या १६ ऑगस्टला एक सुवर्णजयंती वर्ष सुरू झाले आहे ते पुढच्या वर्षी याच तारखेला संपेल.
म्हणजे पुढच्या वर्षी त्या घटनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत.
ती घटना पाहिलेले लोक आजही आहेत. मोठ्या संख्येने आहेत. जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्या घटनेचं चर्वितचर्वण होत राहणार.
काय झालं होतं पन्नास वर्षांपूर्वी ?
एक सिनेमा रिलीज झाला होता.
गीता थिएटरच्या मालकाने दिग्दर्शकाला बोलावलं होतं आणि रिकाम्या खुर्च्या दाखवल्या होत्या. फिल्मचा सौदा महागात पडला असे त्याचे म्हणणे होते.
दिग्दर्शकाने धास्तावून निरनिराळ्या हॉल मधे जाऊन अदमास घ्यायला सुरूवात केली. प्रेक्षक तुरळकच होते. जे होते ते गप्पगार होते.
ना शिट्ट्या, ना टाळ्या.
दिग्दर्शक आता धास्तावला. गेली साडेतीन वर्षे आपण जी फिल्म निगुतीने बनवत होतो ती हीच का ?
त्याने ताबडतोब या फिल्मच्या सगळ्या युनिटला तातडीने बोलावून घेतले.
त्या काळी सिनेमाचं तिकीट पुण्यात अडीच रूपये म्हणजे महागडं असायचं. मुंबईत जास्तीत जास्त १२रूपये होतं. सरासरी चार रूपये असायचं.
तीस हजारात कोथरूडला, हो हो कोथरूडला टू बीएचके फ्लॅट मिळत होता.
मुंबईत वरळीला एका नातेवाईकाने एक लाखात छोटंसं घर घेतलं होतं, त्या एक लाखाचं कौतुक कित्येक वर्षे होत होतं. एक लाख म्हणजे एकावर पाच शून्य हे ऐकण्यात नव्हतं.
इन्कार सिनेमात खंडणीची रक्कम वीस हजार रूपये होती जी प्रचंड वाटत होती. एक हजार रूपये म्हणजे केव्हढा मोठा आकडा होता. चार आकडी पगार म्हणजे मनुष्य कारने फिरायचा.
गणिताने त्या वेळचे १०० रूपये म्हणजे आजचे २९०० रूपये होतात.
https://www.inflationtool.com/indian-rupee/1975-to-present-value?amount=...
अशा वेळी दिग्दर्शकाने या फिल्मवर तब्बल साडेतीन कोटी रूपये घालवले होते. फिल्मचे हक्क विकून निर्मात्याला चार कोटीच्या वर काही रक्कम मिळणार होती आणि हे वेगळंच काहीतरी घडत होतं.
बरोबर ओळखलंत..
१६ ऑगस्ट १९७५ या दिवशी रिलीज झालेला तो सिनेमा म्हणजे शोले !
दिग्दर्शक रमेश सिप्पींनी बैठक बोलावून कुठे चूक झाली ते सर्वांना विचारले.
काहींचं म्हणणं पडलं कि व्हिलन नवा आहे, काही चित्रपटाच्या लांबीला दोष देत होते तर काहींनी हिरो मरतो हे प्रेक्षकांना आवडलेलं नाही असं वाटलं. रमेश सिप्पींना हे पटलं आणि दोन तासात आपण बेंगलोर निघू. तिथे पुन्हा काही सीन्स शूट करूयात, ते एडीट करून नव्या प्रिंट्स थेटरमधे पोहोचवू असे म्हणणे मांडले.
सलीम जावेद यांना हे पसंत नव्हते. ते म्हणाले कि दोनच दिवस झाले आहेत. उद्या रविवार आहे. बघूयात काय होतंय ते. आमच्या मते एक दोन आठवडे जाऊ द्यावेत. त्यानंतर जर प्रेक्षक आले नाहीत तर आपण हे बदल करूयात. आताच करणे खूप घाईचे होईल.
सिप्पींनी ते ऐकले...
थिएटरमधे जे चार लोक गप्प होते, त्यांनी बाहेर जाऊन आणखी सोळा लोकांना सांगितले. त्या सोळा जणांनी प्रत्येकी सोळा जणांना सांगितले. असे करता करता चार आठवडे उलटले आणि मग जे झालं ते आपल्या सर्वांना ठाऊकच आहे.
