Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फारच सुंदर लिहिलं आहे अस्मिता
फारच सुंदर लिहिलं आहे अस्मिता.
एक अमृतानंदाचा अनुभव दिलात.
चित्त तृप्त झाले वाचून
अस्मिता, छान लिहिल आहेस
अस्मिता, छान लिहिल आहेस
अस्मिता,
अस्मिता,
धन्यवाद.
तुम्ही लिहिलेला मजकूर डॉ. आगाशे आणि किशोर कदम यांना पाठवतो आहे.
सुमित्रा मावशींना हे वाचून आनंद झाला असता.
अस्मिता, छान लिहिले आहेस. अस
अस्मिता, छान लिहिले आहेस. अस काहीतरी पण लिहित जा - सुंदर काहीतरी उलगडून दाखवणारे. सिनेमा नितांत सुंदर आहेच पण तुझी पोस्टही नेमकं काहीतरी वेचून देणारी आहे.
कुळाचा निर्वंश झाल्याची चर्चा होते >>> मला काहीसं वेगळं वाटलं. लोक चर्चा करतात पण रामजीला राग वेगळ्याच कारणासाठी आलेला असतो. नातू झाला तर त्याच्या रुपाने मुलगा परत आल्याचे तुट्पुंजे का होईना पण समाधान मिळायची त्याची वेडी आशा असते. पण ती नात झाल्याने फोल ठरते. त्याच्या दु:खात आशाभंगाची (आशाभंगच, अपेक्षाभंग नाही) भर पडते त्याने त्याला राग येतो. शेवटी त्याला जाणवतं की जन्म मरण हा तर खेळ आहे. तो खेळ ज्याने रचलाय तो कधी मुलगा बनतो तर कधी मुलगी, कधी माणूस तर कधी गाय. तसं नसतं तर मग तो खेळ खेळणारा अनंत, अमर्यादीत कसा झाला असता?
मला भरूनच आले चिनूक्स. /\
मला भरूनच आले चिनूक्स. /\
हे रस ग्रहण भारी आहे. वाचून
हे रस ग्रहण भारी आहे. वाचून चित्रपटा बद्दल काही कल्पना झाल्या. त्याला तडा जाऊ नये म्हणून पिक्चर बघणे नाही,
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट! असे नको व्हायला +११
खूपच छान post अस्मिता.
चिनुक्स ह्यांचा लेख वाचलेला असल्यामुळे थोडीकल्पना होती चित्रपटची.
तू खूप सुंदररित्या उलगडले आहेत धागे.
Admin,
Admin,
कृपया हे सगळे नवीन धाग्यावर देता येईल का?
बावळटासारखे'मुका घ्या मुका'वर नुकताच नवीन धागा काढल्याने मला प्रशस्त वाटत नव्हते. पण आता ही एक सुरेख स्मृती झाली आहे. मी इतरांचे पोस्ट कॉपी पेस्ट करणे अधिक्षेप केल्यासारखे वाटते. शिवाय ते सुंदर दिसत नाही. क्राफ्ट सुंदर दिसावे असे मनापासून वाटते.प्लीज, प्लीज, प्लीज
मी वाट बघेन, निदान कळवा हो/नाही. मग मी नेईन हे स्वतंत्र धाग्यावर.
कित्ती छान लिहिले आहे अस्मिता
कित्ती छान लिहिले आहे अस्मिता. हा नक्कीच बघायचा आहे. बघू कधी योग येतो. त्यांचे सगळेच चित्रपट आवडतात. अस्सल व्यक्तिरेखा असतात त्यात.
अस्मिता, सुंदर लिहिले आहेस.
अस्मिता, सुंदर लिहिले आहेस.
सुंदर रसग्रहण अस्मिता.
सुंदर रसग्रहण अस्मिता.
अस्मिता
अस्मिता
अॅडमिनना सुद्धा शक्य होणार नाही माझ्या मते. नुकताच धागा काढल्याने नवा धागा काढायची भीड हे अगदीच समजू शकतो.
