सर्वसिद्धिकर प्रभो!

Submitted by संयोजक on 26 August, 2024 - 22:26

गणपती ही जशी विद्येची देवता आहे तशी संकल्पपूर्तीला मदत करणारी देखील आहे. आपण कुठली पूजा करायला सुरुवात करण्यापूर्वी गणेशाला वंदन करुन संकल्पमंत्र म्हणतो आणि इष्टदेवतेला ते संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन करतो.

या गणेशोत्सवात आम्ही घेऊन आलेला 'सर्वसिद्धीकर प्रभो' हा उपक्रमही अशाच धर्तीवर आहे. आपल्याला सगळ्यांनाच रोजच्या जीवनात काही सवयी सोडायच्या असतात तर काही अंगी बाणवायच्या असतात. 'उद्यापासून रोज तासभर तरी व्यायाम करणारे मी!', 'आजपासून साखर बंद म्हणजे बंद!', 'पूर्वी हातात पुस्तक घेतलं की संपल्याशिवाय खाली न ठेवणारी एक मी, आणि गेल्या संपूर्ण वर्षांत एकाही पुस्तकाला स्पर्श न करणारी दुसरी मी! दोन्ही नक्की एकच का?' , 'फ्रेंच शिकायची होती पण ते राहिलंच. आता संसाराचे पाश जरा सैलावताहेत तर चालू करतोच!' असे एक ना दोन! संकल्प सोडणारे, आणि... ते अनेकदा (कायमचे) सोडणारे ही!

मोठे संकल्प करणारे आणि ते पूर्णत्वास न नेणारे काही फक्त आपणच नाही. साधारण आपला असा समज असतो की मन:शक्ती (विल पॉवर) असली की 'वाळूचे कण रगडून तेलही गळू शकतं'... काय म्हणता? ते प्रयत्नांच्या रकान्यात आहे! बरं! असेल असेल. मुद्दा काय आहे, तर आधुनिक संशोधकांनी आणि आपल्या कवींनी सुद्धा मन हे किती चंचल आणि अचपल आहे हे वारंवार सांगितलेलं आहे. एखादी सवय दीर्घकाळासाठी लावून घ्यायची असेल, ती कृती अंगवळणी पडावी असं वाटत असेल तर फक्त मनःशक्ती काही पुरेशी नाही. असं म्हणतात की एखादी गोष्ट रोजच्या दिनक्रमात समाविष्ट करायची असेल तर अगदी लहान गोष्टी पासून चालू करा. ते सवयीचं झालं की मग हळूहळू वाढवत नेलं, त्यातुन आनंद मिळायला सुरुवात झाली की तुम्ही अर्धी लढाई जिंकलीतच.

मायबोली गणेशोत्सवाचं यंदांच रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने तुम्हाला एखादी सवय सोडायची असेल, किंवा एखादी सवय अंगी बाणवायची असेल तर या धाग्याला प्रतिसाद देऊन तुमचा संकल्प आणि थोडक्यात मनोगत लिहा आणि पुढचे २१ दिवस रोज त्या संकल्पाची पूर्ती झाली की नाही याची खबरबात आम्हाला देत रहा. एका मायबोलीकराने सोडलेल्या संकल्पात दुसर्‍या कुणाला सामील व्हायचं असेल तरी स्वागतच आहे. तुम्ही कोणत्या संकल्पात सामील होत आहात ते कळवा आणि मग रोज कळवत रहा कशी प्रगती होते आहे ते!

रोज पुस्तकाचं एक पान वाचायचं, उद्वाहकाचा वापर न करता जिन्याचा वापर करायचा, झाडांना पाणी घालायचं, कालच्यापेक्षा धूम्रपानाची एक कांडी कमी करायची, मायबोलीवर जास्त वेळ घालवायचा, इन्स्टाग्रामचा वेळ थोडा कमी करायचा, किंवा तुम्ही इतरांवर प्रभाव पाडणारे (इन्फ्लुएंसर) असाल तर रोज दोन तरी नवे व्हिडिओ बनवुन अपलोड करायचे.... काहीही संकल्प करू शकता. तो पूर्ण होतोय की नाही हे बघण्याची जबाबदारी गणरायाची आणि 'त्या गणरायाला का कमी व्याप आहेत?' असं म्हणून जबाबदारी शिरावर घेतलेल्या मायबोलीकरांची.

