अमेरिकन ग्रॉसरी मधील हॉट फूड

Submitted by च्रप्स on 15 August, 2024 - 17:04

हा प्रसंग आहे एका मित्राच्या भेटीचा, ज्याने अमेरिकेत नुकतंच एक इंडियन ग्रोसरी स्टोअर विकत घेतलं आहे. त्याने मला तिथे भेट देण्याची रिक्वेस्ट केली होती. मी म्हटलं, चला, भारतीय दुकानात जाऊन पाहावं! म्हणून एक दिवस त्याच्या दुकानात गेलो. दुकान पाहून मला खूप आनंद झाला, जणू काही ‘पटेल ब्रदर्स’चं छोटं वर्जन पाहिलं.

मात्र, एक गोष्ट लक्षात आली की तिथे फक्त समोसेच विकत होते. आता समोसांवर चहा नसला तर काय मजा? त्यामुळे मी त्याला विचारलं, "अरे, फक्त समोसेच? चहा कुठे आहे? मला तर वाटतं, इथे एक छोटी कँटीन सेटअप करायला हवी!"
अमेरिकेतल्या इतर इंडियन ग्रोसरी स्टोअर्समध्ये लहान किचन सेटअप असतं, जिथे हॉट फूड शिजवतात आणि कस्टमर्सना विकतात. यावर तो पटकन म्हणाला, "हो हो, आम्ही ते करायचं ठरवलं आहे. आणि आपल्याला ते करावं लागेल कारण हे केल्यावर आमचं बरंचसंच ग्रॉसरी वेस्ट होणार नाही!"

हे ऐकून मला थोडा धक्का बसला. मी विचारलं, "अरे, काय बोलतोयस?" तो म्हणाला, "हे बघ, हे कोथिंबीर आहे. उद्यापर्यंत हे वाया जाईल, फेकावं लागेल. ही वांगी पण दोन दिवसात खराब होतील…पण जर आमच्याकडे किचन असलं तर, आम्ही हे घालून भाज्या शिजवू शकतो आणि कस्टमर्सना सर्व करू शकतो!"

आता माझ्या डोक्यात विचार आला. म्हणजे ते ताजं फूड नाही, तर हे "वाचवलेलं फूड" आहे! म्हणजेच, ज्यावेळी व्हेजिटेबल्स वाया जाण्याच्या बेतात असतात, त्या व्हेजिटेबल्स वापरून जेवण बनवलं जातं आणि मग ते फ्रीजरमध्ये ठेवलं जातं.

आता इमॅजिन करा, तुम्ही दुकानात जाऊन हॉट मील मागता, आणि ते "फ्रेश” मील खायला मिळतं, पण खरं तर ते वाया गेलेल्या व्हेजिटेबल्सपासून बनवलेलं असतं, ज्यांना फ्रीजरमध्ये दिवसेंदिवस साठवलं जातं.
अशी ठिकाणं अव्हॉइड करणं कदाचित चांगलं कारण व्हेजिटेबल्सचं शेल्फ लाइफ ठराविक असतं, पण त्याच व्हेजिटेबल्स जेव्हा करीमध्ये घालून शिजवल्या जातात आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा पुन्हा विकल्या जातात, तेव्हा ते हेल्थसाठी हार्मफुल ठरू शकतं.

तर, पुढच्या वेळेस टू गो घेताना किंवा तिथे काही खायला जाताना दोनदा विचार करा! खायला मिळेल , पण ‘फ्रेश’ मिळते का विचार करा…

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे मला ओळखीच्या इंडियन रेस्टॉरंटावाल्याने ‘अनलिमिटेड बफे‘ विषयी सांगितलं होतं. पण ते ‘थोडं’ खराब/शिळं व्हायला लागलेल्या/झालेल्या भाज्यांविषयी होतं.

आम्ही घरी पण ग्रोसरी आणलेली फुकट जाऊ नये म्हणून शिजवून खातो. सगळं एक्सपायरी डेट च्या आधी संपवायचा आटापिटा. बाकी जीवनाचे तरी दुसरं काय असतं! एक्सपायरी डेट पर्यंत जगून घ्यायचं!

बाकी जीवनाचे तरी दुसरं काय असतं! >>> ही पोस्ट काहीच्या काही फॉर्वर्ड्स मधे हलवावी काय? Proud

लेखाने विचारात पाडलं आहे.

पण खराब न झालेल्या भाज्या वगैरे खराब व्हायच्या आत वापरुन केलेला पदार्थ लगेच कस्टमर्सना विकला तर त्यात चुकीचं काय आहे?

हो, आपण घरी पण तेच करत असतो,बीन्स खूप आहेत, किंवा कांदा पात खूप आणलीय, खराब होण्यापूर्वी पिठलं करू.
शिवाय अमेरिकेत असल्याने कोणतीही स्टोअर्स नीट कायद्याच्या,स्वास्थ्य नियमाच्या कक्षेत राहूनच करत असतील सर्व(अशी आशा करू.)
हॉटेल्स च्या भटारखान्यात डोकावले तर प्रत्येक ठिकाणी 1 दिवस जुनी भाजी परत थोडे तेल चीज मसाला मारून 'हॉटेल्स स्पेशालिटी' म्हणून खपवली असेल.त्या मानाने फक्त एक्सपायरी जवळ आलेल्या भाज्या वापरून ताजं अन्न बनवून विकणे हा फारच निरागस अपराध वाटेल.

