Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Wow घेवर किती छान आहेत.
Wow घेवर किती छान आहेत. अस्स्स डाउनलोड झालं असतं तर फोटोतून.
.
माझ्या आईचा जुना andriod सुद्धा ७वर्षे झालं काम करतोय.
ती म्हणते बंद झाला की घेऊ नविन
आमच्या भागात कचोरी म्हणून
कचोरी musings :
आमच्या भागात कचोरी म्हणून बहुतेक मारवाड़ी/ गुजराती दुकानदार मैद्याच्या जाड पुऱ्या विकतात, super oily and refried. त्यात काहीच सारण/चव नसते. मग त्यात फरसाण, कांदा, दही, चटण्या, शेव असा चिखल करुन देतात. वरुन कोथिंबीर, कांदा, शेव, खारी बुंदी, कधी गाजराचा किस. अगदी हल्दीराम, दादूज सारखे प्रसिद्ध, महाग ब्रँड्स हेच करतात.
ते खाण्यापेक्षा आम्ही शेवपुरी खातो मग.
शेगाव कचोरी मात्र मुंबई-पुणे दोन्हीकडे काही ठिकाणी ‘ठीक’ म्हणावी अशी मिळते.
ओव्याच्या पानांचा भात! हे
ओव्याच्या पानांचा भात! हे माहीत नव्हते. रेसिपी द्याल का प्लीज मंजूताई ? घरी खूप आहेत ही पानं.
खूप तिखट लागतो का?
अनिंद्य, राजस्थानी घेवर
अनिंद्य, राजस्थानी घेवर म्हणजे डोळ्यात बदाम. मलाही रबडी न माखलेलाच घेवर आवडतो. पण त्याकरता तो असा जाळीदार आणि खुसशुशीत हवा.
घिवर मला नाही आवडत पण दिसतोय
घिवर मला नाही आवडत पण दिसतोय मात्र फारच अप्रतिम...
मंजू, भात पण मस्तच दिसतोय.
घेवर बघुन पुढे काही बघावेसे
घेवर बघुन पुढे काही बघावेसे वाटेना…. जयपुरहुन एकदा एक कलिग घेवर घेऊन आलेला…. आहाहा…
घेवर ≠ घिवर
घेवर ≠ घिवर
ममो, घेवर ही राजस्थानची तर घिवर सिंधी मिठाई. घेवर आपल्या मसूरपाकासारखी जाळीदार तर घिवर (दुसरा उच्चार घियर) ही बारीक साच्याने पाडलेल्या मोठ्या ढालगज जिलबी सारखी मिठाई.
मे बी तुमचा टायपो झाला असेल पण मी आपले सांगितले.
घेवर ≠ घिवर
.
घेवर भारी आहे.
घेवर भारी आहे.
मालवणला पण घेवर मिळतो. तोही असाच दिसतो. तो राजस्थानी की मालवणी ते माहीत नाही.
चैन्नैत वडापाव, कोलकात्याला
चैन्नैत वडापाव, कोलकात्याला डोसा, गुवाहाटीला छोला टिक्की मिळते. पण मी तरी मुद्दाम खाणार नाही. मालवणला खाजाच घेईन.
दिवे घ्या. आज गमतीचा मूड आहे.
अनिंद्य, थँक्यु.. टायपो
अनिंद्य, थँक्यु.. टायपो वगैरे नाही , मला दोन्ही एकच वाटत होते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वेलकम.
वेलकम.
जय हो.
हा सिंधी घिवर / घियर.
नका हो असे अत्याचार करू आधीच
नका हो असे अत्याचार करू
आधीच मोदकाच्या कॅलरीज मोजून धस्स झालंय.
पण आता आणलाच आहे तर बघू जरा तो घेवर इकडे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मोदकाच्या कॅलरीज मोजून धस्स
मोदकाच्या कॅलरीज मोजून धस्स झालंय>> होना रोज ४ तरी पोटात जात आहेत
शिवाय रोज आमंत्रणे असल्याने व्यायाम बोंबललाय.
उकडी मोदक कसे आले नाहीत अजून
उकडी मोदक कसे आले नाहीत अजून इथे?
गणपतीच्या दिवसांतला खास कोकणी
गणपतीच्या दिवसांतला खास कोकणी पदार्थ - पपनसाची कोशिंबीर
![IMG_7589.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u75664/IMG_7589.jpeg)
वाह माझेमन.. अगदी अगदी !
वाह माझेमन.. अगदी अगदी !