इथे केलेल्या संकल्पांची यादी आम्ही वेळोवेळी मथळ्यात समाविष्ट करत जाऊ म्हणजे नंतर येणार्‍यांना फार शोधाशोध करावी लागणार नाही.
पहिला श्रीगणेशा आम्ही करतो.

१. रोज वीस मिनिटे तरी पुस्तक वाचायचे.
२. अस्मिता. :- भरपूर वेबसिरीज बघायच्या राहून गेल्या आहेत. त्यापैकी 'गॉट' पासून श्रीगणेशा करायचा आहे.
३. देवकी:- व्यायाम
४. साधना:- मोबाईलवेळ कमी करुन तो वेळ छापिल पुस्तकांना द्यायचाय.
५. किल्ली :- ११ सूर्यनमस्कार घालायचेत
६. रीया:- दिवसातले १५ मिनिट स्वतःसाठी देणे. यात १५ मिनिटांचा क्वाईट टाईम अपेक्षित आहे म्हणजे घरातली माणसंच नाही तर पुस्तक, फोन सुद्धा लांब हवा.
७. कविन :- रोज किमान अर्धातास ब्रिस्क वॉक किंवा अर्धा तास व्यायामासाठी काढणार. मैदा/ ब्रेड खाणार नाही.
८. हर्पेन :-सध्या अजीबात बंद असलेले धावणे सुरु करेन. वाढलेले वजन आटोक्यात आणेन.
९. आबा. :- मोबाईल स्क्रीन टाईम कमी करणे.
१०. अतरंगी :- रोज स्वतःच्या चपात्या/भाकरी स्वतः करणार. शोकेस, कपाट, मुलांचे कपाट यातला रोज एक तरी कप्पा आवरणार.
११. माझेमन :- रोज अर्धा तास अभ्यास करणार. रोज अर्धा तास व्यायाम करणार.
१२. सामो :- सकाळी जिम व संध्याकाळी वॉक घेइन
१३. ऋतुराज:- रोज किमान अर्धा तास मराठी पुस्तक वाचणार
१४. ReenaAbhi :-रोज निदान अर्धा तास तरी व्यायाम आणि मेडिटेशन करायचंय..
१५ छन्दिफन्दि :-11 सूर्यनमस्कार, रोज 15 मिनिटे तरी पुस्तक वाचणे.
१६. anjali_kool:- रविवारी फेसबुक अजिबात बघायचे नाही हे एक मला करून बघायचे आहे. मुळात फेबु वापर कमी केलेला आहे पण तरी अजिबात आज फेबु पहिलेच नाही असे आवडेल मला करायला
१७. अवनी :-पेटीवर रोज एक नवीन गाणे वाजवून बघायचे असा संकल्प करत आहे
१८. ऋन्मेऽऽष :- रोज मुलांचा अर्धा तास अभ्यास घेणे.
१९. अमितव :- रोज थोडावेळ कीबोर्ड वाजवायचा. व्यायाम न चुकता करायचा.
२०. पियू:- रोज किमान अर्धा तास व्यायाम करणे. रोज मुलाचा किमान अर्धा तास अभ्यास घेणे. रोज न चुकता Gratitude Journal लिहिणे. रोज न चुकता दिवसातून किमान दोनदा मेडिटेशन करणे. रोज न चुकता मुलासोबत किमान अर्धा तास स्क्रीन फ्री क्वालिटी टाइम घालवणे.
