच बाप्पा उल्लेख कृत्रिम वाटतो.
इथे ते बिस्किट असले काय नसले
इथे ते बिस्किट असले काय नसले काय, काहीच फरक पडत नाही. >>>>>> लोल.. त्यांची टॅगलाईन आहे जी म्हणजे जिनियस. मग बिस्किट खाऊन त्याला ही जिनियस आयडीया सुचते की बायका नाहीतरी इतकी कामं करतात गणपतीसाठी, तर त्यांनीच का आणू नये गणपती.
गणपती घरी आणताना आपल्याकडे तोंड करून आणतात असेच ऐकले आहे - इतरांचे माहीत नाही पण आम्ही तरी करतो. >>>>> आम्ही समोर तोंड ठेवूनच आणतो चेहेरा झाकून. मग दारात आल्यावर दुध पाणी ओवाळून कुंकू लावून ओवाळतो.
इथे ते बिस्किट असले काय नसले
इथे ते बिस्किट असले काय नसले काय, काहीच फरक पडत नाही. >>>>>> लोल.. त्यांची टॅगलाईन आहे जी म्हणजे जिनियस. मग बिस्किट खाऊन त्याला ही जिनियस आयडीया सुचते की बायका नाहीतरी इतकी कामं करतात गणपतीसाठी, तर त्यांनीच का आणू नये गणपती.
गणपती घरी आणताना आपल्याकडे तोंड करून आणतात असेच ऐकले आहे - इतरांचे माहीत नाही पण आम्ही तरी करतो. >>>>> आम्ही समोर तोंड ठेवूनच आणतो चेहेरा झाकून. मग दारात आल्यावर दुध पाणी ओवाळून कुंकू लावून ओवाळतो.
आम्ही समोर तोंड ठेवूनच आणतो
आम्ही समोर तोंड ठेवूनच आणतो चेहेरा झाकून. मग दारात आल्यावर दुध पाणी ओवाळून कुंकू लावून ओवाळतो. >>> १२३+++
Pages