पपनस - भारीच की !!
पपनस - भारीच की !!
माझेमन भारीच. रेसिपी द्या ना.
माझेमन भारीच. रेसिपी द्या ना.
अरे वा.
अरे वा.
पपनस ऐकून माहित आहे, आता फोटोही पाहिला. खायला मात्र कधी नाही मिळाला.
कशी चव असते ? मोसंबी/ अनानस / संत्र्यासारखी ?
हे फळ मी पहिल्यांदा आसामात
हे फळ मी पहिल्यांदा आसामात खाल्लं. मुबलक मिळतात. बहुतेक प्रत्येकाच्या घरी असतात.
काहीशी मोसंबीसारखी चव असते पण
काहीशी मोसंबीसारखी चव असते पण थोडी मिरमिरीत.
पपनस सोलताना पांढरी स्किन काढली की हात धुवून घ्या नाहीतर गर कडवट होतो.
कोशिंबीर सोपी आहे. मीठ, साखर व बारीक कापलेली हिरवी मिरची चवीप्रमाणे, ओलं खोबरं, हवंच तर कोथिंबीर घालून मिक्स करायची. मी शक्यतो कच्ची हिरवी मिरची खात नाही म्हणून लाल तिखट घातलंय. काही जण कच्चा हिंगही घालतात.
कालची ऋषीची भाजी इन मेकिंग -
कालची ऋषीची भाजी इन मेकिंग - एन्ड प्रॉडक्टचा फोटो काढायचं लक्षात आलं नाही. जेव्हा लक्षात आलं तेव्हा कणीस उरलेलं फक्त.![IMG_7584_0.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u75664/IMG_7584_0.jpeg)
काहीशी मोसंबीसारखी चव असते पण
काहीशी मोसंबीसारखी चव असते पण थोडी मिरमिरीत..
>>>>
मिरमिरीत शब्दाचा अर्थ माहीत नाही. पण हो मोसंबीच्या जवळ जाते चव.. पण मोसंबी मला फारशी आवडत नाही. पपनस मात्र फार आवडते. फक्त फार सुके नसावे.
कोशिंबीर नाही करत आमच्याकडे. पण आता मी ट्राय करेन आता या रेसिपीने.. धन्यवाद.
थँक्यू माझेमन
थँक्यू माझेमन
मिरमिरीत म्हणजे फिक्या मोसंबी सारखे ? मग तर नुसते खाण्यापेक्षा कोशिंबीर- सलाड खाणे जास्त योग्य होईल.
बघू कधी योग येतो ते.
मिरमिरीत म्हणजे एरीएटेड
मिरमिरीत म्हणजे एरीएटेड कोल्ड्रिंक्स प्यायल्यावर ओठांना जाणवते ती चव (गोड नाही).
पपनस खाऊनच बघावा लागेल
पपनस खाऊनच बघावा लागेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझे मन ओके. हा शब्द माहीत
माझे मन ओके. हा शब्द माहीत नव्हता. पण बरोबर. असेच असते ते आणि म्हणूनच मला आवडते. कारण मला आंबट चिंबट गोडवा असलेली फळे आवडत नाहीत. जाम हे फळ सुद्धा मला जाम आवडते. मी एकावेळी पंधरा वीस सहज खातो. आणि यावरून घरी मला बोलायचे की ज्या फळांना फार चव नसते तेच कशी तुला आवडतात
कारण अश्या टेस्ट बडस नसतात सर्वांकडे.. या फळांना मीठ मसाला लावला की माझ्यासाठी मजा गेली त्यांची. मला ते कलिंगड सुद्धा मीठ किंवा चाट मसाला लावून जमत नाही. त्यात कलिंगडाची मूळ चव गेली असे वाटते. जर फळे मूळ चवीत आवडत असतील तर तशीच खावीत. न आवडल्यास प्रयोग ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चतुर्थीला मोजकेच मोदक केले
चतुर्थीला मोजकेच मोदक केले होते. आज आई गावाहून माहेरचा गणपती करून आली. म्हणून दुसरा मिनी स्लॉट… तो जरास्सा फाटलेला मोदक इग्नोरा![IMG_7632.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u75664/IMG_7632.jpeg)
माझेमन, मोदकांच्या कळ्यांची
माझेमन, मोदकांच्या कळ्यांची संख्या इज प्रपोर्शनेट टू वळणार्या व्यक्तीचे वय ?
करंजीची दुरडही अगदी रेखीव आहे.
Pages