तांत्रिक कारणाने फोटो अपलोड करू शकत नाहीये. लेख खालील फेसबूक ग्रूप वर तुमचा अभिषेक या नावाने पूर्वप्रकाशित आहे. जो माझाच एक आयडी आहे. फोटो तिथे बघू शकता.
https://www.facebook.com/share/p/VN1VoZd8N4XYUU1D/?mibextid=oFDknk
लेख मात्र इथेच वाचा
--------------------------------
सारभात आणि मासे!
श्रावणात सारभात आणि तळलेल्या माश्याच्या तुकडीचा फोटो शेअर करतोय त्याबद्दल क्षमस्व. पण आमच्यात चालते. आम्ही श्रावणात चिकन मटण खात नाही पण मासे खातो. अर्थात हे घरच्यांचे झाले. मी स्वतः मात्र नास्तिक असल्याने मांसाहार आणि देवधर्माचा आपापसात संबंध न जोडता कुठलाही सणवार न जुमानता वर्षभर खातो. आणि देव मानत नसलो तरी एका गोष्टीसाठी देवाचे आभार जरूर मानतो की त्याने मला योग्य घरात जन्माला घातले. कारण मला दारू सिगारेट, गुटखा तंबाखू, पानसुपारी, बिडीकाडी कसलेच व्यसनं नाही. पण सारभाताचे आहे.
हो व्यसन हाच योग्य शब्द आहे, कारण व्यसनात जसे थांबायचे कुठे हे कळत नाही तसे मला सारभात खाताना थांबायचे कुठे हे कळत नाही.
एखादा आवडीचा पदार्थ खाऊन तृप्त झाल्यावर आपण म्हणतो की पोट भरले बाबा पण मन नाही भरले.. पण सारभात खाताना माझे पोट सुद्धा भरत नाही. कळतच नाही अन्न नेमके कुठे जाते. आता हे शेवटचे चार घास म्हणून थोडा थोडा भात घेतो आणि घेतच राहतो, खातच राहतो. गळ्यापर्यंत कधी येतच नाही. मी सारभात खायला बसलो की बायको मुद्दाम शेजारी बसते आणि भाताच्या दर दोन राऊंड नंतर मला थांबायची आठवण करून देते. असे करायला तिला मीच सांगितले आहे. कारण कधीतरी आतड्यावर ताण येऊन ते पटकन फाटेल अशी भीती कायम वाटते. पण प्रत्यक्षात मात्र प्रत्येक वेळी इतके तुडुंब जेवून सुद्धा कधी जळजळ मळमळ एसिडीटी अपचन, कुठलाही त्रास आजवर झाला नाही.
पोटभर जेवून बसलो आहे आणि त्यानंतर सारभाताचे ताट समोर आले तर मी पुन्हा जेवतो. ते ही पूर्ण ताट भरून जेवतो. यात एका शिताचीही आतिशयोक्ती नाहीये. रात्री उशीरा कधीतरी वडील घरी येतात, मला झोपेतून उठवतात, आणि मी त्यांच्यासोबत ताट घेऊन पुन्हा बसतो. माझे जेवण झाल्यावर मुलांना मासे सोलून देताना पुन्हा भूक चाळवते. मी पुन्हा एखादी माश्याची तुकडी घेऊन पुन्हा चार घास पोटात ढकललो. खरेच कळत नाही की कसे आणि कुठे जाते.. आणि एक सारभात मासे सोडले तर माझा स्वभाव सुद्धा हावरा नाहीये.
आंब्याला फळांचा राजा म्हणतात, अवीट फळ म्हणतात. पण प्रत्यक्षात जगात कुठलाही पदार्थ अवीट नसावा. कितीही आवडीचा पदार्थ असला तरी रोज रोज तेच कोण खाणार.. पण मी सारभात खातो. सकाळ संध्याकाळ खातो. सलग तीन चार दिवस खाणे हे तर नॉर्मल आहे माझ्यासाठी पण सलग सात आठ दिवस दोन्ही वेळा म्हणजे सलग १४ ते १५ वेळा जेवणात सारभात मासे खाण्याचा रेकॉर्ड आहे माझा. आमच्याकडे श्रावणात मासे चालतात यामागे कदाचित मीच कारणीभूत असेन. आपल्या घराण्यात माझ्यासारखा सारभात मासेखाऊ जन्माला येणार आहे हे पूर्वजांना आधीच समजले असावे.