पण स्वतःला सुद्धा कुठे तरी जाणवत असतं कि हे बाळ खासच आहे. तर भीड चेपून त्याला बागडू द्यावं. शोधायला सोप्पं जातं.
मी माझ्या वाढदिवसादिवशी
मी माझ्या वाढदिवसादिवशी थिएटरमध्ये मुंज्या पाहिला आणि बरीच घाबरले.पण मग दुसऱ्या वेळी पाहताना भीती नाही वाटली. >>> वाढदिवसाच्या दिवशी थेटरात जाऊन हा पिक्चर बघितला, धन्य आहेस, हाच मुहुर्त मिळाला तुला.
अस्मिता दिठीचं खरंच वेगळ्या धाग्यावर लिही, इथे हरवून जाणार.
माधव यांची पोस्ट समजली पण मला
माधव यांची पोस्ट समजली पण मला असे वाटते की रामजी सध्याच्या लिबरल व्याख्येनुसार सगळे चेकमार्क्स चेक करणारा असायची गरज नाही. नातू/नात बद्दल त्याला जे वाटते ते चुकीचे असले तरी बर्यापैकी प्रातिनिधिक आहे. वास्तविक अशा व्यक्तीचे मत नंतर बदललेले दाखवण्याचा जास्त सकारात्मक परिणाम होईल.
* इथे "लिबरल" म्हणजे राजकीय बाफवर लिहीतात त्या लोकांबद्दल नाही. एकूण विचारस्वातंत्र्य/व्यक्तीस्वातंत्र्य/आधुनिक विचार वाले. चांगल्या अर्थाने.
अस्मिता,सुरेख रसग्रहण!
अस्मिता,सुरेख रसग्रहण!
मागे तू आमोद सूनासि झाले याचा अर्थ सांगितला होतास.त्याबद्दल खूप धन्यवाद! कित्येक वर्षांचा घोळ त्यामुळे मिटला.
हर्ष, मोद सारखा आमोद समानार्थी शब्द वाटत होता.
खरंय.वाढदिवसादिवशी बघणे वाईट
खरंय.वाढदिवसादिवशी बघणे वाईट कल्पना होती.
अस्मिता, परीक्षण मस्त आहे.वेगळा धागा कर.
अस काहीतरी पण लिहित जा -
अस काहीतरी पण लिहित जा - सुंदर काहीतरी उलगडून दाखवणारे. सिनेमा नितांत सुंदर आहेच पण तुझी पोस्टही नेमकं काहीतरी वेचून देणारी आहे.
>>>> धन्यवाद माधव.
तुमच्या पोस्टीतल्या शेवटच्या चार ओळी फार सुंदर आहेत. पण त्या आधी जे लिहिले आहे तसे मला अजिबात जाणवले नाही. टोकाची उद्विग्नता आलेली असताना माणूस आततायी निर्णय घेतो आणि उद्विग्नता दूर झाली की चूक उमगते तसे काही वाटले.
धन्यवाद सर्वांना:
मागे तू आमोद सूनासि झाले याचा
मागे तू आमोद सूनासि झाले याचा अर्थ सांगितला होतास.त्याबद्दल खूप धन्यवाद! कित्येक वर्षांचा घोळ त्यामुळे मिटला.
>>>>देवकी तै
एक अमृतानंदाचा अनुभव दिलात.
चित्त तृप्त झाले वाचून
>>> ज्ञानेश्वरीत ऊर्जा आहे. 'परि अमृतातेहि पैजासी जिंके' या अर्थाने तो गोडवा अवीट आहे.
Admin कशाला वेगळ्या धाग्याला
Admin कशाला वेगळ्या धाग्याला नाही म्हणत इल? हल्लीच असा पिसं काढणारा एक धागा आलाय ना?
वेगळा धागा काढायला जितका वेळ लावाल तेवढे कॉपी करायचे प्रतिसाद वाढतील.
आणि अशा दुसऱ्या स्वतंत्र आवृत्तीला तेवढे प्रतिसाद मिळत नाहीत. पण संदर्भ मूल्य वाढतं. पटकन शोधता येतं.