भारतीय चित्रपटसृष्टी कायमचीच बदलून गेली.
लोक असे काही येऊ लागले कि गावंच्या गावं बसेसनी शहराकडे यायची. त्या बसेस वर शोलेची चित्रं रंगवलेली असायची, बसस्टॉपचे नाव शोले बसस्टॉप पडलेले होते असे किस्से जवळपास सर्वच लहान मोठ्या शहरातून येत असत.
त्या काळी या सिनेमाने ३५ कोटीचा धंदा केला.
तेव्हांचे ३५ कोटी वर दिलेल्या लिंक वर जाऊन पाहिले तर १०१५ कोटी रूपये होतात.
पण या सिनेमाची ही अधिकृत कमाई आहे. अनधिकृत त्यापेक्षा दोनशे पटींनी जास्त असेल.
मिनर्वाचे तिकीट तेव्हां (शोलेसाठी) बाल्कनीचे १५ रूपये होते. ते बाहेर दोनशे रूपयांना मिळत होते आणि लोक घेत होते.
ब्लॅक वाल्यांनी वरळी सी फेसला घरं बांधली अशा बातम्या छापून आल्या होत्या. काहींच्या घरावर इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या होत्या.
बसेस वाल्यांनी कमाई केली. थिएटर्समधे जे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स होते त्यांची रेकॉर्डब्रेक कमाई झाली.
मिनर्वाला पाच वर्षे शोले हाऊसफुल्ल चालला आणि उतरला तो ही एकाच कारणाने.
त्याच निर्मात्याचा शान आला म्हणून. नाही तर ना निर्मात्याचं मन होतं ना थिएटरच्या मालकाचं. म्हणूनच मॅटिनीला शोले चालवला गेला. दोन वर्षे पुन्हा हाऊसफुल्ल चालला.
या शिवाय त्या काळी रिपीट व्हॅल्यू असल्याने शोल दर वर्षी येऊन कमाई करायचा.
त्या वेळी शोलेला एक वाक्य चिकटलं होतं.
"कुठेही लावा कधीही लावा, सुपरहीट "
तर हा शोले आता पन्नास वर्षांचा होतोय. १६ ऑगस्टला ४९ वर्षे पूर्ण झाली. पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले. पुढच्या वर्षी नक्कीच शोले पुन्हा रिलीज होईल. त्या आधीच शोलेचा रीमेक होत असल्याच्या बातम्या आहेत. कदाचित सलमान खान आणि शाहरूख खान जय वीरू असतील.
या सिनेमाच्या असंख्य आठवणी सर्वांकडे असतील. असंख्य किस्से असतील.
ऐकीव गोष्टी असतील, तेव्हांच्या अफवा असतील.
या सिनेमाशी निगडीत काही खास गोष्टी असतील.
त्या लिहा.
सगळं छानच लिहा असं काही नाही.
एक निगेटिव्ह गोष्ट इथे टाळली आहे. पण ती नंतर लिहीणार आहे.
हिंट - सध्या जुने वेस्टर्न सिनेमे पाहणे चालू केले आहे.
मस्त लेख र.आ. शोलेचे पेपरमधे
मस्त लेख र.आ. शोलेचे पेपरमधे सुरूवातीचे रिव्यूजही फार तारीफ करणारे नव्हते असे वाचले आहे. कोणीतरी फेबुवर एक फोटो टाकला होता. त्या समीक्षकालाही झेपला नव्हता पिक्चर. कदाचित अॅक्शन युग सुरू व्हायच्या आधी लोक ज्या अपेक्षेने पिक्चर्स बघत ते पूर्ण वेगळे होते.
शोले एपिक आहे.
शोले एपिक आहे.
अचाट अतर्क्य कथा बिथा सोडलं तरी त्यातले सर्वांचे (विशेषतः संजीव कुमार, अमिताभ चे) आवाज ऐकायला खूप आवडतात.आमच्याकडे मी अगदी बाळ असताना जुना ग्रामोफोन आणि शोले च्या पूर्ण संवादांची रेकॉर्ड होती.