जीन्स आणि तंबाखू मळल्याशिवाय मजा येत नाही तसे माश्याची तुकडी तळल्याशिवाय मजा येत नाही. त्यामुळे सार आवडीने खात असलो तरी मी सारातले मासे खात नाही. म्हणून आमच्याकडे माश्यांची डोकी सार करायला वापरतात. तर कधी कोलंबीचे सार करतात. पण सारभातासोबत तोंडी लावायला मासेचं हवेत असा हट्ट नसतो. तसेच सार माश्याचेच हवेत असाही हट्ट नसतो. तांबाटयाच्या सारासोबत सुद्धा फिश फ्राय तितकेच आवडते. तसेच जेव्हा मासे संपतात आणि तरी अर्धा टोप सार शिल्लक राहते तेव्हा पुढच्या दिवशी अंड्याचे आम्लेट, बटाट्याची पिवळी भाजी, कांदा-बटाटा भजी, भाजलेला सुका बोंबील या पैकी कुठलाही एखादा पदार्थ तोंडी लावायला घेऊन तो अर्धा टोप संपवायची हिम्मत मी राखतो.
प्रेमविवाहाचे दुष्परीणाम! दैव देते आणि कर्म नेते!
वर मी देवाचे आभार यासाठी मानले होते की मला योग्य घरी जन्माला घातले. पण जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मी काय केले? तर एका शाकाहारी मुलीशी लग्न केले.
लग्नानंतर ती मासे खायला शिकली. पण लुटेरी फक्त वाटेकरी झाली. मांसाहारी स्वयंपाक मला स्वतःलाच येत नाहीत तर तिला कुठल्या तोंडाने शिक म्हणून सांगणार होतो. त्यामुळे सारी मदार फिरून पुन्हा आईवरच उरली. आणि ती माझ्या ईतक्या प्रचंड आवडीला सुद्धा पुरून उरली. म्हणूनच आई स्पेशल असते.
मासे आहेत तर पैसे नाहीत, आणि पैसे आहेत तर मासे नाहीत. असे कधी आयुष्यात झाले नाही. म्हणजे लहानपणी पैसे फार नव्हते तरी मासे पोटात जायचे थांबले नाहीत. केक, चॉकलेट, आईसक्रीम असे लाड कधी झाले नाहीत. पण मासे खाताना आर्थिक परिस्थितीही कधी आड आली नाही.
पोटाचा (की आतड्याचा?) एक छोटासा आजार आहे. त्याने गेल्या काही काळात उचल खाल्ली आहे. भूक मंदावली, तर वजन कमी झाले आहे. मागच्याच महिन्यात एक छोटेसे ऑपरेशन सुद्धा झाले आहे. आजारामुळे म्हणा किंवा वाढलेल्या गोळ्यांनी म्हणा, संध्याकाळ झाली की पाण्याचा घोट जरी घेतला तरी थुंकून टाकावासा वाटावे ईतकी घाण चव तोंडाला यायची. दिवसा छान जेवण जायचे. आणि त्यावरच दिवस जायचा. कारण रात्रीचे जेवण बंद झाले होते. आयुष्य भरभरून जगायची आणि अन्नाचा प्रत्येक घास चवीचवीने खाण्याची आवड आहे मला, पण या आजाराने माझा ठाकूर केला होता. नेमके तेव्हाच सारभाताने मला हात दिला.