२१. हरचंद पालव :- कामाव्यतिरिक्त स्क्रीन टाइम कमी करणे.
२२. आ_रती:- घरातील एक कप्पा रोज साफ करणे व नको असलेल्या / वापरात नसलेल्या वस्तू देऊन टाकणे . डिजिटल कचरा आवरणे . रोज ७ ५ ० ० स्टेप्स चालणे
२३. तनू:-रोज थोडा वेळ तरी पुस्तक वाचणे आणि आता आणलेले पुस्तक वाचून पूर्ण करणे.
२४. सामी :- रोज ४५ मिनिटे वॉक किंवा व्यायाम करणार . लेकीला रोज एक तरी गोष्ट गोष्टीच्या पुस्तकातली / Do you know how-what -when चे एक पान वाचून दाखवणार. एक सर्टिफिकेशन करायचे आहे, ते या वर्षी करणार त्यासाठी रोज थोडा अभ्यास करणार.
२५. rmd:-रोज किमान अर्धा तास चालणे
२६. झकासराव :- नो शुगर , नो मैदा , व्यायाम करणे.
२७. धनुडी:-सकाळचा योग क्लास परत सुरू करायचा आहे. महिषासुरमर्दिनी स्तोत्र पाठ करतेय, दर आठवड्याला दोन श्लोक.
२८. सान्वी :- विणकाम - स्ट्रेस बस्टर म्हणून क्रोशे सुरू केलं आहे, शाळेत शिकले होते आता पुन्हा श्री गणेशा. वाचन करणे, मुलासोबत क्वालिटी टाइम घालवेन, अभ्यास/गप्पा/गोष्ट सांगणे.
२९. आर्चः-न चुकवता रोज क्लास अटेंड करणार. रोज अर्धा तास चालणर.
३०. प्रज्ञा९ :- रोज 20-25 मिनिटं व्यायाम
३१. अनया :- मी रोज पोहणे / चालणे ह्यापैकी काहीतरी व्यायाम करीन. बिस्कीटं वर्ज्य करीन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सौरभ bothra चे habuild सेशन जॉईन केलंय सो व्यायाम योगासने होत आहेत. >> मी पण केलय जॉईन त्यामुळे बर्‍यापैकी नियमीत होतोय पण मधेच आजारी पडले आणि मग खंड पडला. त्यानंतर सुट्टीचा बॅकलॉग भरायला ऑफीसमधे लेट म्हणून हाबिल्ड्च्या वेळा मीस होणे असे झाले. मग परत सुरु केले कधी हाबिल्ड, कधी गार्डनमधे चालण्याच्या ट्रॅकवर चालणे, कधी दोन्ही तर कधी कमी वेळ दोन्ही, कधी वॉक विथ लेस्ली Proud
ग्रॅटीट्युड जर्नल मी पण लिहीते, कधी उशीर झाला तर दोन ओळी तरी. अगदीच चुकते तेव्हा मनातल्या मनात देते ग्रॅटीट्युड आणि परत दुसर्‍या दिवशी वही उघडून सुरु करते Proud