शोले एक अनुभव आहे.थिएटर ला परत लागला तर नक्की पाहणार आहे.
एक निगेटिव्ह गोष्ट इथे टाळली
एक निगेटिव्ह गोष्ट इथे टाळली आहे. पण ती नंतर लिहीणार आहे.
हिंट - सध्या जुने वेस्टर्न सिनेमे पाहणे चालू केले आहे.
>>>>>
कॉपी/चोरी/उचलेगिरी
बॉलीवूडला हे आरोप काही नवीन नाहीत
पण तरी शोले आणि डीडीएलजे हे हिंदी चित्रपट सृष्टीतील दोन मैलाचे दगड आहेत आणि राहणार.
मी शोले ज्या दिवशी पहिल्यांदा पाहिला. त्याच्या पुढच्या दोन दिवसात अजून पाच वेळा पाहिला.
त्या वयात तो काय समजला आणि काय रिलेट झाला कल्पना नाही. पण प्रत्यक्षात असे आपल्या आसपास काही घडत नसले आणि कितीही ते इल्लोजिकल वाटले तरी तीच तर सिनेमाची जादू असते. हे जग वेगळेच असते म्हणून तर ते.आवडते
आजही बंदुकीची गोळी म्हटले की शोलेमधील आवाजच आठवतो..
भानु गुप्ता चा हार्मोनिका ,
भानु गुप्ता चा हार्मोनिका , "चल धन्नो , तेरती बसंती के इज्जत का सवाल है" च्या वेळेस चा सामता प्रसाद चा तबला, जय ला गोळी लागते त्या वेळेस चा , त्या पुलावर चा भयाण सन्नाटा. अजुन बरच काही.
शोले मी आधी विविधभारतीवर
शोले मी आधी विविधभारतीवर ऐकला आणि नंतर बर्याच वर्षांनी पाहिला.
वेस्टर्न चित्रपटांची व गाण्यांची नक्कल करणे यात नवल काही नाही. पण मुळ पाश्चात्य सुरावट किंवा कथेला आपल्या लोकांनी जो भारतीय साज चढवला त्याला तोड नाही. शोलेच्या चार वर्षे आधी आलेल्या मेरा गाव मेरा देशची कथा शोलेचीच आहे, हिरोही तोच आहे.
त्या आधीच शोलेचा रीमेक होत
त्या आधीच शोलेचा रीमेक होत असल्याच्या बातम्या आहेत. कदाचित सलमान खान आणि शाहरूख खान जय वीरू असतील.
>>
एकदा बच्चन ला बब्बन करून राम गोपाल वर्मा नी आग लावली ते पुरे नाही का झालं
की यावेळी अजय देवगण ला गब्बर करणार, अन् तो तंबाखू ऐवजी विमल खाऊन बसंती ला बोलो जुबां केसरी म्हणणार असं काही करायचा प्लॅन आहे
धन्यवाद फारएण्ड
धन्यवाद फारएण्ड
शोलेचे पेपरमधे सुरूवातीचे रिव्यूजही फार तारीफ करणारे नव्हते असे वाचले आहे.>>> माझ्या मामेभावाला सिनेमाच्या जाहिराती, लेख यांची कात्रणे वहीत चिकटवण्याचा छंद होता. त्याच्या वहीत शोले वर टीका करणारे एक परीक्षण वाचले होते. सडकून टीका होती. केसरी असेल बहुतेक.
कदाचित सलमान खान आणि शाहरूख
कदाचित सलमान खान आणि शाहरूख खान जय वीरू असतील.
>>>>
त्यांचा आधीच करन-अर्जुन आला आहे.
सध्या पठाण-टायगर खेळत आहेत.
अजून जय विरू कशाला...
वा, मस्त लेख !
वा, मस्त लेख !
याचा एक किस्सा पूर्वी इथे लिहिलाय : https://www.maayboli.com/node/77181?page=6
Submitted by कुमार१ on 1 September, 2021 - 16:04
सलीम-जावेद वर प्राइम वर ३
सलीम-जावेद वर प्राइम वर ३ एपिसोडची angry young men सिरीज आली आहे.
एकदा बच्चन ला बब्बन करून राम
एकदा बच्चन ला बब्बन करून राम गोपाल वर्मा नी आग लावली ते पुरे नाही का झालं >> अशा वावड्या आहेत सध्या तरी.