माहेरी जायचा विकेंड आला. तसे दर दुसर्या तिसर्या आठवड्याला जातो. पण यंदा आजारपणामुळे आणि मुलांच्या परीक्षांमुळे पाच सहा आठवडे लांबले होते. नेहमीच्या रुटीननुसार शुक्रवारी रात्री निघायचे ते थेट जेवायलाच पोहोचायचे. पण यावेळी आईला जेवण नको म्हणून सांगितले. आईने म्हटले, बरे.. पण आईच ती. पोहोचलो तेव्हा सारभात तयार होता. तांबाट्याचे सार आणि कांद्याची भजी. गेले काही दिवस, सॉरी गेले काही रात्री अन्नावरची वासना अशी उडायची की कित्येक आवडीचे पदार्थ नावडीचे झाले होते. पण सारभात बघून ईतक्या दिवसात पहिल्यांदा रात्रीचे काहीतरी खावेसे वाटले. ते देखील माश्याचे नाही तर साधे तांबाट्याचे सार.. पण सार कधी साधे नसतेच. दोन चार भज्या तोंडी लावायला घेऊन जवळपास टोपभर भात संपवला. म्हटले तर एक छोटासा चमत्कारच होता. ईतके दिवस आजाराने जे मन विटले होते ते अचानक प्रफुल्लित झाले. नैराश्यात आयुष्य संपतेय असे वाटताना जगण्याची नवीन आशा दिसावी असे झाले. जेवण होताच बायकोला फोन लावला आणि तृप्तीचा पहिला ढेकर तिला ऐकवला.
त्यानंतर जी ताणून दिली ते दुसर्या दिवशी दुपारीच उठलो. तेव्हा बिछान्याशेजारीच जे फोटोत दिसत आहे ते सारभात आणि माश्याच्या तुकडीचे ताट माझी वाट बघत होते. तिथून मग पुन्हा मागे वळून पाहिले नाही. चल रे बांगड्या टुणून टुणूक, आईकडे जाईन, सारभात खाईन, जाडजूड होईन ही बालपणीची कविता प्रत्यक्षात जगायला सुरुवात झाली. दोन दिवस तिथे खाल्ले आणि अजून चार दिवस पुरेल ईतके सार आईने सोबत दिले. रात्रीचे सुद्धा जेवण जाऊ शकते हा आत्मविश्वास त्या दोन दिवसात परत आला.
या लेखाचेही सार या प्रसंगातच सामावले आहे. तीच कृतज्ञता व्यक्त करायला हा लिखाण प्रपंच केला आहे. मनापासून आभार मानायचे आहेत. आईचे नाही. तिला गृहीत धरण्यातच या नात्याची मजा आहे. पण तिच्या हातचे आपल्याला सारेच आवडते म्हणून सारभाताला सुद्धा गृहीत धरले होते. पण आईच्या हातचाही एक पदार्थ असा असतो, ज्यापलीकडे जगात भारी काहीच नसते. माझ्यासाठी तो पदार्थ तिच्या हातचे सारभात आणि मासे आहेत हे पुन्हा एकदा नव्याने समजले.
तुझे लग्न एखाद्या कोळीणीशीच लाऊन द्यायला हवे ईथपासून, तुझे घर समुद्रातच बांधायला हवे, ते तुझ्या अंगात रक्त वाहते की सार ईथवर पीजे ऐकत मी लहानाचा मोठा झालोय. त्याला जबाबदार सुद्धा मीच आहे. कारण हलवा म्हटले की मला गाजरका नाही तर हलवा मासाच आठवतो, आणि सूरमयी शामला अगदी कालपरवा पर्यंत मी सुरमई समजत होतो. जेव्हा Crohn's Disease म्हणून माझ्या आजाराचे निदान डॉक्टरांच्या तोंडून ऐकले तेव्हा देखील अरे वाह Prawns, नाव तर मस्त आहे, असेच त्यांना म्हणालो होतो.
पण जोक्स द अपार्ट, आज एक गोष्ट मला समजली आणि ज्यांना पुर्ण लेख वाचूनही समजले नसेल त्यांच्यासाठी म्हणून ईंग्लिशमध्ये सांगतो,
सारभात अॅण्ड फिश, ईजे नॉटए जस्ट फूड... ईट्स ॲन इमोशन!
- तुमचा अभिषेक
अच्छा अनु, तुमचा टॅग मला
अच्छा अनु, तुमचा टॅग मला दिसला नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रीयाने Being मालवणीवर कॉमेंट टाकून टॅग केलेले पाहिले. तिथे रिप्लाय सुद्धा दिला.