नवीन नवीन पेटी शिकते आहे
पेटीवर रोज एक नवीन गाणे वाजवून बघायचे असा संकल्प करत आहे. त्यासाठी youtube व्हिडिओजची मदत घेणार.
प्लीज प्लीज तुम्ही पण माझ्या या संकल्पात सामील व्हा.
तुमची गाणी कदाचित मलाही आवडतील
कोणते गाणे वाजवत आहात ? ते इथे लिहा.

सकाळी विसरले.
संध्याकाळी घालेन सूर्यनमस्कार

छान उपक्रम छान कल्पना

ऋन्मेऽऽष - रोज मुलांचा अर्धा तास अभ्यास घेणे.

आज रात्रीच श्री गणेशा करतो.
नाही ऐकले तर गणपती बाप्पा मोरया बोलून 21 फटक्यांचा प्रसाद देतो.

अभ्यास की फटके याचे अपडेट उद्या देतो

अवनी मस्त!
मी पण सहभागी होतो.
१. रोज थोडावेळ कीबोर्ड (पेटी नाही इकडे) वाजवायचा.
२. व्यायाम न चुकता करायचा.

आजचा दिवस सफल.

चपात्या केल्या. मुलांच्या कपाटातले दोन कप्पे आवरले.

तू फटके देणारा बाबा वाटत नाहीस >> देणारा सुद्धा आहे आणि खाणारा सुद्धा आहे. पण तुमचेही बरोबर आहे. बाबा म्हणून असा काही प्रकार नाही, तर भावंडे जशी मारामारी करतात तशी आमच्यातही चालते. जरा वेगळीच केस आहे. गणपती झाले की आमच्या घरातील डोमेस्टिक वोईलंस वर वेगळा धागा लेख पाडतो Happy

येथील सकल मायबोलीकरांनी आज सर्वसिद्धीकरं प्रभो गणरायांना स्मरून मनोमन जो संकल्प केला आहे तो सिद्धीस जाण्यासाठी सर्वांना अनेकानेक सदिच्छा !!

आता त्या संकल्पाचा रोजचा आढावा न चुकता इथे या धाग्यावर द्या. इथे सगळे तुमचे मनोबल नक्कीच वाढवतील. बाकी कार्य सिद्धीस नेण्यासाठी श्री समर्थ आहेच.

१. रोज किमान अर्धा तास व्यायाम करणे.
२. रोज मुलाचा किमान अर्धा तास अभ्यास घेणे.
३. रोज न चुकता Gratitude Journal लिहिणे.
४. रोज न चुकता दिवसातून किमान दोनदा मेडिटेशन करणे.
५. रोज न चुकता मुलासोबत किमान अर्धा तास स्क्रीन फ्री क्वालिटी टाइम घालवणे.

चांगला उपक्रम आहे. माझा संकल्प - कामाव्यतिरिक्त स्क्रीन टाइम कमी करणे.

अमित, तुझ्यासाठी एक चॅलेंज - पुढील पाच वर्षात (सेकंड हँड/चोरीची/'पर्मनंट उधार' पैकी काहीही), पेटी घेणे.

खूप छान उपक्रम. माझा संकल्प
१ .घरातील एक कप्पा रोज साफ करणे व नको असलेल्या / वापरात नसलेल्या वस्तू देऊन टाकणे .
२ . डिजिटल कचरा आवरणे . म्हणजे रोज एक ऍप घेऊन व्हाट्सअप , fb, इन्स्टा, x वर मेसेजेस उडवणे , न बघणारे चॅनेल्स किंवा आता बोर होणारे इन्फ्लुएन्सर्सना अनफॉलो करणे आणि जीमेल पण
३ . रोज ७ ५ ० ० स्टेप्स चालणे हे माझे टार्गेट असतेच पण नेहमीच होते असे नाही ते शक्यतो पूर्ण करणे . मध्ये २ दिवस प्रवास करायचा आहे म्हणून चुकेल अशी शंका आहे .
सध्या एवढेच

हल्ली लायब्ररी मधून पुस्तक आणून न वाचता तसच राहतं आणि परत देण्याची तारीख येते. तर माझा संकल्प रोज थोडा वेळ तरी पुस्तक वाचणे आणि आता आणलेले पुस्तक वाचून पूर्ण करणे.

रोज ४५ मिनिटे वॉक किंवा व्यायाम करणार . लेकीला रोज एक तरी गोष्ट गोष्टीच्या पुस्तकातली / Do you know how-what -when चे एक पान वाचून दाखवणार. सध्या खंड पडलाय यात.
एक सर्टिफिकेशन करायचे आहे, ते या वर्षी करणार त्यासाठी रोज थोडा अभ्यास करणार

मस्त उपक्रम. माझा संकल्प -
रोज किमान अर्धा तास चालणे (ब्रिस्क वॉक). आजपासूनच सुरू करते आहे.

सौरभ bothra चे habuild सेशन जॉईन केलंय >>> anjali_kool आणि कविन, मी पण तुमच्या habuild गटात! Happy जुलै पासूनच जॉईन केलंय आणि आत्तापर्यंत तरी बर्‍यापैकी रेग्युलरली जमतं आहे.

नो शुगर , नो मैदा , व्यायाम करणे
असे 3 संकल्प बाप्पा चरणी.
सुरवात आधीच झाली आहे.
मध्ये मध्ये खंड पडतो.
म्हणून लिहावे की नको वाटत होते.
पण बाप्पा पासून कुठे काय लपत नसतं.
आणि थोडेफार अजून शिस्त लागेल बाप्पा चरणी असल्याने म्हणून लिहिले इथे.
सर्वांचे संकल्प चांगले आहेत.
पुस्तक वाचणे आणि डिजिटल detox विशेष आवडले.
Gratitude dairy विषयी नवीनच कळाले. चांगली संकल्पना.
सध्या पुस्तक वाचन देखील संकल्प घ्यावा वाटत होते पण वेळ manage होत नाही म्हणून वरचे 3 नीट फॉलो करेन..

