Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
विसर्जन गटग
विसर्जन गटग
“ म्हणजे त्या दिवशी त्या
“ म्हणजे त्या दिवशी त्या मिरवणुकीत आपण जवळपासच होतो” -
मनमोहन देसाईच्या सिनेमाचा सीन वाटतोय. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
“ विसर्जन गटग” -![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कुंभ का मेला,
कुंभ का मेला,
पुणे की विसर्जन मिरवणूक
किंवा
5-star चे सुनील-अनिल
म्हणजे त्या दिवशी त्या
म्हणजे त्या दिवशी त्या मिरवणुकीत आपण जवळपासच होतो
>>
मै भी... (तिसरीत असेन बहुतेक)
यांना देवाच्या रोलमध्ये बघतच
यांना देवाच्या रोलमध्ये बघतच मोठी झाल्यामुळे अभिनय हा मापदंड वगैरे नाही , त्याहीपलीकडे ते कुठेतरी जवळचे आहेत मनाच्या .. त्यांच्या वागण्यामुळे झालेला मनस्ताप बराच काळ आत होता तो आज लिहिला गेला एवढंच
>>
माणसाला देवपण दिलं आणि कुठेतरी त्याचं माणूसपण दिसलं की ते मोराच्या पायाप्रमाणे खुपतं. त्यामुळे कुणालाच अती डोक्यावर चढवू च नये. It's unfair on their side too...
सीतेच्या रोल करणाऱ्या शोभना समर्थ ला लोकांनी सिगरेट ओढताना पाहिलं अन् शिव्या घातल्या. यात चूक सर्वस्वी लोकांची आहे. रील लाईफ ला रिअल लाईफशी ओव्हरलॅप न केलेलं बरं...
विश्वजीत मला आयकॅंडी नाही
विश्वजीत मला आयकॅंडी नाही वाटत. फार फार तर संक्रांतीला लुटतात ती छोटी, पिवळ्याधोप गुळाची ढेप जिला ब्राऊन रंगाच्या गुळाचा खमंगपणा नसतो.>>>
माझेमन
राम म्हणजे अरूण गोविल कधीही राम वाटला नाही.>>> नाही हो, अखिल भारतीय जनता निदान ८०% त्याला खरा राम समजून एयर्पोर्टावर ही साष्टांग वगैरे घालायची. मला वाटतो तो राम, एवढंच काय, लक्ष्मण पण लक्ष्मण वाटतो. सीतेचे उच्चार सदोष होते. हनुमान, रावण, कैकयी, कौशल्या रोल ला फिट. भरत १ घार्या डोळ्यां वाला होता (एकाच भावाचे डोळे घारे कसे हा प्रश्न दशरथाला नसेल का पडला? असो)
बाकी रामाचा/क्रुष्णाचा किंवा महान व्यक्ती चा रोल करणार्यांने प्रत्यक्ष आयुष्यात पण तसे आयडीयल असायला हवे हा कसला बालिश अट्टहास![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अॅनिमल मधला रनबीर कपूर रामाचा रोल करतोय म्हणे.. मला खात्री आहे तो बेस्ट च करेल, कारण अभिनय एवन.
सनी देओल हनुमान आहे त्यात.
सनी देओल हनुमान आहे त्यात.
माणसाला देवपण दिलं आणि
माणसाला देवपण दिलं आणि कुठेतरी त्याचं माणूसपण दिसलं की ते मोराच्या पायाप्रमाणे खुपतं. त्यामुळे कुणालाच अती डोक्यावर चढवू च नये >>> १००++
काशिनाथ घाणेकरांना शिवरायांच्या वेशात सिगारेट ओढताना पाहून बाबासाहेब पुरंदरे नाटकामधून निघून गेले होते. हा प्रसंग पिक्चरमध्ये दाखवला आहे.
हनुमान, रावण, कैकयी, कौशल्या रोल ला फिट. >>>
मंथरेला विसरलात का लोकहो.... ललिता पवार यांच्यापेक्षा कोण जास्त सूट झाले असते या रोलसाठी?
आणि महाभारतामध्ये अर्जून (त्याचे खरे नावच आठवत नाही), पंकज धीर (कर्ण), मुकेश खन्ना (भीष्म)
पंकज धीर रूबाबदार, देखणा आहे
पंकज धीर रूबाबदार, देखणा आहे पण अभिनयाच्या नावाने ठणाणा.
कर्ण जॅकी श्रॉफ सारखा असावा. अर्जुन रामपाल चालेल.
लोकहो. तुम्ही वर्गणी काढून फंडिंग करत असाल तर रामायण. महाभारत वर दहा चित्रपट बनवतो. आतापर्यंत फक्त स्क्रिप्ट रायटिंग चा किडा होता आता दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न पडतेय.