पण आधीच मला ते माहीत होते. गेल्यावर्षीचे वविकर मायबोली आयडी चंपा यांनी निदर्शनास आणून दिले होते.
पण हे होतच राहते. कुठे मनावर घ्यायचे. म्हणून सोडून द्यायचे. फार तर बघा मी किती भारी लेख लिहीला जो कॉपी होऊ लागला म्हणून स्वतःची पाठ थोपटून खुश राहायचे.. जे मी नेहमीच करतो
मी कुठे टॅग केले मलाच आठवत
मी कुठे टॅग केले मलाच आठवत नाहीये![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![IMG_20240817_152855.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u60/IMG_20240817_152855.jpg)
![Screenshot_2024-08-17-15-30-36-604_com.android.chrome.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u60/Screenshot_2024-08-17-15-30-36-604_com.android.chrome.jpg)
तिथे त्याने लेखक तुमचा अभिषेक कोण माहीत नाही लिहिलं होतं म्हणून टॅग केलं.
अनू ओके..
अनू ओके..
ते माझे फार फार जुने प्रोफाईल होते. Deactivate केले होते. चुकून लॉगिन केले एकदा तर पुन्हा activate झाले. पुन्हा deactivate करायला हवे.
ओह ओके ओके, मला माहित नाही
ओह ओके ओके, मला माहित नाही.असो,लेख व्हायरल नावासाहित होतोय ही चांगली गोष्ट.
कालवण, आमटी, सांबर >> ह्या
कालवण, आमटी, सांबर >> ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत रे.
असामी, तुम्ही माझे नाव बघून
असामी, तुम्ही माझे नाव बघून थेट argument mode मध्ये शिरता
वर मी प्रतिसादात तसेच लिहिले आहे की वेगवेगळी नावे आणि वेगवेगळ्या पद्धती असतील.
लेखात लिंक दिली आहे त्यात फोटो बघा. ते जे दिसते त्याला आमच्यात सार म्हणतात.
जर ती लिंक उघडून त्यातील कॉमेंट पाहिल्या तर माश्याचे कालवण, आमटी, सांबर अशी वेगवेगळी नावे आणि पद्धतीचे उल्लेख जागोजागीच्या लोकांनी केले आहेत.
लेखातील फोटोत जे आहे त्याला आमच्यात सार म्हणतात, साधारण असेच पण घट्ट बांगड्याचे तिखले असते, अंड्याचे खेकड्याचे शिंपल्याचे कालवण असते, साधारण असेच कांद्याचे कालवण असते, चिकन मटणाचा रस्सा असतो, काळया वाटण्याचे सांबर असते, मसूरची आमटी असते, फोडणीची तिखट डाळ जी नॉनव्हेज सोबत सुद्धा छान लागते, शाकाहारी असेल तर आंबट वरण, नैवेद्याचे गोडे वरण ज्यावर तूप सोडले जाते, अजून एक माझी फेवरेट कुळदाची पिठी असते, दह्याची वा कोकमाची कढी असते..
मागे डाळ काहीच्या काही महाग झाली होती तेव्हा मायबोलीवर एका धाग्यात मी लिहिले होते की भातावर घ्यायचे इतके सारे पर्याय आहेत की डाळ नसली तरी अडत नाही.