तेव्हा काढून मोकळ्या व्हा.
बरं.
बरं.
@mi_anu: मला तरी भीतीदायक
@mi_anu: मला तरी भीतीदायक वाटला नाही. म्हणजे हे हॉरर जे आहे ते सुरुवातीपासूनच आहे ते शेवटपर्यंत. अचानक अंगावर येणारे jump scare म्हणतात तसे नाही. एकच वैगुण्य ते म्हणजे कमालीचा संथपणा. art movie च्या सीमेवर आहे हा चित्रपट. इकडेच कुठे लिहिले हिते की तुंबाड पेक्षा भारी असेल, ते वाक्य मागे घेतो.
ओके.म्हणजे थोडा भूतकालम सारखा
ओके.म्हणजे थोडा भूतकालम सारखा असेल.
काढला का नवीन धागा दिठीचा ?
काढला का नवीन धागा दिठीचा ?
न राहवून किल्ला पहायला सुरूवात केली. हा सिनेमा पाहताना त्याबद्दल काय बोलू काय नाही असं होतं.
गेल्या वेळीही असंच झालं होतं, पण आवरलं होतं.
या वेळी शक्य होणार नाही. आधी ते उतरवून काढेन मग दिठीचं पूर्ण परीक्षण वाचेन.
हो. धाग्यावर या.
हो. धाग्यावर या.
https://www.maayboli.com/node/85463
दिठी
bhutkalam हिंदी आहे का
bhutkalam हिंदी आहे का कोणत्या ott वर?
आठवत नाही.पण कथा साधी सोपी
आठवत नाही.पण कथा साधी सोपी आहे.हिंदी ऑडिओ नसेल तरी व्यवस्थित कळेल सबटायटल ने.
फिर आई हसीन दिलरुबा ओटीटी वर
फिर आई हसीन दिलरुबा ओटीटी वर पहिला.पूर्ण वेळ तोंडातून 'काहीही, असं कसं होईल, इतकं सोपं असतं का?' वगैरे उद्गार येत होते तोंडातून. विकी कौशल चा भाऊ अजिबात विकी कौशल सारखा दिसत नाही.
नेटफ्लिक्सवर ‘सावी’ पाहिला.
नेटफ्लिक्सवर ‘सावी’ पाहिला.
अनेक वर्षांपूर्वी पुण्यात एक प्रसिद्ध कोचिंग क्लासेस होते. त्याच्या चालकांना गाण्याची आवड होती, पण गाता यायचं नाही. मग ते दर वर्षी क्लासचं गॅदरिंग ठेवायचे. मुक्ख्य कार्यक्रम ह्यांची गाणी आणि त्यांच्या मुलाचे डान्सेस (ह्यातून जागा उरली तर इतर विद्यार्थ्यांना एखाद-दुसरा कार्यक्रम). दोन-तीन प्रोफेशनल गायकांना बोलावलं जायचं, जे स्टेजच्या मागच्या भागात, प्रेक्षकांकडे पाठ करून उभे रहायचे. आणि क्लासच्या चालकांच्या गाण्याला उचलून त्याची नैय्या पार पाडायचे.
सावी हा असाच भुषण कुमारने आपल्या बायकोच्या प्रेमासाठी काढलेला आणि अनिल कपूरच्या खांद्यावरून वाहिलेला सिनेमा आहे.
अनिल कपूर मस्तच आहे त्यात
अनिल कपूर मस्तच आहे त्यात.स्टोरी अतिशय अचाट वाटली.ती मुख्य लीड चांगली आहे.हर्षवर्धन ला शोपीस चे काम आहे.शेवट असाच लोंबत ठेवलाय.
अनु +१ ओढुन ताणून दुसरा भाग
अनु +१ ओढुन ताणून दुसरा भाग आणलाय अस काहीही चालल होत..सनी कौशलची अॅक्टिन्ग बरी आहे पण त्याच स्टायलिग अस ओल्ड स्कुल टाइप का केल होत ते माहिती नाही...
फेफ
फेफ
Pages