पहिला सिनेमा धोधो चालला कि मग त्यातून भांडवल काढून पुढचा सिनेमा बनवूयात. तुमच्या दहा रूपयांच्या शेअरची किंमत सहजच १००० रूपये होईल. डिव्हिडंडच दहा रूपयांवर वीस रूपये मिळेल.
बघा. संधी पुन्हा पुन्हा येत नाही.
मला अर्जुन म्हणून जॉन अब्राहम
मला अर्जुन म्हणून जॉन अब्राहम चालेल.थोडा मोठा वाटेल पण कर्ण म्हणून अजय देवगण.तो कर्णाचं शल्य डोळ्यातून चांगलं दाखवेल. रणवीर सिंग काहीच पौराणिक कॅरेक्टर म्हणून चालणार नाही.(पण बाजीराव छान केला होता त्याने.) कपूर पण चालणार नाही.या दोघांनाही खूप बोहेमीयन टपोरी मनस्वी व्हाईब आहे.
सीता म्हणून मृणाल दुसानिस चालेल(तो आमचा(मी आणि साबा) बरीच वर्षं क्रश आहे.), द्रौपदी म्हणून तापसी किंवा क्रिती.
बाकी पात्रांचा अजून विचार नाही केला.संजय म्हणून तो रजत कपूर(दिल चाहता है मधला महेश अंकल) चालेल.
इतके अठरापगड कलाकार एकत्र कसे येणार हे मात्र विचारू नका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
राम म्हणून फार कोणी डोळ्यासमोर येत नाहीये.युधिष्ठिर म्हणून तो साऊथ मधला अजिथ किंवा आता बातम्यांत असलेले शिल्ड न लावता गोळी मारून सिल्व्हर मेडल जिंकलेले टर्की चे गृहस्थ चालतील.
राम म्हणून आता बातम्यांत
राम म्हणून आता बातम्यांत असलेले शिल्ड न लावता गोळी मारून सिल्व्हर मेडल जिंकलेले टर्की चे गृहस्थ चालतील. >>> फारच म्हातारे नाही का वाटणार? नेमबाजीच बघायची असेल तर अर्जुन म्हणून बेस्ट ....राम म्हणून जयम रवी चालेल (पोन्नीयीन सेल्वन)
संजय म्हणून तो रजत कपूर(दिल चाहता है मधला महेश अंकल) चालेल >>> मला विदुर म्हणून आवडेल. शांत संय्यमी.
द्रौपदी म्हणून तृषा चालेल. ऐश्वर्या याज्ञसेनी नाही वाटणार. तिला माद्री करून टाका. ती म्हणे फार सुंदर होती. आलीया भट्ट मला सुभद्रा म्हणून चालेल.
अजय देवगणपेक्षा मला मवा किंवा विक्रम (आदित्य करिकालन) आवडेल कर्ण म्हणून.
त्या कार्तीला पण कुठेतरी बसवा.
आपली ती ही राहिली
आपली ती ही राहिली
अनुष्का शेट्टी. तिला कुंती म्हणून घेऊ.
मृणाल देव माद्री किंवा पांचाली
दोन्हीतील पात्र एकत्र करू म्हणजे तुफान गर्दी होईल.
मृणाल देव आता म्हातारी दिसेल
मृणाल देव आता म्हातारी दिसेल पांचाली म्हणून.
तिला म्हातारी म्हटले तर आयडी
तिला म्हातारी म्हटले तर आयडी उडेल.
देवबाई चिरतरुण आहेत ना,
देवबाई चिरतरुण आहेत ना, देवानंद प्रमाणे?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिमन्यू म्हणून बाबील खान ला आणि उत्तरा म्हणून अनन्या पांडे ला घेऊन टाकू. छोटे रोल्स आहेत.
भीष्म म्हणून सेतुपती किंवा मामुटी किंवा कमल हसन.
सगळ्या भूमिका एकटाच करू शकेल
सगळ्या भूमिका एकटाच करू शकेल असा नटसम्राट आहे आपल्याकडे.
धोका एकच आहे, कंटाळा आला चाललो मी घरी ही धमकी कधीही देऊ शकतो.
सगळ्या भूमिका एकटाच करू शकेल
सगळ्या भूमिका एकटाच करू शकेल असा नटसम्राट आहे आपल्याकडे.
धोका एकच आहे, "कंटाळा आला चाललो मी घरी" ही धमकी कधीही देऊ शकतो.
बाबील खान चालेल. अनन्या पांडे
बाबील खान चालेल. अनन्या पांडे नकोच. फार मठ्ठ आहे ती. तृप्ती डिमरी चालेल. ती लहान दिसू शकते.