अट्टल मासेखाऊ समजला जाणारा
अट्टल मासेखाऊ समजला जाणारा मालवणी माणूस तळलेला मासा म्हटलं की सोबत सोलाकडी, कुळथाची पिठी किंवा डाळीची आमटी यापलीकडे विचार करतच नाहीं. पण, मुंबईत आमच्या घरी टोमाटोलाही यात घुसवलं तें आमच्या एका मावशीने. तीही मूळची मालवण जवळचीच पण लग्न होवून विरार - वसई भागात स्थायिक झालेली व तिथेच ह्या प्रकाराला चटावलेली. ती ह्याला ' सार' नाहीं, टोमॅटोचा रस्सा म्हणायची. तिची रस्सा बनवायची पद्धत मी शॉर्ट कट काढून वापरतो, ती पद्धत अशी -
मिक्सरच्या रमोठ्या भांड्यात टोमॅटो, हिरव्या मिरच्या, आलं - लसूण पेस्ट, थोडा कांदा, कोथिंबीर व खोबरं थोडंसं पाणीघालून
बारीक वाटून घ्यायचं. हिंग, मोहरीची फोडणी ( शक्यतो, तुपात ) करून त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, मीठ घालून चांगला परतून घ्यायचा. थोडी हळद , किंचित लाल तिखट व चिमुटभर गुळ घालून मग मिक्सर मधलं वाटण त्यात ओतून, मंद आचेवर अधून मधून ढवळत शिजवून घ्यायचं. कोथींबीर पेरून गरमा गरम रस्सा भाताबरोबर किंवा सूप म्हणूनही फस्त करायचा !!
अर्थात, जिभेवरचे मूळचे मालवणी संस्कार इतके खोलावरचे आहेत की तळलेले मासे व त्याबरोबर सोलकढी/ कुळथाची पिठी / डाळीची आमटी याला आमचा अग्रक्रम असतोच !!
कढी आमच्याकडे जेवणासोबत
कढी आमच्याकडे जेवणासोबत ताकासारखी नुसती पितात. मासे असो किंवा चिकन मटण दोन्ही जेवणात प्यायला आवडते. मी बरेचदा मटणाचा रस्सा आणि कढी मिक्स करून भातावर घेतो.
पिठी सोबत जवळा, सुकट, सुके बोंबील आवडतात.
आणि तिखट डाळीचा नंबर माश्याचे सार किंवा चिकन रस्सा संपल्यावर लागतो. कारण ज्यात माश्याचे किंवा चिकनचा फ्लेवर उतरला आहे त्याला पाहिले प्राधान्य देतो मी
याच कारणाने मला उकडलेल्या अंड्याचा अंडा मसाला नाही तर उकळत्या कालवणात अंडी फोडलेला प्रकार आवडतो.
*त्याला पाहिले प्राधान्य देतो
*त्याला पाहिले प्राधान्य देतो मी * - जो जे वांच्छिल तें तो लाहो !!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आज ब्राऊसरवरून लॉगिन झाले.
आज ब्राऊसरवरून लॉगिन झाले. त्यामुळे लगेच फोटो टाकला.
>>>>>>तर उकळत्या कालवणात अंडी
>>>>>>तर उकळत्या कालवणात अंडी फोडलेला प्रकार आवडतो.
साबा करत.
>>>>>>तर उकळत्या कालवणात अंडी
>>>>>>तर उकळत्या कालवणात अंडी फोडलेला प्रकार आवडतो.
साबा करत.
@भाऊ नमसकर - पाककृती दिल्याबद्दल धन्यवाद.
मस्त लिहिलंयस.
मस्त लिहिलंयस.
सामी, तुम्ही माझे नाव बघून
सामी, तुम्ही माझे नाव बघून थेट argument mode मध्ये शिरता >> तुझे नाव नाहीतर तुझ्या लेखामधल्या जनरल सरसकटीकरण करण्याच्या प्रकाराला argument करत होतो. सोशल मिडीयावरच्या कमेंट्सपेक्षा जनरली हे पिढ्यापिढ्या वापरलेले शब्द्प्रयोग जास्त प्रमाण वाटतात मला.
मुंबईत आमच्या घरी टोमाटोलाही यात घुसवलं तें आमच्या एका मावशीने. तीही मूळची मालवण जवळचीच पण लग्न होवून विरार - वसई भागात स्थायिक झालेली >> बरोबर भाऊ. टॉमॅटो किंवा चिंच माशांचा वास कमी करण्यासाठी वापरणे ही उत्तर कोकणामधली खासियत आहे.
सोशल मिडीयावरच्या
सोशल मिडीयावरच्या कमेंट्सपेक्षा जनरली हे पिढ्यापिढ्या वापरलेले शब्द्प्रयोग जास्त प्रमाण वाटतात मला.