शोले एक अनुभव आहे.थिएटर ला परत लागला तर नक्की पाहणार आहे. >>> ३ डी त आला तेव्हां मुलांना दाखवला होता. आता पुन्हा जाईन. शोले मोठ्या पडद्यावर कितीही वेळा पाहू शकेन.
शोले मी आधी विविधभारतीवर ऐकला >> रविवारी शोलेचे संवाद ऐकवायचे. किती वर्षे ते चालू होते. बहुतेक त्यामुळेच संवाद पाठ झाले.
Submitted by कुमार१ on 1 September, 2021 - 16:04 >>> मस्त आहे हा किस्सा.
याच मालकाने आधी सिप्पींना बोलावले होते रिकाम्या खुर्च्या पहायला.
शोले मधे कुठेही थेट
शोले मधे कुठेही थेट रक्तबंबाळ हिंसा येत नाही. बहुतेक ठिकाणी प्रतिकात्मक प्रकार येतात. शेवटचा सीन सोडला तर फायटींग मधून रक्त आल्याचे आठवत नाही. हे सगळे आणीबाणी मूळे सेंसॉर बोर्ड कडक झालेले असल्यामूळॅ केले होते असे वाचले. ख.खो.दे.जा.
कालच 'छोले' परत पाहिला
कालच 'छोले' परत पाहिला.महागुरूंनी केलेलं विडंबन प्लस आठवणी.टाईमपास आहे.बेस्ट भाग सुमित राघवन.जंजिर चा अंजीर पण आहे युट्युब वर.
शोले म्हणजे जादू आहे
शोले म्हणजे जादू आहे
आम्ही जन्मायच्या आधीचा चित्रपट
पण ह्या चित्रपटाविषयी लोकं नेहमी भरभरून बोलत असत.त्यावेळी त्यांच्या डोळ्यात चमक असे, चेहऱ्यावर आनंद आणि बॉडी लॅंग्वेज एकदम energetic. त्यामुळे शोले पाहण्याची उत्सुकता होतीच.
थिएटर मध्ये पहायला नाही मिळाला अजून.
प्रथम पाहिला तो दूरदर्शन वर.
लोकांना आधी अफवा वाटलेली. शोले दूरदर्शन वर कधी दाखवतील अशी अपेक्षा नव्हती म्हणून.
पण तेव्हा गल्लीत सगळ्यांनी झाडून शोले पाहिलेला.
शाळकरी वयात असताना पाहिलाय.
चित्रपट पाहण्याच्या आधी सगळी स्टोरी माहीत होती, डायलॉग च्या कॅसेट्स एकूण डायलॉग माहीत होते, प्रसंग कुठे काय होणार हे सगळे माहीत होते, पण चित्रपट बघताना फार मजा आली होती.
त्यात अत्यंत कल्पक अशा जाहिराती घुसवलेल्या बेमालूमपणे.
एक आठवतंय तेरा क्या होगा कालिया सिन ला गब्बरच्या आवडीच्या बिस्किटची जाहिरात होती. आधी कळलच नव्हतं काय असं हे. नंतर लक्षात आलेलं.
नंतर घरी टीव्हीवर वै पाहिलाय.
Lockdown काळात मुलासहित पाहिलाय.
शोलेची जादू आजही आहे.
थिएटर मध्ये आला की नक्की बघणार आहे.
माझी मुलगी शोले जितके वेळा
माझी मुलगी शोले जितके वेळा कुठल्याही चॅनेलला लागलेला असेल, ती आवर्जुन बघते. अशी जादू आहे शोलेची.
आमच्या गावाकडे एकजण आहेत..
आमच्या गावाकडे एकजण आहेत/
आमच्या गावाकडे एकजण आहेत/ होते.
त्यांनी शोले खुप वेळा पाहिला होता आणि गावात कट्ट्यावर डायलॉग सहीत शोलेची स्टोरी सांगितलेली.
अगदी ते जाईपर्यंत, त्यांची ओळख शोले पवार अशीच राहीली.
शोले माझाही ॲाल टाईम फेवरेट
शोले माझाही ॲाल टाईम फेवरेट आहे….