रणबीर कपूर अश्वत्थामा म्हणून चालेल का? एकांडा शिलेदार म्हणून बरे काम करतो तो. आणि लहानपणीचा गरीब अश्वत्थामा म्हणून इतर कुणाला तरी घेता येईल.
शकुनी म्हणून आमिर खान
हर्षवर्धन राणेला पण कुठला तरी रोल द्या बरं का.
गश्मिर चालेल राम म्हणून
गश्मिर चालेल राम म्हणून
रोहीत शेट्टी ला डायरेक्टर करू
रोहीत शेट्टी ला डायरेक्टर करू
अजय देवगण कर्ण असेल तर शल्य म्हणून संजय मिश्रा ला घेईल तो...
तेजोभंग वाला सीन अशक्य कॉमेडी करतील
तेवढाच ट्विस्ट...
सोबत शिशुपाल वगैरे रोल मधे मुकेश तिवारी येईल
मग चक्रव्यूहात शल्य शिशुपाल ला म्हणेल 'रंगीला रतन जॅकी श्रॉफ, जस्ट चील'
कुठलाही डायलॉग नसलेल्या सदातिसाव्या कौरवाचा रोल तुषार कपूर ला देता येईल
कुठलाही डायलॉग नसलेल्या
कुठलाही डायलॉग नसलेल्या सदातिसाव्या कौरवाचा रोल तुषार कपूर ला देता येईल >>>
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कौरवांत बरेच आयकँडी घुसवता येतील. (प्लीज नोट तुषार कपूरला मी आय कँडी म्हटलेलं नाही)
बाबो
बाबो
आता हे पुढचं धमाल किंवा ऑल द बेस्ट व्हर्जन बनण्याकडे वेगाने चालू आहे.
मृत्युंजयातला कर्ण आठवत
मृत्युंजयातला कर्ण आठवत असल्याने पंकज धीर कधीच आवडत नाही. आणि अनु, अजय देवगण? …. आठव, आठव मृत्युंजयमधला कर्ण.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
त्या दिशा पाटाणीला पण घ्या की. किती नाजुक व सुंदर आहे! आदिती राव हैदरीला पण घ्या. बाप्ये काहीकेल्या आठवेनात आत्ता.
द्रौपदी म्हणून तापसी किंवा
द्रौपदी म्हणून तापसी किंवा क्रिती.
>> >>>> लीप सर्जरी अगोदरची चित्रांगदा सिंग
कर्ण>>> प्रभास (हिंदी डब्बिंग नीट करा फक्त)
कुठलाही डायलॉग नसलेल्या
कुठलाही डायलॉग नसलेल्या सदातिसाव्या कौरवाचा रोल तुषार कपूर ला देता येईल >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
विसर्जन मिरवणूक गटग व मनमोहन
विसर्जन मिरवणूक गटग व मनमोहन देसाई संदर्भ दोन्ही चपखल आहे
कारण तेथे किमान तीन माबोकर होते (कदाचित अजूनही असतील) पण कोणालाच माहीत नव्हते ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
5-star चे सुनील-अनिल >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कुठलाही डायलॉग नसलेल्या सदातिसाव्या कौरवाचा रोल तुषार कपूर ला देता येईल >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
या दोघांनाही खूप बोहेमीयन
या दोघांनाही खूप बोहेमीयन टपोरी मनस्वी व्हाईब आहे.>>>> खूप हसले....काही केल्या हे काँबी इमॅजीन होत नाही
अनू कसं सुचतं तुला हे?
कुठलाही डायलॉग नसलेल्या सदातिसाव्या कौरवाचा रोल तुषार कपूर ला देता येईल >>> अँकी
तरी अॅईओ करेलच ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कसले सुटलेत माबोकर महाभारत
कसले सुटलेत माबोकर महाभारत कास्ट करण्यात![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मृनाल ठाकुर नाही सुचली कोणाला. १ रोयल नाजूक पणा आहे चेहर्यात.
दिशा चीप वाटते.
ते वाक्य ना, काही गोष्टी
ते वाक्य ना, काही गोष्टी एक्स्प्लेन करता येत नाहीत.मला रणवी+बी र दोघेही बायपोलर वाटतात.म्हणजे कितीही प्रॉस्थेटिक वापरले तरी त्यांना गंभीर किंवा मोठ्या व्यक्ती चरित्र रोल्स मध्ये बघताच येत नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जरा उमामी फ्लेवर समजावून सांगता येत नाही, खाऊन अनुभवावा लागतो तसं
कळलं जरासं..
कळलं जरासं..
रनवीर बाजीराव कॅरॅक्टर मधे बाजी मारून जातोय असं वाटतानाच दुश्मन ची वाट लावली म्हणुन नाचायला लागतो.. मग मूड जातो तसं.
Pages