>>>>>
जनरली पिढ्यानपिढ्या वापरलेले शब्द प्रयोगच आपल्याला सोशल मीडिया कॉमेंट मधून समजतात. आपल्या महाराष्ट्रात गावागावात इतकी विविधता आहे की हे सार, कालवण, आमटी, सांबर कुठे कश्याला म्हणतात हे कुठल्या पुस्तकात किंवा शब्दकोशात सापडणार नाही. म्हणून मी त्या प्रत्येक कॉमेंटला त्या त्या जागेचे प्रमाण मानतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लेख!
मस्त लेख!
जबरदस्त लेख. अशीच सेम अवस्था
जबरदस्त लेख. अशीच सेम अवस्था माझी व्हायची आजीच्या हातची सुरमई फ्राय आणि कालवण खाताना. आता आजी थकली जेवण बनवत नाही. पण आम्ही सगळ्यांनी हा आयटम खाताना आज्जीचं नाव काढावं म्हणून आज्जी कोणाला ती रेसिपी सांगत नाही. विचारलं की गालातल्या गालात हसते
असो. धन्यवाद रुन्मेश जुन्या आठवणी जागवल्याबद्दल.
या आज्या अश्याच असतात बोकलत..
या आज्या अश्याच असतात बोकलत.. माझी आजी सुद्धा मटणाचा काढा बनवायची. मटणाचा सारा अर्क त्यात उतरायचा. त्याचे सिक्रेट सुद्धा ती आपल्या सोबत घेऊन गेली. आजवर ती चव जीभेवर आहे. पण तिच्या पश्चात कुठे सापडली नाही.
आज माहेरून शाकाहारी सारभाताचा
आज माहेरून शाकाहारी सारभाताचा स्टॉक आला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमचे तांबाट्याचे सारे देखील अगदी माश्याच्या सारासारखेच दिसते आणि ते नुसते सूप म्हणून प्यावे अश्या चवीचे नसते. फेसबुकवर बरेच लोकांच्या डोळ्यासमोर टोमॅटो सूप सारखा पदार्थ आला होता. त्यामुळे आज पहिले या साराचा फोटो काढला
तरीही नॉट आउट ? लंचला
इथे क्रिकेट येणं अपरिहार्य आहे -![20211107_195502.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u13291/20211107_195502.jpg)
तरीही नॉट आउट ? लंचला सारभात आणि मासे खावून इथे डुलक्या काढता की काय !
व्यंगचित्र छान भाऊ पण सारभात
व्यंगचित्र छान भाऊ पण सारभात आणि मासे खाऊन कधीच डुलक्या येत नाहीत. माझ्यातरी कधीच ते जेवण अंगावर येत नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऋन्म्या - पिपल मॅनेजमेंट
ऋन्म्या - पिपल मॅनेजमेंट १ओ१. नेवर कामेंट्/क्रिटिसाय्ज फोक्स सपोर्टिग योर अजेन्डा.. होल्ड ऑन टु योर थॉट्स, इवन इफ यु आर राइट...
Yup yup. I read it as pimple
मी गडबडीत पिंपल मनेज मेंट वाचले.
देसी टोमा टो आणलेत पण स्वयंपाकाचा मूड नाही घर व फ्रिज रिकामे करा यचे आहे. बघू नव्या घरुन
राज, एवढे इंग्लिश समजत नाही.
राज, एवढे इंग्लिश समजत नाही. पण तुम्ही म्हणता तर योग्यच असेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
*सारभात आणि मासे खाऊन कधीच
*सारभात आणि मासे खाऊन कधीच डुलक्या येत नाहीत. * - माझा समज उलटा होता.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पण तुम्ही म्हणता तर योग्यच असेल !
हा युनिव्हर्सल रुल नाहीये भाऊ
हा युनिव्हर्सल रुल नाहीये भाऊ. म्हणून तर पुढच्या वाक्यात माझ्यातरी लिहिले आहे. किंबहुना लेखात सुद्धा हेच लिहिले आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
*हा युनिव्हर्सल रुल नाहीये
*हा युनिव्हर्सल रुल नाहीये भाऊ...* - मान्य!!
Pages