किती वेळा बघिताय कोणास ठावूक
२००४ की २००५ मधे शोलेची unedited की with original sounds अशी काहीतरी कॅापी थिएटर्सला आली होती. तेव्हा शोले थिएटर ला पहायची मनोकामना पुण्यात चुलत भावाबरोबर E-Square ला जाऊन पूर्ण केली होती…..
भानु गुप्ता चा हार्मोनिका ,
भानु गुप्ता चा हार्मोनिका , "चल धन्नो , तेरती बसंती के इज्जत का सवाल है" च्या वेळेस चा सामता प्रसाद चा तबला, जय ला गोळी लागते त्या वेळेस चा , त्या पुलावर चा भयाण सन्नाटा. >>>> ठाकूरच्या कुटुंबातील लोकांना मारल्यावर फ्रीज झालेला सीन परत सुरू होतो तेव्हा थिएटर चिरत जाणारा झोपाळ्याचा आवाज, टायटल च्या वेळेस वेस्टर्न मूव्हीज सारखे सुरू होणारे संगीत मधेच गावात शिरते तेव्हा एकदम देशी होते, आणि मग परत ठाकूरच्या घराजवळ जाताना मूळ वेस्टर्न रूपात येते. जया च्या एण्ट्रीच्या वेळेस वाजणारे पार्श्वसंगीत. नंतर अमिताभ बाजा वाजवतानाचे संगीत. गब्बर त्या लहान मुलाला गोळी मारतो तेव्हा तो सीन कट करून वापरलेला कोळशाच्या इंजिनाचा आवाज!
काही पिक्चर फुल फोकस ने थिएटर मधे वेगळाच परिणाम करतात त्यात शोले एकदम वर असेल.
जया च्या एण्ट्रीला खरा अमिताभ दिसतो. तोपर्यंत त्याचे सीन काही फायटिंग वाले व काही गमतीशीर संवादांचे आहेत. त्याच्यावर खूप क्लोजअपही नाही. बहुतांश सीन्स मधे धरम बरोबरच तो ही आहे फ्रेममधे. पण जयाला बघून त्याला जो धक्का बसतो तो त्याच्या एक्स्प्रेशन्स मधे बघावा. सलीम-जावेदच्या पिक्चर्स मधे पटकथाच नव्हे तर दिग्दर्शनही तेच करत अशी शंका येईल इतका एकसंधपणा आहे अमिताभच्या मॅनरिजम्स मधे, निदान जंजीर, दीवार, शोले, त्रिशूल आणि काला पत्थर मधे.
भानु गुप्ता चा हार्मोनिका ,
डबल पोस्ट.
५० वर्षं?! या सिनेमाची जादू
५० वर्षं?! या सिनेमाची जादू टाइमलेस आहे!!
सलीम-जावेदने याचे संवाद ‘ऑन प्रेम’ - सेटवरच लिहिले असं अनुपमा चोप्राच्या पुस्तकात वाचल्याचं आठवतं. ते लक्षात घेता त्यातली अफाट कॅरेक्टर डेव्हलपमेन्ट आणखीनच अमेझिंग वाटायला लागते!
आणि हे लहानमोठ्या सगळ्या पात्रांना लागू होतं!
जय-वीरूच्या प्रत्येक संभाषणातली ‘पते की बात’ जयच्या तोंडी येते. आणि जया भादुरीशी जुळलेला त्याचा बंध अक्षरशः ‘शब्दांवाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले’ प्रकारचा आहे. त्यांच्यातच नव्हे, ठाकुरने ते ‘सेन्स’ करणंही!
बाकी असरानी, सूरमा भोपाली, हन्गल/सचिन वगैरे उपकथानकं आज इतक्या ‘तबीयत’ने कोणी लिहिली तर तो वेड्यात निघेल, पण यात ती कशी सुरेख विरघळून जातात!
टाकीवरून वीरू बरळतो तसं ‘इस कहानी में ड्रामा है, ॲक्शन है, इमोशन है…’
मॅजिक! प्युअर मॅजिक!!
>>> सलीम-जावेदच्या पिक्चर्स
>>> सलीम-जावेदच्या पिक्चर्स मधे पटकथाच नव्हे तर दिग्दर्शनही तेच करत अशी शंका येईल इतका एकसंधपणा आहे अमिताभच्या मॅनरिजम्स मधे,
अगदी!!!