सायो +१

बरं जिथे ताज्या भाज्या मिळतात त्या पण कुठे तरी दूर पिकवल्या जाऊन शेवटी आलेल्या असतात. म्हणाजे "टजं" ही व्याख्या परत बदलली Happy

अनुसायो - तर, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा, तुम्हाला चिकन करी बनवायची आहे. ठीक आहे. आणि तुम्ही काय कराल? तुम्ही ताजं चिकन आणाल, ज्याचा एक्सपायरी डेट थोडा लांब आहे. आणि तुम्ही त्याचं चिकन करी बनवाल. आता, किराणा दुकानं काय करत आहेत? ते चिकन विक्रीसाठी ठेवतात, आणि एक्सपायरी डेटच्या शेवटच्या दिवशी किंवा कदाचित एकदा ते संपल्यानंतर, ते त्याचं करी बनवतात. तुम्हाला कसं कळणार की ते संपलेलं आहे? ते आधीच पॅकेटमधून बाहेर आहे. तुम्ही काहीही करून ते शोधू शकत नाही. आणि याच कारणामुळे, बऱ्याचदा चव खराब लागते….

संपल्यावर असेल तर कठीण आहे.यावर कायदेशीर नियम हवेत(एक्सपायरी डेट च्या 2 दिवस आधी वापरलेच पाहिजे/एक्सपायरी डेट च्या दिवशीच वापरले तर फ्रीज मधून काढून लगेच शिजलेच पाहिजे).हे नियम पाळले जातात का हे रोज कोणी बाहेरच्या एजन्सी ने येऊन तपासणं पण अवघड आहे.स्वतःच्या 'खराब लागतं आहे' जाणिवेवर विसंबून पुढच्या वेळी ते हॉटेल टाळणे हा एकच उपाय दिसतो.
एथिकली हॉटेल्स ने हे करायला नको.

खराब होऊ घातलेल्या/उद्या न वापरू शकत असलेल्या भाज्या वापरून पदार्थ बनवणे & तो लगोलग विकणे ह्यात काहीच गैर नाही आणि तो पदार्थ शिळा पण म्हटला जात नाही.

पण सडकी टमाटी/भाजी घालून पदार्थ बनवला/ खराब होऊ घातलेल्या/उद्या न वापरू शकत असलेल्या भाज्या वापरून पदार्थ बनवला आणि लगेच न विकता दुसर्‍या दिवशी विकला तर ते अयोग्य आहे, पण रेस्तराँ वाले सर्रास करतात..

अमेरिकेत सगळे ग्रोसर्स मीट एकस्पायार व्हायला आलं की त्यावर रंग लावतात, त्याची साईड बदलतात, एक लेअर काढतात, अप सायकल करतात... आणि अशा अनेकोनेक क्लृप्त्या करतात. त्यावर रेडीओवर एक रिपोर्ट/ nefli डॉक्यू होती. लिंक सापडली तर देतो.
आता होल फूड करत नाही आणि ट्रेडर जोज करत नाही अशा पोस्ट ला काही अर्थ नाही. माझं वैयक्तिक मत असे सेफ असले तसे जरूर करावे आणि जो भयानक फूड वेस्ट होतो तो कमी करावा. अनेक गोष्टीवर बेस्ट बिफोर सेल डेट असते. ती एक्सपायरी नाही.
कॅलिफोर्नियात नीट लिहिलं तर डेट उलटून गेल्यावर विकता येतं. ही वाटते तितकं वाईट समस्या नाही, देसी लिमिटेड तर अजिबातच नाही. सार्वत्रिक आहे.

वेळ./अंतर इत्यादी कारणानी आठवड्याची खरेदी (फळे/ भाज्या / मांस) बहुतेक वेळा एकदाच केली जाते.
त्यात शेतात पिकलेला माल, दुकानात पोहोचेपर्यंत किती दिवस लागतात हे आपल्याला महीत नसतेच.
दर्शनी खराब दिसत असेल, तर आपण तो घेत नाही, पण घरी आणलेल्या भाज्या आठवडाभर शिळ्या होतच असतात.
इथे अमेरिकेत farm to table शक्य नाही. भारतातही शहरातून हे शक्य नाही.
... तेव्हा विश्वास असेल तिथे आपल्याला आवडेल तोच माल घ्यावा, याला पर्याय नाही.
त्यावरून आठवलं. मिसळ हा पदार्थ पूर्वी 'काल उरलेला माल' एकत्र करून देण्यामुळे तयार झाला. त्यात बटाट्याची भाजी/ पोहे/ उसळ इत्यादी जे काही उरेल ते टाकलं जातं.. आणि खूप लोक आवडीने वेगवेगळ्या ठिकाणी मुद्दाम मिसळ खायला जातात.. (चालू द्या...)

>>पण ‘फ्रेश’ मिळते का विचार करा…<<
पुर्वि दहिसर नाक्याच्या पुढे एका धाब्यावर कस्टमर दाखवेल ती कोंबडि तंदूरमधे शिजवुन द्यायचे, आता क्ल्पना नाहि. तुम्हाला या लेवलचा फ्रेशनेस अपेक्षित आहे काय? Wink

राज
आमच्या इथे भायखळा Renault हॉटेल जिवंत मासे असेच आधी दाखवून मग बनवून मिळतात. वडील तसेच आणतात.

अमा खेकडे जिवंतच असताना घ्यायचे. मग फ्रीझरमध्ये ठेवुन द्यायचे की मरतात. किंवा मग उकळत्या पाण्यात टाकायचे असतात.

या लेवलचा फ्रेशनेस अपेक्षित आहे काय? >> भाज्या बिचार्‍या स्वतः म्हणुन अजिबात आवाज किंवा हालचाल करत नाहीत.. Happy