Submitted by मुग्धमानसी on 26 July, 2024 - 13:16
श्वासांच्या पाठीवरती
दु:खाची हळवी रेघ
जगण्याचे कातर मेघ
जे कधी बरसले नाही!
आकाशाच्या दरबारी
फत्थरही उजळून जावे
निर्वात कुणी मोजावे
जे कधी प्रकाशत नाही!
आश्वस्त नदीच्या काठी
पहुडले कितीक किनारे
ते तिच्यात बुडले सारे
पण तिच्यात भिजले नाही!
ओलेत्या रात्रीपाशी
एकांत बोचरा निजतो
डोळ्यांना मिटवू धजतो
पण क्षणांस विझवत नाही!
एकेक पळाच्या पाठी
जगण्याची घरंगळ माळ
ओटीत बांधला काळ
जोवरी उजाडत नाही!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
क्या बात है! मस्त!!
क्या बात है! मस्त!!
वाह Intense
वाह
Intense
धन्यवाद
धन्यवाद
>>>
>>>
ओलेत्या रात्रीपाशी
एकांत बोचरा निजतो
डोळ्यांना मिटवू धजतो
पण क्षणांस विझवत नाही!
एकेक पळाच्या पाठी
जगण्याची घरंगळ माळ
ओटीत बांधला काळ
जोवरी उजाडत नाही!
अप्रतिम
वाह! क्या बात है
वाह! क्या बात है
खूप सुंदर..!!
खूप सुंदर..!!
केवळ सुंदर...
केवळ सुंदर...
धन्यावाद!!
धन्यवाद!!
सुंदर!
सुंदर!
वाह! मनस्वी.
वाह! मनस्वी.
क्या बात है!
क्या बात है!
निव्वळ अप्रतिम...!!
निव्वळ अप्रतिम...!!
पुन्हा पुन्हा वाचली.
धन्यवाद!
धन्यवाद!