अवांतर: अमजद खानचा आवाज गब्बरसाठी पुरेसा दमदार नाही म्हणून त्याला रीप्लेस करायची सूचना सलीम-जावेद यांनी वारंवार केली होती म्हणे, त्यामुळे वैतागून अमजदने पुन्हा कधी त्यांच्याबरोबर काम केलं नाही.
बाकी ब्लूपर्सबद्दल बरंच लिहिलं गेलंय - गावात वीज नसताना टाकी कशी काय, गब्बरचे डाकू अनाज गोळा करून काय दळणकांडण करून खाणार होते का इत्यादी. के सगळे जमेस धरूनही
याची जादू कमी होत नाही! खरा कल्ट सिनेमा!
कल्ट सिनेमा हा चपखल
कल्ट सिनेमा हा चपखल शब्दप्रयोग आहे
सगळे जमेस धरूनही
गावात वीज नसताना टाकी कशी काय, गब्बरचे डाकू अनाज गोळा करून काय दळणकांडण करून खाणार होते का...
>>>>>
अश्या गोष्टी कधीच चित्रपट बघताना जाणवत नाहीत. हे नंतर लोकांनी उगाच मजा म्हणून उकरून काढले असते. अन्यथा जो डाकू गावात येऊन बिनधास्त अनाज घेऊन जातो त्याला पकडायचेच झाल्यास सरकार कधीही पकडू शकते. बरे तो घनदाट जंगलात सुद्धा लपत नाही. उघड्यावर अड्डा असतो. बसंतीला सुद्धा तसेच उघड्यावर नाचायला लावतात. शौचालाही तसेच उघड्यावर बसत असतील. अमिताभ आणि धर्मेंद्र कुठलाही गूगल नकाशा न वापरता पटापट त्यांच्या अद्द्यावर पोहोचतात. ते सुद्धा गाणे संपायच्या आत पोहोचता येते. हात कापायच्या सीन मध्ये ठाकूर सुद्धा रमतगमत पोहोचतो. मला पुरेसा फौजफाटा दिला असता तर मी जाऊन पकडून आलो असतो गब्बरला. जर मी हे करू शकतो तर ठाकूर सुद्धा नक्कीच करू शकला असता. पण आपण हे बघायला थिएटरमध्ये गेलो नसतो. पिक्चर हा पिक्चर सारखाच बनवावा लागतो. त्यामुळे अश्या सो कॉलल्लड ब्लूपरना काही अर्थ नाही असे मला वाटते.
अमिताभच्या डोळ्यांतील थंडपणा
अमिताभच्या डोळ्यांतील थंडपणा ही भानगड संजीव कुमार आणि धर्मेंद्रच्या पहिल्यांदा डोक्यावरूनच गेली असेल.
गावात वीज नसताना टाकी कशी काय
गावात वीज नसताना टाकी कशी काय, >> ती पाण्याची टाकी असेल ना. ग्रावीटि ने पाणी खाली येत असेल. एकदा परत बघते.
रेड ईन्डिअन स्क्वा असते तशी एखादी म्हातारी दळून भाकर्या थापत असेल. मॅकेनाज गोल्ड टाइप. असे वाटते. तिथे एक खिच्डी उकडवायचे भांडे व आग दिसत.
>>> ग्रावीटि ने पाणी खाली येत
>>> ग्रावीटि ने पाणी खाली येत असेल.
हो, पण टाकीत शिरत कसं असेल?
टाकीला झाकण नसेल, पावसाचे
टाकीला झाकण नसेल, पावसाचे पाणी साठवत असतील
“ टाकीत शिरत कसं असेल?” -
“ टाकीत शिरत कसं असेल?” - मोहन ने बांधलेल्या झरना-पाईप मेकॅनिझम मधून / रेन हार्वेस्टिंग / पृथ्वी स्वतः भोवती फिरताना अपसाईड डाऊन झाल्यामुळे - अश्या काही शक्यता आहेत.
“ मॅजिक! प्युअर मॅजिक!!” -
“ मॅजिक! प्युअर मॅजिक!!” - टोटली!!
Pages