आज व्यायाम झाला, refined साखर अथवा ते घातलेले गोड पदार्थ खाल्ले नाही, मैदा पदार्थ खाल्ले नाही.
दिवस पहिला बाप्पा कृपेने सुफळ

पुस्तक वाचणे आणि डिजिटल detox विशेष आवडले >>> मलाही. पुस्तक वाचणे खूप रेग्युलरली होत नाही Sad डिजिटल detox मात्र खरंच करायचं आहे. जबरदस्त आवश्यकता आहे. पण ते असं २१ दिवसांत होईल इतकं छोटं काम नाही Proud या वर्षाखेरपर्यंत झालं तरी खूप झालं.

Gratitude Journal >>> यात काय लिहायचं असतं हे मला कधीच समजलं नाही. कोणी मदत करेल का?

अरे वाह छान उपक्रम आहे. आणि सगळ्यांचे संकल्प वाचून उत्साह आला. सुरवातीला वाचून वाटलं की वाड्यावर तर नाही ना आले? सगळे वाडेकर मंडळी दिसली म्हंटलं मी कुठे होते? ( मला न सांगता हे कुठे गेले होते Lol ) आता माझा संकल्प लिहीते
१) सकाळचा योग क्लास परत सुरू करायचा आहे.
२) महिषासुरमर्दिनी स्तोत्र पाठ करतेय, दर आठवड्याला दोन श्लोक.

१. रोज किमान अर्धा तास व्यायाम करणे.
>> नाही झालं
२. रोज मुलाचा किमान अर्धा तास अभ्यास घेणे. >> केलं
३. रोज न चुकता Gratitude Journal लिहिणे. >> नाही झालं
४. रोज न चुकता दिवसातून किमान दोनदा मेडिटेशन करणे.
>> एकदा झालं.
५. रोज न चुकता मुलासोबत किमान अर्धा तास स्क्रीन फ्री क्वालिटी टाइम घालवणे.
>> झालं Happy

मुलासोबत किमान अर्धा तास स्क्रीन फ्री क्वालिटी टाइम>>> छान!

काल रात्री हा धागा वाचला... त्यातील २ मनात आधीपासूनच रेंगाळत होते. उशीर झाला होता त्यामुळे पहिला विचार आला, वा! आपणही उद्या पासून सुरुवात करुया..
पण पूर्ण धागा वाचून मोबाईल खाली ठेवला तेव्हा वाटलं, उद्यापासून .. hmm हे काही बरोबर नाही..
कल करे सो आज..
त्यामुळे रात्रीच सूर्यनमस्कार घातले..
पुस्तकातील एक प्रकरण वाचलं.. इतकं सुंदर लिखाण/ विचार होते.
उशीर झाला असला तरी समाधान वाटलं..

पुढचे २० दिवसही असेच जाऊ देत.

विणकाम - स्ट्रेस बस्टर म्हणून क्रोशे सुरू केलं आहे, शाळेत शिकले होते आता पुन्हा श्री गणेशा. खूप मजा येते आहे.
वाचन करणे, खूप पुस्तकं वाचायची आहेत, सुरूवात नक्की करेन
मुलासोबत क्वालिटी टाइम घालवेन, अभ्यास/गप्पा/गोष्ट सांगणे.

मीपण सौरभ बोथ्राची एक वर्षाची मेंबर्शीप घेतली आहे. सध्यातरी न चुकवता क्लास अटेंड करते आहे.
संकल्प:
१. असच न चुकवता रोज क्लास अटेंड करणार.
२. रोज अर्धा तास चालणर.

तासभर गेलेले जिम ला. सकाळी विघ्ने आलेली पण आत्ता दुपारी जिम झाले. आता संध्याकाळी वॉक.
------
८००० स्टेप्स

Pages

Back to top